मोबाइल शाप की वरदान Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi

Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi मोबाइल शाप की वरदान मराठी निबंध नमस्कार मित्रहो आजच्या या लेखात आपण भ्रमणध्वनी शाप की वरदान तसेच यावर निबंध mobile shap ki vardan marathi nibandh देखील पाहणार आहोत.आजच्या या एकविसाव्या शतकात अनेक यंत्रांचा शोध लागला, पण आपण त्यांचा उपयोग चांगल्यासाठी केला का ? नाही. सोनोग्राफी सारख्या यंत्राचा वापर केला तो स्त्रीभ्रुणहत्येसाठी, १९०५ साली अल्बर्ट आईनस्टाईनने अणुबॉम्बचा शोध लावला, पण त्याचा उपयोग झाला तो जपानसारखा देश उध्दवस्त करण्यासाठी, कित्येक निष्पाप लोक मारले गेले त्या युध्दात, दोष कुणाचा होता?

अल्बर्ट आईनस्टाईनचा? नाही, दोष होता तो त्या मारेकऱ्यांचा, त्यांच्या विचारांचा. हा निबंध व माहिती आपण विविध इयत्ते करिता तसेच स्पर्धापरीक्षा व भाषणे यामध्ये देखील याचा वापर करू शकतो. याचा वापर करून आपण परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवू शकता. 
mobile shap ki vardan in marathi
mobile shap ki vardan in marathi

मोबाइल शाप की वरदान मराठी निबंध – Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi

आज मोबाईलच देखील तसच झालंय. मोबाईलचा नको तिथे आणि नको तसा वापर होताना आपल्याला सर्रास दिसतो.

ब्लू व्हेल सारख्या गेममुळे कितीतरी निष्पाप लोक मारले गेले, असा हा जीवघेणा गेम आहे, हे माहीत असूनही जाणूनबुजून हा गेम खेळणाऱ्या या तरुणांना म्हणावं तरी काय! गाडीत, बसमध्ये किती मोठमोठ्याने गाणी लावली जातात. त्यामुळे, मोबाईल हा शाप ठरेल याला करंटेपणाच म्हणावं लागेल.

आता दुसऱ्या बाजूने विचार केला तर, मोबाईल वरदान ही आहे. कुठूनही, कोणाशीही संपर्क साधण्यासाठी, मोबाईल हे एक अत्यंत सोपे असे यंत्र उपयोगी आहे. या मोबाईल ची उपयुक्तता कळते ती फक्त आपत्कालीन परिस्थितीतच मग, त्यामध्ये गुजरातचा भूकंप असो, २६ जुलैला झालेला महापूर, अशा अनेक घटनांमध्ये थोडंसं डोकावून पाहिलं की या छोट्याश्या यंत्रान आपल्यावर केलेले उपकार लक्षात येतात.

मात्र अनेक ठिकाणी मोबाईल चा गैरवापरही सुरू आहे. धमक्या, अश्र्लिष गोष्टी, दहशतवाद, आतंगवाद, चोवीस तास सेल्फी, अशा अनेक गोष्टींसाठी आज मोबाईल वापरला जातो .

मोबाईल शाप की वरदान कविता मराठी

विज्ञानाने काढलंय मोबाईल नावाचं यंत्र

तोच झाला आहे आता धोक्याचा मंत्र ||१||

विसरलीत मुल मैदानात खेळायच भान

कारण मोबाईल मधील गेम वाटतोय फारच छान ||२||”

पण, तस पाहिलं तर यामागच खर कारण आहे ते म्हणजे  माणसांची भरकटलेली मानसिकता. कोणत्याही यंत्राचा, तंत्रज्ञानाचा, उपयोग, दुरुपयोग हा त्या यंत्राचा किंवा तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतो.

दिनांक, २६ जुलै २००६ च्या प्रचंड पावसात बस निम्मी पाण्यामधे बुडालेली असताना, त्या रात्रीच्या काळोखात फक्त एका महिला प्रवाशीचा मोबाईल चालू होता, त्यावरून तिने तत्काळ पोलिसांना खबर दिली व पोलिसांना घटनास्थळी बोलवून घेतलं, जर त्यावेळी मोबाईल नसता, तर कित्येक लोक मारले गेले असते, त्यावेळी तिथे उपयोगी पडलेला मोबाईल वरदानच ना!

मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांच्या शारीरिक व मानसिक अवस्थेवर होणारे दुष्परिणाम पाहता, इतर राज्यातील सरकारने शाळेत मोबाईल वापरण्यावर आणलेली बंदी योग्यच ठरते. फक्त, मुलांनीच न्हवे तर मोठ्यांनिसुद्धा साठ मिनिटांपेक्षा जास्त मोबाईलचा उपयोग करू नये.

मोबाईलसाठी हजारो टॉवर्स उभारले आहेत. हे टॉवर्स नॉन स्टॉप रेडिएशन ओकत असतात, त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो . डोकेदुखी, थकल्यासारखे वाटणे, झोप न येणे, बुद्धि काम न करणे ज्याला आपण इंग्लिशमध्ये लॉस ऑफ मेमोरी अस म्हणतो, असे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. 

पण,कुणीही त्याची कबुली देत नाही. अमेरिकेच्या शास्त्रज्ञान शोध लावलाय की मोबाईल च्या अती वापरामुळे भारतातील चारशे पन्नास नागरिकांना रातांधळेपणा, पंधरा हजार तीनशे पन्नास नागरिकांना अंबलिओपिया हा रोग झाला आहे.

मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करणारा भारत हा जगाच्या पाठीवरचा एकमेव असा देश आहे. याला, आजची तरुण पिढी जास्त जबाबदार आहे आणि या तरुण पिढीला भरकटणाऱ्या या मोबाईल कंपन्या. मिनिटं मिनिटांनी वस्तूंचे मार्केटिंग करणे, यासाठी चोवीस तास एसएमएस पाठवण्याचे काम या कंपन्यांनी चॅनल्स आणि मोबाईल्सच्या मार्फत चालू केले आहे.

तरुणाईला बिघडवणारा हा मोबाईल एक महागुरूच आहे.  आजच्या तरुणांना त्यांच्या कर्तृत्वापासून दूर नेणाऱ्या या यंत्राला म्हणावं तरी काय?  शाप .

पण, आज आपल्या देशात कोरोनासारखी महामारी चालू असताना या मोबाईलनेच याच तरुणांच्या आयुष्यात महत्वाचा भाग घेतला,  शिक्षणाची साखळी तुटत असताना डिजिटल शिक्षण हे या मोबाईलमुळे शक्य झाले. घरी बसून आज विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोपे झाले,  त्यामुळे शिक्षणासोबतच विद्यार्थ्याचं नात टिकून राहील.

अभ्यास करताना आपल्याला अडचण आली की त्याचं निराकरण आपण लगेच गूगलच्या माध्यमातून करू शकतो, त्यामुळे समस्या लगेच दुरुस्त होतात आणि शिकताना आवड निर्माण होते .

दुसरीकडे बघितल तर या मोबाईलमुळे माणुसकी हरवत चालले हे ही लक्षात येत. आज भर रस्त्यात एखादा अपघात झाला तर सगळेजण पहिल्यांदा मोबाईल काढून फोटो काढतात, शुटिंग करतात. समोरच्याला मदतीची गरज आहे हे ही विसरून जातात, अर्थात या मोबाईलचा अतिरिक्त वापर तर होत आहेच.  

कित्येक वेळा अंगाला चिकटलेला हा मोबाईल माणसांच्या कानांवर, डोळ्यांवर व आपल्या शरीरसंस्थांवर वाईट परिणाम करतो. रस्त्यात वाहन चालकाला अपघाताला निमंत्रण देतो. म्हणून, काय आपण मोबाईल वापरायचं बंद करतो, नाहीच ना. प्रत्येक गोष्टीचे फायदे तसेच तोटेही असतात, फक्त त्याचा वापर कसा करायचा हे आपण ठरवल पाहिजे.

जसं की कालची भाजीवाली उद्याच्या भाजीची ऑर्डर आजच घरबसल्या घेते, त्यामुळे भाजीचं नुकसान होत नाही. काही गुन्हेगारी प्रकरणातील गुंड शोधण्यात मोबाईल महत्वाचा दुवा ठरला आहे. गुन्हेगारांचे अनेक नवे रस्ते मोबाईलच तर खुले करून देतो. पण, आजचा माणूस मोबाईल मध्ये इतका गुंतलेला आहे की त्याला आजूबाजूच्या कोणत्याच गोष्टीची जाणीव होत नाही.

कोणे एकेकाळी लोक आपल्या गाडीवर, स्वतः बांधलेल्या माडीवर नाहीतर, आपल्या जोडीवर प्रेम करत होते. पण, आता गाडी, माडी, जोडी बाजूला गेली आणि त्याची जागा एका मोबाईलच्या काडीने घेतली, त्या काडीला आपण रेंज म्हणतो, ती जर थोडीशी इकडेतिकडे झाली की आपला जीव कासावीस होतो आणि परत आली की नवलाईचा आनंद होतो.

ज्यावेळी मोबाईलचा जन्म झाला त्यावेळी जगातील सगळी माणसं एकत्र आली आणि आज मोबाईलच्या अतिवापरामुळे ती दुरावली गेली. थोडक्यात, शेवटी इतकंच कळत की कोणत्याही गोष्टीचा वापर हा प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं झाला पाहिजेत.

कोणत्याही यंत्राला किंवा निर्जीव वस्तूंना दोष न देता, स्वतः जर आपण त्यांचा चांगला वापर केला तर मोबाईल हा शाप नसून आपल्या सर्वांसाठी वरदानच ठरेल …..

तेजल तानाजी पाटील

 बागीलगे, चंदगड

आम्ही दिलेल्या mobile shap ki vardan nibandh in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “भारत माझा देश मराठी निबंध” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mobile shap ki vardan marathi nibandh या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mobile shap ki vardan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण essay on mobile phone in marathi या लेखाचा वापर mobile vardan ya abhishap असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!