Zatpat Snacks Recipe in Marathi – Maharashtrian Recipes for Breakfast in Marathi स्नॅक्स रेसिपी मराठी भारतामध्ये वेगवेगळ्या डिश बनवल्या जातात आणि ते लोक आवडीने खातात. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ बनवतात आणि त्यामधील काही पदार्थ हे जेवना बनवले जातात, काही नाश्त्यामध्ये बनवले जातात किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवले जातात तर काही स्नॅक्स म्हणून बनवले जातात. आणि आज आपण या लेखामध्ये वेगवेगळ्या स्नॅक्स रेसिपीज कश्या बनवायच्या ते पाहणार आहोत. स्नॅक्स रेसिपी आपण केंव्हाही बसल्या बसल्या खावू शकतो. तसेच आपण संध्याकाळच्या चहा सोबत स्नॅक्स रेसिपी खावू शकतो.
स्नॅक्स रेसिपीज ह्या लहानांच्यापासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडतात आणि ह्यामधील काही रेसिपीज खूप सोप्या असतात तर काही रेसिपीज बनवण्यासाठी अवघड असतात. चला तर आता आपण काही स्नॅक्स रेसिपीज कश्या बनवायच्या ते पाहूयात.
स्नॅक्स रेसिपी मराठी – Snacks Recipe in Marathi
स्नॅक्स रेसिपीज – Zatpat Snacks Recipe in Marathi
भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्नॅक्स रेसिपीज बनवल्या जातात आणि त्यामधील काही बनवण्यासाठी खूप सोप्या असतात तर काही खूप अवघड असतात तर काही बनवण्यासाठी खूप सोपे असतात. चाल तर मग आता आपण काही स्नॅक्स रेसिपीज पाहूयात.
शेव रेसिपी
स्नॅक्स म्हणून खाल्ली जाणारी हि रेसिपी घरामध्ये बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि आपण हि रेसिपी कमी वेळेमध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये अगदी उत्तम पध्दतीने बनवू शकतो. चला तर मग पाहूयात शेव रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते.
- २ वाटी बेसन.
- १ चमचा ओवा.
- १ चमचा लाल मिरची पावडर.
- २ चमचे तेल.
- १/४ चमचा हळद.
- मीठ ( चवीनुसार ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- तेल ( तळण्यासाठी ).
- साधी शेव बनवताना सर्वप्रथम ओवा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्या आणि त्यामध्ये १ मोठा चमचा पाणी घालून ते १५ ते २० मिनिटे झाकण लावून बाजूला ठेवा.
- आता एक मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यामध्ये २ वाट्या बेसन घ्या मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आणि आता त्यामध्ये ओव्याचे पाणी घाला आणि मग त्यामध्ये गरम केलेले ते घालून मिश्रण चांगले एकत्र करून घ्या आणि मग त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून ते पातळ माळून घ्या.
- ते पीठ ५ ते ६ मिनिटे भिजू द्या.
- आता शेव तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल गरम करून घ्या आणि गॅसची आच मंद करा.
- मग शेवचे पीठ साच्यामध्ये घाला आणि त्याची शेव तेलामध्ये पाडा आणि ते मंद आचेवर चांगली कुरकुरीत होईपर्यंत टाळून घ्या.
- तुमची साधी शेव तयार झाली.
भाजके पोहे चिवडा रेसिपी
- १ किलो भाजके पोहे.
- १०० ग्रॅम चिवडा मसाला ( कोणताही वापरा ).
- १ मोठी वाटी खोबरे तुकडे.
- १ मोठी वाटी शेंगदाणे.
- १ वाटी फुटाणा डाळ.
- १ मोठा चमचा बारीक ठेचलेला लसून.
- १ छोटी वाटी कडीपत्ता.
- लाल मिरची पावडर ( चवीनुसार ).
- १ चमचा हळद.
- मीठ ( चवीनुसार ).
- पिठी साखर ( चवीनुसार )
- तेल ( फोडणीसाठी आणि तळण्यासाठी )
- सर्वप्रथम पोहे चांगले निवडून घ्या आणि ते तासभर उन्हामध्ये घाला त्यामुळे ते चांगले तापतील आणि त्यामध्ये थोडा मऊ पणा असेल तर तो निघून जाईल.
- मग ते पोहे एक मोठ्या भांड्यामध्ये काढा जेणेकरून त्यामध्ये सर्व साहित्य टाकल्यानंतर ते चांगले हलवता येईल.
- आता एक कढई घ्या आणि ती गॅसवर मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये सर्व साहित्य तळून घेता येईल इतके तेल घाला ती ते गरम होईपर्यंत वाट पहा.
- तेल गरम झाले कि त्यामध्ये खोबऱ्याचे काप टाका आणि ते चांगले तळून घ्या आणि ते तेलामधून काढून ते सरळ पोह्यामध्ये घाला.
- मग तेलामध्ये शेंगदाणे टाका आणि ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या आणि ते चांगले कुरकुरीत तळून झाले कि ते काढून पोह्यामध्ये घाला.
- आता त्यामध्ये डाळ घाला आणि ती देखील तळून पोह्यामध्ये टाका.
- आता गॅसची आच थोडी मंद करा आणि आणि त्यामध्ये बारीक ठेचलेला लसून घाला आणि तो लसून चांगला भाजा. लसून जर मऊ ठेवला तर चिवडा देखील मऊ पडण्याची शक्यता असते म्हणून लसून चांगला भाजा. आता त्यामध्ये कडीपत्ता घाला आणि तो चांगला फुलला कि त्यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर घाला लगेच ते पोह्यामध्ये ओता आणि हे सर्व मिश्रण एकत्र करा.
- आणि आता त्यामध्ये चिवडा मसाला, साखर ( चवीनुसार ), मीठ ( चवीनुसार ) घाला आणि चांगले एकत्र करा आणि गॅसवर तो चिवडा थोडा वेळ गरम करा.
- तुमचा भाजक्या पोह्याचा कूसकुशीत आणि खमंग चिवडा तयार झाला.
पाणी पुरी रेसिपी
पाणी पुरी म्हंटल कि अनेकांच्या तोंडाला पाणी येते आणि पाणी पुरी हि अनेकांची आवडती डिश आहे. पाणी पुरी हा भारतातील आवडता स्ट्रीट फुड आहे आणि हा घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनतो. आता आपण घरच्या घरी पाणी पुरी कशी बनवायची आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहणार आहोत.
- १ वाटी रवा.
- ३ चमचे मैदा
- १/४ चमचा बेकिंग सोडा.
- मीठ ( चवीनुसार ).
- तेल ( तळण्यासाठी ).
- अर्धी वाटी चिंच कोळ.
- २ वाटी पाणी.
- ३ हिरवी मिरची.
- २ चमचे भाजलेले जिरे किंवा जीरा पावडर.
- २ चमचे गुळ.
- १/२ वाटी पुदिन्याची पाने.
- १/२ वाटी कोथिंबीर पान.
- १ चमचा बुंदी.
- १/२ मोठा चमचा लिंबू रस.
- मीठ ( चवीनुसार ).
पुरीमध्ये भरण्यासाठी लागणारे साहित्य
- हिरवी चटणी
- लाल चिंचेची चटणी
- २ उकडलेले बटाटे
- १/२ वाटी उकडलेले छोटे चणे किंवा मुग ( आवडीनुसार )
- मीठ ( चवीनुसार ).
- कांदा ( बारीक चिरलेला ).
कृती १ : पाणी बनवण्यासाठी केली जाणारी कृती
सर्व प्रथम ब्लेंडरमध्ये कोथिंबीर, पुदिन्याची पाने आणि हिरव्या मिरच्या आणि २ चमचा जिरे घालून त्याची बारीक पेस्ट बनवा.
आता एका भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये हिरवी पेस्ट, चिंच कोळ, बुंदी, गुळ, लिंबू रस आणि मीठ ( चवीनुसार ) घालून ते चांगले एकत्र करून घ्या आणि गुळ विरघळूपर्यंत ढवळत रहा.
मग ते चांगले एकत्र केल्यानंतर ते चांगले गाळून घ्या आणि ते २ ते ३ तास फ्रीजमध्ये ठेवा.
कृती २ : पुऱ्या बनवण्यासाठी केली जाणारी कृती
- सर्व प्रथम एक मोठा बाऊल घ्या आणि त्यामध्ये मैदा, रवा, सोडा आणि मीठ ( चवीनुसार ) घाला आणि ते चांगले एकत्र करा आणि त्यानंतर त्यामध्ये लागेल तसे पाणी घालून ते चांगले घट्ट मळून घ्या.
- मग त्यावर झाकण घालून ते पीठ २५ ते ३० मिनिटे चांगले भिजू द्या.
- २५ ते ३० मिनिटाने ते पीठ परत चांगले मळून घ्या आणि त्याचे चपाती बनवण्यासाठी जेवढे आपण गोळे बनवतो त्या आकाराचे गोळे बनवा आणि ते कोरडा मैदा वापरून चपातीच्या आकारा एवढी लाटून घ्या.
- आणि मग पाणी पुरीच्या आकाराच्या पुऱ्या छोट्या वाटीने किंवा टोपनाणे पाडून घ्या.
- आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करा आणि एकदा तेल गरम झाले कि त्यामध्ये पुऱ्या लालसर रंगावर तळून घ्या.
कृती ३ : पाणी पुरीचे सर्व्हिग कसे करावे
- सर्वप्रथम एका बाऊल मध्ये बटाटे मॅश करा आणि त्यामध्ये मीठ घालून ते चांगले मिक्स करा आणि बाजूला ठेवा.
- मग आपण तयार केलेल्या पुऱ्या घ्या आणि त्यांना एका बाजूने हलक्या हाताने छिद्र पाडा आणि मग त्यामध्ये खुस्करलेला बटाट, कांदा आणि उकडलेले चणे घाला मग त्यामध्ये हिरवी चटणी, चिंच चटणी आणि पाणी पुरीचे पाणी घाला आणि ते सर्व्ह करा.
व्हेज सँडविच रेसिपी – veg sandwich recipe in marathi
व्हेज सँडविच हे आपण एक पौष्टिक सँडविच हे स्नॅक्स म्हणून लहान मुलांना किंवा मोठ्यांना देखील खायला देवू शकतो कारण यामध्ये वेगवेगळ्या फळभाज्या ( गाजर, टोमॅटो आणि काही इतर भाज्या ) वापरल्या जातात आणि प्रत्येक भाजीत काही ना काही पोषक गुणधर्म असतो. चला तर मग पाहूयात व्हेज सँडविच कसे बनवायचे.
- २ कांदे ( बारीक चिरलेले ).
- २ शिमला मिरची ( बिया काढून चिरलेल्या ).
- २ टोमॅटो ( चिरलेले ).
- १ गाजर ( बारीक चिरलेले ).
- २ उकडलेले बटाटे
- २ ते ३ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
- १ मोठा चमचा कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
- १/४ चमचा चाट मसाला.
- १/४ चमचा काळी मिरी पावडर
- ३ ते ४ चमचे मेयोनीज.
- ४ ब्रेड स्लाइस
- २ चीज स्लाइस
- २ ते ३ चमचा लोणी ( ब्रेडला लावण्यासाठी ).
- मीठ ( चवीनुसार ).
- सर्वप्रथम कांदा, सिमला मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घ्या आणि मग ते बाजूला ठेवा
- हिरव्या मिरच्यांचे तुकडे करा तसेच बटाटे उकडून मॅश करा.
- आता एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये कांदे, सिमला मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे, चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि काळी मिरी पावडर घालून चांगले मिसळा.
- मिक्स झाल्यावर मेयोनीज घालून सर्व भाज्यांचे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या आणि त्यावर एक एक चीज स्लाइस घाला.
- आता ब्रेडच्या २ स्लाईस घ्या आणि ब्रेडच्या दोन्ही स्लाइसवर भाज्यांचे मिश्रण घाला.
- सारण भरलेल्या दोन ब्रेडच्या स्लाईसवर राहिलेल्या ब्रेडच्या स्लाईस घाला आणि त्यावर थोडे लोणी लावा आणि लोणी लावलेली बाजू गरम तव्यावर भाजा आणि त्यावेळी खालची बाजू भाजत असताना वरच्या बाजूला लोणी लावा आणि ते सँडविच हळुवार पलटऊन चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
- दोन्ही बाजूंनी ग्रील झाल्यावर प्लेटमध्ये काढा आणि तिरपे कापून घ्या आणि गरम असताना टोमॅटो केचप किंवा काही मसालेदार हिरव्या चटणीसह आनंद घ्या.
लसून शेव रेसिपी – garlic shev recipe in marathi
आता आपण लसून शेव कशी बनवायची आणि हि शेव बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता पाहूयात.
- २ वाटी बेसन.
- १ चमचा ओवा.
- १ चमचा लाल मिरची पावडर.
- २ चमचे तेल.
- १/४ चमचा हळद.
- मीठ ( चवीनुसार ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- तेल ( तळण्यासाठी ).
- १ मोठा चमचा लसून पाकळ्या.
- लसून शेव बनवताना सर्वप्रथम लसून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या आणि तो बारीक करून घ्या आणि त्यामध्ये थोडे पाणी घाला आणि ते परत मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
- आता हे मिश्रण गाळण्यात ओता आणि लसूनच रस एक वाटीमध्ये गाळून घ्या.
- मग ओवा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्या आणि त्यामध्ये १ मोठा चमचा पाणी घालून ते १५ ते २० मिनिटे झाकण लावून बाजूला ठेवा.
- आता एक मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यामध्ये २ वाट्या बेसन घ्या मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आणि आता त्यामध्ये लसून रस आणि ओव्याचे पाणी घाला आणि मग त्यामध्ये गरम केलेले ते घालून मिश्रण चांगले एकत्र करून घ्या आणि मग त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून ते पातळ माळून घ्या.
- ते पीठ ५ ते ६ मिनिटे भिजू द्या.
- आता शेव तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल गरम करून घ्या आणि गॅसची आच मंद करा.
- मग शेवचे पीठ साच्यामध्ये घाला आणि त्याची शेव तेलामध्ये पाडा आणि ते मंद आचेवर चांगली कुरकुरीत होईपर्यंत टाळून घ्या.
- तुमची साधी शेव तयार झाली.
खारी शंकरपाळी रेसिपी – khaari shankarpali recipe
खारी शंकरपाळी बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते आणि खमंग आणि खुशखुशीत खारी शंकरपाळी कशी बनवायची याबद्दल खाली आपण माहिती घेवूयात.
खारी शंकरपाळी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी खाली दिलेली आहे.
- २०० ग्रॅम मैदा.
- १/२ वाटी पाणी.
- २ चमचे ओवा.
- मीठ ( चवीनुसार ).
- ४ चमचे तेल.
खारी शंकरपाळी हि आपण स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो आणि चहा सोबत देखील खाऊ शकतो. खारी शंकरपाळी कशी बनवली जाते ते आपण खाली पाहू.
- सर्वप्रथम एक मोठा बाऊल घ्या आणि त्यामध्ये २०० ग्रॅम मैदा घालून त्यामध्ये ओवा आणि मीठ घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.
- मग त्यामध्ये तेल घालून ते चांगले मिक्स करून घ्या आणि मैद्यामध्ये तेल घातल्यानंतर पिठामध्ये गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या.
- आता मैद्यामध्ये लागेल तसे कोमट पाणी घालून चांगले मऊ मळून घ्या ( टीप : पीठ जास्त मऊ होणार नाही याची काळजी घ्या ).
- मळलेले पिठावर झाकण घालून ते १० ते १५ मिनिटासाठी भिजू द्या.
- १० ते १५ मिनिटांनी ते पीठ चांगले भिजल्यानंतर त्याचे मध्यम आकाराचे गोळे करा आणि त्याचे पीठ लावून जाड पाने लाटून घ्या.
- त्याचे चाकूने किंवा कोरण्याने शंकरपाळ्या कापून घ्या.
- एक कढईमध्ये तेल मध्यम आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवा.
- तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोड्या थोड्या शंकरपाळ्या घालून त्या चांगल्या कुरकुरीत आणि लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या.
- राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या तेलामध्ये तळून घ्या.
- तुमच्या खमंग आणि कुरकुरीत खाऱ्या शंकरपाळ्या तयार झाल्या.
आलू टिक्की रेसिपी – aalu tikki recipe
- ३ ते ४ मोठे बटाटे ( उकडलेले ).
- २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर.
- २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या.
- मीठ ( चवीनुसार ).
- मैदा किंवा कॉर्णफ्लोवर.
- टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून ते कुकरमध्ये पाणी घालून उकडून घ्या.
- मग बटाटे थोडे गार झाले कि कुकर मधून काढा आणि त्याची साल काढून ते कुस्करून एक मिक्सिंग बाऊलमध्ये घाला आणि त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, आणि मीठ घाला आणि ते मिक्स करून त्याच्या छोट्या छोट्या टिक्क्या बनवा आणि त्या मैद्याच्या किंवा कॉर्णफ्लोवर लावून घ्या.
- आता तवा गरम करा आणि त्यावर तेल टाकून मावतील तेवड्या टिक्की घाला आणि त्याला तेल सोडून ते लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या. ह्या सर्व टिक्की दोन्ही बाजूने तेल सोडून भाजून घ्या.
- तुमच्या आलू टिक्की टोमॅटो सॉस सोबत खाण्यासाठी तयार झाल्या.
चकली रेसिपी – chakali recipe
चकली हा पदार्थ एक भारतीय पदार्थ आहे आणि हा पदार्थ भारतामध्ये दिवाळीच्या फराळामध्ये बनवला जातो तसेच हा पदार्थ आपण कधीहि बनवून खावू शकतो. हा पदार्थ आपण जर भाजणी पीठ बनवून ठेवले असेल तर लगेच बनवता येणारा पदार्थ आहे आणि हा खूप कमी वेळेमध्ये बनू शकतो. चला तर मग चकली रेसिपी कशी बनवायची आणि त्या साठी काय काय साहित्य लागते.
- २ वाटी चकली भाजणी पीठ.
- १ मोठा चमचा तेल.
- दीड चमचे लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- १/४ चमचा हिंग.
- १/२ चमचा ओवा.
- १ चमचा तीळ.
- मीठ ( चवीनुसार ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- तेल ( तळण्यासाठी ).
- चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम चकली भाजणी पासून बनवलेले पीठ घ्या आणि त्यामध्ये हळद, हिंग, लाल मिरची पावडर, ओवा, तीळ आणि चवीनुसार मीठ घालून ते मिश्रण एकत्र करून घ्या.
- आता एका छोट्या तडका कढईमध्ये १ मोठा चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि ते गरम झाले कि ते चकलीच्या पिठामध्ये ओता.
- पुन्हा पीठ चांगले एक जीव करून घ्या आणि त्यामध्ये एक वाटी उकळलेले पाणी घाला आणि ते पीठ चांगले गुसळून घ्या.
- मग गॅसवर मोठ्या आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये चकल्या तळण्यासाठी तेल घाला आणि ते तेल मोठ्या आचेवर गरम करा.
- आता ते पीठ तसेच दाबून ठेवा आणि त्यामधील थोडे थोडे पीठ घेवून त्याला साधे पाणी लावून ते चांगले मऊ मळून घ्या आणि ते मळलेले पीठ जितके मावेल तेवढे चकली साचामध्ये घाला आणि त्याच्या गोल चकल्या बनवा.
- तेल गरम झाले असेल तर गॅसची आच मध्यम करा आणि त्यामध्ये बनवलेल्या २ किंवा ३ ( मावतील तेवढ्या ) चकल्या सोडून त्याच्या चांगल्या लालसर रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा आणि त्या भाजल्या कि त्यामध्ये दुसऱ्या चकल्या घाला आणि त्या भाजा.
- अश्या प्रकारे पीठ मळून ते साच्यामध्ये घालून त्याच्या सर्व चकल्या बनवून त्या तळून घ्या.
- तुमच्या कुरकुरीत आणि खमंग चकल्या तयार झाल्या.
मुग डाळ कचोरी रेसिपी – moong dal kachori recipe
कचोरी हे भारतातील लोकप्रिय स्ट्रीट फूड म्हणून ओळखले जाते आणि हे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते. म्हणूनच आज आपण मुग डाळ कचोरी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहणार आहोत.
कचोरी कणिक बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- २ वाटी मैदा.
- मीठ ( चवीनुसार ).
- २ चमचे तूप.
- अर्धी वाटी कोमट पाणी.
- तेल ( तळण्यासाठी ).
सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- २ मोठे चमचे मुग डाळ.
- १ चमचा कस्तुरी मेथी.
- २ चमचा लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा धने पावडर.
- १ चमचा गरम मसाला पावडर.
- काळी मिरी पावडर.
- आमचूर पावडर.
- ४ चमचे बेसन.
- १ चमचा हिंग.
- २ हिरव्या मिरच्या ( चिरलेल्या ).
- १ चमचा पिठी साखर.
- २ चमचे जिरे आणि बडीशेप ( क्रश करून ).
- २ चमचा तेल
- सर्वप्रथम मिक्सिंग बाऊलमध्ये मैदा, मीठ आणि तूप घाला आणि हे चांगले मिसळा. आपण जे पिठामध्ये तेल घातलेले असते ते पिठाला चांगले लाऊन घ्या.
- आणि मग त्या पिठामध्ये हळूहळू पाणी घालून एक मऊ गोळा मळून घ्या.
- त्यानंतर तो पिठाचा गोळा २० ते २५ मिनिटे झाकून ठेवा.
- आता २ चमचे मूग डाळ सर्वप्रथम धुवून घ्या आणि मग ती १ वाती पाण्यामध्ये किंवा पुरेशा पाण्यात भिजत घालावी.
- मूग डाळ फुगली की पाणी काढून टाका आणि थोडे मोठे मोठे वाटून घ्या किंवा तुम्हाला जर मुग डाळ तशी घालायची असल्यास सारणामध्ये तुम्ही तशीच मुग डाळ घालू शकता.
- आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, काळी मिरी पावडर, आमचूर पावडर, मीठ, आणि कसुरी मेथी घाला आणि हे सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.
- आता कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, हिरवी मिरची, क्रश केलेली बडीशेप आणि जिरे टाका ते एक मिनिट भाजून घ्या.
- मग त्यामध्ये मसाल्यांचे मिश्रण आणि बेसन घालून त्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत भाजून घ्या.
- त्यानंतर या सारणामध्ये पिठी साखर आणि भिजवलेली मूग डाळ घाला आणि सर्वकाही मिक्स करा.
- तआणि त्यामध्ये थोडे पाणी घालून ते मिश्रण झाकून मध्यम आचेवर चांगले शिजवून घ्या आणि सारण थोडे घट्ट बनवा कारण याचे गोळे बनवले जातात.
- मूग डाळीचे सारण तयार झाल्यानंतर ते किंचित थंड करा आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे बनवा.
- आता आपण मळून ठेवलेली मैद्याची कणिक घ्या आणि त्याचे छोटे छोटे म्हणजेच सारणाच्या गोळ्यापेक्षा दोनपट मोठे असवेते अशे गोळे बनवून घ्या.
- आणि कणकीच्या गोळ्यांच्यामध्ये सारणाचे गोळे भरून ते पूर्णपणे झाकून घ्या.
- आता कढईमध्ये कचोरी तळण्यासाठी तेल गरम करून घ्या.
- आपण बनवून ठेवलेले गोळे हाताने मध्यम आकारामध्ये थापून घ्या आणि ते हळुवार तेलामध्ये सोडा आणि चांगले लालसर होईपर्यंत तळून घ्या तसेच कचोरी चांगली फुगू द्या.
- कचोरी चांगली तळली कि ती तेलातून काढा आणि अश्या प्रकारे सर्व कचोऱ्या तळून घ्या ( टीप : कढईतील तेलामध्ये जितक्या कचोऱ्या मावतील तितक्या कचोऱ्या घालून तुम्ही बॅचमध्ये कचोऱ्या टाळू शकता ).
- तुमची स्वादिष्ट कचोरी तयार झाली.
आम्ही दिलेल्या zatpat snacks recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर स्नॅक्स रेसिपी मराठी माहिती marathi snacks बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या madhuras recipes snacks in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि maharashtrian recipes for breakfast in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maharashtrian snacks recipes in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट