थॉमस अल्वा एडिसन Thomas Edison Information in Marathi

Thomas Edison Information in Marathi थॉमस अल्वा एडिसन माहिती मराठी आपण शाळेमध्ये असल्यापासून एक प्रेरणादायी कथा ऐकत आलो आहोत. ती म्हणजे, एक मुलगा असतो ज्याला अभ्यासात अजिबात रस नसतो, जो थोडा बुद्धीने मंद असतो, ज्याला फारसे नीट ऐकायला सुद्धा येत नसते. एकदा त्याचे शिक्षक त्याच्याकडे एक चिठ्ठी देतात आणि घरी गेल्यावर आईकडे देण्यासाठी सांगतात. तो मुलगा आईला चिठ्ठीमध्ये काय लिहिलय हे विचारतो, तेव्हा त्याची आई त्याला सांगते, यामध्ये असं लिहिलंय की “तुमचा मुलगा फार हुशार आहे”. आमच्याकडे त्याच्यासाठी उत्तम प्रकारचे शिक्षक नाहीत त्यामुळे तुम्ही त्याला घरीच शिकवा”.

तेव्हापासून त्याची आई त्याला घरीच शिकवू लागली. काही वर्षानंतर जेव्हा तो मुलगा मोठा होतो तेव्हा घरातील कपाटात काहीतरी शोधत असताना त्याच्या हाताला ती चिट्ठी सापडते. तेव्हा त्याला समजतं की ही चिठ्ठी त्याच्या शिक्षकाने दिलेली आहे.

जेव्हा तो ती चिठ्ठी वाचतो त्यामध्ये असे लिहिलेले असते की, “तुमचा मुलगा खूप मंद आहे त्याला आमचे शिक्षक शिकवू शकत नाहीत तेव्हा तुम्ही त्याला घरीच शिकवा”. हा मुलगा म्हणजेच थॉमस एडिसन. ज्याने दिव्याचा शोध लावून संपूर्ण जग प्रकाशात आणले. जगातील महान शास्त्रज्ञ आणि संशोधकापैकी एक. ज्याचे नाव संशोधनाचे पिता म्हणून समोर येते. ज्याच्या नावावर विश्वातील सर्वाधिक 1094 शोधांच्या नोंदी आहेत.

thomas edison information in marathi
thomas edison information in marathi

थॉमस अल्वा एडिसन माहिती मराठी – Thomas Edison Information in Marathi

थॉमस एडिसनमाहिती
जन्म11  फेब्रुवारी 1847
जन्म ठिकाण यु एस मधील मीलान
अवार्ड्सहॉल ऑफ फेम फोर ग्रेट अमेरिकन
शोधफोनोग्राफ
पेटंट1093
मृत्यू18  ऑक्टोंबर 1931

जन्म :  

थॉमस एडिसन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1847 रोजी यु एस मधील मीलान येथे झाला. लहानपणी ताप आणि ऐकण्याचा त्रास असल्यामुळे ते आजीवन काही प्रमाणात बहिरे होते.

शिक्षण :  

यांना अभ्यासात रस नसल्यामुळे ते केवळ तीनच महिने शाळेत गेले. त्यानंतर त्यांच्या आईने त्यांना घरीच शिकवले. लहानपणापासून नवीन शोध लावण्यात त्यांचा रस होता. दिवसातील कित्येक तास ते प्रयोगशाळेत असत.

करियर :  

थॉमस एडिसन यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात वर्तमानपत्रे विकून, भाज्या विकून केली या पैशातून ते प्रयोगास लागणारी उपकरणे विकत घ्यायचा.

टेलीग्राफ ऑपरेटर :  

एडिसनने एकदा एक लहान मुलगा रेल्वे रुळावर खेळत असल्याचे  पाहिले. तेवढ्यात त्याला सामान भरलेला  ट्रक भरधाव वेगाने फाटकातून आत येताना दिसला. क्षणात त्याने त्या मुलाला बाजूला करून त्याचे प्राण वाचवले. तो मुलगा तेथील स्टेशन मास्तर चा होता. एडिसन चे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याने त्याला आगगाडीच्या तारा यंत्राचे शिक्षण दिले आणि त्याला स्टेशन वर टेलिग्राफ ऑपरेटर चे काम दिले.

इथेच त्याने प्रचालकांना शिवाय चालणाऱ्या एकच संदेश विविध ठिकाणी पाठवू शकणाऱ्या स्वयंचलित यंत्राचा शोध लावला. एडिसनने रस्त्यावर वर्तमानपत्रे विकण्याचा विशेष हक्क मिळवला. सोबतच त्याने ‘ग्रँड ट्रंक हेराल्ड’ नावाचे  वर्तमानपत्र चालू केले.

उद्योजक:  

थॉमस एडिसन याने 14 कंपनीची स्थापना केली. त्यातीलच एक म्हणजे ‘जनरल इलेक्ट्रिक’ जी जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात व्यापार करणारी कंपनी पैकी एक आहे. एडीसन याने स्वतंत्र उद्योजक म्हणून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये भागीदारी केली आणि उत्पादने तयार केली.

  1. कार्बन टर्मिनेटर
  2. ज्वलनशील दिवा                     
  3. किनेतोग्राफ
  4. किनेतोस्कोप      
  5. फोनोग्राफ  
  6. फ्लूएरोस्कोप 

थॉमस एडिसन ने quadraplex telegraph यंत्राची निर्मिती केली. जो एकाच वायरने दोन वेगवेगळ्या दिशेला सिग्नल प्रसारित करीत असे.

शोध :

फोनोग्राफ

1877 मध्ये आवाज रेकॉर्ड करण्यासाठी ही पद्धत विकसित केली गेली. या फोनोग्राफ वर पहिले शब्द बोलले गेले होते. ”mary had a little lamb”

विजेचा दिवा :   

विजेच्या दिव्यांचे तंत्रज्ञान संपूर्ण जगासाठी खुले करण्याचे श्रेय थॉमस एडिसन यांना दिले जाते. 1879 मध्ये त्याने लाईट बल्ब इन्वेनशन केले  एडिसनने सर्वांना परवडणारा, सहज हाताळता येणारा, टिकाऊ आणि सुरक्षित असा दिवा तयार केला आणि देशव्यापी वीजपुरवठ्याचे जाळे उभारले.

दिव्याचे घाऊक किमतीत उत्पादन आणि वितरण केले. यामुळे सर्वसामान्य माणसांनी विजेच्या दिव्याला आपलेसे केले. विजेच्या दिव्यात नवीन सुधारणा केल्या. मोठी मोठी जनित्रे बनवली. 1982 मध्ये जगातला पहिला मध्यवर्ती वीज निर्मिती प्रकल्प न्यूयार्क शहरात उभारला. एडिसनने चार्जिंग करता येण्याजोगा लोह आणि निकेल यांचा वापर करून अल्कधर्मी संचायक स्टोरेज बॅटरी तयार केली.

विजेचे पेन, तापमानातील अतिसुक्ष्म बदल दाखवणारा मायक्रो सीमीटर, धावत्या रेल्वे सोबत संपर्क साधण्यासाठी बिनतारी यंत्रणा याच्यानंतर एडिसनने रसायन क्षेत्रात सुद्धा काम केले आहे. एडिसनने benzine, carbolic आम्लं यांसारख्या रसायनांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारी संयंत्र उभारून उत्पादन करून पहिल्या महायुद्धाच्या काळात सहाय्य केले.  

1883 मध्ये त्याने धातूच्या तप्त राखेतून इलेक्ट्रॉन्स चा प्रवाह निघतो हा महत्त्वपूर्ण शोध लावला. हा शोध आधुनिक इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मध्ये महत्त्वाचा ठरला म्हणूनच या शोधाला ‘एडिसन इफेक्ट’ असे   नाव दिले गेले.  न्यूयॉर्कमधील ‘ गोल्ड अँड   स्टॉक ‘  तारायंत्र कंपनीत काम करत असताना तेथील यंत्रसामग्री आणि सेवा प्रणालीमध्ये त्यांनी अनेक महत्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या.  नोकरीतून उरलेल्या वेळेत  ते संशोधन करत असत. त्यातूनच  त्यांनी तारा यंत्रासाठी   जोडयंत्रणा  तयार  केली. त्यामुळे नेहमीच्या तारा द्वारे  अनेक पट  अधिक संदेश वहनाची  सोय झाली.

मोशन  पिक्चर : 

1896 मध्ये मोशन पिक्चर प्रोजेक्ट तयार करणारे एडिसन हे पहिले व्यक्ती होते.

मेनलो पार्क लॅबोरेटरी. :      

एडिसन याचा पहीला नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे ‘औद्योगिक संशोधन प्रयोगशाळा’. याची स्थापना 1876 मध्ये मेनलो पार्क येथे केली.

पेटंट :  

एडिसन ने एकूण 1093 अमेरिकन पेटंट आपल्या नावावर रजिस्टर केलेले आहेत त्याचे पहिले पेटंट हे इलेक्ट्रो ग्राफिक वोट रेकॉर्ड हे असून लास्ट पेटंट हे इलेक्ट्रो ग्राफिक वस्तू ठेवण्यासाठी होते.

अवार्ड्स : 

1960 मध्ये “हॉल ऑफ फेम फोर ग्रेट अमेरिकन” हा पुरस्कार त्यांच्या नावे आहे.

पुस्तके

  1. The Adison and Ford coat book
  2. Diary and sandry observation of Thomas Alva Adison 
  3. The vizard of Menlo Park 1878   
  4. The making of an inventor Feb 1847 – Jun 1874
  5. From workshop to laboratory Jun 1873 – March 1876

मृत्यू : 

18 ऑक्टोंबर 1931 मध्ये न्यू जर्सी येथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर जगभरातील काही समुदायाने आणि कंपनीने त्यांच्या स्मरणार्थ काही काळ  आपले घरचे दिवे बंद ठेवले होते.

वरील सर्व मजकूर पाहून आपणास अंदाज लागला असेल कि थॉमस अल्वा एडिसन कोण होते thomas edison information in marathi PDF त्यांनी कशाचा शोध लावला व त्यांचा इतिहास काय आहे. thomas edison information in marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच thomas alva edison information in marathi language हा लेख कसा वाटला व अजून काही थॉमस अल्वा एडिसन thomas edison biography in marathi language या शास्त्रज्ञाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या information about thomas alva edison in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!