डॉ अनिल काकोडकर यांची माहिती Anil Kakodkar Information in Marathi

Anil Kakodkar Information in Marathi डॉक्टर अनिल काकोडकर हे भारतातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत. त्यासोबतच भारतामधील महत्त्वपूर्ण वैज्ञानिक अनु संशोधन केंद्राचे प्रमुख पद सांभाळण्याची जबाबदारी डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हाती होती. याशिवाय डॉक्टर अनिल काकोडकर यांची थोरियम इंधनावर आधारित अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक अशी विशेष ओळख आहे. डॉक्टर अनिल काकोडकर यांचे भारताच्या अणुऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्या योगदानामुळे भारताने अनिल काकोडकर यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे भारतात सर्वश्रेष्ठ मांडले जाणारे पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.

भारताला अनु ऊर्जेचे एक मोठं स्त्रोत्र निर्माण करून देण्याचं काम डॉक्टर अनिल काकोडकर यांनी केलं. थोरियम या इंधनापासून अनिल काकोडकर यांनी अनु उर्जा निर्माण करण्याचं संशोधन केलं. आजच्या लेखामध्ये आपण डॉक्टर अनिल काकोडकर यांची वैज्ञानिक क्षेत्रातील कामगिरी जाणून घेणार आहोत.

dr anil kakodkar information in marathi
dr anil kakodkar information in marathi

डॉ अनिल काकोडकर यांची माहिती – Anil Kakodkar Information in Marathi

पूर्ण नाव डॉक्टर अनिल काकोडकर
जन्म११ नोव्हेंबर १९४३
जन्म गावजन्म मध्य प्रदेशातील बारावनी गावचा आहे
राष्ट्रीयत्व भारतीय
ओळख वैज्ञानिक अनु संशोधन केंद्राचे प्रमुख पद
उंची ५ फुट ९ इंच ( १.७५ मीटर )
राष्ट्रीय पुरस्कारपद्मश्री पुरस्कार, पद्मविभूषण, जे भाभा स्मृती पुरस्कार

जन्म

डॉक्टर अनिल काकोडकर यांचा जन्म सन १९४३ मधला आहे. ११ नोव्हेंबर १९४३ मध्ये काकोडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील बारावनी येथे झाला. डॉक्टर अनिल काकोडकर यांचं घरानं गांधीवादी होतं. म्हणजेच स्वातंत्र्य पूर्वीच्या काळामध्ये अनिल काकोडकर यांचे आई-वडील गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते.

काकोडकर यांचे बालपण त्यांच्या आई-वडिलांच्या गांधी वादी विचारांमध्ये गेलं. लहानपणापासून काकोडकर यांच्या मनावर प्रबोधन कारक विचारांचा ठसा त्यांच्या घरच्यांनी उमटवला. काकोडकर हे हुशार आणि तल्लख बुद्धीचे होते त्यामुळे त्यांचा शैक्षणिक आयुष्य देखील अगदी सहज रित्या पूर्ण झालं.

शिक्षण

हुशार आणि चातुर्य असलेले डॉक्टर अनिल काकोडकर यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेतूनच पूर्ण केलं. पुढच्या शिक्षणासाठी काकोडकर खारगाव येथे गेले माध्यमिक शिक्षण त्यांनी खारगाव येथूनच संपूर्ण केलं. पुढे जाऊन अनिल काकोडकर मुंबईला पोहोचले मुंबई मधील सुप्रसिद्ध रूपारेल कॉलेज येथे त्यांनी त्यांचं बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. यंत्र शास्त्रीय म्हणजेच मेकॅनिकल ची पदवी अनिल काकोडकर यांनी १९६३ साली मुंबई विद्यापीठ, व्हि जे टी आय इथून संपादन केली.

वैयक्तिक आयुष्य

डॉक्टर अनिल काकोडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील बारावनी गावचा आहे. डॉक्टर काकोडकरांना त्यांच्या आई वडिलांनी लहानपणापासूनच स्वातंत्र्याचे धडे गिरवायला शिकवले काकोडकर यांचा शैक्षणिक आयुष्य हसत-खेळत गेलं, कारण काकोडकर यांची बुद्धी अतिशय तल्लख होती त्यामुळे शालेय जीवनात परीक्षा देणे त्यांना अतिशय सोपं वाटायचं.

मॅट्रिकची परीक्षा पास करून डिग्री मिळवण्यासाठी ते मुंबईला आले. १९६४ मध्ये डॉक्टर अनिल काकोडकर भाभा अनु संशोधन केंद्रामध्ये रुजू झाले. १९६९ मध्ये डॉक्टर अनिल काकोडकर हे इंग्लंड मध्ये पोहोचले तिकडे त्यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठातून म्हणजेच ब्रिटिश युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर पदवी संपादन केली.

राजकीय आयुष्य

डॉक्टर अनिल काकोडकर यांनी भाभा संशोधन केंद्रामध्ये रिॲक्टर इंजीनियरिंग डिपार्टमेंट मध्ये बनवल्या जाणाऱ्या ध्रुव रिॲक्टरमध्ये नवीन व चांगल्या क्षमतेचे तंत्रज्ञान वापरून या क्षेत्रांमध्ये मोलाची भर टाकली. कल्पकम आणि रावतभट्ट या दोन अनुभट्टी यांची परिस्थिती अतिशय गंभीर होती म्हणजे त्या मोडकळीला आल्या होत्या डॉक्टर अनिल काकोडकर यांनी तांत्रिक कौशल्य वापरून या भट्यांमध्ये सुधारणा घडवून आणली.

डॉक्टर अनिल काकोडकर थोरियम अनु ऊर्जेचा स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक आहेत. त्यांनी भारताला ऊर्जा क्षेत्रांमध्ये उच्च स्तरावर नेण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांनी भारतामध्ये थोरियम हा इंधन सहज उपलब्ध असल्यामुळे त्यांनी या इंधनापासून ऊर्जा स्तोत्र निर्माण करून दाखवले आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये भर पाडली.

त्यांच्या या कार्यामधून एक गोष्ट जाणवली म्हणजे भट्टीमध्ये थोरियम युरेनियम २३३ हा प्रमुख ऊर्जा स्तोत्र वापरला जातो. ज्यामुळे भारताची ७० टक्के ऊर्जेची गरज कमी होते आणि आपल्या देशातच आढळणाऱ्या या इंधनामुळे आपल्याला एका प्रकारे फायदा होतो. डॉक्टर अनिल काकोडकर यांच्याकडे अनु संशोधनाचा गाढा अनुभव आहे.

डॉक्टर अनिल काकोडकर यांच्याकडे भारतातील महत्त्वाची वैज्ञानिक पदे हाताळण्याचं काम दिलं होतं. भारतातील महत्वाच्या अनुभट्टींमध्ये प्रमुख पद डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हाती सोपवण्यात आलं होतं. २०११ मध्ये अनिल काकोडकर यांच्या हाती भारतीय तंत्रज्ञान संस्था जी मुंबईमध्ये आहे या संस्थेचे अध्यक्ष पद होतं.

१९९९ ते २००० या कालावधीमध्ये अनिल काकोडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान अकॅडमीच्या अध्यक्ष पदावर होते. याच कालावधी दरम्यान अनिल काकोडकर एन एस जी ग्रुप म्हणजे न्यूक्लियर सप्लाय ग्रुप चे सभासद होते.अनिल काकोडकर जागतिक अणुऊर्जा महामंडळाचे सभासद देखील होते.

जागतिक नवतंत्रज्ञान संस्थेने अनिल काकोडकर यांना मानाचे सभासदत्व पद देखील दिलं आहे. डॉक्टर अनिल काकोडकर यांची ओळख भारतातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणून आहे. त्या शिवाय त्यांच्या हाती भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्षपद आहे. डॉक्टर अनिल काकोडकर भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत. एकेकाळी होमी भाभा अनु संशोधन केंद्राचे संचालक पद देखील डॉक्टर अनिल काकोडकर यांनी सांभाळलं होतं.

शोध

डॉक्टर अनिल काकोडकर यांनी अनेक संशोधन केले. त्यांनी भारतामध्येच सहज रित्या मिळणार थोरियम इंधन याच्या पासून ऊर्जा निर्माण करण्याचं काम केलं. या त्यांच्या कार्यामुळे भारतामध्ये ऊर्जेची कमी जाणवत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या इंधनापासून ऊर्जा निर्माण होते तो आपल्या भारतातच आढळतो त्यामुळे भारताला अनु ऊर्जेमध्ये एक कलाटणी मिळाली.

भारतीय स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक

डॉक्टर अनिल काकोडकर हे भारतीय अनु शास्त्रज्ञ आहेत त्यासोबतच भारतातील अनुसंशोधन केंद्रांमधील मुख्य पदे आज पर्यंत डॉक्टर अनिल काकोडकर यांनी सांभाळली आहेत. त्या सोबतच अनिल काकोडकर थोरियम इंधनावर आधारित अनुउर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक मानले जातात.

इतर माहिती

डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या कार्यावर आधारित काही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. सूर्यकोटी समप्रभ द्रष्टा अनुयात्रिक डॉक्टर अनिल काकोडकर हे लेखिका अनिता पाटील यांनी लिहिलेले पुस्तक आहे. अनु विश्वातील ध्रुव डॉक्टर अनिल काकोडकर हे निरज पंडित यांनी लिहिलेले पुस्तक आहे.

डॉक्टर अनिल काकोडकर यांना त्यांच्या कार्यासाठी काही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले. १९९८ मध्ये पद्मश्री साठी अनिल काकोडकर यांचे नाव पुढे करण्यात आलं होतं. पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. १९९९ मध्ये डॉक्टर अनिल काकोडकर यांनी पद्मभूषण मिळवला.

२००९ मध्ये त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सन २०१० मध्ये गोवा राज्याकडून डॉक्टर अनिल काकोडकर यांना गोमंत विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. सन २०११-१२ मध्ये डॉक्टर अनिल काकोडकर यांना महाराष्ट्र राज्याकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात करण्यात आला.

डॉक्टर अनिल काकोडकर यांना २०१४ मध्ये मध्य प्रदेश राज्याकडून मध्यप्रदेश गौरव पुरस्कार जाहीर झाला. १९८८ मध्ये डॉक्टर अनिल काकोडकर यांना हरिओम आश्रम प्रेरित विक्रम साराभाई पुरस्कार मिळवण्याचा मान मिळाला. अनिल काकोडकर यांना त्यांच्या कार्यामुळे एकावर एक पुरस्कार मिळत होते.

११९७ मध्ये अनिल काकोडकर यांना एच के फिरोदिया पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याच वर्षी त्यांना रॉकवेल पदक हा पुरस्कार देखील मिळाला. डॉक्टर अनिल काकोडकर यांना त्यांनी दिलेल्या अनु ऊर्जा व तंत्रज्ञानाच्या योगदाना बद्दल फिक्की पुरस्कार १९९८ मध्ये देण्यात आला.

११९८ मध्ये डॉक्टर अनिल काकोडकर यांना अनकॅन जीवनगौरव पुरस्कार देखील मिळाला. १९९९ ते २००० या दरम्यान डॉ अनिल काकोडकर यांना एच जे भाभा स्मृती पुरस्कार देण्यात आला. सन २००० मध्ये डॉक्टर अनिल काकोडकर यांना गोदावरी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भारतातील नावाजलेल्या शास्त्रज्ञान पैकी डॉक्टर अनिल काकोडकर एक आहेत. त्यांचं अनु उर्जा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये असलेले योगदान खूप मोठ आहे. त्यांच्या थोरियम या इंधनापासून उर्जा निर्माण करण्याच्या शोधामुळे भारताची भविष्य मधील एक काळजी कमी झाली आणि भविष्यामध्ये कणखरपणे टिकून राहण्याच्या क्षमतेमध्ये वाढ झाली. या शोधामुळे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये देखील भारताचं नाव एक पायरी पुढे गेलं.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये Anil Kakodkar Information in Marathi language काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर information about Anil Kakodkar in marathi म्हणजेच “भारतीय अणुशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर” dr anil kakodkar information in marathi यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या anil kakodkar information in marathi wikipedia या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि anil kakodkar scientist information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!