Bhagar Recipe in Marathi भगर रेसिपी मराठी भारतीय संस्कृती हि वेगवेगळ्या प्रकारे जपली जाते आणि भारतीय संस्कृती मध्ये उपवासाला एक वेगळेच महत्व आहे. भारतामध्ये कित्येक ठिकाणी वेगवेगळे उपवास केले जातात आणि त्या उपवासाला वेगवेगळे पदार्थ आणि फळे खाल्ली जातात जसे की शाबु, चिप्स, रताळाची खिचडी, साबूदाणा वडे, उपवासाची बटाटा भाजी, बटाटे चिवडा, शाबु चिवडा यासारखे वेगवेगळे पदार्थ उपवासाला बनवले जातात आणि यामधील एक लोकप्रिय आणि उपवासाला बनवला जाणारा पदार्थ म्हणजे भगर किंवा वरीची खिचडी. आज आपण या लेखामध्ये भाग किंवा वरीची खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत.
भगर म्हटलं कि अनेकांना प्रश्न पडतो कि भगर म्हणजे काय पण भगर म्हणजे जे आपण वारीच्या तांदळा पासून जी खिचडी बनवतो त्याला भगर म्हणतात आणि हि रेसिपी आपण उपवासासाठी बनवू शकता. भगर हि महाराष्ट्रीयन डिश आहे जी महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राजवळ असणाऱ्या कर्नाटक सीमा भागामध्ये उपवासाला बनवला जातो. चला तर आता आपण भगर कशी बनवायची ते पाहूयात.
भगर रेसिपी मराठी – Bhagar Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
भगर बनवताना सर्वप्रथम वरीचे तांदूळ कोरडे भाजले जातात आणि मग ते बाजूला काढून मध्यम गॅस वर कढई गरम करून त्यामध्ये तेल घालून हिरव्या मिरच्या, कडीपत्ता, जिरे आणि मोठा मोठा शेंगदाणा कुट घालून फोडणी दिली जाते आणि मग त्यामध्ये पाणी आणि मीठ घालून उकळले जाते आणि त्यामध्ये भाजलेले वरीचे तांदूळ घालून ते तांदूळ मऊ शिजवले जातात.
- वरी तांदूळ : वारी तांदूळ हा भगर बनवण्यासाठी लागणारा मुख्य घटक आहे जो आपल्याला कोणत्याही किरणामध्ये अगदी सहजपणे मिळू शकतो.
- हिरवी मिरची : उपवासाची भगर बनवताना त्यामध्ये हिरवी मिरची वापरली जाते आणि यामुळे रेसिपीला तिखट पणा येतो.
भगर रेसिपी – how to make bhagar recipe in marathi
भगर हि एक महाराष्ट्रीयन डिश आहे जी आपण उपवासासाठी बनवून खावू शकतो आणि हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच २० ते २५ मिनिटामध्ये बनते आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण उपवासाला खाल्ली जाणारी भगर कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
भगर हि रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला वरीचे तांदूळ हे मुख्य साहित्य लागते आणि हे काही वेळा आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तर काही वेळा आपल्याला हे बाजारातून विकत आणावे लागते. तसेच भगर बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते. चला तर आता आपण भगर बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- १ वाटी वरी.
- २ वाटी पाणी.
- २ हिरव्या मिरच्या ( मोठ्या मोठ्या चिरलेल्या ).
- ६ ते ७ कडीपत्ता पाने.
- १ बटाटा ( साल काढून बारीक चिरलेला ).
- ४ चमचे मोठा शेंगदाणा कुट.
- १/२ चमचा जिरे.
- २ ते ३ चमचे तेल.
- मीठ ( चवीनुसार ).
भगर हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनते. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून भगर कशी बनवायची ते पाहूयात.
- भगर बनवताना सर्वप्रथम वरीचे तांदूळ स्वच्छ निवडून घ्या.
- मग गॅस वर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये वरी तांदूळ घाला आणि ते चमच्याने सतत हलवत राहून चांगले भाजून घ्या आणि मग ते बाजूला काढा ( टीप : तांदूळ चांगले भाजा नाही तर आपली भगर चांगली होणार नाही .
- एकी कडे भांड्यामध्ये गॅस वर मध्यम आचेवर पाणी गरम करण्यासाठी ठेवा.
- आता त्याच कढई मध्ये तेल घाला आणि ते गरम होऊ द्या. तेल गरम झाले कि त्यामध्ये जिरे टाका जिरे फुलले कि लगेच त्यामध्ये हिरवी मिरची आणि कडीपत्ता घाला आणि ते २ सेकंद परता.
- आता त्यामध्ये साल काढलेला आणि बारीक चिरलेला बटाटा घाला आणि तो २ ते ३ मिनिटे तेलमध्ये भाजा आता त्यामध्ये मोठा मोठा केलेला शेंगदाणा कुट घाला आणि तो तेला मध्ये मिक्स करा.
- आणि त्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलेले पाणी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा आणि या पाण्याला एक उकळी येवू द्या.
- पाण्याला उकळी आली कि त्यामध्ये आपण भाजून ठेवलेले तांदूळ घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि त्यावर झाकण लावून ते तांदूळ मऊ होई पर्यंत शिजवा. भगर चांगली शिजली कि गॅस बंद करा.
- उपवासाची भगर गरमागरम सर्व करण्यासाठी तयार आहे.
भगर कश्यासोबत खातात – serving suggestions
- भगर आपण खोबऱ्याच्या पातळ चटणी सोबत किंवा शेंगदाण्याच्या तिखट आमटी सोबत खूप छान लागते.
आम्ही दिलेल्या bhagar recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर भगर रेसिपी मराठी माहिती bhagar papad recipe in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bhagar dhirde recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि bhagar chakli recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bhagar in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट