Anandibai Joshi Information in Marathi आनंदीबाई जोशी यांच्या बद्दल माहिती मराठी आनंदीबाई जोशी, म्हणतात ना मूर्ती लहान पण कीर्ती महान. असंच काहीतरी आनंदीबाई जोशी यांच्या आयुष्यात घडलं. आनंदीबाई यांची ओळख भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आहे. यांची ख्याती सर्व विश्वामध्ये प्रसिद्ध आहे. आनंदी आणि गोपाळ हे एक यशस्वी दांपत्य होतं. गोपाळ रावांनी आनंदीबाई यांना त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी कशी मदत केली आणि कसं त्यांना प्रोत्साहित केलं याचा आढावा घेणारे अनेक लेख, नाट्य, कथा, कादंबरी, पुस्तक प्रदर्शित करण्यात आले आहेत.
जेव्हा आनंदीबाई एकट्या अमेरिकेला जलमार्गाने गेल्या होत्या तेव्हा गोपाळराव रोज त्या समुद्रावर जाऊन आनंदीबाईंची वाट बघायचे. त्यांच्यामते जरी आनंदी समुद्राच्या दुसर्या टोकावर असली तरी मी या टोकावरून तिच्यासोबत आहे. आजच्या ब्लॉग मध्ये आपण याच जोडप्याची एक प्रेरणादायी आणि आदर्श ठरलेली कथा जाणून घेणार आहोत.
डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची माहिती – Anandibai Joshi Information in Marathi
नाव(Name) | आनंदीबाई जोशी |
जन्म (Birthday) | ३१ मार्च १८६५ |
जन्मस्थान (Birthplace) | कल्याण |
वडील (Father Name) | गणपतराव अमृतेश्वर जोशी |
पती (Husband Name) | गोपाळराव जोशी |
मृत्यू (Death) | २१ फेब्रुवारी १८८७ |
लोकांनी दिलेली पदवी | फर्स्ट डॉक्टर |
आनंदीबाई जोशी लहान बालपण
३१ मार्च १८६५ पुणे येथे यमुना यांचा जन्म झाला. यमुना हे आनंदीबाई यांचं माहेरचं नाव होतं. आनंदीबाई यांचे बालपण फार सुखात गेलं. त्यांचा जन्म त्यांच्या आजोळी झाला होता. आई-वडिलांकडून देखील आनंदीबाई यांना फार प्रेम मिळालं. लहानपणी आई-वडिलांनी आनंदीबाई यांच्यावर फार जीव लावला. आनंदीबाई यांना हवी असणारी प्रत्येक गोष्ट त्यांना आणून दिली. खूप चांगल्या प्रकारे संगोपन केलं. आनंदीबाई यांच्यावर त्यांच्या आईवडिलांचे संस्कार होते जे त्यांना पुढे जाऊन उपयोगी ठरले.
- नक्की वाचा: समाजसुधारक रमाबाई रानडे यांची माहिती
वैयक्तिक आयुष्य
आनंदी यांचे बालपण सुखात गेलं. त्यांच्या जीवनाला वेगळे वळण त्यांचे लग्न झाल्यावर मिळालं. आनंदीबाई यांच अगदी लहान वयामध्ये वयाने वीस वर्ष मोठे असणारे गोपाळराव यांच्याशी लग्न झालं. त्या दोघांना एक अपत्य देखील झाल. परंतु ते अल्पायुषी ठरल. आनंदीबाई यांना त्यांच्या कठीण प्रसंगांमध्ये त्यांचे पती गोपाळराव यांनी खूप प्रोत्साहित केले. अनेक प्रसंगावर मात करत आनंदीबाई यांनी त्यांचं ध्येय पूर्ण करून दाखवल.
राजकीय आयुष्य
आनंदीबाई या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या. आनंदीबाई यांचे नाव संपूर्ण जगभर पसरलं आहे इतकंच नव्हे तर स्वतः विक्टोरिया राणीने देखील आनंदीबाई यांची दखल घेतली होती. जेव्हा त्यांना एम.डी. ही पदवी मिळाली होती. आनंदीबाई यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचं ठरवलं त्यासाठी त्यांना अनेक वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जावं लागलं.
त्या काळी स्त्रियांचं घराबाहेर पडणं देखील पाप मानलं जायचं. स्त्रियांना नेहमी डोक्यावर पदर आणि मान खाली ठेवून राहावं लागायचं. अशा परिस्थितीत आनंदीबाई यांनी डोक्यावरचा पदर काढून मान ताठ ठेवून आपल्या ध्येयाकडे चालण्याचा निर्णय घेतला. हेच समाजाच्या डोळ्यांमध्ये खटकलं त्यावेळी आनंदीबाई यांना खूप विरोध भेटला.
आनंदीबाई यांनी समाजाला स्त्री ला देखील शिक्षण घेण्याचा हक्क आहेत, इतकेच नव्हे तर आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी स्त्रीने स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहणं खूप गरजेच आहे हे समाजाला पटवून दिलं. तसेच त्याकाळी महिला डॉक्टरची समाजाला किती गरज आहे हे आनंदीबाई यांनी भाषणांच्या द्वारे समाजाला पटवून दिलं.
- नक्की वाचा: थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची माहिती
त्यांच्या या सगळ्या प्रवासामध्ये एक व्यक्ती जिने त्यांची अखेरपर्यंत साथ सोडली नाही म्हणजे त्यांचे पती गोपाळराव. गोपाळ राव हे अत्यंत उच्च विचारसरणीचे व्यक्ती होते. त्यांनी आपल्या पत्नी मधील शिकण्याची इच्छा ओळखून त्यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केलं. आनंदीबाईंच्या शिक्षणासाठी गोपाळरावांनी खूप मेहनत घेतली आणि खूप कष्ट करून आनंदीबाई यांना अमेरिकेला पुढील वैद्यकीय शिक्षण घेण्यास पाठवलं.
त्यापुढे आनंदीबाई भारतामध्ये जेव्हा परतल्या त्या भारताच्या पहिल्या डॉक्टर महिला बनूनच. अमेरिकेमध्ये पोचल्यावर तेथील वेगळं वातावरण या सगळ्याशी मिळतंजुळतं करून घेण्यामध्ये आनंदीबाई यांना फार वेळ लागला. त्या चार वर्ष अमेरिकेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होत्या.
आनंदीबाई जोशी मेडिकल कॉलेज
आनंदीबाई यांचे बालपण हसत-खेळत गेलं. पण त्यांच्या तारुण्यामध्ये त्यांच्यासोबत असं काही घडलं ज्या घटनेमुळे त्या वैद्यकीय शिक्षण घेण्यास तयार झाल्या. लग्नानंतर आनंदीबाई यांचे जीवन सुखी चालू होतं आनंदीबाई यांचे पती गोपाळ जोशी हे त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे होते. आनंदीबाई जेव्हा १४ वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांना एक मुलगा झाला.
परंतु त्या मुलाची प्रकृति काही ठीक नव्हती म्हणून त्याचं दहा दिवसातच निधन झालं. या धक्क्याने आनंदीबाई खूप घाबरल्या होत्या तसेच त्यांची मानसिक स्थिती देखील चांगली नव्हती. त्या काळात त्यांना त्यांच्या पतीने खूप चांगला आधार दिला. ही घटना आनंदीबाई यांच्या मनावर खूप खोल रुतली होती. आनंदीबाई यांनी शिक्षण घेऊन डॉक्टर बनण्याचं ठरवलं.
त्या काळामध्ये पंडिता रमाबाई यांसारख्या स्त्रिया स्त्री शिक्षण आणि स्त्री हक्कासाठी लढत होत्या. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आनंदीबाई यांनीदेखील शिक्षणास सुरुवात केली. त्यावेळी स्त्रियांच्या बाबतीत समाजाचे बुरसटलेले विचार आनंदीबाई यांचे पती यांना बिलकूल मान्य नव्हते. त्यांनी स्वतः आनंदीबाई यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले.
तिथून पुढे आनंदीबाई यांची शिकवणी सुरू झाली आनंदीबाई यांनी इंग्रजी आणि संस्कृत भाषांच प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांचे पती गोपाळराव यांनी आनंदीबाई यांचे नाव मिशनरी शाळेमध्ये नोंदवले. वैद्यकीय शिक्षण मिळवण्यासाठी आनंदी बाईंचे पती गोपाळराव यांनी खूप प्रयत्न केले. समाजाचा आनंदीबाई यांच्या या निर्णयाला विरोध होता. म्हणजे समाज आनंदीबाई यांच्या वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या विरोधात होता.
परंतु या सगळ्या वाटचाली मध्ये त्यांचे पती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले इतकच नव्हे तर त्यांनी अमेरिकेमध्ये चौकशी देखील केली, परंतु वैद्यकीय शिक्षण घ्यायचा असेल तर क्रिश्चन धर्म स्वीकारावा लागेल अशी अट त्यांना घालण्यात आली. शेवटी खूप खटाटोप करून कसंतरी आनंदीबाई यांना अमेरिकेमधील मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याची परवानगी मिळाली.
तेही क्रिश्चन धर्म स्वीकारल्या शिवाय. त्यावेळी आनंदीबाई यांचा वय फक्त १९ वर्ष होतं. अमेरिकेमधील वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला. आनंदीबाई यांनी खूप कष्ट घेऊन अतत प्रयत्नांनी महिनत करून वैद्यकीय शिक्षण घेतलं. भारतीय समाजाचा आनंदीबाई यांच्या या निर्णयास खूप विरोध होता. परंतु आनंदीबाई यांनी एक पाऊल पुढे घेऊन सगळ्यांना त्यांचं हे शिक्षण घेणं किती महत्त्वाचा आहे हे पटवून दिलं.
शिवायच भारतामध्ये एक महिला डॉक्टरची किती गरज आहे हे देखील सगळ्यांना समजावून दिलं. त्यानंतर हळूहळू आनंदीबाई यांच्या वैद्यकीय शिक्षणासाठी सगळ्यांचा प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली तर काही लोकांनी आर्थिक फंड जमा करून आनंदीबाई यांच्या शिक्षणास दिला. आता आनंदीबाई यांच्या वाटचालीमध्ये लोकांचे आशीर्वाद आणि त्यांच्या पतीची खंबीर साथ होती.
खूप प्रयत्न करून शेवटी इसवी सन १८८६ मध्ये आनंदीबाई यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आणि आनंदीबाई यांना एम.डी. अशी पदवी जाहीर झाली. आणि आनंदीबाई या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या आनंदीबाई यांची ही ख्याती सर्व जगभर पसरली विक्टोरिया राणीने स्वतः आनंदीबाईंना भेट देऊन त्यांचा सत्कार करून त्यांच अभिनंदन केलं.
- नक्की वाचा: अहिल्याबाई होळकर यांची माहिती
आनंदी गोपाळ कादंबरी – Dr Anandibai Joshi Book in Marathi
“आनंदी गोपाळ” ही कादंबरी श्री ज जोशी यांनी लिहली आहे. आनंदी गोपाळ या कादंबरीमध्ये आनंदी जोशी यांच्या जीवनातील खडतर प्रवास दर्शवला आहे. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे आनंदीबाई जोशी यांना आपलं वैद्यकीय शिक्षण घेण्यास कुठल्या कुठल्या प्रसंगांना सामोरे जावं लागलं याच्यावर सविस्तर माहिती या कादंबरीमध्ये लिहिली गेली आहे.
आनंदीबाई यांच्या जीवनावर अनेक कथा तसेच नाट्य आणि चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहेत. २०१९ मध्ये आनंदीबाई यांच्या जीवनावर एक चित्रपट निर्मिती करण्यात आला होता. त्या चित्रपटाचं नाव “आनंदी गोपाळ” असं होतं या चित्रपटामध्ये आनंदी आणि गोपाळ या दोघांचा समाजाविरुद्धचा लढा आणि त्यांच्या जीवनात येणारे अडथळे या चित्रपटात दाखवले आहेत. हा चित्रपट खूपच लोकप्रिय ठरला.
मृत्यू
आनंदीबाई यांनी एकोणिसाव्या वयात डॉक्टर ही पदवी मिळवली. परंतु काळाने त्यांची साथ दिली नाही. त्यांना शयरोग होता. आनंदीबाई या खुप स्त्रियांसाठी प्रेरणादायी ठरल्या. एक स्त्री ही कुठल्याच गोष्टी मधे मागे नाही आहे. तसेच स्त्री देखील पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुरुष जे काम करतात ती कामं करू शकते असा आदर्श आनंदीबाई यांनी समाजातील सर्व स्त्रियां समोर ठेवला.
परंतु आनंदी बाई यांनी घेतलेल्या ज्ञानाचा वापर समाजाच्या हितासाठी त्यांना करता आला नाही. आनंदीबाई यांच डॉक्टर होऊन भारतामध्ये दवाखाना उघडण्याचे स्वप्न होतं. जे अपूर्ण राहिलं त्यांना समाजसेवा करायची होती परंतु रोगाने घात केला. आणि २१ फेब्रुवारी १८८७ रोजी आनंदीबाई यांचा निधन झालं.
आम्ही दिलेल्या dr anandibai joshi information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची माहिती” यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about anandibai joshi in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि anandi gopal joshi information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये anandibai joshi essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट