Bhadang Recipe in Marathi भडंग रेसिपी मराठी भडंग हि रेसिपी महाराष्ट्रीयन म्हणजेच कोल्हापुरी आहे जी चिरमुरे किंवा मुरमुरे पासून बनवली जाते. भडंग रेसिपी हि एक स्नॅक्स रेसिपी आहे जी आपण आपण संध्याकाळच्या चहाच्या वेळी खावू शकतो. भडंग बनवताना चिरमुरे तसेच कोरडे गॅसवर भाजून घेतले जातात आणि मग त्यामध्ये कुरकुरीत तळलेले शेंगदाणे टाकले जातात आणि मग त्याला लाल मिरची पावडर, हळद, चिवडा मसाला, कडीपत्ता, ठेचलेला लसून मीठ याची फोडणी दिली जाते आणि ते चांगले मिक्स करून त्यामध्ये थोडी साखर घालून मिक्स केला जातो.
भडंग हि रेसिपी आपण कधीही बनवून ती १५ ते २० दिवस डब्यामध्ये घालून ठेवू शकतो आणि आपल्याला हवा तेंव्हा काढून खावू शकतो. भडंग हि रेसिपी जरी कोल्हापुरी असली तरी हि रेसिपी भारताच्या काही भागामध्ये बनवली जाते आणि आवडीने खाल्ली जाते.
भडंग हा घरी बनवण्यास खूप सोपा आहे आणि हि रेसिपी झटपट म्हणजे १५ ते २० मिनिटामध्ये अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण या लेखामध्ये भडंग रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.
भडंग रेसिपी मराठी – Bhadang Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
पाककला | कोल्हापुरी ( महाराष्ट्रीयन ) |
बनवण्याची पद्धत | खूप सोपी |
भडंग म्हणजे काय ?
भडंग बनवताना चिरमुरे तसेच कोरडे गॅसवर भाजून घेतले जातात आणि मग त्यामध्ये कुरकुरीत तळलेले शेंगदाणे टाकले जातात आणि मग त्याला लाल मिरची पावडर, हळद, चिवडा मसाला, कडीपत्ता, ठेचलेला लसून मीठ याची फोडणी दिली जाते आणि ते चांगले मिक्स करून त्यामध्ये थोडी साखर घालून मिक्स केला जातो.
- नक्की वाचा: चिवडा रेसिपी मराठी
भडंग रेसिपी – how to make bhadang recipe in marathi
भडंग रेसिपी हि एक कोल्हापुरी रेसिपी आहे जी आपण स्नॅक्स म्हणून खातो आणि हि रेसिपी बनवण्यास खूप सोपी आहे आणि झटपट बनते. चला तर आता आपण भडंग कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
पाककला | कोल्हापुरी (महाराष्ट्रीयन) |
बनवण्याची पद्धत | खूप सोपी |
भडंग बनवण्यासाठी चिरमुरे किंवा मुरमुरे हे मुख्य साहित्य लागते आणि जे इतर साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि जर घरामध्ये उपलब्ध नसेल तर ते आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करू शकतो. चला तर आता आपण भडंग बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- ४ ते ५ वाटी चिरमुरे / मुरमुरे.
- अर्धी वाटी शेंगदाणे.
- १ मोठा चमचा कडीपत्ता पाने.
- २ चमचे लाल मिरची पावडर.
- ८ ते ९ ठेचलेला लसून.
- १/४ चमचा हळद.
- १ चमचा चिवडा मसाला.
- मीठ ( चवीनुसार ).
- पिठी साखर ( चवीनुसार ).
- ३ ते ४ चमचे तेल.
भडंग हि रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच १५ ते २० मिनिटामध्ये बनते. चला तर मग आता आपण वर दिलेले साहित्य वापरून भडंग कसा बनवायचा ते पाहूयात.
- भडंग बनवताना सर्वप्रथम बाजारातून आणलेले चिरमुरे चांगले घोळून निवडून घ्या आणि ५ वाटी चिरमुरे अगदी सहजपणे मावतील असे भांडे घ्या आणि ते मध्ये आचेवर गॅसवर ठेवा. आणि त्यामध्ये चिरमुरे घालून ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
- मग ते चांगले भाजले कि ते एक परातीमध्ये काढून घ्या.
- आता त्याच भांड्यामध्ये तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये शेंगदाणे टाका आणि त्याला लालसर रंग येई पर्यंत भाजा आणि ते देखील चिरमुऱ्या मध्ये काढा.
- आता यामध्ये राहिलेल्या तेलामध्ये लसून. आणि कढीपत्ता घाला आणि लसून चांगला भाजून घ्या मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, चिवडा मसाला आणि हळद घाला आणि ते चांगले मिक्स करा (हि प्रक्रिया थोडी गडबडीने करायची नाहीतर आपली फोडणी करपण्याची शक्यता असते).
- त्यामध्ये लगेच चिरमुरे आणि शेंगदाणे टाका आणि हे सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्या आणि चिरमुरे थोडे गरम करून घ्या.
- आता यामध्ये चवीनुसार पिठीसाखर घाला आणि ती चांगली मिक्स करून घ्या.
- भडंग सर्व्ह करण्यास तयार झाला.
भडंग कसा सर्व्ह करावा – serving suggestion
भडंग हा आपण गरमागरम सर्व्ह करू शकतो किंवा हवाबंद डब्यामध्ये ठेवून १५ ते २० दिवस खावू शकतो. तसेच भडंग सोबत आपण कच्चा चिरलेला टोमॅटो आणि कांदा देखील खावू शकतो.
टिप्स (Tips)
- भडंगला फोडणी देताना ती मंद आचेवर दिली तर ते चांगले होईल कारण मध्यम किंवा मोठ्या आचेवर फोडणी करपण्याची शक्यता असते.
- आपण या भडंग मध्ये खोबऱ्याचे काप देखील घातले तरी चालतात.
- हिरव्या मिरचीची फोडणी टाकून देखील भडंग बनवता येतो.
- फोडणी टाकतेवेळी लसून चांगला भाजून घ्यावा ज्यामुळे चिवड्याला लसणाचा चांगला स्वाद येतो.
- भडंग मधील शेंगदाणे हे कुरकुरीत भाजलेले असावेत.
आम्ही दिलेल्या bhadang recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर भडंग रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या amba bhadang recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि bhadang chivda recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bhadang masala recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट