Anand Dighe Biography in Marathi – धर्मवीर आनंद दिघे माहिती मराठी आनंद दिघे यांचा जीवन परिचय सध्या सोशल मीडियावर धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या टीझरची चर्चा सुरू आहे. हा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून हा टीझर प्रचंड व्हायरल होत आहे. हा चित्रपट आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे. आनंद दिघे एक शिवसैनिक होते. आनंद दिघे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना पक्षाचे ठाणे जिल्हा युनिट प्रमुख होते. या ब्लॉग मध्ये आपण आनंद दिघे यांच्या जीवनाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
धर्मवीर आनंद दिघे माहिती मराठी – Anand Dighe Biography in Marathi
पूर्ण नाव (Name) | आनंद दिघे |
जन्म (Birthday) | २७ जानेवारी १९५२ |
जन्म गाव (Birth Place) | ठाणे |
राष्ट्रीयत्व (Citizenship) | भारतीय |
ओळख (Identity) | शिवसैनिक |
मृत्यू | २५ ऑगस्ट २००१ |
जन्म व सुरुवातीचे आयुष्य – Anand Dighe Life History in Marathi
२७ जानेवारी १९५२ मध्ये आनंद चिंतामणी दिघे यांचा जन्म झाला. ठाण्यातील टेंभी नाका परिसरात त्यांनी आपलं बालपण घालवले. त्यांचं कुटुंब साधारण टिपिकल मराठी कुटुंब होतं. त्यांच्या वडिलांचे नाव चिंतामणी दिघे असून ते शेतीचा व्यवसाय करायचे. ज्या वेळी आनंद दिघे तरुण वयामध्ये होते त्यावेळी शिवसेनेचा प्रभाव वाढत चाललेला होता. ठाण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे भेट देत असत आणि सोबतच उत्तमोत्तम भाषणे देत असत.
त्यांच्या भाषणांना चिमुकला आनंद नेहमी उपस्थिती लावायचा त्यामुळे अगदी लहानपणापासूनच आनंद बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आणि त्यांच्या पक्षाकडे आकर्षित झाला होता. लहानपणापासूनच ते शिवसेना व त्यांच्या विचारसरणीशी जोडले गेले. त्यामुळे त्यांना अभ्यासामध्ये फारसा रस नव्हता. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचा अधिक प्रभाव आनंद दिघे यांच्यावरती होऊ लागला त्यामुळे त्यांनी शिवसेनेसाठी काम करण्याचा निर्णय घेतला.
राजकीय आयुष्य
अठरा वर्षाचे असताना सन १९७० मध्ये आनंद दिघे यांनी शिवसेनेमध्ये कार्यकर्ता म्हणून शिवसेनेसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या विभागातील सेना भवनात जाऊन त्यांनी लोककल्याणाचे काम केले अगदी लहान वयापासूनच त्यांनी लोकांचे हित जाणले. मज्जा मस्ती करण्याचा, शिक्षण घेण्याच्या वयामध्ये आनंद दिघे लोकांचे प्रश्न सोडवत होते. शिवसेना हा एक असा संघ आहे जो मराठी माणसांच्या हक्कासाठी लढा देतो आणि प्रामुख्याने मुंबई व ठाणे या जिल्ह्यांमध्ये. त्यावेळी सेनेच्या अनेक आंदोलनात आनंद दिघे यांचा सहभाग असायचा ते शिस्तप्रिय होते नेहमी वेळेचे पालन करायचे.
मराठी माणसांच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिला त्यांचे काम पाहून शिवसेनेतील प्रमुख नेते त्यांच्याकडे आकर्षित झाले. अगदी लहान वयामध्ये आनंद दिघे यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी अर्पण करायचं ठरवलं. आणि लवकरच त्यांना उपतालुकाप्रमुख पद मिळाले. आणि पुढे त्यांचे कार्य बघून उपजिल्हाप्रमुख ते जिल्हाप्रमुख ही पदे त्यांच्याकडे सोपवण्यात आली. या कालावधीमध्ये आनंद दिघे यांच्यावर अनेक आरोप झाले परंतु त्यांना कशाचीच भीती नव्हती त्यांनी फक्त शिवसेनेसाठी काम केले. लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे यांची सेंट्रल मैदान वरची भाषणे आनंद दिघे यांच्या कानावर पडली होती.
त्यामुळे शिवसेनेचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले त्याचे रूपांतर पुढे एक सच्चा शिवसैनिकामध्ये झाल. आनंद दिघे हे लोकांचे आवडते नेते होते कारण त्यांनी तळागाळातील लोकांसाठी अनेक चांगली कामे केली आहेत. ठाण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दानंतर आनंद दिघे यांचा शब्द शेवटचा असायचा. त्यांचं नाव अगदी सामान्य जनतेमध्ये आदरभावानं, मायेनी, आपुलकीने घेतलं जायचं. आनंद दिघे यांनी खऱ्या अर्थाने ठाण्यामध्ये शिवसेना रुजवली आणि ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून घोषित केला.
त्यांना ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे अशी प्रतिमा देण्यात आली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद दिघे यांनी ठाण्यामध्ये इतकं चांगलं काम केलं की तेथील सामान्य जनतेला प्रशासना पेक्षा आनंद दिघे यांच्यावरती जास्त विश्वास होता. ठाण्यामध्ये शिवसेना रुजवायची ही त्यांची धडपड होती यासाठी त्यांनी रक्ताचे पाणी केले. सुरुवातीस एक सामान्य कार्यकर्ता आणि त्यानंतर तर आपल्या कार्याच्या जोरावर ते शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक बनले.
सामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आनंद दिघे रोज जनता दरबार भरवत असत त्यावेळी लोक आपल्या अडचणी आपले प्रश्न घेऊन सकाळी सहा वाजल्यापासून रांगा लावून बसायचे जेणेकरून आनंद दिघे त्यांचे प्रश्न सोडवू शकतील. संपूर्ण जिल्ह्यातील लोक आनंद दिघे यांना देव माणूस मानायचे कारण त्यांनी प्रत्येकाचे प्रश्न सोडवले. आपल्या घराच्या जवळपास त्यांनी आनंद आश्रमाची स्थापना केली. ठाकरे यांच्या घराण्यात देखील आनंद दिघे सर्वांचे लाडके होते.
तरुणांना,बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे, ठाणे परिवहन सेवेत मराठी मुलांना नोकरी मिळवून देणे, छोटेमोठे स्टॉल्स, दुकानं उभी करण्यासाठी लागणारे भांडवल किंवा लहान-मोठे व्यवसाय उभे करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देताना हवी ती मदत करणे अशी सर्व कामे आनंद दिघे यांनी केली आहेत. आणि ही कामे त्यांनी एक नेता म्हणून नाही तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून केली त्यांनी ठाण्याला आपलं घरासारखं समजलं ठाण्यातील प्रत्येक व्यक्तीचे दुःख जाणून त्यांनी ते सोडवण्याचा प्रयत्न केला.
म्हणूनच आज देखील त्यांच्या मृत्यूनंतर ठाणेकर त्यांना विसरू शकले नाही आहेत. शिवसेनेसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं स्वतःचं घर संसार लांब करून त्यांनी लोकांची दुःख, अडचणी जवळ केल्या. जेव्हा त्यांच्यावर ती जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा तर ते कामात इतके मग्न असायचे की त्यांना घरी जायला देखील वेळ मिळायचा नाही म्हणूनच आनंद आश्रमातील त्यांच्या पक्ष कार्यालयातच त्यांनी मुक्काम केला. त्यांचे कार्यकर्ते त्यांना जेवणाचा डबा घेऊन जात असत चार घास खाऊन पुन्हा कामाला लागायचे.
त्यांना सण-उत्सवांची आवड होती. नेहमी शहराच्या विकासासाठी झटणारे आनंद दिघे जेव्हा धार्मिक सण उत्सव साजरे करण्याची वेळ यायची तेव्हा ते नेहमी म्हणायचे की धार्मिक उत्सवात राजकारण नको.. ठाण्यातील टेंभी नाका येथे नवरात्र उत्सव साजरा करण्याची कल्पना व ठाण्यामध्ये दहीहंडी साजरी करण्याची कल्पना त्याचे श्रेय आनंद दिघे यांना जातं. देवीच्या मंडपामध्ये राबणारे आनंद दिघे आजही ठाणेकरांना आठवतात. त्यांच्या याच व्यक्तिमत्वामुळे त्यांना धर्मवीर अशी उपमा देण्यात आली.
आनंद दिघे हे त्यांच्या कामासाठी नेहमीच चर्चेत असायचे परंतु यावेळी थोडं नवऱ्याचं घडलं १९८९ मध्ये महापौर निवडणूक झाली आणि त्यानंतर जे काही घडले त्यामुळे आनंद दिघे यांचे नाव राज्यांमध्ये वाऱ्यासारखे पसरले. आनंद दिघे निवडणुकीसाठी उभे नव्हते परंतु प्रकाश परांजपे या उमेदवाराला पाठिंबा देणारे व त्यांना जिंकवणारे भक्कम आधार होते परंतु या निवडणुकीमध्ये परांजपे यांचा एका मताने पराभव झाला शिवसेनेचे नगरसेवक फुटल आणि शिवसेनेचा पराभव झाला.
परंतु गद्दार कोण ? असा प्रश्न बाळासाहेबांनी विचारल्यावर त्या गद्दाराला शोधून काढणे शिक्षाही देऊ, असं आनंद दिघे म्हणाले. त्याचा एकच संताप झाला त्यावेळी श्रीधर खोपकर या शिवसेनेच्या नगरसेवकाने फितुरी केली अशी चर्चा सुरू होती आणि नेमका त्याच काळात अगदी दिवसाढवळ्या श्रीधर खोपकर यांचा ठाण्यात खून झाला. याप्रकरणी पोलिसांनी आनंद दिघे यांना अटक केलं परंतु लगेच जामीनही मिळाला त्यांच्यावरती खटला लादण्यात आला तो अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत चालला. आनंद दिघे यांच्या मध्ये माणसं जोडण्याची कला होती त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचे झाले तर गरीब व होतकरू सामान्य जनतेचा विचार करणे, अन्यायाला वाचा फोडणारे, जुलूमी भाषा करणाऱ्यांवर जरब बसवणारे असे आनंद दिघे होते.
मृत्यू – Anand Dighe Death Information in Marathi
राज्यभरात गणपतीचे आगमन सुरू होतं. ते दिवस होते गणेशोत्सवाचे. २५ ऑगस्ट २००१ रोजी पहाटे टॉकीज जवळ आनंद दिघे यांचा अपघात झाला त्या दिवशी ते शिवसैनिकांच्या मंत्र्यांना मान देत सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट देत होते त्यावेळी प्रवासादरम्यान त्यांचा अपघात झाला. त्यामुळे त्यांना सिंघानिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या काळजीपोटी अनेक नेत्यांनी त्यांना रुग्णालयात भेट दिली त्यांच्यावर ती शस्त्रक्रिया देखील करण्यात आली.
त्यानंतर त्यांची प्रकृती थोडी स्थिर होती परंतु २६ ऑगस्ट २००१ रोजी संध्याकाळी अचानक प्रकृतीत बिघाड झाला आणि त्यांना दोन वेळा हृदयविकाराचा झटका आला आणि संध्याकाळी सहाच्या दरम्यान अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. निधनानंतर संपूर्ण ठाणे व महाराष्ट्र पेटून उठलं. आनंद दिघे यांच्या वरती जीवापाड प्रेम करणारे त्यांचे चाहते शिवसैनिक सैरभैर झाले होते. तर सामान्य जनतेचे अश्रू अनावर झाले होते. प्रमुख नेते देखील शोकसागरात बुडाले होते. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी सिंघानिया रुग्णालय पेटवून टाकले. त्यांच्या जाण्याने एक सच्चा शिवसैनिक, समाजसेवक, लोकनेता हरपला.
आम्ही दिलेल्या anand dighe biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर धर्मवीर आनंद दिघे माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या anand dighe death information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि anand dighe life history in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये anand dighe death history in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
छान आर्टीकल लिहिले आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ..!!