आनंदीबाई जोशी निबंध Anandibai Joshi Essay in Marathi

Anandibai Joshi Essay in Marathi आनंदीबाई जोशी निबंध भारतामध्ये आजपर्यंत अनेक डॉक्टर होऊन गेले, परंतु ज्यांनी डॉक्टर होऊन मोलाचे काम केले. तसेच आपले जीवन देशासाठी घालवले तसेच त्यांनी डॉक्टर हा एक व्यावस नसून समाजसेवेच एक भाग आहे. असे मानून ज्यांनी लोकांची मदत केली असे खूप जन आहेत आणि त्यामधील एक म्हणजे आनंदीबाई जोशी कारण त्या आपल्या देशातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या आणि त्यांनी खूप अडचणींचा सामना करून डॉक्टर बनल्या. अश्या या सर्व संकटांचा सामना करत डॉक्टर बनलेल्या आनंदीबाई जोशी यांच्यावर आज आपण निबंध लिहणार आहोत.

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून संपूर्ण भारतामध्ये ओळख असणाऱ्या आनंदीबाई जोशी यांचा जन्म पुणे शहरामध्ये म्हणजेच त्यांच्या आजोळी ३१ मार्च १८६५ मध्ये झाला आणि त्या कल्याण मधील पारनाका या गावामध्ये राहत होत्या आणि त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव अमृतेश्वर जोशी होते आणि त्याचे पूर्वीचे पूर्ण नाव यमुना गणपराव जोशी असे होते.

आनंदीबाई जोशी हि त्यांची जेष्ठ कन्या होती आणि त्यांनी तिचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. त्यांना वयाच्या १४ व्या वर्षी त्यांना एक मुल झाले पण त्या बाळाला चांगले उपचार न मिळाल्यामुळे ते मुल जास्त दिवस जगू शकले नाही आणि त्यामुळेच आनंदीबाईंनी डॉक्टर बनण्याचा निर्णय घेतला.

१८८३ मध्ये आनंदीबाईंनी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिलव्हानिया या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. आनंदीबाईंना डॉक्टर होण्यासाठी सर्व भारतीयांचा विरोध होता परंतु त्यांनी कोलकत्ता शहरामध्ये भाषण करून आपले विषय मांडले आणि लोकांचे मन वळवले त्यानंतर भारतीय लोक्कानी त्यांना आर्थिक मदतही केली. वेगवेगळ्या अडचणी पार करत कष्ठाने आणि जिद्दीने १८८६ मध्ये त्यांनी एम.डी ची पदवी मिळवली व त्या भारतामध्ये परत आल्या आणि कोल्हापूर मधील एडवर्ड दवाखान्यात स्त्री कक्षा सांभाळू लागल्या.

anandibai joshi essay in marathi
anandibai joshi essay in marathi

आनंदीबाई जोशी निबंध – Anandibai Joshi Essay in Marathi

Anandibai Joshi Nibandh in Marathi

आनंदी बाईंनी डॉक्टर होण्यासाठी कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यांचे पती गोपाळराव यांनी त्यांना डॉक्टर बनण्यास कशी मदत केली हे आपण सविस्तर पाहू. आनंदीबाई ह्या गणपतराव जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या आणि त्यांनी आनंदी बाईंचा विवाह करण्याचे ठरवले. त्यांच्या वयाच्या ९ व्या वर्षी त्यांचा विवाह वयाने २० वर्ष मोठे असलेले गोपाळराव जोशी यांच्याशी झाला.

गोपाळराव जोशी हे पोस्ट ऑफिसमध्ये कारकुनाची नोकरी करत होते आणि ते सुशिक्षित असल्यामुळे आनंदीबाईंना डॉक्टर बनण्यासाठी त्यांचा चांगला पाठींबा मिळाला. गोपाळराव जोशी यांचे मूळ गाव संगमनेर जिल्ह्यातील अहमदनगर येथे राहत होते परंतु त्यांनी नोकरी पोस्टामध्ये असल्यामुळे त्यांची सतत एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये बदली होत होती.

आनंदीबाई हे नाव गोपाळरावांनी लग्नानंतर ठेवले होते त्यांचे पूर्वीचे नाव यमुना बाई होते. आनंदीबाई यांना वयाच्या १४ व्या वर्षी पहिले बाळ झाले परंतु त्याला चांगल्या प्रकारे उपचार न मिळाल्यामुळे त्यांचे बाळ १० दिवसामध्येच मरण पावले आणि त्यांना हे खूप वाईट वाटले कि आपल्या बाळाला आपण वाचवू शकलो नाही. त्यांच्या काळामध्ये तशी डॉक्टरांची संख्या देखील कमी होती आणि त्या अभावामुळेच त्यांचे बाळ वारले असावे.

त्यानंतर त्यांनी खूप विचार केला आणि त्यांना या गोष्टीमुळे डॉक्टर बनण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी डॉक्टर बनण्याचा निर्णय घेतला. गोपाळराव हे एक पुरोगामी विचारवंत होते आणि ते स्त्रियांना शिक्षण मिळायला हवे यासाठी झटत होते किंवा स्त्रयांच्या शिक्षणासाठी समर्थन देत होते.

त्यामुळे त्यांनी आनंदी बाईंच्या या निर्णयाला पाठींबा दिला आणि त्यांना असे वाटत होते कि तिने आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून देशामध्ये तसेच जगामध्ये आपली ओळख निर्माण करावी. आनंदी बाई ज्यावेळी शिक्षण घेण्यासाठी सुरुवात केली त्यावेळी गोपाळराव जोशी यांची बदली कोलकत्ता या शहरामध्ये झाली होती.

वैद्यकीय शिक्षणाची सोय भारतामध्ये नसल्यामुळे त्यांना अमेरिकेमध्ये जाण्याची गरज होती आणि म्हणून गोपाळराव यांनी अमेरिकेमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी पत्र व्यावाघर करण्यास सुरुवात केली, परंतु हे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले कारण त्यांना विद्याकीय शिक्षण घ्यायचे असल्यास ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट मान्य करावी लागणार होती.

परंतु त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी आपला धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे मान्य नव्हते कारण त्यांना त्यांचा धर्म आणि संस्कृती बाळगून वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. गोपाळराव जोशी आणि आनंदीबाई जोशी यांच्या अथक प्रयत्नानंतर आनंदी बाई यांना इ.स १८८३ मध्ये ख्रिस्ती धर्म न स्वीकारता त्यांना वुमेन्स मेडिकल ऑफ पेन्सिल्व्हानिया या कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला. वुमेन्स मेडिकल ऑफ पेन्सिल्व्हानिया या कॉलेज मध्ये प्रवेश मिळाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेत असताना एक कार्पोरेट जोडप्याचे साहाय्य मिळाले.

ज्यावेळी त्यांनी अमेरिकेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळी कोलकत्ता मधील अनेक लोकांनी त्यांना विरोध केला आणि तेथील लोकांना देखील असे वाटत होते कि वैद्यकीय शिक्षणासाठी धर्म बदलने बरे नव्हे म्हणून त्यांनी त्यांना विरोध केला. पण आनंदीबाई मागे हाताला नाहीत, तर त्यांनी कोलकत्ता मध्ये झालेल्या त्यांच्या भाषणाच्या मार्फत लोकांना असे पटवून दिले कि देशामध्ये महिला डॉक्टर ची किती गरज आहे.

आणि देशामध्ये महिला डॉक्टर झाल्या तर आपल्या देशांमध्ये महिलांना चांगल्या प्रकारे उपचार घेता येईल आणि हे लोकांना पटले तसेच त्यांनी मी वैद्यकीय शिक्षणासाठी कोणतेही धर्मांतर करणार नाही हे देखील लोकांना सांगितले आणि त्यामुळे त्याची अर्धी समस्या भाषण केल्यामुळे कमी झाली.

तसेच अनेक लोकांचे मन त्या एका भाषणामुळे वळले आणि त्यांना मग शिक्षणासाठी त्या लोकांच्या कडून मदतही मिळू लागली तसेच भारताकडून त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी २०० रुपयांची मदत देखील मिळाली. आनंदीबाई आणि गोपाळराव यांच्या सर्व प्रयत्नामुळे तसेच त्यांनी सर्व समस्यांवर मात करून १८८६ मध्ये मार्च महिन्यामध्ये एम. डी ची पदवी मिळवली आणि मग त्या भारतामध्ये आल्या आणि भारतामध्ये त्यांचा सत्कार केला तसेच भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून मान मिळाला.

त्या भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी कोल्हापूर मधील एडवर्ड दवाखान्यात स्त्री कक्षा सांभाळू लागल्या. ज्यावेळी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबाफुले स्त्री शिक्षणासाठी लढत होते. त्यावेळीच आनंदीबाई देखील त्यांच्या डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत होत्या. अश्या प्रकारे त्यांनी अमेरिकेतून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्यांनी भारताची पहिली महिला डॉक्टर म्हणून मान मिळवला

आणि अनेक भारतीय महिलांच्या पुढे एक उत्तम उदाहरण ठेवून त्या भारतीय महिलांच्यासाठी प्रेरणा बनल्या. त्यांच्या जिद्दीमुळे आणि गोपाळराव यांच्या पाठिंब्यामुळे आणि त्यांच्या दोघांच्या प्रयत्नामुळे त्या डॉक्टर बनू शकल्या आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकल्या.

आनंदीबाई जोशी यांनी डॉक्टर म्हणून फक्त एक वर्ष आपली कामगिरी बजावली आणि त्यांना दुर्दैवाणे २० व्या वर्षी क्षयरोग झाला आणि त्यांचे निधन २६ फेब्रुवारी १८८७ मध्ये पुण्यामध्ये झाले. आनंदीबाई यांना फक्त २१ वर्षाचे जीवन लाभले तर त्यांनी त्या वीस वर्षामध्ये भारतामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि त्या आजही त्यांच्या नावामुळे जिवंत आहेत.

आम्ही दिलेल्या Anandibai Joshi Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आनंदीबाई जोशी निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या anandibai joshi nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये essay on anandibai joshi in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!