कुलाबा किल्ल्याची माहिती Kolaba Fort Information in Marathi

Kolaba Fort Information in Marathi कुलाबा किल्ला माहिती मराठी कुलाबा हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील कुलाबा या कोकण भागामध्ये आहे या किल्ल्याजवळचे मुख्य शहर अलिबाग alibag fort हे आहे आणि हा किल्ला मुंबई पासून जवळ जवळ ३० ते ३५ किलो मीटर आहे. कुलाबा हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला अरबी समुद्रामध्ये वसलेला आहे. कुलाबा या किल्ल्याला किल्ला इ कुलाब या नावांनी देखील ओळखले जाते. ज्या समुद्र किनारपट्टी वर हा किल्ला वसलेला आहे त्या किनारपट्टीला अष्टागर किनारपट्टी म्हणतात आणि कुलाब या किल्ल्याला त्या किनारपट्टी वरील राजा म्हंटले जाते.

Kolaba fort information IN marathi
Kolaba fort information IN marathi

कुलाबा किल्ल्याची माहिती Kolaba Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावकुलाबा, किल्ला इ कुलाबा
प्रकारजलदुर्ग
समुद्रअरबी समुद्र
किनारपट्टीअष्टागर
ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील अलिबाग जवळील कुलाबा येथे आहे
स्थापनाइ. स. १६५२
संस्थापकछत्रपती शिवाजी महाराज
किनारपट्टी पासूनचे अंतर२ किलो मीटर
चढाई श्रेणीमध्यम
किल्ल्यावरील प्रेकशणीय ठिकाणेगणपती मंदिर, दरवाज्यावरील आणि भिंतीवरील कोरीव नक्षीकाम, महिषासुर मंदिर, पद्मावती मंदिर आणि गोड्या पाण्याचा तलाव, वाडा, सर्जेकोट आणि महा दरवाजा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी समुद्रातून होणाऱ्या आक्रमणांना उत्तर देण्यासाठी आणि रयतेचे समुद्रातून येणाऱ्या शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी समुद्रामध्ये अनेक किल्ले जिंकले आणि बांधले देखील आणि जिंकलेले किल्ले वापरता यावे महणून त्याची डाकडूजी केली किवा पुनर्बांधणी केली त्यामधील एक ऐतिहासिक महत्व असणारा किल म्हणजे कुलाबा (किल्ला इ कुलाबा).

कुलाबा किल्ला माहिती मराठी – information about kolaba fort in marathi

कुलाबा हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील अलिबाग जवळील कुलाबा येथे आहे. कुलाबा हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला अरबी समुद्रामध्ये अष्टागर किनारापट्टी वर वसलेला आहे. कुलाबा या किल्ल्याला किल्ला इ कुलाबा असे देखील संबोधले जाते. कुलाबा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६५२ मध्ये बांधला आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील एक महत्वाचा किल्ला होता. या किल्ल्याची उंची २५ फुट आहे आणि हा किनारपट्टी पासून २ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्रामध्ये चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला हा ऐतिहासिक किल्ला पर्यटकांच्या दृष्टीने हा एक म्हण्तावाचा किल्ला आहे.

या किल्ल्याच्या भोवती तटबंदी बांधलेली आहे आणि या भिंतींवर प्राणी, पक्षी आणि तोफखाना या सारखे नक्षीकाम करण्यात आले आहे आणि मुख्य दाराच्या कमानीवर वाघ, हत्ती, मोर यासारखी कोरीव नक्षी बनवलेली आहे त्याचबरोबर या किल्ल्याला एकूण १७ बुरुज आहेट आणि त्यामधील १४ बुरुज अजूनही मजबूत आहेत. कुलाबा या किल्ल्याच्या चारही बाजूला जरी खारट पाण्याचा समुद्र असला तरी या किल्ल्यावर आपल्याला गोड्या पाण्याचे तलाव पाहायला मिळतात. इ. स. १७५९ मध्ये राघोजी आंग्रे यांनी बांधलेले श्री गणेश मंदिर देखील आपल्याला या किल्ल्यावर पाहायला मिळते.

किल्ल्यावरील बुरुजांची नावे : दारूखाना, नगारखाना, गोलंदाज, सूर्य, मडीका, नाल, भवानी, यशवंतंतरी, बापदेव, गणेश, दर्या, घनाचक्र, हनुमंत, गणेश आणि फत्ते अशी त्यामधील काही  बुरुजांची नावे आहेत.

कुलाबा किल्ल्याचा इतिहास  – Kolaba fort History in Marathi

कुलाबा हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील कुलाबा जिल्ह्यामध्ये इ. स १६५२ मध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्री आक्रमणे रोखण्यासाठी तसेच समुद्रातून येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला आहे. कुलाब या किल्ल्याचे नाव संस्कृत शब्द कुल आणि आप या नावावरून कुलाबा हे नाव पडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यासाठी २ सेनापती नेमले दर्या सारंग आणि मयनाक भंडारी त्यानंतर पहिला सरखेल कान्होजी आंग्रे किल्ल्याचा सेनापती झाला. कुलाबा या किल्ल्यावर ब्रिटीश तसेच पुर्तुगीजांच्या सैनिकांनी खूप वेळा हल्ले केले पण कान्होजी आणि त्यांच्या सैनिकांनी त्यांचा प्रत्येक वेळी पराभव केला. कान्होजी आंग्रे यांना याच किल्ल्यावर जुलै ४ जुलै १७२९ वीर मरण आले. पण इतिहासामध्ये पहिले तर कुलाबा हा किल्ला नेहमीच आग अपघातांचा बळी ठरला.

इ. स. १७५३, इ. स. १७५९, इ. स. १७७० आणि इ. स. १७८७ या किल्ल्यावर मोठ्या आगी लागल्या होत्या आणि इ. स. १७५३ च्या आगीच्या घटनेमध्ये मध्ये कान्होजीचा मुलगा मनाजी आंग्रे यांचे घर पूर्णपणे जळाले त्याचबरोबर इ. स. १७७० मध्ये ४ बुरुजांना आग लागून मोठे नुकसान झाले.

कुलाबा किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे 

 • मुख्य दरवाजा :

या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला महादरवाजा म्हणतात. या किल्ल्यामध्ये येण्यासाठी दोन दरवाजे आहेत एक अलिबाग शहराच्या दिशेने थोंड करून आहे आणि दुसरा पूर्वेकडे आहे. किल्ल्याचा पूर्वेकडील दरवाजा हा मुख्य दरवाजा आहे आणि या दरवाज्याच्या कमानीवर आपल्यला वाघ, हत्ती, मोर यासारख्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची कोरीव नक्षी बनवलेली पाहायला मिळते त्याचबरोबर कमानीवर गणेशाचे शिल्प देखील पाहायला मिळते. या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाची रचना दोन बुरुजांच्या मध्यभागी केलेली आपल्यला पाहायला मिळते.

 • गोड्या पाण्याचा तलाव :

कुलाबा किल्ल्य्वर एक गोड्या पाण्याचा तलाव पाहायला मिळतो ज्याला पायऱ्यांचा किवा पुष्करणी तलाव देखील म्हणतात. हे तलाव आपल्याला गणेश मंदिरा जवळ पाहायला मिळतो. या तलावातील पाण्याचा उपयोग पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी केला जात होता.

 • अंधारावाव :

अंधारावाव हि एक किल्ल्यावरील विहीर आहे ज्यामधील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जायचा.

 • देवी गुलबाई मंदिर :

आपल्याला किल्ल्यामध्ये आत गेल्यानंतर गुलबाई देवी किवा महिषासुरमर्दिनी चे मंदिर पाहायला मिळते. हे गुलबाई देवीचे मंदिर आकाराने छोटे आहे आणि या मंदिरातील मूर्ती खूपच वेगळी आहे. या मूर्तीला चार हात आहेत आणि तिने चार हातामध्ये एक शस्त्र, परळ, म्हशीची जीभ आणि शेपूट धरली आहे असे या मूर्तीचे स्वरूप असण्याचे कारण या देवीने महिषा नावाच्या राक्षसाचा वध केला होता.

 • गणेश मंदिर :

या मंदिरामध्ये गणेश मूर्ती सोबत सूर्य, विष्णु, शिव आणि देवी यांच्या मुर्त्या देखील आहेत. या मंदिराची स्थापना इ. स. १७५९ मध्ये राघोजी आंग्रे यांनी बांधले आहे.

 • इतर मंदिरे :

या किल्ल्यावर आपल्याला पद्मावती देवी मंदिर, शिव मंदिर आणि हनुमान मंदिर देखील पाहायला मिळते. शिव आणि हनुमान मंदिर हे गणेश मंदिराजवळ पाहायला मिळते.

 • वाडा :

देवीच्या मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्यला २०० पूर्वी बांधलेल्या पडलेल्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात.

 • कान्होजी घुमटी :

मराठा साम्राज्याचे पहिले सरखेल कोन्होजी आंग्रे यांच्या नावाने असलेली किल्ल्यावर आपल्यला एक घुमटी पाहायला मिळेल. कोन्होजी घुमटी हि बहुतेक कान्होजी आंग्रे यांच्या काळातच बांधली असावी.

 • सर्जेकोट :

कुलाबा या किल्ल्याच्या शेजारी एक किल्ल्यासारखी रचना आहे. याला चार बाजूला चार बुरुज आहेत आणि प्रवेश दार आहे.

 • कुलाबा किल्ल्यावर आपल्याला ब्रिटीश काळातील तोफा पाहायला मिळतात.

कुलाबा किल्ल्याजवळी प्रेक्षणीय ठिकाणे 

 • मॅग्नेटीक वेधशाळा
 • अलिबाग बीच
 • पुष्कर कुंड
 • कनकेश्वर देवस्थान
 • कान्होजी आंग्रे समाधी
 • नागाव बीच
 • वरसोली बीच
 • मुरुड जंजिरा किल्ला
 • मांडवा

कुलाबा किल्ला फोटो:

Kolaba fort
Kolaba fort

कुलाबा किल्ल्यावर कसे जायचे – how to reach kolaba fort

 • कुलाबा या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपण मुंबई , पुणे या शहरातून बसने अलिबागला जावू शकतो आणि तेथून आपण स्थानीक बसने किवा टॅक्सीने कुलाबा मध्ये जावू शकतो. मुंबई ते कुलाबा हे अंतर ३० ते ३५ किलो मीटर आहे.
 • किल्ल्याजवळी किनारपट्टी वर गेल्यानंतर तेथे किल्ल्या पर्यंत जाण्यासाठी बोटीने जावे लागते.
 • पुणे ते कुलाबा : चिंचवड – देहु – लोणावळा – खोपोली – पेन – वाडखान – पोयनाड – अलिबाग – कुलाबा किल्ला.
 • मुंबई ते कुलाबा : मुंबई – कुर्ला – नवी मुंबई – उलवे – चीमर – पेन – वाडखान – पोयनाड – अलिबाग – कुलाबा किल्ला.

टीप

 • महादरवाज्यातून आत गेल्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण कार्यालय आहे तेथे आपल्यला किल्ला पाहण्यासाठी तिकीट घ्यावे लागते.
 • किल्ल्याला भेट देण्याची वेळी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत.
 • किल्ला पाहण्यासाठी कमीत कमी २ तास लागतात.
 • या किल्ल्यामध्ये फोटो किवा व्हीडीओ करायचा असेल तर २५ रुपये शुल्क आकाराला जातो.
 • या किल्ला पाहण्यासाठी भारतीय पर्यटकांच्या कडून ५ रुपये प्रवेश शुल्क घेतला जाते आणि विदेशी पर्यटकांच्या कडून १०० रुपये प्रवेश शुल्क घेतला जातो.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, कुलाबा किल्ला kolaba fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. kolaba fort information in marathi pdf हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about kolaba fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही कुलाबा किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या kolaba killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही kolaba fort alibag information in marathi त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!