सुवर्णदुर्ग किल्ला माहिती Suvarnadurg Fort Information in Marathi

Suvarnadurg Fort Information in Marathi सुवर्णदुर्ग किल्ल्याची माहिती इतिहासामधील काही राजकर्त्यांनी समुद्रामधून होणारे आक्रमण रोखण्यासाठी आणि समुद्री शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी आणि जेथे व्यापारी बंदरे आहेत त्या ठिकाणे अनेक किल्ले बांधले त्यामधील एक महत्वाचा किल्ला म्हणजे सुवर्णदुर्ग किल्ला. सुवर्णदुर्ग हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वसलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्यला सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ले देखील पाहायला मिळतात. सुवर्णदुर्ग हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची उंची समुद्र सपाटी पासून १४०० फुट इतकी आहे.

या किल्ल्याजवळचे सर्वात जवळचे गाव म्हणजे दापोली. कोकणातील समुद्री किल्ल्यांचे रक्षण करणारे कान्होजी आंग्रे आणि आंग्रे कुटुंब हे सगळ्यांना माहित आहेत कारण हे मराठा साम्राज्याचे पहिले समुद्री सरखेल म्हणून ओळखले जायचे आणि हे समुद्राचे राजेच होते त्याचबरोबर कान्होजी आंग्रे आणि त्यांची पुढील पिढी देखील समुद्री किल्ल्यांचे रक्षण करत होती. पूर्वीच्या काळी आंग्रे कुटुंबाकडे समुद्र किनाऱ्यावरील जास्तीत जास्त किल्ले त्यांच्या कडेच होते आणि त्यामधील एक म्हणजे सुवर्णदुर्ग किल्ला म्हणजेच सुवर्ण दुर्ग किल्ला देखील आंग्रे कुटुंबाच्या वर्चस्वाखाली होता.

 suvarnadurg fort information in marathi
suvarnadurg fort information in marathi

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती मराठी – Suvarnadurg Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावसुवर्णदुर्ग
ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यामधील  दापोली गावातील हर्णे बंदराजवळ आहे
समुद्रअरबी समुद्र
प्रकारजलदुर्ग
किल्ल्याची उंची१४०० फुट
किल्ल्याचा आकारलांबी ४८० मीटर आणि रुंदी १२३ मीटर
क्षेत्रफळ४.५ ते ५ एकर
किल्ल्यावरील ठिकाणेमहादरवाजा, चोरदरवाजा, तोफा, बुरुज, विहीर आणि राजवाडा.

सुवर्णदुर्ग हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यामधील  दापोली गावातील हर्णे बंदराजवळ आहे. या किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची उंची १४०० फुट इतकी असून हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे आणि हा किल्ला समुद्राने वेढलेला आहे. सुवर्णदुर्ग हा किल्ल्याची लांबी ४८० मीटर आहे आणि रुंदी १२३ मीटर इतकी आहे.

किल्ल्याच्या संरक्षणासाठी किल्ल्याभोवती एक भक्कम तटबंदी आहे. सुवर्णदुर्ग हा किल्ला समुद्राच्या पाण्याने वेढलेला असल्यामुळे ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला बोटीचा वापर करावा लागतो. आपल्याला किल्ल्याजवळ जाताच मुख्य दरवाजा आणि त्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला असलेले २ बुरुज पाहायला मिळेल. मुख्य दरवाज्यावर आपल्याला काही शिल्प पाहायला मिळतात आणि ह्या किल्ल्याचा मुख्य दरवाजा आजही सुस्थितीत आहे.

सुवर्णदुर्ग हा किल्ला ४.५ ते ५ एकरच्या क्षेत्रफळामध्ये विस्तारलेला आहे. या किल्ल्यावर एकूण २४ बुरुज असावेत आणि या प्रत्येक बुरुजाची उंची ३० फुट आहे. सुवर्णदुर्ग किल्ला हा हर्ने बंदरा पासून १७ किलो मीटर अंतरावर आहे.

सुवर्णदुर्ग किल्ल्याचा इतिहास – Suvarnadurg Fort History in Marathi

सुवर्णदुर्ग हा किल्ला १६ व्या शतकामध्ये आदिलशहाच्या काळामध्ये बांधला आहे त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच इ. स. १६६० मध्ये मराठा सामाज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी दुसऱ्या आदिलशाहाचा परभाव करून सुवर्णदुर्ग हा किल्ला मराठा साम्राज्यामध्ये सामील केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर शिवाजी महाराजांचा दुसरा मुलगा राजाराम महाराज यांनी या किल्ल्यावर एक नेमला.

सुवर्णदुर्ग हा किल्ला समुद्राचे शिवाजी म्हणून ओळख असणाऱ्या महान सैनिक कान्होजी आंग्रे यांच्या देखरेखी खाली होता. कान्होजी ते तुळाजी पर्यंत हा किल्ला आंग्रे घराण्याच्या ताब्यात राहिला. इ. स. १७५५ मध्ये हा किल्ला पेशव्यांना देण्यात आला आणि मग तो इ. स. १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे इंग्रजांच्या ताब्यात गेला. आता हा किल्ला भारत सरकारच्या अधिपत्त्या खाली आहे.

नक्की वाचा: नळदुर्ग किल्ल्याची माहिती 

किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व 

प्राचीन काळी हर्णे बंदराच्या रक्षणासाठी समुद्र किनारपट्टी वर काही किल्ले बांधले होते त्यामधील एक म्हणजे सुवर्णदुर्ग. ज्यावेळी मोगल सरदार सिद्दी कासीम याने इ. स १६८८ मध्ये सुवर्णदुर्ग या किल्ल्याला वेढा घातला होता त्यावेळी आचलोजी मोहिते हा या किल्ल्याचा किल्लेदार होता आणि तो मोगलांना मिळालेला होता.

आचलोजी मोहिते हा मोगलांना फितूर झाला आहे हे कान्होजी आंग्रे (२० वर्षाचे तरुण) यांना समजताच त्यांनी सुवर्णदुर्ग किल्ल्यावरील इतर सहकाऱ्यांना विश्वासात घेवून आचलोजी मोहिते याला जेरबंद केले आणि मोगलांवर हल्ला केला पण तो हल्ला वाया गेला आणि कान्होजी आणि त्यांच्या सैनिकांना मोगलांनी कैद केले.

पण कान्होजी मोठे धैर्याचे असल्यामुळे त्यांनी कैदेतून कशी बशी सुटका करून ते समुद्रातून पोहत सुवर्णदुर्ग किल्ल्यावर आले त्यांचे जे धाडस पाहून मराठ्यांच्या इतर सैनिकांच्या मध्ये देखील लढण्यासाठी उत्साह आला आणि त्यानंतर सैनिकांनी हा किल्ला पावसाळ्या पर्यंत लढवला. सिद्दी कासीमने हार मानली आणि वेढा हटवला आणि या सर्व लढाई मध्ये धैर्याने सामोरे जाणाऱ्या केवळ २० वर्ष वय असणाऱ्या कान्होजी आंग्रे यांना हा किल्ल्याचे किल्लेदार पड मिळाले आणि त्यांची कारकीर्द देखील याच किल्ल्यापासून सुरु झाली. 

नक्की वाचा: पद्मदुर्ग किल्ल्याची माहिती 

सुवर्णदुर्ग हा किल्ला मराठा साम्राज्यामध्ये असण्याचा मुख्य उद्देश काय होता ?

सुवर्णदुर्ग ह्या किल्ल्याची स्थापना करण्याचा मुख्य उद्देश युरोपमधील वसाहत वादि आणि स्थानिक सरदारांनी केलेल्या हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी हा किल्ला महत्वाचा होत.

सुवर्णदुर्ग किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे 

  • महादरवाजा :

समुद्रातून बोटीने किल्ल्याजवळ गेल्यानंतर दोन बुर्जांच्या मध्य भागी एक दरवाजा दिसतो तोच किल्ल्याचा महादरवाजा. हे दरवाजा पूर्वेकडील बाजूला असून हा उत्तरमुखी आहे. असे म्हणतात कि हे किल्ल्याचे प्रवेश दार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतले आहे त्याचबरोबर महादरवाज्याच्या पायरी जवळ गेल्यानंतर आपल्यला पायरी वर एक कासवाचे शिल्प कोरलेले पाहायला मिळते.

त्याचबरोबर दरवाज्याच्या कमानीवर देखील वेगवेगळे शिल्प पाहायला मिळतात. दरवाज्याच्या उजव्या बाजूच्या तटावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे आणि त्याला शेंदूर लावलेला आहे.

  • विहीर :

किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर काही पुढे चालत गेल्यावर आपल्यला विहिरी पाहायला मिळतात त्या बहुतेक गोड्या पाण्याच्या असाव्यात आणि त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी केला जात असावा. या किल्ल्यावर आपल्याला ७ विहिरी पाहायला मिळतील.

  • राजवाडा :

महादरवाज्यातून आत आल्यानंतर डाव्या बाजूला विहिरीच्या थोडे पुढे अल्यानंतर राजवाड्याचे अवशेष किवा दगडी चौथरे पाहायला मिळतात.

  • चोरदरवाजा :

किल्ल्यामध्ये पश्चिम बाजूच्या तटाला एक सुंदर आणि सुरेख असा चोर दरवाजा आहे. हा दरवाजा ४ फुट उंचीचा आहे आणि याला खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्या पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर ती वाट समुद्राकडील बुरजांकडे जाते. ह्या दरवाज्याचा उपयोग पूर्वी अडचणींच्या काळी केला जायचा म्हणून याला चोर दरवाजा म्हणतात.

  • तोफा :

या किल्ल्यावर महादरवाज्या समोर वाळूमध्ये असलेल्या तोफा पाहायला मिळतात.

  • बुरुज :

पूर्वीच्या काळी बुरुजांचा उपयोग शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा आणि ह्या किल्ल्यावर देखील आपल्यला बुरुज पाहायला मिळतात. सुवर्णदुर्ग किल्ल्यावर आपल्याला एकूण २४ बुरुज पाहायला मिळतात आणि या बुरुजांची उंची ३० फुट आहे. बुरुजावर चढण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. आज आपल्यला बुरुजावर चढून किल्ल्याच्या सभोवताली असणाऱ्या समुद्राच्या सौदर्याचा आनंद घेता येतो.

सुवर्णदुर्ग किल्ला फोटो:

 suvarnadurg fort information in marathi
suvarnadurg fort information in marathi

किल्ल्याजवळी इतर ठिकाणे

  • हारनाई बीच
  • कनकदुर्ग
  • गोवा किल्ला
  • फत्तेगड किल्ला

सुवर्णदुर्ग किल्ल्यावर कसे जायचे ? 

जर आपल्याला सुवर्णदुर्ग हा किल्ला पाहण्यासाठी जायचे असेल तर आपण पुणे, मुंबई मुख्य शहरातून बसने गोवा महामार्गावर खेद या फाट्याजवळ उतरून तेथून स्थानिक बस पकडून दापोलीला जावे लागते आणि दापोलीमधून आपण बस किवा टॅक्सी पकडून हर्णे बंदरावर जावू शकतो. हर्ने बंदरावर आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी बोटी भेटतील. हर्णे बंदरावरून सुवर्णदुर्ग किल्ल्यावर बोटीतून जाण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागतात.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, सुवर्णदुर्ग किल्ला suvarnadurg fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. suvarnadurg fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about suvarnadurg fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही सुवर्णदुर्ग किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या suvarnadurg killa chi mahiti (konakdurg) माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!