3 January Balika Din Information in Marathi 3 जानेवारी बालिका दिन माहिती राष्ट्रीय बालिका दिवस महात्मा ज्योतिबा फुले ह्यांबद्दल आपणा सर्वांना माहिती आहेच. त्यांच्या पत्नी म्हणजेच सावित्रीबाई फुले ह्या होत्या. महात्मा ज्योतिबा फुले जसे खूप मोठ्ठे समाजसुधारक होते तसेच त्यांच्या पत्नी सुद्धा होत्या. म्हणून त्यांचा जन्मदिन हा बालिका दीन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्या देशातील पहिली महिला शिक्षक तसेच समाज सेविका सुद्धा होत्या. त्यांचा जन्म ३ जानेवारी, १८३१ रोजी झाला. सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अनेक प्रयत्न केले आणि मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा केला आणि म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या जन्म दिवसादिवशी म्हणजेच ३ जानेवारीला बालिका दिन म्हणून साजरा केला आणि आज आपण या लेखामध्ये बालिका दिन विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.
सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची दारे खुली केली आणि त्या देशातील पहिल्या महिला शिक्षक होत्या आणि ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुणे या शहरामध्ये शनिवारवाड्यावर पहिली मुलींची शाळा सुरु केली आणि नंतर त्यांनी अश्या एकूण १८ बालिका शाळा स्थापन केल्या. तसेच त्यांनी समाजसेविका आणि सत्यशोधक समाज्याच्या कार्यकर्त्या म्हणून आपली कामगिरी बजावली आणि ह्या एक लोकप्रिय समाजसुधारण ज्योतिबा फुले यांच्या पत्नी होत्या आणि अश्या मुलींच्यासाठी आणि समाजासाठी कार्य करणाऱ्या महिलेचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जयंती निमित्त बालिका दिवस साजरा केला जातो.
3 जानेवारी बालिका दिन माहिती – Balika Din Information in Marathi
दिनाचे नाव | बालिका दिन / दिवस ( girl child day ) |
दिवस | ३ जानेवारी |
सुरुवात | २००८ पासून |
सुरुवात कोणी केली | महिला आणि बाल विकास मंत्रालय |
बालिका दिन इतिहास आणि माहिती – history and information
बालिका दिन किंवा बालिका दिवस ( girl child day ) हा दिवस मुलींना अधिक चांगले स्थान मिळवून देण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी ३ जानेवारी म्हणजेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी साजरा केला जातो. बालिका दिन हा सर्वप्रथम २००८ पासून साजरा करण्यास सुरुवात झाली आणि हि सुरुवात महिला आणि बाल विकास मंत्रालयाने केली.
बालिका दिन हा दिवस भारतामध्ये सर्व ठिकाणी साजरा केला जातो परंतु भारतातील प्रत्येक राज्यामध्ये हा दिवस साजरा करण्याचे स्वरूप हे थोडे वेगवेगळे आहे म्हणजेच हे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. या दिवशी देशामध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि या कार्यक्रमांच्यामार्फत मुलींना भेडसवणारी असमानता तसेच सक्षमीकरण या विषयी माहिती दिली जाते तसेच याचे महत्व सांगून समाज्यामध्ये जागरुकता निर्माण केली जाते आणि दरवर्षी बालिका दिवस हा वेगवेगळ्या थीम वापरून साजरा केला जातो.
सावित्रीबाई फुले ह्या एक सामान्य स्त्री होत्या आणि यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी ३ जानेवारी १८३१ मध्ये झाला. इ.स १८४० या वर्षामध्ये सावित्रीबाई यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबा फुले यांना समाजसुधारक आणि समाजसेवक म्हणून काम केले आणि त्यांच्या पाठीमागे सावित्रीबाई फुले यांनी देखील आपल्या पतीच्या पाठीमागे समाजसेवेचे आणि समाजसुधारणेचे काम हाती घेतले.
आणि सध्या हि नावे इतकी लोकप्रिय झालेली आहेत कि जर आपण समाजसुधारक जरी म्हटले तरी आपल्या तोंडामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांची नावे येतात. सावित्रीबाई फुले यांनी लग्ना अगोदर कोणतेही शिक्षण घेतले नव्हते आणि म्हणून त्यांनी लग्न झाल्यानंतर शिक्षण घेतले आणि मग त्यांनी इतर मुलींच्यासाठी शिक्षणाचा मार्ग रिकामा करून दिला आणि त्यावेळी पासून मुलींना देखील शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेता येऊ लागले.
का साजरा करतात ?
- बालिका दिवस हा साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजेच पूर्वी मुलींना अनेक भेदभाव आणि शोषणाला सामोरे जावे लागत लागत होते आणि हे मुलींच्यावर होणारे भेदभाव आणि शोषण कमी करण्यासाठी तसेच सामाज्यामध्ये मुलींना चांगले स्थान मिळवून देण्यासाठी बालिका दिवस साजरा केला जाऊ लागला.
- त्याचबरोबर पूर्वी स्त्री शिक्षण घेणे खूप अवघड होते आणि कोणत्याही मुलींना शिक्षण घेता येत नव्हते आणि त्यावेळी सावित्रीबाई यांनी अनेक प्रयत्न करून मुलींच्या शिक्षणाचे मार्ग खुले केले आणि त्यांनी पुण्यामध्ये बालिका शाळा सुरु केल्या त्याचबरोबर त्यांनी समाजसेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून देखील काम केले आणि अश्या सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जयंती निमित्त ३ जानेवारील या दिवशी बालिका दिवस साजरा केला जातो.
बालिका दिन कसा साजरा करतात ?
समाजातील मुलींच्या पोषणासाठी बाल-बाल दिन साजरा करण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारतीय समाजातील मुलींविषयी लोकांची जाणीव वाढवण्यासाठी भारत सरकार एक मोठी मोहीम आयोजित करते. महिला व बालविकास मंत्रालयाने राष्ट्रीय साजरा म्हणून साजरा करण्यासाठी राष्ट्रीय बाल बाल दिन उत्सव २००८ पासून सुरू केला होता.
या मोहिमेच्या माध्यमातून भारत सरकारने मुलींविषयी असमानता भारतीय समाजात प्रकाशझोत टाकली. आज सरकार टीव्ही चॅनेल्स, स्थानिक वृत्तपत्रे आणि रेडिओ स्टेशन्सवर आणि “मुलगी वाचवा” संदेशाद्वारे विविध जाहिराती चालवतात. स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवी संस्थासुद्धा एकत्र येतात आणि मुलींविषयीच्या सामाजिक कलमाविरूद्ध लढा देण्यासाठी या उत्सवात भाग घेतात.
बालिका दिन साजरी करण्याची मुख्य उदिष्ठ्ये – objectives
- मुलींच्यावर होणारे भेदभाव आणि शोषण कमी करण्यासाठी बाल दिन साजरा केला जातो आणि त्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारे जागरूकता निर्माण केली जाते.
- बालिका दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे समाजामध्ये समानता आणण्यासाठी सरकाने हा दिवस सुरु केला आहे.
- मुलींना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे हे देखील हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उदिष्ट आहे.
- या कार्यक्रमांद्वारे किंवा दिनामार्फत स्त्री पुरुष असमानतेविषयी जनजागृती निर्माण करणे.
बालिका दिन विषयी अधिक माहिती
- ३ जानेवारी या दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व ठिकाणी बालिका दिवस साजरा केला जातो आणि हा दिवस सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो.
- राष्ट्रीय बालिका दिन / दिवस हा देशभरामध्ये साजरा केला जातो आणि हा दिवस देशभरामध्ये २४ जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो.
- आंतरराष्ट्रीय बालिका दिवस हा वेगवेगळ्या देशांच्यामध्ये साजरा केला जातो आणि हा दिवस ११ ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो.
महाराष्ट्र बालिका दिवस इतिहास
महाराष्ट्र बालिका दिवस हा ३ जानेवारी दिवशी साजरा केला जातो आणि हा दिवस सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो कारण त्यांनी मुलींच्या शिक्षणाची दारे खुली केली तसेच पुण्यामध्ये बालिका शाळेची स्थापना केली तसेच सामाजिक कार्यकर्त्या म्हणून देखील कामगिरी पार पाडली.
राष्ट्रीय बालिका दिन इतिहास
संपूर्ण भारतामध्ये २४ जानेवारी दिवशी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो आणि २४ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधान खुर्चीवर बसल्या होत्या आणि त्या पहिल्या महिला पंतप्रधान २४ जानेवारी या दिवशी झाल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय बालिका दिन इतिहास
अंतरराष्ट्रीय बालिका दिवस हा संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो आणि अंतराष्ट्रीय दिवस साजरा करण्याची सुरुवात हि एनजीओने केली आहे आणि हा एक अंतराष्ट्रीय प्रकल्प म्हणून सुरु केला. १९ डिसेंबर २०११ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी एकत्र हा ठराव मंजूर केला आणि मग त्यांनी ११ ऑक्टोबर हि तारीख बालिका दिनासाठी ठरवली आणि २०१२ पासून हा दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला जाऊ लागला.
आम्ही दिलेल्या balika din information in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “3 जानेवारी बालिका दिन” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या 3 january balika din information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about balika din in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण balika din in marathi या लेखाचा वापर बालिका दिन (महाराष्ट्र) असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट