तुंग किल्ला माहिती Tung Fort Information in Marathi

Tung Fort Information in Marathi तुंग किवा कठीण गड हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामधील लोणावळा या गावाजवळ वसलेला. तुंग हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची उंची जवळ जवळ ३५२६ फुट म्हणजेच १०७५ मीटर इतकी. तुंग हा किल्ला बहुतेक आदिल शाही काळामध्ये भोर या घाटावर नजर ठेवण्यासाठी बांधला असावा. काही दिवसात हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये सामील केला होता पण ज्यावेळी पुरंदरचा तह झाला त्यावेळी हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला होता. हा किल्ला शंकूच्या आकाराचा असून डोंगराच्या काठावर अगदी अरुंद मार्गाने उंच चढलेला आहे.

पवना धरणातून हा किल्ला ४०० मीटर चढाई आहे. तुंग या किल्ल्याच्या पायथ्याशी घुसाळखांब हे गाव आहे जेथून किल्ला १.५ किलो मीटर अंतरावर आहे आणि जर तुम्ही मुक्कामाला जाणार असाल तर या गावामध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय होऊ शकेल.

tung fort information in marathi
tung fort information in marathi

तुंग किल्ला माहिती मराठी – Tung Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावतुंग किल्ला किवा कठीण गड
प्रकारगिरिदुर्ग
ठिकाणतुंग हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामधील लोणावळा या गावाजवळ वसलेला आहे
डोंगर रांगलोणावळा (सह्याद्री)
उंचीसमुद्र सपाटीपासून ३५२६ फुट (१०७५ मीटर )
किल्ल्याची बांधणीआदिलशाही काळामध्ये
किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणेहनुमान पुतळा, गणेश मंदिर, तुंगी माता मंदिर, तलाव आणि लोहागड, विसापूर, टिकोना आणि कोरीगड किल्ले वरून स्पष्ट दिसतात

तुंग हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामधील लोणावळा या गावाजवळ लोणावळा डोंगर रांगेमध्ये वसलेला आहे. तुंग या किल्ल्याला कठीनगड देखील म्हणतात. तुंग हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची उंची ३५२६ फुट म्हणजेच १०७५ मीटर इतकी आहे. तुंग किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पवना धरणाच्या जवळ एक प्राचीन डोंगर किल्ला आहे.

तुंग हा किल्ला लोणावळा शहरापासून २४ किलो मीटर अंतरावर आहे, पुणे शहरापासून ६७ किलो मीटर, मुंबई पासून १२१ किलो मीटर आणि लोहगड किल्ल्यापासून ३१ किलो मीटर अंतरावर आहे. तुंग या किल्ल्यावरून आपल्याला मावळ, पावना धरण, विसापूर आणि लोहगड हा परिसर नजरेस पडतो. तुंग या किल्ल्यावर आपल्याला हनुमान मंदिर, गणेश मंदिर, तुंगी माता मंदिर, तलाव आणि लोहगड, विसापूर, टिकोना आणि कोरीगड किल्ले वरून स्पष्ट दिसतात.

तुंग या किल्ल्याचा इतिहास – Tung Fort History in Marathi

तुंग हा किल्ला बहुतेक आदिल शाही घराण्याने १६०० वर्षापूर्वी बांधलेला एक किल्ला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर आपल्या ताब्यात घेतला होता. तुंग हा किल्ला तेथे असणाऱ्या भोर या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता. मावळ प्रांतातील देशमुखांपैकी एक असलेल्या ढमाले कुटुंबावर तुंग किल्ल्याची सुरक्षा आणि जबाबदारी देण्यात आली होती.

इ. स. १६६५ मध्ये मावळ या प्रांतावर मिर्झाराजे जयसिंग यांनी आक्रमण केले. त्याचबरोबर दिलेरखान आणि त्याच्या इतर साथीदारांनी तुंग आणि तिकोना भोवतालची गावे नष्ट केली परंतु त्यांना या किल्ल्यांवर विजय मिळवता आला नाही. पण ज्यावेळी पुरंदरची लढाई झाली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह करण्याचे ठरवले आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबामध्ये पुरंदरचा तह झाला त्यानुसार कुलाबखानने हलालखान व इतरांनी १८ जून १६६५  मध्ये किल्ला ताब्यात घेतला.

पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी मोगलांना २३ किल्ले द्यायचे ठरवले होते त्यामध्ये तुंग किल्ला देखील होता. हा किल्ला भूतकाळात टेहळणी बुरूज म्हणून काम करत होता कारण किल्ल्याच्या माथ्यावरुन पवना व मुळशी खोऱ्याच्या मावळ भागातील बऱ्याच प्रदेशावर नजर ठेवता येत होती.

तुंग किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे 

 • हनुमान मंदिर :

तुंग या किल्ल्याजवळ आपल्यला एक हनुमान मंदिर पाहायला मिळते. हे हनुमान मंदिर आपल्याला लोणावळा गावाच्या पायथ्याशी पहायला मिळते आणि त्या मादिराजवळ पार्किंगसाठी भरपूर जागा आहे. या मंदिरामध्ये ६ ते ७ जणांची राहण्याची सोय होऊ शकते.

 • प्रवेश दार :

आपण किल्ल्यावर साधारण ४०० मीटरची चढाई ( या किल्ल्याची चढाई सोपी आहे ) चढून वरती गेल्यानंतर आपल्यला किल्ल्याचे प्राचीन प्रवेश दार पाहायला मिळते.

 • तलाव :

या किल्ल्याच्या प्रवेशदारातून आत गेल्यानंतर आपल्याला एक छोटासा तलाव पाहायला मिळतो. आता या तलावामधील पाणी जरी पिण्यायोग्य नसले तरी पूर्वीच्या काळी बहुतेक या तलावातील पाणी पिण्यासाठी तसेच पिण्यासाठी वापरले जात असावे. हा तलाव पूर्वीच्या काळी पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी केले होते.

 • गणेश मंदिर :

प्रवेश दार ओलांडून किल्ल्याच्या आत आपल्याला एक गणेश मंदिर पाहायला मिळते.

 • सदर :

आपल्याला एक किल्ल्यामध्ये एक इमारत पाहायला मिळते ती इमारत म्हणजे सदर जेथे पूर्वीच्या काळी गुप्त खलबत त्याच इमारतीमध्ये चालत असावी.

 • या किल्ल्यावर आपल्याला तुंगी मातेचे मंदिर देखील पाहायला मिळते.
 • किल्ल्यावरून दिसणारा परिसर :

या किल्ल्यावरून आपल्याला लोहगड, विसापूर, टिकोना, कोरीगड, मावळ आणि पावना धरण हा परिसर दिसतो.

तुंग किल्ला फोटो:

tung fort information in marathi
tung fort information in marathi

तुंग या किल्ल्यावर कसे जायचे ? 

 • जर तुम्हाला मुंबईहून तुंग किल्ला पाहायला जायचे असेल तर मुंबई ते लोणावळा जाणाऱ्या अश्या किती तरी गाड्या आपल्याला मिळू शकतात. लोणावळा शहरामध्ये जावून तेथून टॅक्सी पकडून किल्ल्यापर्यंत जावू शकतो.
 • जर तुम्हाला हा किल्ला पाहण्यासाठी रेल्वेने यायचे असल्यास या किल्ल्याचे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक लोणावळा येथे आहे आणि आपण कोणत्याही मुख्य शहरातून ( पुणे, मुंबई औरंगाबाद, नशिक ) लोणावळ रेल्वे स्थानकापर्यंत येवू शकतो आणि तेथून आपण टॅक्सी पकडून किल्ल्यापर्यंत जावू शकतो.
 • जर तुम्हाला हा किल्ला पाहण्यासाठी बसने जायचे असल्यास तुम्हाला पहिल्यांदा कशानेही लोणावळा गाठावे लागेल आणि तेथून घुसाळखांब ला जाणारी स्थानिक बस पकडून किल्ल्यापर्यंत जावे लागेल. घुसाळखांब या गावातून हा किल्ला १.५ किलो मीटर अंतरावर आहे.
 • जर तुम्हाला हा किल्ला पाहण्यासाठी विमानाने यायचे असल्यास या किल्ल्याचे सर्वात जवळचे विमानतळ पुणे येथे आहे. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा पुण्याला यावे लागेल मग तेथून लोणावळ्याला जाणारी रेल्वे किवा बस पकडून लोणावळा शहरामध्ये जावे लागेल आणि मग तेथून तेथून टॅक्सी पकडून किल्ल्यापर्यंत जावू शकतो.

टीप

 • तुंग या किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची आणि खाण्याची सोय नसल्यामुळे आपण सोबत पिण्याची पाणी आणि खायला काही स्नॅक्स घेवून गेले तर चांगले.
 • हर तुम्हाला येथे मुक्काम करायचा असल्याला या किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हनुमान मंदिरा मध्ये ६ ते ७ जणांची रहायची सोय होऊ शकते. पण राहायचे असल्यास जेवणाची सोय आपणच करावी लागते.
 • हा किल्ला चढण्यासाठी कमीत कमी १ तास लागतो आणि पाहण्यासाठी दीड ते दोन तास लागतात.
 • तुंग हा किल्ला पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शूल आकाराला जात नाही पण ट्रेकिंग पॅकेजीस उपलब्द असतात.
 • तुंग या किल्ल्याची चढाई खूप सोपी आहे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, तुंग किल्ला tung fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. tung fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about tung fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही तुंग किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या tung killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!