साबुदाणा वडा रेसिपी मराठी Sabudana Vada Recipe in Marathi

Sabudana Vada Recipe in Marathi साबुदाणा वडा रेसिपी मराठी उपवासाचा शाबूदाणा वडा रेसिपी शाबूदाणा म्हंटल कि आठवतो तो उपवास कारण बहुतेक लोक उपवासाच्या दिवशी शाबुदानाच्या वेगवेगळे पदार्थ बनवून खातात आणि शक्यतो भारतामध्ये बहुतेक ठिकाणी शाबुची खिचडी उपवास दिवशी बनवली जाते. पण शाबुची खिचडी देखील उपवासाला सारखी सारखी खावू वाटत नाही आणि शाबुच्या खिचडीचा देखील कधी तरी कंटाळा येतो त्यावेळी आपण शाबुपासून बनवले जाणारे वेगवेगळे पदार्थ ट्राय करू शकतो त्यामधील एक उपवासासाठी खाल्ला जाणारा स्वादिष्ट पदार्थ म्हणजे शाबुचे वडे.

शाबुचे वडे आपण कधीही बनवून खावू शकतो आणि कोणत्याही उपवासाला शाबुचे वडे बनवले जावू शकतात. शाबुचे वडे हे शाबु रात्रभर भिजवली जाते आणि ती भिजून मऊ झालेल्या शाबुमध्ये उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, मीठ आणि इतर साहित्य घालून ते मिश्रण एकत्र करून त्यांना गोल आणि थोडासा चपटा वड्याचा आकार दिला जातो आणि मग ते तेलामध्ये तळले जातात.

शाबुचा वडा हा अनेक लोकांचा आवडता पदार्थ आहे आणि हा पदार्थ महाराष्ट्र तसेच देशाच्या काही भागामध्ये आवडीने बनवला जातो आणि खाल्ला जातो. त्याबरोबर ज्या लोकांना शाबुचे पदार्थ आवडतात ते लोक शाबु वडा नाश्त्यासाठी देखील बनवून खातात तसेच लहान मुलांची देखील शाबुदाना आवडती असते.

त्यामुळे त्यांचा शाबुदाना वडा आवडता असू शकतो. शाबु वडा हा असा पदार्थ आहे जो लहान मुलांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडतो आणि सर्व लोक हा खावू शकतात. शाबूदाणा वडा हा बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि हा खूप कमी वेळेत आणि खूप कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनतो. म्हणून आज या लेखामध्ये आपण शाबूदाणा वडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत.

sabudana vada recipe in marathi
sabudana vada recipe in marathi

साबुदाणा वडा रेसिपी मराठी – Sabudana Vada Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ२० मिनिटे
तळण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे
पाककलाभारतीय
पदार्थाचा प्रकारउपवासाचा पदार्थ

शाबूदाणा वडा म्हणजे काय ?

शाबूदाणा वडा म्हणजे शाबु रात्रभर पाण्यामध्ये भिजवली जाते आणि ती शाबु रात्रभर फिजून फुगते आणि मऊ बनते. मऊ झालेल्या शाबुमध्ये उकडलेला खुसकरलेला बटाटा घालतात आणि त्यामध्ये हिरवी मिरची, मीठ आणि इतर साहित्य घालून ते मिश्रण चांगले एकत्र केले जाते आणि त्याचे गोल आणि थोडे चपटे वडे बनवले जातात आणि ते तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत तळले जातात आणि ते खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाल्ले जातात.

शाबूदाणा बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients

  • शाबु : शाबु हा या पदार्थातील एक मुख्य घटक आहे. शाबूदाणा वडे बनवण्यासाठी शाबु रात्रभर भिजवली जाते ज्यामुळे त्यामध्ये इतर साहित्य एकत्र करता येते आणि वडे मऊ बनतात.
  • बटाटा : शाबूदाणा वड्यामध्ये बटाटा वापरण्याचे मुख्य कारण म्हणजे जर आपण वड्यामध्ये उकडलेला बटाट कुसकरून घातला तर त्यामुळे मिश्रणाला चिकटपणा येतो आणि त्यामुळे वडे गोल वळता येतात.
  • तेल : शाबु वडे तळण्यासाठी तेलाचा वापर केला जातो.

साबुदाणा वडा कसा बनवतात – how to make sabudana vada recipe in marathi

शाबूदाणा वडा हा एक उपवासाचा पदार्थ आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पूजा, उपवास आणि देवधर्म याला फार महत्व आहे आणि भारतामध्ये लोक लेक वेगवेगळे उपवास करतात आणि ते उपवासाला शाबुची खिचडी खातात पण काही वेळा शाबुची खिचडी कंटाळवाणी वाटते. त्यावेळी आपण शाबुचे वडे बनवून खावू शकतो कारण हे वडे बनवण्यासाठी खूप सोपे असतात आणि कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये बनतात. आता आपण पाहूयात शाबुचे वडे कसे बनवायचे आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ२० मिनिटे
तळण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे
पाककलाभारतीय
पदार्थाचा प्रकारउपवासाचा पदार्थ

शाबुदाणा वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make shabu vada 

शाबु वडा बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही आणि जे साहित्य वडे बनवण्यासाठी लागते ते आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असू शकते. आता आपण पाहू वडे बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

  • ३ वाटी भिजवलेली शाबु.
  • २ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे.
  • ३ ते ४ हिरव्या मिरच्या किंवा २ चमचे लाल तिखट.
  • १/२ छोटी वाटी चिरलेली कोथिंबीर.
  • १ चमचा मोठे मोठे वाटलेले जिरे.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).

शाबूदाणा वडा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make sabudana vada recipe 

  • आता आपण शाबूदाणा वडा बनवण्यासाठी केली जाणारी कृती पाहूयात.
  • शाबूदाणा वडा बनवण्यासाठी आपल्याला वडा बनवण्याच्या आधल्या दिवशी शाबु भिजत घालावी लागते ज्यामुळे शाबु चांगली भिजून मऊ होईल.
  • आता बटाटे स्वच्छ धुवून ते एका कुकरमध्ये पाण्यामध्ये घालून ते कुकरला २ ते ३ शिट्या देवून चांगले शिजवून घ्या आणि कुकर गार झाला कि त्यामधील बटाटे काढून त्याची साल काढा आणि ते चांगले कुसकरून घ्या.
  • मग एक परात घ्या आणि त्या परातीमध्ये भिजवलेली शाबु, कुसकरलेला बटाट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, चवीनुसार मीठ आणि साखर ( चवीनुसार ) घालून हे सर्व मिश्रण एकत्र करून ते चांगले मळून घ्या.
  • आता या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोल आणि चपटे वडे बनवून ( सर्व मिश्रणाचे वडे बनवून घ्या ).
  • मग कढई गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि त्यामध्ये वडे तळण्यासाठी तेल घाला आणि तेला गरम झाले कि त्या तेलामध्ये एक एक करून तेलामध्ये जितके वडे मावतील तितके वडे घाला आणि ते चांगले लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या.
  • अश्या प्रकारे सर्व वडे तळून घ्या, तुमचे उपवासाचे शाबुचे वडे तयार झाले.

शाबुचे वडे कश्यासोबत खातात – serving suggestions

शाबुचे वडे आपण खोबऱ्याच्या चटणी सोबत किंवा फेटलेल्या दह्यासोबत ( दही, मीठ, साखर आणि कोथिंबीर ) देखी खावू शकतो.

टिप्स ( Tips ) 

  • जर तुम्ही उपवासाला शाबूदाणा वडा बनवणार असाल तर शाबु आधल्या दिवशी रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवा त्यामुळे शाबु चांगली भिजेल आणि मऊ होईल.
  • जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर वड्यामध्ये आपण मिरचीच्या ऐवजी लाल मिरची पावडर देखील वापरू शकतो ( मिरची वापरायची की लाल तिखट हे तुमच्या आवडीवर अवलंबून असते ).
  • शाबु वडे तळताना काळजीपूर्वक तळावे.

आम्ही दिलेल्या sabudana vada recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर साबुदाणा वडा रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sabudana vada recipe in marathi video या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sabudana vada chutney recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maharashtrian sabudana vada Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!