औषधी वनस्पती माहिती व उपयोग Ayurvedic Vanaspati Information in Marathi

Ayurvedic Vanaspati Information in Marathi – Aushadhi Vanaspati Chi Mahiti औषधी वनस्पती माहिती व उपयोग मराठी पूर्वीच्या काळामध्ये आयुर्वेदिक वनस्पतींना अनन्य साधारण महत्व होते कारण या आयुर्वेदिक वनस्पती पूर्वीच्या काळामध्ये आजार बरे करण्यासाठी वापरल्या जात होत्या. आणि आज हि काही ठिकाणी वापरल्या जातात. काही ठिकाणी असे म्हणण्याचे कारण आजच्या आधुनिक काळामध्ये लोक आपला आजार बरा करण्यासाठी केमिकल युक्त औषधे खातात. पण जेवढे आयुर्वेदिक वनस्पतीच्या औषधांमुळे गुण येतात तितके केमिकलच्या औषधाने येत नाहीत आणि आयुर्वेदिक वनस्पतीचे अजून एक वैशिष्ट म्हणजे आयुर्वेदिक वनस्पतींच्या मुळे आपल्याला कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत.

आपल्या भारता देशामध्ये तुळस, कोरफड यासारख्या अनेक आयुर्वेदिक वनस्पती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि याचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी होतो. बहुतेक करून आयुर्वेदिक वनस्पती ह्या सुगंधी आणि औषधी गुणाने संपूर्ण असतात त्यामुळे त्या वनस्पतीचा वापर अन्नामध्ये किंवा औषध म्हणून केला जातो.

स्वयंपाकामध्ये औषधी वनस्पतींचा उपयोग हा मसाल्यांच्या रुपामध्ये होतो तर काही वनस्पती आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जातात.

 ayurvedic vanaspati information in marathi
ayurvedic vanaspati information in marathi

औषधी वनस्पती माहिती व उपयोग मराठी – Ayurvedic Vanaspati Information in Marathi

आयुर्वेदिक वनस्पती म्हणजे काय ? 

आयुर्वेदिक उपचार मराठी माहिती आयुर्वेदिक वनस्पती म्हणजे अश्या वनस्पती ज्या पूर्वीच्या काळी तसेच आजही काही भागांमध्ये छोट्या मोठ्या आजारांच्या उपचारासाठी वापरल्या जातात. उदाहरणार्थ – तुळस : जर आपल्याला खोकला असेल तर तुळशीच्या मूळ, खोड, पाने आणि मंजुळा या पासून काढा बनवला जातो. त्याच बरोबर कोरफड हे त्वचेची सुंदरता वाढवण्यासाठी वापरले जाते.

औषधी वनस्पती नावे – Aushadhi Vanaspati Chi Mahiti

औषधी वनस्पती मध्ये हळद, हिंग, आले, लसून, कडुलिंब, पुदिना, तुळस, चंदन आणि कोरफड या सारख्या आणि वनस्पती येतात. यामधील काही आयुर्वेदिक वनस्पतींची माहिती आणि या पासून होणारे फायदे खाली पाहणार आहोत.

पुदिना 

पुदिना हि वनस्पती शक्यतो सर्व लोकांना माहित आहे कारण खूप लोक पुदिन्याची चटणी बनवतात. पुदिना या वनस्पतीमध्ये आयुर्वेदिक गुण आहेत आणि म्हणूनच उन्हाळ्यामध्ये बहुतेक लोक पुदिन्याचा वापर आपल्या आहार करतात कारण तो एक थंड वनस्पती आहे आणि यामुळे उष्णतेपासून बचाव होतो.

पुदिण्यापासून बनवलेल्या काही टूथपेस्ट, माऊथ फ्रेशनर आणि काही कॅडिज आपल्याला बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. खूप कमी लोकांना माहित आहे कि पुदिना हा औषधी गुणांनी भरलेले आहे.

फायदे 

  • जर तुमचे केस गळत असतील तर त्याच्यावर उपाय म्हणून पुदिना वापरू शकतो.
  • पचन प्रक्रिया बिघडून आपले डोके दुखू शकते त्यामुळे जर आपण पुदिन्याचा चहा पिला तर डोके दुखणे कमी होऊ शकते.
  • पुदिन्याच्या पानांचा चूर्ण बनवून खाल्ला दात दुखणे बंद होते.

तुळस

आपल्या घराच्या सुरुवातीला असणारी तुळस हि खूप फायद्याची आहे आणि त्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. जर आपल्याला खोकला असेल तर तुळशीच्या मूळ, खोड, पाने आणि मंजुळा या पासून काढा बनवला जातो आणि तुळस हि आपल्या घराच्या आसपास कोठेही येवू शकते. तुळस वनस्पतीला हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्वाचे आणि पवित्र स्थान आहे.

फायदे

  • तुळशीच्या पानांचा रस हा सर्दी, खोकला, ताप या सारख्या आजारांवर मात करण्यासाठी वापरला जातो.
  • तुळस हि वनस्पती अपचन, निद्रानाश आणि डोकेदुखी या सर्व समस्यांवर खूप प्रभावीपणे काम करते.
  • तुळश आपल्या केसांच्यासाठी आणि त्वचेसाठी वापरले तर ते त्वचेला आणि केसांना चमक देते.
  • तुळस पानाच्या सेवनाने मेलेरीया या रोगापासून सुटका होते.

ब्राम्ही

ब्राम्ही हि एक लहान रेंगाळणारी औषधी वनस्पती आहे ज्याचे अनेक धर्म औषधी आहेत. या वनस्पतीला लहान फिकट निळसर रंगाची फुले असतात आणि त्याला पाच पाकळ्या असतात आणि त्याचे देठ खूप मावू असतात. ब्राम्ही हि वनस्पती पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे येवू शकते

फायदे

  • हि वनस्पती मानसिक थकवा दूर करण्यासाठी मदत करते.
  • ब्राम्ही वनस्पती खोकला, दमा, संधिवात, बद्धकोष्ठता, ताप, पाचक समस्या आणि केस गळणे या सारख्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
  • ब्राम्ही वनस्पती हि कर्करोगाविरुध्द काम करते.

कडुलिंब

कडुलिंब हि एक महत्वाची आणि औषधी वनस्पती आहे जी भारत आणि पाकिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. या वनस्पतीच्या मुळापासून त्याच्या झाडाच्या टोकापर्यंत यांचे औषधी गुणधर्म आहेत. कडूलिंबाची पाने कडू असतात पण ती खूप औषधी असतात आणि हा जरी कडू असला तरी तो केस, त्वचा आणि शरीराला खूप फायद्याचा असतो.

फायदे

  • कडुलिंब हा केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतो.
  • कडुलिंब हा डोळ्यांचा लालसरपणा, डोळ्याची जळजळ दूर करण्यासाठी उपयोगी ठरते.
  • दातांच्यासाठी कडुलिंब खूप चांगल्या प्रकारे काम करतो आणि आपण बाजारामध्ये मिळणाऱ्या टूथपेस्ट मध्ये देखील कडुलिंब वापरलेले असते.

हळद

हळद हि एक बारमाही आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि या वनस्पतीचे अनेक औषधी गुण असतात. या वनस्पती एक लहान देठ असतो आणि त्याला मोठी पाने असतात आणि याला पिवळ्या रंगाची फुले असतात. हळद हि त्वचेच्या सौंदर्यासाठी, जखम भरून येण्यासाठी तसेच खोकला सर्दी या छोट्या मोठ्या आजारासाठी हळद गुणकारी असते.

फायदे

  • हळद घातलेले दुध जर पिले तर खोकल्यापासून मुक्ती मिळू शकते.
  • हळद हे यकृताच्या आजारावर आणि कावीळ रोगावर उपचार करण्यास मदत करते.
  • हळद हि जातुनाशक आहे त्यामुळे जखम झाल्यानंतर, मुरूम, सूज यांच्यावर उपचार करण्यासाठी मदतीचे ठरू शकते.

आले

आले हि एक औषधी वनस्पती आहे आणि हि उष्ण कटीबंधात वाढणारी वनस्पती आहे. आले हे ठिसूळ आणि वालुकामय जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येते. अल्ले दुधामध्ये बुडवून ते वाळवून त्याची सुंठ बनवली जाते.

फायदे

  • जर आल्याचा कीस पाण्यामध्ये घालून उकळून ते घालून पिले तर त्यामुळे वजन कमी होऊ शकते.
  • आल्यामुळे खोकला कमी होऊ शकतो.

कोरफड

कोरफड हि वनस्पती कोरफड वंशाची एक रसाळ वनस्पती प्रजाती आहे आणि हे एक लहान तंतुमय झुडूप आहे. प्रामुख्याने ‘कोरफड जेल’ हे पीक कोरफड पानांपासून घेतले जाते. एलोवेरासाठी मानवी वापराचा सर्वात प्राचीन नोंद १६ व्या शतक बीसी पासून एबर्स पॅपिरस (इजिप्शियन वैद्यकीय रेकॉर्ड) कडून आला आहे.

कोरफड जेल सूर्यप्रकाशापासून मुक्त होण्यासाठी आणि जखमा भरण्यास मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ओळखले जाते. त्याचबरोबर छातीत जळजळ दूर करण्यापासून ते स्तनाचा कर्करोगाचा प्रसार कमी होण्यापर्यंत या वनस्पतीचे फायदे आहेत. कोरफड ही कोरफड वंशाची एक रसाळ वनस्पती प्रजाती आहे.

वनस्पती जाड, हिरवट, मांसल पानांसह आहे पण याला खोड नसते किंवा अगदी लहान खोड असलेली आहे जी वनस्पतीच्या मध्यवर्ती खोडा मधून बाहेर पडते. या वनस्पतीची पाने हिरव्या रंगाची असतात आणि पानांच्या दोन्ही कडा काटेरी असतात आणि जर आपण ते पान उघडून बघितले तर त्यामध्ये संपूर्ण भरलेले एक पारदर्शक जेल असते आणि हेच या वनस्पतीचे मुख्य पिक आहे.

फायदे

  • यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो.
  • कोरफड दातांमधील पट्टिका कमी करण्यास मदत होते.
  • कॅन्कर फोडांवर उपचार करण्यास मदत करते.
  • त्वचा सुधारून सुरकुत्या कमी होऊ शकतात.

वरील ayurvedic vanaspati information in marathi सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि औषधी वनस्पती माहिती व उपयोग मराठी फायदे तोटे काय आहेत. त्याचबरोबर रोग नियंत्रणासाठी कोणती उपाययोजना करावी हे सर्व या लेखातून आपल्याला भेटले आहे. aushadhi vanaspati in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच aushadhi vanaspati project in marathi pdf हा लेख कसा वाटला व अजून आयुर्वेदिक उपचार मराठी माहिती काही राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

vanaspati chi mahiti in marathi या आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “औषधी वनस्पती माहिती व उपयोग Ayurvedic Vanaspati Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!