बुलढाणा अर्बन बँक माहिती Buldana Urban Bank Information in Marathi

buldana urban bank information in marathi – buldana urban co op credit society ltd बुलढाणा अर्बन बँक माहिती, आज आपण या लेखामध्ये बुलढाणा अर्बन बँकेविषयी संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. बुलढाणा अर्बन बँकेची सुरुवात हि १५ ऑगस्ट १९८७ या दिवशी फक्त ७२ सभासद बनवून करण्यात आली आणि त्यावेळी या बँकेचे अध्यक्ष हे राधेश्यामजी चांडक हे होते. गेल्या ३५ ते ३६ वर्षामध्ये या बँकेमध्ये अनेक सुधारणा झाल्या सध्या या बँकेच्या एकूण ३३० पेक्षा अधिक शाखा आहेत तसेच या बँकेमध्ये सात लाख पेक्षा अधिक सदस्यत्व देखील झालेले आहे.

बुलढाणा अर्बन बँकेचे मुख्यालय हे बुलढाणा या शहरामध्ये असून हि बँक बँकिंग, बचत, ग्राहक बँकिंग, खाजगी बँकिंग, वित्त बँकिंग, मालमत्ता व्यवस्थापन, क्रेडीट कार्ड सेवा, गुंतवणूक बँकिंग या सारख्या बँकिंग विषयक सेवा लोकांना प्रधान करते तसेच हि बँक बँकिंग सेवा तर करतेच परंतु या बँकेने ब्लड बँक, वेद शाळा आणि रुग्णवाहिका यामध्ये सामाजिक कार्य केले आहे.

तसेच तिरुपती आणि शिर्डी या ठिकाणी लोकांना भक्तनिवास देखील बांधून देण्याचे एक चांगले सामाजिक कार्य या बँके मार्फत केले गेले आहे. सुरुवातीच्या काळामध्ये या बँकेचे कार्य हे फक्त बुलढाणा या ठिकाणी चालत असले तरी आता या बँकेचे कार्य गोवा, राजस्थान, अंदमान निकोबार, तेलंगना, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या ठिकाणी देखील सुरु आहेत.

buldana urban bank information in marathi
buldana urban bank information in marathi

बुलढाणा अर्बन बँक माहिती – Buldana Urban Bank Information in Marathi

बँकेचे नावबुलढाणा अर्बन बँक
स्थापना१५ ऑगस्ट १९८७
अध्यक्षराधेश्यामजी चांडक
शाखा३३० पेक्षा अधिक शाखा आहेत
सेवाबँकिंग, बचत, ग्राहक बँकिंग, खाजगी बँकिंग, वित्त बँकिंग, मालमत्ता व्यवस्थापन इत्यादी

बुलढाणा अर्बन बँकेची स्थापना कोणी व केंव्हा केली ?

बुलढाणा अर्बन बँकेची स्थापना हि राधेश्यामजी चांडक यांनी १५ ऑगस्ट १९८७ मध्ये केली आणि त्यांनी बँक स्थापनेच्या सुरुवातीला फक्त १२ हजार रुपये भांडवल घेवून ७२ सदस्य बनवून हि बँक स्थापन केली होती आणि सध्या या बँकेच्या अनेक शाखा वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत.

बुलढाणा बँकेमध्ये पुरवल्या जाणाऱ्या सेवा – facilities

बुलढाणा बांकी हि एक चांगल्या बँकिंग सेवा देणारी बँक असून या बँकेमध्ये बँकिंग सेवेसोबत आपुलकी देखील जपली जाते अश्या या बँकेमध्ये कोणकोणत्या सेवा पुरवल्या जातात ते खाली आपण पाहणार आहोत.

  • बुलढाणा बँकेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात जसे कि अनेक प्रकारचे बँकिंग, बचत सेवा आणि इतर वित्त सेवा.
  • या बँकेमध्ये लोकांच्याकडून ठेवी स्वीकारल्या जातात आणि त्यांना त्या ठेवीवर योग्य तो व्याजदर देऊन लोकांना बचतीची सवय करण्यास प्रोत्साहन दिले जाते.
  • तसेच बुलढाणा बँक कमी आणि योग्य व्याजदरामध्ये गरजू लोकांना कर्ज देते.
  • बुलढाणा बँक क्रेडीट कार्ड सेवा, ऑनलाईन बँकिंग सेवा, चेक बुक सेवा, लॉकर सेवा अश्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा प्रधान करते.
  • बुलढाणा बँकेमार्फत टर्म लोन, होम लोन, शैक्षणिक कर्ज, सोने तारण कर्ज, तसेच वैयक्तिक कर्ज या प्रकारचे वेगवेगळे कर्ज देते.
  • या बँकेमध्ये तारण ठेवलेले लोकांचे सोने चेक करण्यासाठी गोल्ड चेकिंग मशीन उपलब्ध आहे आणि यामुळे तारण ठेवलेल्या सोन्याचे निरीक्षण करता येते.
  • बुलढाणा बँक हि मालमत्ता व्यवस्थापन सेवा देखील पुरवते तसेच या ठिकाणी गुतंवणूक बँकिंग सेवा देखील पुरवली जाते.

बुलढाणा बँकेची कार्यालये कोणकोणत्या राज्यामध्ये आहेत – offices

बुलढाणा बँकेचे मुख्यालय हे बुलढाणा शहरामध्ये आहे तर या बँकेची इतर कार्यक्षेत्रे हि गोवा, राजस्थान, अंदमान निकोबार, तेलंगना, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या ठिकाणी आहेत.

बुलढाणा बँकेमधील जागांची नावे

जर एखाद्या व्यक्तीला बुलढाणा बँकेमध्ये नोकरी करायची असेल तर तो व्यक्ती खालील वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करू शकतो परंतु त्यासाठी त्या व्यक्तीला काही पात्रता निकष पार पाडावे लागतात.

जागा

वसुली अधिकारी, शाखा व्यवस्थापक, महिला बचत गट आणि महिला ठेव प्रतिनिधी, विभागीय अधिकारी, रोखपाल, लिपीप या सारख्या जागा उपलब्ध असतात परंतु संबधित व्यक्तीला योग्य त्या जागेसाठी काम करण्यासाठी त्या व्यक्तीला त्या विषयक पात्रता निकष पूर्ण करावे लागते.

जसे कि रोखपाल, लिपिक, वसुली अधिकारी या सारखी नोकरी मिळवण्यासाठी त्या संबधित व्यक्तीने कोणत्याही शाखेची पदवी पूर्ण करणे आवश्यक असते तर विभागीय अधिकारी किंवा शाखा प्रमुख बनण्यासाठी त्या व्यक्तीला एमबीए ( MBA ) किंवा बी. कॉम ( B.com ) चे शिक्षण पूर्ण केलेलं असले पाहिजे.

बुलढाणा बँकेला मिळालेले पुरस्कार – awards

बुलढाणा बँकेची सुरुवात होताना त्यावेळी फक्त ७२ सदस्य होते ते सध्या ७ लाख पेक्षा अधिक सदस्य बनले आहेत आणि अश्या प्रकारे या बँकेच्या शाखा देखील वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत आणि या बँकेच्या चांगल्या कामगिरीसाठी त्या बँकेला वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत ते आपण आता खाली पाहणार आहोत.

  • बुलढाणा अर्बन बँकेला २००८ आणि २०१३ या दोन वर्षामध्ये सर्वोत्कृष्ट सहकारी पतसंस्था पुरस्कार मिळाला होता आणि हा पुरस्कार को ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया कडून मिळाला होता.
  • तसेच या बँकेला क्रेडीट युनियन मायक्रो फायनान्स इनोव्हेशन हा पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आले होते.
  • त्याचबरोबर बुलढाणा अर्बन बँकेला २०१४ मध्ये सर्वोत्कृष्ट युवा सीईओ पुरस्कार देखील मिळाला होता आणि तसेच जागतिक कार्पोरेट उत्कृष्टता पुरस्कार देखील मिळाला आहे.

FAQ

Q1. बुलढाणा अर्बन बँकेची स्थापना कोणी व केंव्हा केली ?

बुलढाणा अर्बन बँकेची स्थापना हि राधेश्यामजी चांडक यांनी १५ ऑगस्ट १९८७ मध्ये केली.

आम्ही दिलेल्या buldana urban bank information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बुलढाणा अर्बन बँक माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या buldana urban co op credit society ltd या buldana urban bank information in marathi pdf article मध्ये update करू, मित्रांनो हि information about buldana urban bank in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!