Ambenali Ghat Information in Marathi आंबेनळी घाट हा महाराष्ट्रातील सर्वात लांब घाट आहे. या घाट रस्त्याची लांबी 40 किलोमीटर इतकी आहे. तरी या घाटाची उंची 2100 फूट आहे. पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगेतील हा घाट आहे. रायगड जिल्हा आणि सातारा जिल्हा या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा घाट आहे. पोलादपूर हे या घाट पायथ्याचे तर महाबळेश्वर हे घाट माथ्याचे पर्यटन क्षेत्र आहे. इतिहासातील प्रतापगडाच्या छत्रछायेखाली येणारा हा घाट. जसजसं आपण हा घाट चढायला सुरुवात करतो तसे वातावरणातील गारवामध्ये हरवून जातो. उन्हाळ्यामध्ये या घाटामध्ये गारवा भरपूर असतो. उन्हाळ्यामध्ये गारवा असणे याचे आश्चर्य वाटते.
आंबेनळी घाट माहिती – Ambenali Ghat Information in Marathi
आंबेनळी घाट | माहिती |
श्रेणी | पश्चिम घाट |
लांबी | 40 किलोमीटर |
उंची | 2100 फूट |
कोठे आहे | रायगड जिल्हा आणि सातारा जिल्हा |
पाहण्यासारखी ठिकाणे | मोरझोत धबधबा, रायगड, प्रतापगड, महाबळेश्वर |
रस्ता | रायगड जिल्हा आणि सातारा जिल्हा या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा घाट आहे |
या घाटाच्या दोन्ही बाजूला आंब्यांची भरपूर झाडे व यातून निघणारा नळीसारखा मार्ग यामुळे या घाटाला आंबेनळी घाट असे नाव पडले असे वाटते. घाट माता चढून आल्यानंतर आपण महाबळेश्वर मध्ये प्रवेश करतो. या घाटाच्या जवळपास अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. जसे की प्रतापगड, महाबळेश्वर, रायगड, चंद्रगड, पोलादपूर ही ठिकाणे पाहायला मिळतात.
- नक्की वाचा: माळशेज घाटाची माहिती
तसेच हा घाट वर्ग रेल्वेमार्गाची जोडला गेला आहे. त्यामुळे आपल्याला पळसदरी, मंकी हिल, खंडाळा ही रेल्वे स्थानके पाहायला मिळतात. या घाटात घनदाट जंगल आहे. या घाटात उंचच उंच डोंगर पाहायला मिळतात. पावसाळ्यामध्ये या घाटात भरपूर पाऊस पडतो तसेच धुक्याचे प्रमाणही भरपूर असते. पावसाळ्यात या घाटाचे सौंदर्य खुलून उठते. हिरवीगार नटलेली वनराई आणि सर्वत्र हिरवळ पाहून मन प्रसन्न होऊन जाते.
महाबळेश्वर :
महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील वर्षाचे बारा महिने सुंदर दिसणारे हिल स्टेशन म्हणजे महाबळेश्वर. पर्यटकांची वर्षभर या ठिकाणी गर्दी असते. निसर्गरम्य आणि निसर्गाच्या सौंदर्याने नटलेले महाबळेश्वर हे कायमच पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. हे हिरवळीने सजलेले ठिकाण आहे. महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी अतिशय प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. पश्चिम घाटातील एक निसर्गरम्य ठिकाण. समुद्रसपाटीपासून तेराशे 72 मीटर उंचीवर महाबळेश्वर ठिकाण आहे.
येथे पूर्वीच्या काळात राजा सिंघनदेव याने बांधलेले देऊळ आहे. या मंदिराचा कळस सोन्याचा आहे. येथे घनदाट जंगल आहे. महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळ्यात हा परिसर जलमय असतो. येथील निसर्गसौंदर्य खंडाळा लोणावळा किंवा माथेरान प्रमाणे या ठिकाणी असलेले पॉईंट्स खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉइंट, ऑर्थर सीट पॉइंट, हे पॉइंट त्यापैकी प्रसिद्ध पॉईंट आहेत. महाबळेश्वराच्या मंदिरात येथुन कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गोवित्री या नद्या उगम पावतात. येथे पंचगंगेचे देऊळ आहे.
- नक्की वाचा: आंबा घाटाची माहिती
सावित्री ही नदी पश्चिमवाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिन्या आहेत. तलाव म्हणजे तर पर्यटकांचे मोठे आकर्षण होय. वाघाचं पाणी या नावाचा मोठा जलाशय येथे आहे. येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असा समज आहे.येथील स्ट्राबेरी रासबेरी जांभळं लाल रंगाची मुळे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. येथे गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणात मिळतो. आर्थर सीट पॉइंट समुद्र सपाटीपासून तेराशे 40 मीटर उंचीवर आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले, थंड हवा, अप्रतिम निसर्गरम्य वातावरण असलेले महाबळेश्वर हे एक सुंदर ठिकाण आहे.
प्रतापगड :
उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस आठ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपऱ्या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. प्रतापगडाची उंची समुद्रसपाटीपासून 3556 फूट आहे. हा किल्ला 1656 ला बांधला आहे.
- नक्की वाचा: आंबोली घाटाची माहिती
या गडाला 95 पायऱ्या आहेत. गडावर भवानी माता मंदिर, शिव मंदिर, रेडका यशवंत सूर्य बुरूज आहेत. नासके व गोडे तळे आहे. अफजल खानाची कबर आहे.गडावर तुळजाभवानी मंदिरात हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला या प्रतापगडावरती. या गडाचा मुख्य दरवाजा उंचावर आहे. म्हणजे शत्रू थेट हल्ला करू शकत नव्हता. तटबंदीवर जागोजागी जंग्या आहेत. तसेच हस्तकला केंद्र आहे.
आंबेनळी फोटो:
रायगड:
रायगड छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी. स्वप्नातल्या स्वराज्याचा स्वर्ग म्हणजे हा किल्ला रायगड. ज्याची निर्मितीची इतक्या तत्परतेने आणि आईची सुखाची तमा न बाळगता केलेली आहे.रायगड किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती श्री शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला. या किल्ल्याची उंची 820 मीटर आहे. गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. रायगडचे जुने नाव रायरी आहे. या गडावर अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.
त्यातील काही अशी पाचाडचा जिजाबाईचा वाडा, नाना दरवाजा (नाना दरवाज्याला नाणे दरवाजा असेही म्हणतात), हिरकणी टोक, वाघ दरवाजा, जगदीश्वर मंदिर, महाराजांची समाधी, शिरकाई देऊळ, राज सभा, राज भवन, मेना दरवाजा,पालखी दरवाजा, स्तंभ (गंगासागर याच्या दक्षिणेस असणारे दोन उंच मनोरे), हत्ती तलाव, गंगासागर तलाव, महादरवाजा अशी अनेक ठिकाणे आहेत.
मोरझोत धबधबा:
पोलादपूर तालुक्यात पावसाळ्यामध्ये अनेक धबधबे पाहायला मिळतात. चंद्रगडमध्ये तानाजी मालुसरे यांचे जन्मगाव उमरठ आहे. उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे व शेलार मामा यांची समाधी आहे. या समाधीचे दर्शन घेऊन पर्यटक पुढे जातात. उमरठ पासून गाडीने दहा-पंधरा मिनिटे पुढे आल्यानंतर आणखी एक पर्यटन स्थळ पाहायला मिळते ते म्हणजे मोरझोत धबधबा. मोरझोत धबधबा खोपट गावाजवळ असल्यामुळे याला खोपडचा मोरझोत धबधबा असे म्हणतात. हा धबधबा दोनशे ते अडीचशे फूट उंचावरून खाली कोसळतो. या धबधब्याच्या आजूबाजूचा परिसर मस्त झाडांनी वेढलेला आहे.
- नक्की वाचा: माळशेज घाट माहिती
वरून पडणारा पांढराशुभ्र धबधबा दिसायला खूप सुंदर आहे. या धबधब्याजवळ एक गुहा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी असते. महाड, पोलादपूर या ठिकाणाहून पर्यटक येतात तसेच मुंबई पुणे इथून येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप असते. पावसाळ्यामध्ये हा धबधबा खूप सुंदर दिसतो. पावसाळ्यात जसं जसे पावसाचे प्रमाण वाढत जाते तसे या धबधब्याचा आकारही वाढत जातो. धबधब्याचे दिसणारे ते दृश्य खूप मनमोहक आहे.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, आंबेनळी घाट ambenali ghat information in marathi wikipedia हा कसा आहे? कोठे आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about ambenali ghat in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही आंबेनळी घाटा विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या ambenali ghat in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही ambenali ghat information in marathi language त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
आंबेनळी घाट हा रड कुंडीचा घाट म्हणून ओळखला जातो का??