चंद्रशेखर आझाद यांची माहिती Chandra Shekhar Azad Information in Marathi

Chandra Shekhar Azad Information in Marathi चंद्रशेखर आझाद यांची माहिती आपली भारत भूमी ही थोर क्रांतिवीरांची आहे. आपल्या भारताला महान क्रांतिकारक लाभले आहेत. त्यातीलच एक मोठा व्यक्तीमत्व म्हणजे चंद्रशेखर आझाद होय. चंद्रशेखर आजाद हे युवा क्रांतिकारक होते. त्यांनी भारताचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाचा त्याग केला. भारत मातेला स्वातंत्र्य मिळावं म्हणून चंद्रशेखर आझाद यांनी रक्ताचं पाणी केलं. स्वातंत्र्य लढ्यामध्ये चंद्रशेखर आझाद यांनी मुख्य भूमिका बजावली होती. भारत स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते स्वतः तर सहभागी झाले परंतु, लोकांना देखील प्रोत्साहित करण्याचे काम चंद्रशेखर आझाद यांनी केलं.

इतकेच नव्हे तर प्रत्येकाला आपल्या देशाबद्दल अभिमान असतो आणि जर तुम्हाला तुमच्या देशाचे होणारे हाल पाहून तुमचं रक्त सळसळत नसेल तर ते रक्त नाहीतर पाणी आहे. असे विचार होते क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचे.

त्यांनी अगदी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत फक्त देशाचाच विचार केला. देशाला कसं स्वातंत्र्य मिळवून देता येईल आणि इंग्रजांना कसे पळवून लावता येईल, या गोष्टीचा त्यांनी विचार केला. आजच्या लेखामध्ये आपण याच महान क्रांतिकारकांचा स्वातंत्र्य विरुद्धचा लढा पाहणार आहोत.

chandra shekhar azad information in marathi
chandra shekhar azad information in marathi

चंद्रशेखर आझाद यांची माहिती – Chandra Shekhar Azad Information in Marathi

पूर्ण नाव चंद्रशेखर आझाद
जन्म२३ जुलै १९०६
राष्ट्रीयत्व भारतीय
वडीलसीताराम तिवारी
आईजागरणी देवी
जन्मगावमध्य प्रदेशातील भवरा गावातील
मृत्यू२७ फेब्रुवारी १९३१

जन्म

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म मध्य प्रदेशातील गावातील आहे. २३ जुलै १९०६ रोजी चंद्रशेखर आझाद यांचा जन्म झाला. चंद्रशेखर आझाद यांचा बालपण अन्य इतर मुलांसारखंच गेलं. जसं लहानपणी आपल्या सगळ्यांनाच अभ्यासापेक्षा खेळण्याची जास्त आवड असते. तसंच काहीसं चंद्रशेखर आजाद यांच्या बाबतीतही घडलं.

अभ्यासापेक्षा आझाद यांना खेळायची खूप जास्त आवड होती. खेळता-खेळता चंद्रशेखर यांना धनुष्यबान चालवण्याची सवय झाली. ते धनुष्यबाण उत्तम प्रकारे चालवायचे. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म स्वातंत्र्यकाळा पूर्वीचा आहे. त्यामुळे चंद्रशेखर आझाद यांना लहानपणीच भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्याची इच्छा जागृत झाली.

चंद्रशेखर तिवारी ते चंद्रशेखर आजाद होण्यापर्यंतचा प्रवास

सन‌ १९२१ मध्ये महात्मा गांधीजी यांनी असहकार आंदोलन चळवळ सुरू केली होती. चंद्रशेखर हे देशभक्त असल्याने या चळवळीमध्ये त्यांचा सहभाग असणं अतिशय सहाजिक होतं. चंद्रशेखर यांना देशासाठी लढायचं होतं असं ठरवलं होतं. या आंदोलनात सहभागी झाल्या मुळे चंद्रशेखर यांना कैद करण्यात आलं.

चंद्रशेखर यांना न्यायालयात नेण्यात आलं न्यायालयामध्ये न्यायाधीशाने चंद्रशेखर यांना त्यांचं नाव विचारल तेव्हा चंद्रशेखर यांनी त्यांचं नाव आझाद म्हणून सांगितलं. तेव्हापासून चंद्रशेखर हे चंद्रशेखर तिवारी नव्हे तर चंद्रशेखर आजाद म्हणून ओळखू जाऊ लागले.

उलट उत्तर दिल्यामुळे चंद्रशेखर यांना काठीचे फटके देण्यात आले त्यावेळी प्रत्येक फटक्या मागे चंद्रशेखर आझाद यांनी खूप अभिमानाने “भारत माता की जय” असा नारा लावला होता. ही घटना घडली तेव्हा चंद्रशेखर यांचे वय फक्त पंधरा वर्ष होतं.

भारत स्वातंत्र्य सामग्रीमध्ये मोलाचा वाटा

भारताचे वीर सुपुत्र चंद्रशेखर आझाद यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. स्वातंत्र्यासाठी लढता लढता त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. याच्या पेक्षा मोठे बलिदान अजून काय असू शकतं? आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करावे, हे स्वप्न चंद्रशेखर आझाद यांनी लहानपणापासून त्यांच्या मनाशी बाळगल.

आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न देखील घेतले. चंद्रशेखर आझाद यांना गांधीजींनी सन १९२२ मध्ये असहकार चळवळ मधून काढून टाकलं होतं. चंद्रशेखर ज्यांना देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं ते खूप लोकांना प्रेरित करत होते त्याच दरम्यान चंद्रशेखर यांची ओळख राम प्रसाद बिस्मिल यांच्याशी झाली.

रामप्रसाद हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन चे संस्थापक होते. ही एक क्रांतिकारक संस्था असून या संस्थेमध्ये सगळ्यांना समान हक्क दिला जायचा सगळ्यांना निर्णय घेण्याचा समान अधिकार होता त्यामुळे या संस्थेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय चंद्रशेखर आझाद यांनी घेतला. या संस्थेच्या मदतीने चंद्रशेखर आजाद यांनी या संस्थेमध्ये नेतृत्व केले.

या संस्थेमधील १० सदस्यांच्या साथीने चंद्रशेखर आजाद यांनी इंग्रजांची काकोरी ट्रेन लुटली. ही ट्रेन खजिना ने भरलेली होती. या मिशन मध्ये चंद्रशेखर आझाद यांचा खूप मोठा वाटा आहे. खरतर त्यांच्याच नेतृत्वाखाली हे मिशन पार पडलं. परंतु काही सदस्यांना या मिशनमुळे आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली.

या मिशनमध्ये काही प्रमुख क्रांतीकारकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यातीलच काही नाव म्हणजे राम प्रसाद बिस्मिल, अश्फाक उल्ला खां, राजेंद्रनाथ लाहिडी, ठाकुर रोशन सिंह. या प्रकरणानंतर चंद्रशेखर आझाद दिल्लीला पळून गेले. दिल्लीमध्ये गेल्यावर आझाद यांनी एक क्रांतिकारक बैठक घडवून आणली.

या बैठकीमध्ये भगतसिंह देखील सहभागी झाले होते. चंद्रशेखर आजाद भगत सिंह यांचे गुरु होते. या बैठकीमध्ये सर्व क्रांतिकारकांनी पुन्हा एक नवीन संस्था निर्माण करण्याचं ठरवलं. रामप्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर चंद्रशेखर आजाद यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ही संस्था पुन्हा उभारली आणि या क्रांतिकारक संस्थेला हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे नाव दिले.

या संस्थेचे सरचिटणीस हे पद चंद्रशेखर आजाद यांच्याकडे होता आणि या संस्थेचे एक प्रोत्साहित करणारे वाक्य म्हणजे “अंतिम निर्णय होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील आणि तो निर्णय विजय किंवा मृत्यू असेल”.

अशाच प्रकारे चंद्रशेखर आझाद यांनी बऱ्याच क्रांतिकारक चळवळींमध्ये सहभाग घेतला यातीलच एक घडलेली घटना म्हणजे चंद्रशेखर आजाद यांनी लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घ्यायचं ठरवलं. १९२८ मध्ये चंद्रशेखर आझाद यांनी त्यांच्या साथीदारांसोबत मिळून सँडर्सची हत्या केली.

ब्रिटिश पोलीस या घटनेनंतर पुन्हा चंद्रशेखर आजाद यांच्या क्रांतिकारक संस्थेच्या पाठी लागले. त्यानंतर ब्रिटिश पोलिसांनी पूर्ण संस्थेला अटक केली. आणि यात भगतसिंग यांचाही समावेश होता. परंतु, चंद्रशेखर आझाद हे चतुर असल्यामुळे त्यांनी ब्रिटिश पोलिसांनी तुरी देऊन ते पळून गेले.

चंद्रशेखर आझाद यांनी भगतसिंह आणि बाकी संस्थेतील सदस्यांना सोडवण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु त्यांना अपयश आले. चंद्रशेखर आझाद यांचा एकच स्वप्न होतं, ते म्हणजे भारताला आझाद, स्वतंत्र झालेल पाहायचं. त्यासाठी चंद्रशेखर आझाद यांनी स्वतःच्या रक्ताचे पाणी केले.

काकोरी ट्रेन लूट ची घटना, केंद्रीय विभागातील बॉम्बस्फोट म्हणा याशिवाय लाहोर येथील ब्रिटिश पोलिसाचा खून म्हणा. या सगळ्या हिंसक मार्गान मध्ये चंद्रशेखर आझाद यांनी सहभाग घेतला होता. चंद्रशेखर आझाद यांच्या मध्ये जेव्हा संघर्षाची वेळ असते तेव्हा हिंसक अहिंसक असं काही नसतं. हि सगळी खटपट चंद्रशेखर आजाद फक्त आणि फक्त आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी करत होते.

मृत्यू

चंद्रशेखर आझाद हे नाव खूप मोठं आहे. इतिहासामध्ये चंद्रशेखर आझाद यांचे नाव सोनेरी पानांवर कोरलं गेल आहे. कारण आझाद यांची कारकीर्द खूप मोठी आहे. चंद्रशेखर आजाद हे एक महान युवा क्रांतिकारक होते. त्यांनी आयुष्यामध्ये फक्त एकाच गोष्टीसाठी कष्ट घेतले, धडपड केली. ती म्हणजे स्वतःच्या देशाला म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं.

आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळावे हे स्वप्न चंद्रशेखर आजाद त्यांनी लहानपणापासून आपल्या मनाशी बाळगून ठेवलं होतं. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला वाचवण्यासाठी आणि ब्रिटिशांना त्यांची लायकी दाखवून देण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांनी अतोनात कष्ट केले. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाचा हि विचार केला नाही.

बहुतेक स्वातंत्र्यलढा चळवळीमध्ये चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आलं होतं. ते एकदाही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. जीव गेला तरी चालेल परंतु ब्रिटिशांच्या हाती लागणार नाही असं चंद्रशेखर आझाद यांचं ठाम मत होतं. राजगुरू जेलमध्ये होते आणि त्यांच्या आईला आर्थिक मदतीची गरज होती.

म्हणून चंद्रशेखर आजाद हे २७ फेब्रुवारी १९३१ मध्ये अलाहाबाद येथील अल्फ्रेड पार्कमध्ये एका क्रांतिकारकाला भेटण्यासाठी गेले असता, काही खबर्यांनी ब्रिटिश पोलिसांना खबर पोहोचवली आणि ब्रिटिश पोलिसांनी पूर्ण पार्कला घेरा घातला. या घटनेमध्ये चंद्रशेखर आजाद आणि ब्रिटिश पोलिसांनी मध्ये गोळीबार झाला.

या गोळीबारामध्ये चंद्रशेखर आजाद एकटे लढत होते. त्यांनी तीन ते चार ब्रिटिश पोलिसांचा खातमा केला परंतु, शेवटी त्यांच्याकडे पिस्तुल मध्ये एकच शेवटची बंदुकीची गोळी उरली होती.

ब्रिटीशांच्या हातून जीव जाण्यापेक्षा मी स्वतः भारत माते साठी माझ्या प्राणाचे बलिदान देईन हे चंद्रशेखर आजाद यांचे विचार होते. शेवटची एक गोळी उरली होती ती गोळी चंद्रशेखर आझाद यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये मारून घेऊन भारत मातेसाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये chandra shekhar azad information in marathi काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर chandrashekhar azad information in marathi म्हणजेच “चंद्रशेखर आझाद यांची माहिती” chandrashekhar azad in marathi यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या information of chandra shekhar azad in marathi language या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि chandra shekhar azad wikipedia in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!