चाकण किल्ला माहिती Chakan Fort History in Marathi

Chakan Fort History in Marathi चाकण किल्ल्याची माहिती चाकणचा हा किल्ला भुईकोट प्रकारातील असून हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामधील आहे. चाकणचा हा किल्ला पुणे शहरातील चाकण या भागामध्ये पुणे नाशिक मार्गावर वसलेला आहे. चाकणच्या या किल्ल्याला संग्रामगड या नावाने देखील ओळखले जाते. चाकणचा हा किल्ला पुणे शहरापासून ३२ किलो मीटर अंतरावर आहे. चाकणचा हा संग्रामगड किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासामधील एक महत्वाचा किल्ला आहे.

कारण आदिलशाही मध्ये काम करणारा एक मराठा कामगार म्हणजेच फिरंगोजी नरसाळा हा शिवाजी महाराजांच्या एका शब्दा खातर स्वराज्य सेवेसाठी स्वराज्यामध्ये सामील झाला आणि त्याने चाकणचा अतिशय सुंदर असणारा किल्ला शिवाजी महाराजांना खुशीने दिला आणि त्यावेळी महाराजांनी त्याला ह्या किल्ल्याचा किल्लेदार बनवले होते. २३ जून १६६० या किल्ल्यावरून तोफखानांनी शाहिस्तेखाना वर हल्ला केला होता. त्यावेळी किल्ल्याचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हे होते आणि त्यांनीच संग्रामगड हा किल्ला स्वराज्यामध्ये आणला होता.

chakan fort history in marathi
chakan fort history in marathi

चाकण किल्ला माहिती – Chakan Fort History in Marathi 

किल्ल्याचे नावचाकणचा किल्ला किवा संग्रामगड
प्रकारभुईकोट किवा भू किल्ला
ठिकाणहा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामधील आहे
पुण्यापासुनचे अंतर३२ किलो मीटर
क्षेत्रफळ६५ एकर
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणेदामोदर विष्णू मंदिर, शिव मूर्ती, खंदक आणि प्रवेश दरवाजा

चाकणचा हा किल्ला पुणे शहरामध्ये चाकण या भागामध्ये आहे आणि हा मुख्य पुण्यापासून ३२ किलो मीटर अंतरावर आहे आणि पुणे नाशिक मार्गावर वसलेला आहे. भुईकोट प्रकारातील हा किल्ला प्राचीन काळी खूप भक्कम आणि सुंदर होता पण ह्या किल्ल्याचा आज फक्त कोटच शिल्लक आहे. चाकणचा हा किल्ला ६५ एकर क्षेत्रफळामध्ये वसलेला होता पण आज हा किल्ला ५.५ एकर आहे.

चाकण या किल्ल्याला म्हणावे तसे संरक्षण नव्हते पण या किल्ल्याभोवती एक खोल खंदक खोदलेले होते ज्यामध्ये साप, मगरी आणि काही सरपटणारे प्राणी सोडले होते. त्याबरोबर या किल्ल्याला संरक्षक उंच तटबंदीची भिंत देखील आहे जी विटांनी आणि दगडाने बांधलेली होते.

चाकण किल्ला इतिहास

चाकणचा संग्रामगड हा किल्ला कोणी बांधला याबद्दल इतिहासामध्ये कोणतेही ठोस पुरावे नाहीत. चाकण हा किल्ला इ. स. १३४७ ते इ. स. १५२७ ह्या काळामध्ये चाकण या किल्ल्यावर बहामनी साम्राज्यांने राज्य केले होते आणि बहामनी साम्राज्यांनंतर या किल्ल्यावर डेक्कन सल्तनतने राज्य केले.

इ. स १५९५ ते इ. स १५९९ मध्ये अहमदनगरचा शासक बहादूर निजाम याने छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांना “राजा” हि पदवी बहाल केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा म्हणजे मालोजी भोसले यांना पुणे, सुपे, परगणा, जागीर, शिवनेरी आणि चाकण हे किल्ले त्यांच्या ताब्यात दिले.

त्यानंतर हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही मध्ये काम करणारा एक मराठा सरदार फिरंगोजी नरसाळा यांच्या मदतीने हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला आणि त्या किल्ल्याचे नाव संग्रामगड असे नाव ठेवले. इ. स. १६६० मध्ये या किल्ल्याचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हे होते त्यावेळी मुगल सरदार शाहिस्तेखान आणि फिरंगोजी नरसाळा यांच्यामध्ये लढाई झाली आणि हा किल्ला मुगल साम्राज्याच्या वर्चस्वा खाली गेला.

मराठा आणि चाकणचा किल्ला

आदिलशाही मध्ये काम करणारा एक मराठा कामगार म्हणजेच फिरंगोजी नरसाळा हा शिवाजी महाराजांच्या एका शब्दा खातर स्वराज्य सेवेसाठी स्वराज्यामध्ये सामील झाला आणि त्याने चाकणचा अतिशय सुंदर असणारा किल्ला शिवाजी महाराजांना खुशीने दिला आणि त्यावेळी महाराजांनी त्याला ह्या किल्ल्याचा किल्लेदार बनवले होते.

जून १६६० ज्यावेळी या किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी शाहिस्तेखान प्रचंड सैनिक, तोफा, दारुगोळा यासारखे लढाई लागणारे सर्व काही घेवून तो चाकण (संग्रामगड) या किल्ल्याकडे आला. शाहिस्तेखानाला असे वाटत होते कि हा किल्ला आपण जिंकून घेणे हे आपल्यासाठी खूप सोपे काम आहे.

पण असे काही नव्हते कारण त्यावेळी या किल्ल्याचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हे होते आणि ते खूप धैर्याचे आणि जिद्दीचे होते. शाहिस्तेखानाणे २१ जून १६६० मध्ये चाकणच्या संग्रामगड या किल्ल्याला वेढा घातला आणि हा वेढा जवळ जवळ ५५ ते ५६ दिवस चालला होता. मराठा सैनिकांनी शाहिस्ते खानाच्या प्रचंड सैनिकांना मोठ्या धैर्याने तोंड दिले.

शाहिस्तेखान मराठा सैनिकांच्यावर तोफांचा मारा करत होता पण मराठा सैनिक काही माघार घेत नव्हते आणि म्हणून शाहिस्तेखानाणे बुरुजांच्या खाली सुरंग तयार करायला सांगितले कारण त्याला बुरुज उडवायचे होते. फिरंगोजी नरसाळा आणि त्यांच्यासोबत एकूण ४०० ते ४५० सैनिक शाहिस्तेखानाच्या प्रचंड फौजेला धैर्याने तोंड देत होते पण १४ ऑगस्टला सुरंगाची वात पेटवली.

त्यामुळे सुरंग लावलेला बुरुज आकाशात उडाला आणि त्यामुळे त्या बुरुजावर असणारे भिवाजी आणि १०० हून अधिक सैनिकांना इजा झाली तसेच जीवित हानी देखील झाली. पण या किल्ल्याचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी हार मानली नाही. हर हर महादेवची घोषणा करत ते लढतच होते शेवटी ते किल्ल्याच्या बाहेर आले आणि किल्ल्यामध्ये मुगल सैनिकांनी ताबा मिळवला पण खानाने किल्ल्यामध्ये पहिले तर आतमध्ये पडलेल्या भिंती होत्या आणि खान आश्चर्यचकित झाला आणि त्यावेळी त्याला कळले मराठा काय आहेत ते आणि मुघलांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि तेथे आपला झेंडा फडकवला.

चाकण किल्ल्यावर पाहण्यासारखी प्राचीन ठिकाणे 

चाकण हा किल्ला भुईकोट प्रकारातील असून सध्या या किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड आणि नासधूस झालेली आपल्यला पाहायला मिळते.

  • खंदक :

चाकणचा संग्रामगड हा किल्ला भुईकोट या प्रकारातील असून या किल्ल्याभोवती एक खोल पाण्याचे खंदक आहे ज्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साठवले जाते आणि या खंदकाचा उपयोग किल्ल्याच्या संरक्षणासाठी देखील केला होता. या खंदकामध्ये पूर्वीच्या काळी साप, सरपटणारे प्राणी आणि मगरी सोडल्या होत्या.

  • प्रवेश दरवाजा :

चाकण या किल्ल्यावर आपल्याला किल्ल्याचे प्रवेश दार आज देखील पाहायला मिळते आणि या प्रवेश दाराच्या आतल्या बाजूला पहारेकारांच्यासाठी २ देवड्या बांधलेल्या आहेत.

  • दामोदर विष्णू मंदिर :

आपण किल्ल्यामध्ये प्रवेशदारातून आत गेल्यानंतर सरळ समोर गेल्यानंतर दामोदर विष्णू मंदिर पाहायला मिळते. या मंदिराच्या बाजूला आपल्याला २ तोफा आणि कातळामध्ये कोरलेली सुंदर शिल्पे पाहायला मिळते.

  • बुरुज :

बुरुज हे प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला बुरुज बांधलेले पाहायला मिळतात आणि या किल्ल्यावर देखील तसे बुरुज बांधले होते आणि या बुरुजांचा उपयोग शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी आणि आक्रमण करण्यासाठी केला जात होता पण या किल्ल्यावरचे काही बुरुज लढाईच्या वेळी पडलेले आहेत. आज आपल्याला या किल्ल्यावरील पडझड अवस्थेतील बुरुज पाहायला मिळतात.

  • चाकण या किल्ल्यावर आपल्याला एक दगडामध्ये कोरलेली शिव मूर्ती देखील पाहायला मिळते.
  • या किल्ल्यावर आपल्याला एक मशीद देखील पाहायला मिळते.

चाकण किल्ला फोटो:

chakan fort history in marathi
chakan fort history in marathi

चाकण किल्ल्यावर कसे जायचे ?

चाकण या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला कोणत्याही मुख्य शहरातून पुण्याला यावे लागेल आणि पुण्यातून कोठूनही तुम्हाला चाकण (संग्रामगड) किल्ल्याला जाण्यासाठी बस किवा टॅक्सीने जावू शकतो. पुण्यातून चाकण (संग्रामगड) या किल्ल्याचे अंतर २३ किलो मीटर आहे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, चाकण किल्ला chakan fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. Chakan Fort History in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about chakan fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही चाकण किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या chakan killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!