गणेश उत्सव निबंध मराठी Ganesh Chaturthi Essay in Marathi

Ganesh Chaturthi Essay in Marathi माझा आवडता सण गणेश चतुर्थी निबंध मराठी गणेश चतुर्थी भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. घराघरात आणि सार्वजनिक मंडळात श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा, आरती केली जाते. दारात गणेशाच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढल्या जातात. कोकणामध्ये आरतीच्या नंतर देवे म्हणतात. गणेश चतुर्थीला सुरू झालेल्या गणेश उत्सव हा दहा दिवसांचा सोहळा असतो.

essay on ganesh chaturthi in marathi हा गणेश उत्सव भारतात महाराष्ट्रात याशिवाय आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, ओरिसा आणि छत्तीसगडमध्ये तसेच भारताबाहेरही अमेरिका, सिंगापूर, नेपाळ, कॅनडा, ब्रह्मदेश या देशांमध्ये साजरा केला जातो. मुंबई आणी पुण्यामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो.

पुण्यात पाच मानाचे गणपती आहेत. कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरी वाडा याव्यतिरिक्त दगडूशेठ, हलवाई मंडई, बाबू गेनू आणि जिलब्या मारुती ही काही मोठी मंडळी आहेत. पुण्यात हिरा बाग मंडळ हे भव्य देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईमध्ये लालबागचा राजा हा सर्व गणपती मोठा मानलेला गणपती आहे.

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ

निर्वीघ्न मुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा

ganesh chaturthi essay in marathi
ganesh chaturthi essay in marathi

गणेश उत्सव निबंध मराठी – Ganesh Chaturthi Essay in Marathi


गणेशोत्सव मराठी निबंध 

ganesh chaturthi information in marathi श्री गणेश चतुर्थी हा भाद्रपद शुद्ध चतुर्थीला केला जाणारा एक धार्मिक सण आहे.श्री गणेश यांचा जन्म भाद्रपद शुध्द चतुर्थीला झाला असावा असे मानले जाते म्हणून गणेश चतुर्थीला महासिद्धिविनायक चतुर्थी असे म्हटले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थी पर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा केला जातो. कोकणात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

बाप्पाच्या आगमनाला पासून ते विसर्जनापर्यंत आरत्या, भजन इत्यादी कार्यक्रमाची रेलचेल चालू असते. लहानापासून ते थोरापर्यंत हा उत्सव सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा असतो. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरूवात लोकमान्य टिळकांनी 1894 साली केली. गणेश उत्सवाच्या निमित्ताने सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र येता यावे या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली.

लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने हा सण चालू केला त्याचे फळ आज आपण पाहू शकतो. गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा असा सर्व गणेश भक्तांचा प्रयत्न असतो.

गणेश उत्सव देश विदेशामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो पण खास करून मुंबई, पुणे आणि कोकणात याची मजा काही औरच असते. सर्व जातीचे लोक या उत्साहात सहभागी होतात. गणेश उत्सवाची तयारी 15 दिवस अगोदर चालू होते.गणपतीसाठी मकर बनवण्यासाठी 15 दिवस अगोदर प्लॅनिंग केले जाते.

घरातील महिला दोन दिवस अगोदरच घराची साफसफाई करायला सुरुवात करतात. शालेय विद्यार्थ्यांसाठी गणपतीची सुट्टी म्हणजे पर्वणीच असते. गणपतीसाठी मुलांना  मुलांना 8 दिवसाची सुट्टी मिळते. गणपती दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे आवरून गणपतीला आणायला जायची तयारी सुरू होते. सनई चौघडा वाजत गाजत गणपती बाप्पा मोरया अशा जोरदार चारोळ्या ठोकर गणेश मूर्ती घरी आणली जाते.

भटजीला बोलावून मूर्तीची पूजाअर्चा व प्रतिष्ठापना केली जाते. त्यानंतर घरातील सर्व मंडळी हार, फुले, मोदक, फळे, हळद-कुंकू, अगरबत्ती, धूप, कापूर हे सर्व ताटात घेऊन गणपतीची पूजा करतात आणि गणपतीला नैवेद्य दाखवतात. गणपतीसाठी घरी मोदक बनवले जातात. गणपतीला मोदक खूप आवडतात. गणपतीच्या आगमनाने सारे वातावरण बहरून जाते.

गणेश चतुर्थी हा माझा आवडता सण कारण ही तसेच आहे कारण या सणाला घरातील सर्वजण एकत्र येतात. घरातीलच नाही तर समाजातील सर्व लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात. आपापसात असलेले भांडण, रुसवे-फुगवे सर्व काही विसरून एकत्र येतात. विविध धर्माचे लोक सुद्धा एकत्र येऊन गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतात. गणेशोत्सव हा सण समाजाला एकत्र आणण्याचे काम करतो.

गणेश चतुर्थीला गणरायाचे आगमन झाल्यावर सर्व वाट बघत असतात गौरीच्या आगमनाची. गणपती बाप्पा सोबत यांच्या मातोश्री गौरी सुद्धा येतात. भाद्रपद महिन्यात साजरा केला जाणारा महत्त्वाचा सण म्हणजे गौरीपूजन. घरातील स्त्रिया खूप भक्तिभावाने गौरीचे व्रत आणि पूजा करतात. गणेश उत्सवाच्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात. त्यावेळी गौरीसाठी छानसी सजावट केली जाते.

नळावर, विहिरीवर जाऊन तांब्यामध्ये हळदीची पाने, गौरीची रोपे घालतात तांब्याला हळद कुंकू लावून सजवतात आणि पूजा करतात. गौरीला भाकरी आणि भाजी चा नैवेद्य दाखवतात आणि आरती म्हणतात.

गौरी आली सोन्याच्या पावली

गौरी आली चांदीच्या पावली

गौरी आली गाई वासराच्या पावली

गौरी आली पुत्र पोत्रांच्या पावली

गणपती पूजन, गौरी पूजन यामध्ये दहा दिवस कधी निघून जातात समजतच नाही. हे पूर्ण दहा दिवस घरातील वातावरण उत्साहित, आनंदित असते. लोकांचा असा विश्वास आहे की श्री गणेश येताना आपल्या सोबत सुख आणि समृद्धी घेऊन येतात.

कोणाच्या घरी गणपती बाप्पा दीड दिवस असतात तर कोणाकडे पाच सात किंवा दहा दिवस वास करतात. बघता बघता गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस उजाडतो. गणपती विसर्जनाच्या दिवशी ढोल, बॅन्जो, पथक नाचत गाजत गुलाबाची उधळण करत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा भावनिक साद घालत गणपतीचे विसर्जन केले जाते.

गणपतीची मुख्य म्हणजे 12 नावे आहेत. त्या बारा नावाचे वर्णन नारद पुराणात केलेले आहे. श्री गणेशाना सुमूख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्ननाशक, विनायक, धूम्रकेतू, गणाध्यक्ष, बालचंद्र, गजानन या नावाने ओळखले जाते.

आपल्या प्रसाद, पूजेच्या वस्तूमधून आपल्या शारीरिक विकारावर कशी मात करायची याचं मार्गदर्शन गणपती करतो. उदा. पित्तावर दूर्वा, परिपूर्ण क्षुधाशांतीसाठी केळी आणि मोदक, वात विकारावर नारळ, रक्तदाबावर जास्वंद इत्यादी. विविध पातळ्यांवरून आरोग्य रक्षणाचा मंत्र देणारा गणेश उत्सव खऱ्या अर्थाने वेगळा आहे.

आरोग्याचा आणि गणेशोत्सवाचा संबंध हा चहुबाजूंनी येतो. अध्यात्मिक, सामाजिक, शारीरिक आणि मानसिक अशा सर्व स्तरावर आरोग्यरक्षण गजाननाच्या केवळ नामोच्चारात येतो. सामाजिक आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी बंधुभाव निर्माण करणारा हा उत्सव खूप महत्त्वाचा वाटतो. जगभर नावाजलेला आद्यपूजेचा मान असणारा हा गजानन स्वतःही आरोग्य क्षेत्रातल्या प्रगतीचे एक प्रतीक आहे. बुद्धिमत्ता चाणाक्षपणा ताकत शौर्याचं प्रतिक म्हणजे गणपती. त्याचे बघतोय त्याला देवापेक्षा मित्रच जास्त मानतात.

आम्ही दिलेल्या ganesh chaturthi essay in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “गणेश उत्सव निबंध मराठी किंवा गणेश चतुर्थी निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ganesh chaturthi nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि ganesh utsav essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण ganesh chaturthi nibandh in marathi या लेखाचा वापर ganpati essay in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!