बाळासाहेब ठाकरे माहिती मराठी Balasaheb Thackeray Biography in Marathi

Balasaheb Thackeray Biography in Marathi – Balasaheb Thackeray Information in Marathi बाळासाहेब ठाकरे माहिती मराठीमहाराष्ट्राचा वाघ”  उर्फ “बाळासाहेब ठाकरे”!! बाळासाहेब ठाकरे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे एक उजव्या विचारसरणीचे मराठी समर्थक होते आणि त्यांनी स्थापन केलेला पक्ष पश्चिम महाराष्ट्रात सक्रीय स्वरूपात कार्य करीत आहे. याशिवाय बाळासाहेब ठाकरे हे एक व्यंगचित्रकार आणि सामना या मराठी दैनिकाचे संस्थापक व प्रमुख संपादकही होते. आजच्या लेखामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

balasaheb Thackeray biography in marathi
balasaheb Thackeray biography in marathi

बाळासाहेब ठाकरे माहिती मराठी – Balasaheb Thackeray Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)बाळासाहेब ठाकरे
जन्म (Birthday)२३ जानेवारी १९२६
जन्म गाव (Birth Place)महाराष्ट्रातील पुणे
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)राजकारणी
मृत्यू१७ नोव्हेंबर २०१२

Balasaheb Thackeray Information in Marathi

जन्म

बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे (२३ जानेवारी १९२६). बाळासाहेबांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. बाळासाहेबांचे वडील केशव सीताराम ठाकरे व आई रमाबाई ठाकरे. वडील केशव ठाकरे हे व्यवसायाने पत्रकार आणि व्यंगचित्रकार होते. ते एक सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते ज्यांचा १९५० च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये समावेश होता‌. मराठी भाषिक भागांसाठी महाराष्ट्र नावाच्या एकात्म राज्याच्या निर्मितीसाठी व या राज्याची राजधानी मुंबई असावी हा या चळवळीचा मुख्य उद्देश होता.

वडिलांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने बाळासाहेब ठाकरे प्रेरित होते. बाळासाहेबांना आठ भावंडे होती आणि यांपैकी बाळासाहेब सर्वात मोठे होते. बाळासाहेबांचा विवाह मीनाताई ठाकरे यांच्याशी झाला. बाळासाहेबांना तीन मुले आहेत. बिंदुमाधव ठाकरे, जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे. बाळ ठाकरे यांना “बाळासाहेब” व “हृदय सम्राट” या नावाने संबोधले जायचं.

सुरुवातीचे आयुष्य

राजकारणामध्ये येण्याआधी बाळासाहेब ठाकरे हे एक व्यंगचित्रकार होते. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात मुंबईतील फ्री प्रेस जनरल मध्ये एक व्यंगचित्रकार म्हणून केली. बाळासाहेबांची ही व्यंगचित्रे टाइम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या आवृत्तीतही छापली जात असत. पुढे फ्री प्रेस जर्नलशी बाळासाहेब ठाकरे यांचे मतभेद झाल्यानंतर त्यांनी व राजकारणी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह चार पाच अन्य सह कर्मचाऱ्यांसोबत ते फ्री प्रेस जर्नल मधून वेगळे झाले.

यापुढे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच दैनिक न्यूज डे सुरू केले. हे वृत्तपत्र १/२ महिने टिकलं. सन १९६० मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी आपला भाऊ श्रीकांत सोबत मार्मिक साप्ताहिक व्यंगचित्र सुरू केले. मार्मिकच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस व महाराष्ट्रातील बेरोजगारी, परप्रांतीयांचा ओघ, मराठी कामगारांची छाटणी अशा समस्यांवर लक्ष केंद्रित केले.

शिवसेनेची स्थापना

मार्मिकच्या यशामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेना स्थापन केली. शिवसेना हे नाव १७ व्या शतकातील मराठी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून ठेवले गेले आहे. सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे म्हणाले की हा राजकीय पक्ष नसून शिवाजी महाराजांची फौज आहे. जी मराठी माणसांच्या हक्कासाठी लढण्यास इच्छुक आहे. महाराष्ट्रात आणि विशेषता मुंबईमध्ये मराठी लोकांची संख्या वाढावी आणि मराठी लोकांना राजकारणात आणावे म्हणून या पक्षाची स्थापना करण्यात आली.

राज्याची स्थानिक भाषा मराठी असावी व मराठी भाषिकांना खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीमध्ये प्राधान्य मिळावे अशी या पक्षाची मागणी होती. पक्षाच्या जाहीरनाम्यात बाळासाहेब ठाकरे यांनी प्रामुख्याने दक्षिण भारतीयांना दोषी ठरवले. मार्मिक मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी स्थानिक निर्देशिका येतील कॉर्पोरेट अधिकाऱ्यांची यादी प्रकाशित केली ज्यात अनेक दक्षिण भारतीय होते. महाराष्ट्रीय लोकांसोबत भेदभाव केला जात असल्याचा पुरावा म्हणून उल्लेख केला होता.

पुढील दहा वर्षांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष वाढत गेला. बाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र ट्रेड युनियनचे मुख्य वकील माधव मेहरे यांसारखे ज्येष्ठ नेते पक्षा मध्ये सामील झाले आणि चार्टर्ड अकाउंटंट माधव गजानन देशपांडे यांनी पक्षाच्या कामकाजाच्या विविध पैलूंचे समर्थन केले. बाळासाहेब ठाकरे मराठीला जास्त प्राधान्य द्यायचे. पक्षाची स्थापना झाल्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी वृत्तपत्र सामना आणि हिंदी वृत्तपत्र दोपहर का सामना सुरू केले.

१९६९ मध्ये कारवार, बेळगाव आणि निपाणी प्रदेश महाराष्ट्रात विलीन करण्याच्या मागणीसाठी आंदोलनात भाग घेतल्याने बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी यांना तुरुंगात टाकण्यात आले. १९७० च्या दशकात स्थानिक निवडणुकांमध्ये बाळासाहेब ठाकरे यशस्वी ठरले आणि उर्वरित राज्यांच्या तुलनेत ते प्रामुख्याने मुंबईमध्ये सक्रिय होते. पक्षाने अनेक स्थानिक शाखा आणि कार्यालय स्थापन केली. राजकीयदृष्ट्या शिवसेना कम्युनिस्ट विरोधी होती आणि मुंबईतील कामगार संघटनांवर भारतीय कम्युनिस्ट पार्टी करून नियंत्रण मिळवले.

घटत्या वस्त्रोद्योगातील स्थानिक बेरोजगार तरुण पक्षात सामील झाले आणि कोकणातील मराठी स्थलांतरितांमुळे पक्षाचा विस्तार झाला. सन १९८९ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे सामना हे वृत्तपत्र सुरु केले. १९९२ च्या मुंबई दंगलीनंतर बाळासाहेब ठाकरे आणि मुस्लिम विरोधी आणि हिंदुत्वावर आधारित भूमिका घेतली. शिवसेनेने नंतर भारतीय जनता पक्षाशी युती केली.

भाजप-शिवसेना युतीने १९९५ च्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आणि १९९५ ते १९९९ पर्यंत ते सत्तेत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःला रिमोट कंट्रोल मुख्यमंत्री म्हणून घोषित केले. २८ जुलै १९९९ रोजी बाळासाहेब ठाकरे यांना ११ डिसेंबर १९९९ ते १० डिसेंबर २००५ पर्यंत सहा वर्षांसाठी कोणत्याही निवडणुकीत मतदान करण्यास आणि लढवण्यास बंदी घालण्यात आली होती.

निवडणूक आयोगाच्या शिफारशींवरून बाळासाहेब ठाकरे खूश नव्हते. धर्माच्या नावावर मत मागण्याचा आरोप ठेवत त्यांच्यावरती हे निर्बंध लावण्यात आले होते. २००५ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या वरील सहा वर्षांची मतदान बंदी उठविल्यानंतर २००७ मध्ये बीएमसीच्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथमच मतदान केले.

शिवसेनेने मुंबईतील मराठी माणसांना विशेषतः सार्वजनिक क्षेत्रात मदत केल्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणाले. आपल्या अस्मिता आणि धर्माला विरोध करणार्यां विरुद्ध संघर्ष करण्यासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे असे बाळासाहेब ठाकरे यांचे मत होते.

मृत्यू

बाळासाहेब ठाकरे यांचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ रोजी अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी लोकांच्या हक्कासाठी भरपूर काम केलं आहे. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झालं. पुणे मुंबईकरांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद केली. आणि संपूर्ण राज्यभरात हायअलर्ट जारी करण्यात आला. वीस हजार पोलिस आणि पंधरा रिझर्व्ह पोलिसांच्या तुकड्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तैनात केल्या गेल्या.

१८ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेबांच्या पार्थिवाला शिवाजी पार्क येथे नेण्यात आला आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाळासाहेबांच्या जाण्याने संपूर्ण देशामध्ये शोककळा पसरली होती. आणि महाराष्ट्रीयांना तर दुःख अनावर झालं होतं. बाळासाहेबांच्या प्रति जनतेचे प्रेम अफाट होतं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नंतर सार्वजनिक ठिकाणी होणार हे पहिले अंत्यसंस्कार होतं. शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हे तेच ठिकाण होतं तिथे शिवसेनेने अनेक अभियान यशस्वी केले होते.

काही वृत्तपत्रांच्या माध्यमातून कळाले की जवळपास दीड ते दोन लाख लोक त्या वेळी बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारा समयी उपस्थित होती. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी बाळासाहेबांच्या प्रीती आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. महत्त्वाची बाब म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे लोकसभा किंवा विधानसभेचे कोणत्याही प्रकारचे सदस्यत्व नव्हते.

शिवाय बाळासाहेब यांच्याकडे कुठलीही कार्य कालीन पदवी नव्हती तरीही बाळासाहेबांना २१ तोफांची सलामी देण्यात आली होती. आणि असा सन्मान हा फार कमी लोकांना देण्यात येतो. इतकेच नव्हे तर बिहार येथील दोन्ही मुख्य सभागृहांमध्ये बाळासाहेबांना श्रद्धांजली देण्यात आली. मराठी भाषेवर बाळासाहेबांच असणार नितांत प्रेम आणि मराठी माणसा करता आणि मराठी माणसाच्या हक्का करता बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक आंदोलने केली.

रोजगाराच्या क्षेत्रात मराठी माणसाच्या आरक्षणा करता बाळासाहेबांनी बऱ्याच वेळा भाष्य केलं आणि म्हणूनच महाराष्ट्रातील जनतेने बाळासाहेबांवर भरपूर प्रेम केलं. बाळासाहेबांची एकच इच्छा होती त्यांना आपल्या मराठीला उच्च स्थानावर पोहोचलेलं पाहायचं होतं. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील एक महान नेते होते ज्यांच्या मृत्यूच्या बातमीने लोकांनी कोणत्याही आदेशाविना स्वयंस्फूर्तीने बंद पाळला होता. आणि आजही प्रत्येक वर्षी १७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवला जातो.

आम्ही दिलेल्या Balasaheb Thackeray Biography in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बाळासाहेब ठाकरे माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Balasaheb Thackeray information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Balasaheb Thackeray in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये balasaheb thakre biography in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!