apps information in marathi ॲप्स विषयी माहिती, आज आपण या लेखामध्ये वेगवेगळ्या ॲप्स विषयी माहिती घेणार आहोत तसेच ते कश्या प्रकारे काम करते, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत. या विषयी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. ॲप हे एक स्वयं समाविष्ट सॉफ्टवेअर पॅकेज म्हणून केली जाते जी वापरकर्त्यांना मोबाईल किंवा डेस्कटॉप डिव्हाईसवर विशष्ट प्रकारचे कार्य करण्यास अनुमती देते आणि वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स हे वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग भाषांच्यामध्ये लिहिलेले असतात.
ॲप्स हे प्रामुख्याने आजच्या जगामध्ये मोबईल अर्थव्यवस्थेचे प्रमुख चालक म्हणून मानले जातात आणि २००७ मध्ये आयफोन आणि २००८ मध्ये ॲप स्टोअरच्या रिलीजसह ॲप्सनी चालना दिली. चला तर खाली आपण ॲप्स विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती जाणून घेवूया.
ॲप्स विषयी माहिती Apps Information in Marathi
ॲप्सचे प्रकार – types
ॲप्सचे काही प्रकार आहेत आणि खाली आपण ते कोणकोणते आहेत आणि त्याचा वापर हा कसा होतो या विषयी माहिती पाहणार आहोत.
वेब ॲप्स
वेब ब्राऊझर विंडो वापरून वेब आणि मोबईल वेब अनुप्रयोगामध्ये प्रवेश केला जाऊ शकतो आणि यामध्ये ॲपला ऑपरेट करण्यासाठी कोणत्याही स्टोरेज क्षमतेची किंवा इन्सटॉलेशनची आवश्यकता नसते आणि मोबईल वेब ॲप्लिकेशन हे एकाधिक स्क्रीन आकार अहि डिव्हायसेस मध्ये सहज जुळवून घेतात.
मूळ मोबईल ॲप्स – mobile app information in marathi
मुळ मोबाईल ॲप्लिकेशन्स हे सामन्यता मोबईल डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी विकसित केले जातात आणि म्हणून मुला अँड्रॉईड मोबईल ॲप्स आणि मूळ आयओएस ॲप्स उपलब्ध आहेत.
डेस्कटॉप ॲप्स
डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स हे एक सॉफ्टवेअर आहे, जे विशिष्ट क्रियाकलाप पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र संगणकावर कार्यान्वित केले जावू शकते. काही डेस्कटॉप प्रोग्राम्स जसे कि वर्ड प्रोसेसर, मिडिया प्लेयर, पिक्चर इडीटर हे आपल्याला विविध कार्ये पूर्ण करण्यासाठी सक्षम करतात.
प्रोग्रेसिव्ह वेब ॲप्स
प्रोग्रेसिव्ह वेब ॲप्स हे असे वेब ॲप्स आहेत जे वापरकर्त्यांना नेटिव्ह ॲप्शी तुलना करता येणारा अनुभव प्रदान करण्यासाठी सर्व्हिस वर्कर्स, मॅनिफेस्ट आणि इतर वेब प्लॅटफॉर्म क्षमतांसह प्रगतीशील सुधारणा एकत्र करतात.
ॲप्सचे महत्व – importance
ॲप्स हे प्रामुख्याने आजच्या जगामध्ये मोबईल अर्थव्यवस्थेचे प्रमुख चालक म्हणून मानले जातात आणि २००७ मध्ये आयफोन आणि २००८ मध्ये ॲप स्टोअरच्या रिलीजसह ॲप्सनी चालना दिली. खाली आपण ॲप्सचे महत्व काय आहे ते पाहणार आहोत.
- एखादे व्यवसाय ॲप हे एखाद्या कंपनीची उत्पादकता वाढवू शकते आणि त्या कंपनीची पोहोच देखील वाढवू शकते.
- त्याचबरोबर संस्थांना बुक कीपिंग, इंव्हेन्टरी कंट्रोल आणि संपर्क केंद्र सेवा प्रधान करते.
- वेगवेगळ्या प्रकारची ॲप्स हि कंपनीच्या कार्यक्षमतेत सुधारणा करणारे सॉफ्टवेअर वेगाने तैनात करण्यात व्यवसाय मालकांना मदत करते.
- उपक्रमांना त्यांच्या वापरकर्त्याशी किंवा ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी सक्षम करणे आणि संस्थेची एसइओ स्थिती सुधारणे. कर्मचाऱ्यांना कामाच्या ठीकानाबाहेरील व्यावसायिक कार्ये पूर्ण करण्याची परवानगीदेते.
- ॲप्स इतर प्रकारच्यासॉफ्टवेअर पेक्षा कमी खर्ची असतात.
सध्या अनेक वेगवेगळ्या सोशल मिडिया ॲप्चा मोठ्या प्रमाणात वापर हा लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सार्वजन करत आहेत आणि खाली आपण त्यामधील काही लोकप्रिय सोशल मिडिया ॲप्स पाहणार आहोत जसे कि फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि असे इतर अनके ॲप्स आहेत.
इंस्टाग्राम – Instagram
इंस्टाग्राम या ॲपविषयी कोणाला माहित नाही तर या ॲपविषयी सर्व लोकांना माहिती आहे म्हणजेच लहानांच्यापासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना या ॲपविषयी माहित आहे. आपण इंस्टाग्राम या ॲपवर फोटो शेअर करू शकतो तसेच दुसऱ्यांनी टाकलेले फोटो लाईक किंवा कमेंट करू शकतो तसेच आपण इंस्टाग्राम वर वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स पाहू शकतो तसेच सेलिब्रिटी आणि पॉलीटीशियन अश्या लोकांना फॉलो करू शकतो.
तसेच या ॲपविषयी विशेष म्हणजे आपण या ॲपवरून आपल्या बिझनेसची देखील वाढ करू शकतो म्हणजेच आपण या ॲपवर बिझिनेस अकाऊंट तयार करून आपल्या प्रोडक्टचे मार्केटिंग आपण या ॲपद्वारे करू शकतो. इंस्टाग्राम हे एक विनामूल्य फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग ॲप आहे जे आपण आयफोन किंवा स्मार्ट फोनवर वापरू शकतो.
लोक या वर फोटो आणि व्हिडीओ अपलोड करू शकतात आणि ते त्यांच्या मित्रांच्या निवडलेल्या गटासह सामायिक देखील करू शकतात. १३ वर्षाच्या वरील कोणतीही व्यक्ती त्यांच्या इमेल पत्त्याची नोंदणी करून आणि वापरकर्त्याचे नाव निवडून खाते तयार करू शकते.
फेसबुक – Facebook
फेसबुक हे एक सोशल नेटवर्किंग साईट असून या ॲपची स्थापन ४ जानेवारी २००४ या दिवशी झाली आणि या फेसबुक ॲपचे संस्थापक हे मार्क झुकेरबर्ग हे असून हि एक अमेरिकन कंपनी आहे. हि सोशल नेटवर्किंग साईट अनेकांच्यासाठी कुटुंब आणि मित्रांच्यासोबत ऑनलाईन संपर्क साधण्यासाठी आपल्याल मदत करते आणि हे महाविद्यालयीन मुलांच्यासाठी जरी डिझाईन केले असले तरी हे १३ वर्षावरील वय असणारा कोणताही व्यक्ती हे ॲप वापरू शकतो.
फेसबुक हे एक विनामूल्य फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग ॲप आहे जे आपण आयफोन किंवा स्मार्ट फोनवर वापरू शकतो. लोक या वर फोटो आणि व्हिडीओ अपलोड करू शकता. तुम्ही एक विशिष्ट विषयाशी संबधित एक किंवा अनेक गट तयार करू शकता आणि तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांचे सदस्य होऊ शकता. हे इतर फेसबुक वापरकर्त्यांना सामील होण्यासाठी परवानगी देते.
व्हॉट्सॲप – Whatsapp
व्हॉट्सॲप हे एक ॲप आहे जे इन्स्टंट मेसेजिंग करण्यासाठी असलेले एक ॲप आहे जे आयफोन, अँड्रॉइड, विंडोज फोन आणि स्मार्टफोन वापरकर्त्यांना मजकूर, प्रतिमा, ऑडिओ आणि व्हिडिओ संदेशांची मोफत देवाणघेवाण करण्याची परवानगी देते किंवा आपण या ॲपवरून मजकूर, प्रतिमा, ऑडिओ आणि व्हिडिओ दुसऱ्या व्यक्तीला पाठवू शकतो.
हे एक असे ॲप आहे ज्यामध्ये आपण मजकूर, प्रतिमा, ऑडिओ आणि व्हिडिओ संदेश कोणतेही मूल्य न देता करता येतात पण या ॲपवर मजकूर, प्रतिमा, ऑडिओ आणि व्हिडिओ संदेश करण्यासाठी इंटरनेट ची आवश्यकता असते. सध्या हे जगभरामध्ये १ अब्ज लोक व्हॉट्सॲपचा वापर करतात आणि हे ॲप सर्वात मोठे ॲप आहे.
आम्ही दिलेल्या apps information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर ॲप्स विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mobile app information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about apps in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट