अनुस्कुरा घाट माहिती Anuskura Ghat Information in Marathi

anuskura ghat information in marathi अनुस्कुरा घाट माहिती, अणुस्कुरा हा एक ऐतिहासिक मार्ग आहे ज्याचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोल्हापूरहून कोकण मध्ये प्रवेश करण्यासाठी केला होता आणि आज आपण या लेखामध्ये अणुस्कुरा घाटाविषयी माहिती पाहणार आहोत. अणुस्कुरा हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील एक ठिकाण आहे आणि या मार्गाचा वापर हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोल्हापूरहून म्हणजेच पन्हाळगडावरून कोकण भागामध्ये प्रवेश करण्यासाठी वापरलेला मार्ग आहे. त्यामुळे अणुस्कुरा घाटाला एक ऐतिहासिक ओळख मिळाली आहे.

तसेच या ठिकाणी एक पांडवकालीन मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळते. अणुस्कुरा हा एक सातवाहनकालीन घाट मार्ग आहे जो कोल्हापूर आणि कोकणाला जोडतो आणि या घाटाजवळ प्राचीन शिलालेख, पांडवकालीन मंदिर हि ऐतिहासिक ठिकाणे आहेत परंतु या ठिकाणांच्यावर दुर्लीक्षित आहेत.

ब्रिटीशांच्या काळामध्ये या मार्गावरून राजापूर या बाजारपेठेतून निर्यात होणारा माल नेला जात होता. या मार्गावरून जाताना अनेक झाडे आहेत त्यामुळे हे घनदाट जंगल बनते आणि हा एक नागमोडी घाटमार्ग आहेत तसेच घाटावर दगडी सुळके देखील आहेत म्हणून सध्या हा घाटमार्ग एक धोकादायक मार्ग आहे असे म्हटले जाते.

anuskura ghat information in marathi
anuskura ghat information in marathi

अनुस्कुरा घाट माहिती – Anuskura Ghat Information in Marathi

ठिकाणाचे नावअणुस्कुरा घाट
प्रकारघाट मार्ग
ओळखछत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणामध्ये प्रवेश करण्यासाठी वापरलेला मार्ग आणि सातवाहन कालीन मार्ग
केंव्हा बनवला२००२ मध्ये
पाहण्यासारखी ठिकाणेनैसर्गिक वातावरण (जंगल आणि नागमोडी वळणे), शिलालेख आणि पांडवकालीन मंदिर आणि इतर छोटी मोठी पर्यटन स्थळे.

अणुस्कुरा घाटाविषयी मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts

 • अणुस्कुरा घाटमार्गाचा वापर हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोल्हापूर मधून कोकोन मध्ये जाण्यासाठी किंवा प्रवेश करण्यासाठी या मार्गाचा वापर केला होता.
 • वाहतुकीसाठी अणुस्कुरा घाट हा २००२ मध्ये तयार करण्यात आला होता आणि वाहतुकीसाठी २००२ मध्ये या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले होते परंतु सध्या हा मार्ग सुव्यवस्थेत नाही.
 • अणुस्कुरा घाटामध्ये घनदाट जंगल, नागमोडी वळणे आणि दगडी सुळके आहेत त्यामुळे हा घाट आपल्याला निसर्गाचे सौदर्य दाखवतो.
 • अणुस्कुरा घाट हा कोल्हापूर जिल्हा आणि कोकण जोडणारा एक मार्ग आहे आणि ह्या मार्गावरून कोल्हापूर जिल्हा हा राजापूर या कोकणातील गावाला जोडला जातो त्यामुळे हा कोकणाला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे किंवा घाट आहे.
 • हा मार्ग जरी २००२ मध्ये तयार करण्यात आला असला तरी हा मार्ग सातवाहनकालीन घाट मार्ग आहे असे म्हटले जाते.
 • त्याचबरोबर या घाटावर पांडवकालीन मंदिर आणि प्राचीन शिलालेख देखील आहे.
 • अणुस्कुरा घाट (राजापूर) हा शाहुवाडी जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे आणि तेथून पुढे कोकण घाट सुरु होतो.
 • ब्रिटीशांच्या काळामध्ये या मार्गावरून राजापूर या बाजारपेठेतून निर्यात होणारा माल नेला जात होता.
 • अणुस्कुरा ते कोल्हापूर या घाटमार्गाचे अंतर हे ३६५ किलो मीटर इतके आहे.
 • या घाटावर एक शिलालेख आहे आणि या शिलालेख हि पांडवांच्या उपस्थितीची खून आहे आणि असे म्हटले जाते कि हि खून म्हणजे भीमाने त्याच्या बोटाने खडकावर मोडी लिपीमध्ये काही संदेश लिहिलेला आहे.
 • या घाटमार्गावर जे पांडवकालीन मंदिर म्हणजेच हे मंदिर पांडवांच्या काळामध्ये बांधलेले आहे आणि ते मंदिर हे उगवई देवीचे मंदिर आहे.
 • अणुस्कुरा घाट हा राजापूर (कोकण) आणि कोल्हापूर शहराला जोडणारा एक मार्ग आहे आणि कोकणामध्ये प्रवेश करण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे.

अणुस्कुरा घाटाला कसे जायचे – how to reach

 • जर तुम्हाला अणुस्कुरा या ऐतिहासिक मार्गाला आणि नैसर्गिक ठिकाणाला भेट द्यायची असल्यास आणि जर तुम्हाला रेल्वेने यायचे असल्यास तुम्ही कोल्हापूर शहरामध्ये रेल्वेने येऊ शकता कारण कोल्हापूर मध्ये रेल्वे स्टेशन आहे आणि हे अणुस्कुरा पासूनचे जवळचे ठिकाण आहे आणि तेथून तुम्ही बस किंवा टॅक्सी पकडू शकता.
 • कोल्हापूर आणि अणुस्कुरा हि ठिकाणी चांगल्या रस्त्यांनी जोडलेली आहेत त्यामुळे आपण कोल्हापूर शहरामध्ये येऊन बस पकडून तुम्ही अणुस्कुरा घाटामध्ये जाऊ शकता किंवा मद तुम्ही स्वताची कार किंवा दुचाकी घेऊन देखील जाऊ शकता.
 • जर तुम्ही तुमची खाजगी गाडी घेवून गेलात तर तुम्हाला घाटामध्ये असणारी काही छोटी मोठी पर्यटक स्थळे तर पहायला मिळतीलच परंतु तुम्हाला काही इतर पर्यटन स्थळे देखील पहायला मिळतात.

अणुस्कुरा घाटाविषयी काही टिप्स – tips

 • जर तुम्हाला अणुस्कुरा घाटावर जायचे असल्यास तुम्हाला घाटाचा अनुभव असला पाहिजे म्हणजेच वेगवेगळ्या मार्गांनी घाटावर कसे जायचे आणि घाटातून बाहेर कसे यायचे या बद्दल माहिती पाहिजे.
 • तसेच तुम्हाला घाटावरील प्रेक्षणीय इतर स्थळे देखील माहिती असल्यास तुम्ही ते देखील पाहू शकता.
 • अणुस्कुरा घाटावर रात्री प्रवास करणे योग्य नाही त्यामुळे तुम्ही शक्यतो घाटातून दिवसाच प्रवास करा.
 • अणुस्कुरा घाटावर अनेक नागमोडी वळणे असल्यामुळे या घतवरून गाडी चालवताना सावधगिरी बाळगली पाहिजे आणि वाहनांचा वेग हा कमी असला पाहिजे.
 • अणुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळत असल्यामुळे आणि आणि रस्त्याची परिस्थिती देखील चांगल्या स्थितीमध्ये नसल्यामुळे या मार्गावरची वाहतूक हि अवजड वाहनांच्यासाठी बंद करण्यात आली आहे.
 • अणुस्कुरा घाटामध्ये राहण्याची आणि खाण्याची सोय नाही त्यामुळे तुम्ही घाटातून बाहेर पडल्यानंतरच आपल्या खाण्यासाठी काही तरी मिळेल.

आम्ही दिलेल्या anuskura ghat information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अनुस्कुरा घाट माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about anuskura ghat in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!