भ्रमणध्वनी नसते तर निबंध मराठी Bhraman Dhwani Naste Tar Essay in Marathi

Bhraman Dhwani Naste Tar Essay in Marathi – Mobile Naste Tar Essay in Marathi भ्रमणध्वनी नसते तर निबंध मराठी भ्रमणध्वनी मोबाईल बंद झाले तर निबंध मराठी मोबाईल नसता तर निबंध खरंतर, एकविसाव्या शतकातील विज्ञान युग हे खऱ्या अर्थाने भ्रमणध्वनी आणि संगणक यांचेच युग आहे, असे आपल्याला म्हणावे लागेल. कारण मित्रहो, वास्तविकरित्या जर आपण पहायला गेलं तर आपल्या निदर्शनास येईल की आजचे जग हे भ्रमणध्वनी शिवाय खरंच किती अपूर्ण आहे! शिवाय, मनुष्याने लावलेल्या आतापर्यंतच्या शोधांमध्ये मोबाईलचा शोध हा खूप  अभुतपूर्व आहे.

तसेच मित्रांनो, आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आजकाल दिवसाची सुरुवात देखील सगळेजण मोबाईलनेच करतात. तसेच, जर आपल्या मित्रमंडळींशी, नातेवाईकांशी अथवा अन्य कोणत्याही व्यक्तींशी आपल्याला संपर्क साधायचा असेल तर आपल्याला मोबाईलचा वापर करावाचं लागतो.

याखेरीज, आजच्या तरुणांमध्ये तर  मोबाईलचा वापर दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणावर  वाढत चालल्याचं आपल्याला दिसून येतं. पण मित्रहो,  तुम्ही कधी अशी कल्पना केली आहे का की जर आपल्याकडे भ्रमणध्वनी नसते तर….?

bhraman dhwani naste tar essay in marathi
bhraman dhwani naste tar essay in marathi

भ्रमणध्वनी नसते तर निबंध मराठी – Bhraman Dhwani Naste Tar Essay in Marathi

मोबाईल नसता तर निबंध – Mobile Naste Tar Essay in Marathi

mobile nasta tar marathi nibandh मित्रांनो, जर आजच्या काळात मोबाईल नसता तर पहिली गोष्ट म्हणजे आपण या युगाला कधीचं आधुनिक युग किंवा विज्ञान युग म्हणू शकलो नसतो. कारण, आजच्या आधुनिक युगाला निर्माण करण्यामध्ये मोबाईलची भूमिका ही फार महत्त्वाची होती. शिवाय, आजदेखील विज्ञान युगाला अधिक विकसित करण्यामध्ये मोबाईल खूप महत्वाचे कार्य करत आहे.

तसेच मित्रहो, केवळ मोबाइलमुळे आपल्या देशाच्या विकासाच्या मार्गावर आज सर्व वस्तू डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाल्या आहेत. यावरून आपल्या लक्षात येतं की जर मोबाईल नसता तर आपल्या देशामध्ये डिजिटल क्रांती आणणे आपल्याला किती कठीण झाले असते.

कारण, फक्त मोबाईलच्याचं मदतीने सर्वसामान्य व्यक्तींपासून ते उच्च स्तरावरील व्यक्तीपर्यंत अगदी सर्वांना पैश्यांची देवाणघेवाण सहजरीत्या करता येते. त्याचबरोबर, जर  मोबाईल नसता तर कुणालाही आपल्या नातेवाईकांशी, मित्रमंडळींशी अथवा व्यावसायिक व्यक्तींशी संपर्क करणे शक्य झाले नसते. 

मित्रहो, आजकाल प्रत्येक प्रकारचे माध्यम स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे, जगभरातील कोणतीही माहिती आपण घरबसल्या सहजरित्या मिळवू शकतो. शिवाय, घरी बसून आपल्याला हवे असलेले जेवण, फळे, फुले, भाज्या, कपडे, विविध वस्तू, फर्निचर, शोभेच्या वस्तू, अलंकार अशा कित्येक वस्तू केवळ मोबाईलच्या सहाय्याने आपण मागवू शकतो.

त्यामुळे, जर मोबाईल नसता तर जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे काय नवीन घडत आहे याची माहिती आपल्याला मिळाली नसती, तसेच ऑनलाईन शॉपिंग देखील आपल्याला करता आली नसती. त्यामुळे, प्रत्येक किरकोळ गोष्टीसाठी आपल्याला त्या त्या दुकानांत जावं लागलं असतं.

शिवाय, आजकाल  सगळीकडे जेंव्हा लोकांना त्यांना हवा असलेला रस्ता माहीत नसतो तेंव्हा ते मोबाइलमधील गुगल मॅप या अॅपच्या मदतीने एका जागेहून दुसर्‍या जागी अगदी बरोबर पोहचू शकतात. परंतू मित्रहो, जर भ्रमणध्वनी नसते तर लोकांना पूर्वीप्रमाणे प्रत्येक स्टॉपला तेथील रहिवाश्यांना विचारतं विचारतं हवा असलेला मार्ग शोधावा लागला असता.

पण मित्रांनो, ज्याप्रकारे मोबाईल नसण्याचे दुष्परिणाम आहेत अगदी त्याचप्रकारे मोबाईलच्या असण्याचे देखील अनेक दुष्परिणाम आहेत, ते आपण पाहुयात! आज लोकांना अति मोबाईल वापराचे जणू एक प्रकारचे व्यसनचं जडले आहे. परंतू, या व्यसनाच्या आहारी आज मनुष्य इतका गेलाय की मोबाईलमध्ये दीर्घकाळ गेम खेळणे, इंटरनेटचा सातत्याने वापर करणे, सोशल मीडियावर सतत चॅटिंग करत बसणे यांमुळे आपल्या डोळ्यांना किती दुखापत होत आहे, याकडे मात्र त्याचे लक्ष नाही.

तसेच, डोकेदुखी, डोळे चुरचुरणे, डोळ्यांमध्ये अंधुक होणे, व्यवस्थित न दिसणे यांसारख्या समस्यांना देखील आज मनुष्याला सामोरे जावे लागतं आहे. त्यामुळे, जर मोबाईल नसता तर कदाचित या समस्या निर्माण झाल्या नसत्या. शिवाय, मोबाईलच्या वापराने आज एकमेकांतील हरवत चाललेला संवाद नव्याने सुरू झाला असता, तसेच प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या मोबाईलमधला संपूर्ण वेळ एकमेकांशी गप्पा-गोष्टी करण्यामध्ये घालवला असता.

यांखेरीज मित्रहो, मोबाईलच्या मदतीने अनेक वाईट बुद्धीचे लोक हॅकिंग करून, लोकांची माहिती चोरून घेतात आणि त्याचा चुकीचा उपयोग करतात. त्यामुळे, जर मोबाईल नसते तर या वाईट लोकांनी कधीचं ऑनलाईन हॅकिंग केली नसती, त्यामुळे प्रत्येकाची माहिती सुरक्षित राहिली असती. शिवाय, आजकाल मोबाईलचा वापर करून ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रमाण देखील खूप वाढले आहे.

त्यामुळे, जर मोबाईल नसता तर ब्लॅकमेलिंग सारख्या चुकीच्या गोष्टी कमी झाल्या असत्या. याशिवाय, शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की मोबाईल फोनमधून निघणारे रेडिएशन हे मानवी शरीराला खूप हानीकारक असतात, तसेच या रेडिएशनमुळे दरवर्षी जवळजवळ कित्येक हजारो पक्षी मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे, जर मोबाईल नसता तर या निष्पाप पक्ष्यांचे जीव गेले नसते.

आजकाल सगळ्यांच्या बाबतीत असं झालंय की प्रत्येकाला मोबाईल म्हणजे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग वाटतं आहे, त्यामुळे काहीजण तर सहज बोलून दाखवतात की, “एकवेळ जेवायला मिळाले नाही तरी चालेल परंतु, मोबाईल मात्र माझ्याजवळ पाहिजेत”, अशा प्रकारची गंभीर परिस्थिती फक्त आणि फक्त मोबाईलमुळे आज सगळीकडे निर्माण झालेली आपल्याला पहायला मिळते.

याशिवाय मित्रहो, चांगली बाब म्हणजे अगदी हातगाडीवाल्यापासून ते भाजी विक्री करणाऱ्या बाईकडेही आपल्याला स्मार्टफोन पहायला मिळतो. म्हणजे एकंदरीत, या भ्रमणध्वनीने सामान्यांच्या आयुष्यात एक मोठी क्रांती घडवून आणली आहे.

त्याचबरोबर, विदेशांमध्ये अथवा अमेरिकेसारख्या देशांत नोकरीसाठी गेलेल्या मुलांच्या म्हाताऱ्या आई-बापासाठी भ्रमणध्वनी हे एक प्रकारचे वरदानच ठरलेले आहे, हेदेखील तितकेच खरे आहे! 

तसेच, विडिओ कॉलच्या माध्यमातून कित्येक आई-वडिलांना आपल्या मुलांशी, आपल्या लहानग्या नातवंडांशी सहजपणे संवाद साधता येतो. शिवाय, आपले दररोजचे व्यवहार देखील मोबाईलवरून खूप सहजतेने आणि अगदी कमी वेळेमध्ये आपल्याला करता येतात. आधुनिक क्रांतीमध्ये झालेल्या बदलांमुळे आणि विकासामुळे संगणकाचे संपुर्ण काम आजचा स्मार्टफोन व्यवस्थितरीत्या व अगदी बरोबर पद्घतीने  करू लागला आहे.

त्यामुळे, कुठल्याही क्षणी ई-मेल तपासण्यासारखे काम खूप सोपे झाले आहे. तसेच,  मोबाइलमधील घड्याळ, कॅलक्युलेटर, एफ. एम., कॅमेरा यांसारख्या अनेक प्रकारच्या विविध सुविधांमुळे कित्येक उपकरणे विकत घेण्याचे आपले पैसे वाचतात. त्याचबरोबर, र्वल्ड कॉलिंग कार्डसारख्या अनेक सुविधांनी परदेशस्थ नातेवाईक आणि विविध कंपन्यांचे उद्योजक यांच्याशी अगदी स्वस्तात आणि गरजेच्या वेळी संपर्क साधने शक्य झाले आहे.

पण मित्रांनो, जर आपण दुसऱ्या बाजूला आपली नजर फिरवली तर आपल्याला दिसून येईल की, लहान मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वजण दिवसांतील जास्तीत जास्त वेळ आपल्या हातामध्ये मोबाईल घेऊन बसलेले असतात. ए

कंदरीत, मोबाईलच्या वापराने जरी आपल्याला नवनवीन गोष्टी, ज्ञान, कल्पना अशा अनेक गोष्टी सहजरीत्या मिळत असतील, तरी सुद्धा त्याच्या अतिरिक्त वापराचे तोटे आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे, प्रत्येक व्यक्तीने भ्रमणध्वनीचे फायदे तसेच, तोटे लक्षात घेऊन फक्त गरजेच्या वेळी त्याचा वापर केला पाहिजेत.

कारण मित्रहो, प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट परिणाम असतात. पण, आपण त्याचा उपयोग कशा पद्धतीने करतो आणि किती करतो यांवर त्याच्या चांगल्या किंवा वाईट परिणामांचे प्रमाण ठरवले जाते. त्यामुळे, मोबाईलमुळे उद्भवणाऱ्या शारिरीक स्वास्थ्याच्या समस्येंबाबत आपण सर्वांनी दक्ष राहिले पाहिजेत. तरच, त्याच्या दुष्परिणामांवर प्रत्येक व्यक्तीला ताबा मिळवणं शक्य होईल.

                      तेजल तानाजी पाटील

                          बागिलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या bhraman dhwani naste tar essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भ्रमणध्वनी नसते तर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mobile naste tar essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mobile nasta tar marathi nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bhraman dhwani naste tar essay in marathi language wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!