Bhagat Singh Information in Marathi भगतसिंग माहिती भगत सिंह हे नाव अतिशय मोठ आहे. नावाप्रमाणेच क्रांती देखील मोठी आहे. भगत सिंह यांचं नाव भारतातील महान क्रांतिकारकांमध्ये येतं. लहानपणापासूनच भगत सिंह यांना देशप्रेमाचे धडे मिळाले लहानपणीच त्यांच्या मनामध्ये देशाविरुद्ध प्रेम निर्माण झाले देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे त्यांचं स्वप्न होतं. भगतसिंह यांची विचारसरणी अतिशय वेगळी होती याच विचारसरणीने देशामध्ये क्रांती घडवून आणली. भगतसिंह यांनी अनेक युवा पिढीला इंग्रजांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी प्रोत्साहित केले. परंतु हिंसक मार्गाने काम केल्यामुळे त्यांना २३ व्या वर्षांमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
bhagat singh mahiti marathi भगत सिंह यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान नेहमीच सर्वोच्च राहील. आजच्या ब्लॉग मध्ये आपण याच महान व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती घेणार आहोत.
भगतसिंग माहिती मराठी – Bhagat Singh Information in Marathi
नाव (Name) | भगत सिंह |
जन्म (Birthday) | १९०७ साली २८ सप्टेंबरला |
जन्मस्थान (Birthplace) | बंगा हे पंजाब राज्यातील ल्यालपुर जिल्ह्यातील गाव |
वडील (Father Name) | सरदार किशन सिंग |
आई (Mother Name) | विद्यावती |
पत्नी (Wife Name) | दुर्गा देवी |
मृत्यू | २३ मार्च १९३१ |
भगत सिंह इतिहास – Bhagat Singh history
भगत सिंह हे खूप मोठे क्रांतिकारक होऊन गेले. भगत सिंह यांना अगदी लहान वयामध्ये देशाबद्दल प्रेम निर्माण झालं त्यांनी देशाला इंग्रजांच्या त्रासातून मुक्त करण्याचं ठरवलं होतं इंग्रजांपासून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा वसा त्यांनी घेतला होता शिक्षणाच्या वयात त्यांनी आपल्या उच्च विचारांनी आपल्या वयाच्या युवा पिढीला देश प्रेमाबद्दल माहिती देऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामाविष्ट करुन घेतल.
त्यांनी युवा पिढीच्या मनामध्ये इंग्रजांविरुद्ध द्वेष निर्माण करून दिला इंग्रज कसे आपल्या भारतावर राज्य करू पाहत आहेत हे युवा पिढीला समजावून सांगितलं आणि त्यांना आपल्या बाजूने वळवून क्रांतिकारक चळवळ सुरू केली. त्याकाळातील देशातील महान क्रांतीकारकांनी मधील भगत सिंह हे लहान वयाचे क्रांतिकारक होते एवढ्या लहान वयामध्ये त्यांना देश प्रेम जाणवलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला.
महान क्रांतिकारक भगत सिंह यांना शहीद ए आजम अशी पदवी देखील मिळाली होती. भगतसिंह यांचे विचार सामान्य माणसापेक्षा खूप वेगळे होते. आता ज्या जाती धर्मान वरून वाद विवाद चालू आहे त्यावेळी भगत सिंह यांच्या मते माणसांमध्ये जाती धर्मा वरून कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये.
तसेच त्यांच्यामध्ये या समाजातील प्रत्येक घटकाला त्यांचे स्वातंत्र्य जीवन जगण्याचा अधिकार आहे या समाजातील प्रत्येक घटकाचे वेगळे विचार वेगळे मत असावे कोणाचंही शोषण होऊ नये तसेच कोणाकडूनही त्यांचे अधिकार हिरावून घेतले जाऊ नये त्याचप्रमाणे आपण कोणावरही आपले अधिकार लादू शकत नाही प्रत्येकाने विचारपूर्वक व स्वतःला वाटेल तरच एखादा निर्णय घ्यावा कोणीतरी दुसरा आपल्यावर जबरदस्ती करतोय म्हणून एखादा निर्णय घेऊ नये. एकूणच भगतसिंह यांच्या मध्ये सर्वांनी समाधानी, अहिंसक जीवन जगावे.
- नक्की वाचा: महात्मा गांधी यांची माहिती
शिक्षण:
भगत सिंह हे लहानपणापासूनच हुशार होते चतुर होते. त्यांच्या घराण्यात मध्येच क्रांतिकारक जन्माला आल्यामुळे लहानपणापासून त्यांनी एक क्रांतिकारक बनण्याचं स्वप्न मनात ठेवलं होतं लहानपणापासून ते स्वतःला तयार करू लागले होते. भगतसिंह हे लहानपणी शाळेमध्ये नाही जायचे कारण त्यांच्या आजोबांना शाळेतील लोकांची इंग्रज सरकारसाठी असलेली निष्ठा मान्य नव्हती.
युद्ध कला राजकारण या सगळ्या गोष्टींमध्ये ते प्रशिक्षण घेत होते. भगत सिंह यांचे शिक्षण लाहोर येथील नॅशनल कॉलेजमध्ये चालू होतं परंतु क्रांतीकारक आणि देश प्रेमापुढे त्यांनी शिक्षण सोडून नवजवान भारत सभेची स्थापना केली. खरंतर भगत सिंह यांना शिक्षणाची गरजच नव्हती लहानपणापासूनच क्रांती घडवणाऱ्या लोकांसोबत त्यांचा वावर होता.
त्यांचं वाचन देखील अतिशय उत्तम होतं तसेच ते एक लेखक देखील होते एक वक्ते देखील होते. त्यांच्या कॉलेजमधून देखील त्यांना उत्तम निबंध लिहिल्यामुळे पारितोषिक जाहीर झालं होतं त्यांच्या कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या हिंदी निबंध स्पर्धेत भगत सिंह यांनी अतिशय उत्तम लेख लिहिला होता.
- नक्की वाचा: पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती
वैयक्तिक आयुष्य:
भगत सिंह यांच्यामध्ये जे देश प्रेम निर्माण झालं त्याच प्रोत्साहन त्यांना त्यांच्या घरातून मिळालं. त्यांच्या घरामध्ये सर्वत्र देशप्रेमी माहोल होता त्यांच्या घरातील सगळेच सदस्य स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामाविष्ट होते. त्यामुळे अगदी लहान वयामध्ये भगतसिंह यांनी देखील देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं स्वप्न बघितलं.
त्यांचे आजोबा म्हणजे अर्जुनसिंग हे हिंदू सुधारणावादी चळवळीत समाविष्ट होते तर ते आर्य समाजाचे मुख्य सदस्य देखील होते. भगत सिंह हे लहानपणापासूनच हुशार होते त्यांनी लहानपणी युद्धकला सामाविष्ट असणारे खेळ खेळले. भगत सिंह यांना वाचनाची प्रचंड आवड होती. घरातील सगळेच सदस्य स्वातंत्र्यलढ्यात समाविष्ट होते त्यातच घरात क्रांतीचे वाहणारे वारे, त्यामुळे भगतसिंह यांनादेखील क्रांती वर आधारित पुस्तके वाचनाची प्रचंड आवड होती.
भगत सिंह यांना खूप मोठा वाचनाचा दांडगा अनुभव होता इतकेच नव्हे तर शहीद होण्याच्या आधी देखील ते पुस्तकच वाचत होते. भगत सिंह एक क्रांतिकारक तर होते त्या सोबत असते वक्ते, लेखक, नाट्यअभिनेते देखील होते पत्रकार मधून त्यांना लेखनाची आवड लागली. बेळगाव येथे १९२४ – २५ मध्ये काँग्रेस अधिवेशन भरले होते त्या अधिवेशनामध्ये अकाली या पत्राचे प्रतिनिधित्व भगत सिंह यांनी केले होते. राणा प्रताप, दुर्दशा या नाटकांमध्ये त्यांनी अभिनय देखील केला होता. त्यांनी अनेक लेख देखील लिहले होते.
- नक्की वाचा: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती
राजकीय आयुष्य:
भगतसिंह यांच्या मनामध्ये जे देश प्रेम जाग झालं होतं ते त्यांच्या घरच्या वातावरणामुळे. लहानपणापासून ते क्रांतिकारक विचार असणाऱ्या लोकांमध्ये वाढले तसंच लहानपणी बघितलेल्या जालियनवाला बाग हत्याकांड सोबतच त्यांच्या आयुष्यात घडणारे अनेक वेगवेगळे कठीण प्रसंग यामुळे भगत सिंह यांना इंग्रजांविरुद्ध खूप द्वेष निर्माण झाला होता.
इंग्रजांना धडा शिकवणं तसेच युवा पिढीमध्ये स्वातंत्र्याची ज्योत निर्माण करणं अत्यंत महत्त्वाचा आहे असा त्यांना वाटायचं. त्यांनी त्यांचं शिक्षण अर्धवट सोडून स्वातंत्र्य चळवळीमध्ये पुढाकार घेतला सगळ्यात आधी येणाऱ्या पिढीमध्ये स्वातंत्र्य किती महत्त्वाचा आहे तसच इंग्रजांची गुलामी आपल्या भारत देशावर चालणार नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न करून युवा पिढीला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला.
लहानपणापासूनच त्यांचा जन्मच क्रांतिकारक घराण्यात झाला असल्यामुळे त्यांना राजकारणाविषयी चांगलीच माहिती होती. त्यांनी त्यांच्या चातुर्याचा अगदी योग्य प्रमाणे वापर केला. किसान कीर्ती पक्षा द्वारे प्रकाशित नियतकालिके इंग्रजांविरुद्ध आक्षेप असल्याचे आरोप करून लेख लिहायला सुरुवात केली.
परिणामी युवा पिढीमध्ये स्वातंत्र्या विषयी जागृती निर्माण झाली आणि भगत सिंह यांना खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला पुढे ९ सप्टेंबर १९२५ सायली भगत सिंह यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या साथीने HSRA म्हणजेच हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना निर्माण केली. या संघटने मध्ये लाला लाजपतराय यांचादेखील समावेश होता.
या संघटनेचे मुख्य चंद्रशेखर आजाद होते. या संघटनेचं एकच उद्दिष्ट होतं सशस्त्र क्रांती द्वारे इंग्रजांना लढा देऊन भारतीय स्वराज्य निर्माण करायचं. पण १९२७ मध्ये गो बॅक सायमन च्या वादामध्ये सायमन कमिशनला परत घालवण्यासाठी इंग्रजांकडून लाठीचार झाला त्या लाठीचारा मध्ये महान क्रांतिकारक लाला लाजपतराय हे मृत्युमुखी पडले. भगत सिंह यांना ही बातमी कळल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण देशात क्रांती घडवून आण्यामध्ये लाला लजपतराय यांचे खूप मोठं श्रेय होतं.
भगतसिंग राजगुरू सुखदेव यांची माहिती:
भगत सिंह राजगुरु आणि सुखदेव हे तीन भारतातील महान क्रांतिकारांपैकी एक होते. या तिघांनी मिळून स्वातंत्र्य लढा दिला. या तिघांच्या जोडीने इंग्रजांच्या नाकात दम करून ठेवला होता भगतसिंह राजगुरू आणि सुखदेव हे तुरूंगामध्ये देखील सोबतच होते आणि ह्यांना एकाच वेळी फाशीची शिक्षा देण्यात आली या तिघांचे इंग्रजांविरुद्धच्या लढायांमध्ये खूप मोठा आहे.
भगतसिंग पुस्तके:
भगत सिंह यांचं स्वातंत्र्य लढ्यात मध्ये खूप मोठं योगदान आहे. भगतसिंह यांनी केलेल्या क्रांतिकारक चळवळीमुळे त्यांच्यावर अनेक पुस्तकं लिहिली गेली. अमर शहीद भगत सिंह हे पुस्तक विष्णु प्रभाकर यांनी हिंदी भाषेत लिहिलं आहे. आम्ही कशासाठी लढत आहोत? मूळ लेखक भगतसिंह अनुवाद चित्रा बेडेकर.
Krantiveer Bhagat Singh इंग्रजी भाषेतील पुस्तक लेखिका नयनतारा देसाई यांनी लिहिला आहे. सरदार भगतसिंह लेखक संजय नहार. शहीद भगत सिंह समग्र वाड्मय संपादक दत्ता देसाई. देस मंगता है कुर्बानी (शिवाजी भोसले) शहीद भगत सिंग – जीवन व कार्य लेखक अशोक चौसाळकर. मी नास्तिक आहे का मूळ लेखक भगतसिंह अनुवाद चित्रा बेडेकर.
भगत सिंह यांची क्रांती इतकी मोठी होती की त्यांच्यावर फक्त पुस्तकेच नाही तर अफाट चित्रपट आणि नाट्य देखील निर्मित करण्यात आली. त्यातीलच काय चित्रपट नाट्य म्हणजेच रंग दे बसंती, अमर शहीद भगत सिंह, द लिजेंड भगत सिंग.
- नक्की वाचा: नेताजी सुभाषचंद्र बोस यांची माहिती
मृत्यू:
भगत सिंह यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन इंग्रजांना परत पळवून लावण्याचा विडा उचलला होता. त्याच प्रमाणे त्यांनी क्रांतिकारक चळवळ सुरु केली परंतु त्यांच्या संघटनेमधील लाला लजपतराय हे इंग्रजांकडून मारले गेले या गोष्टीचा बदला घेण्यासाठी भगतसिंह यांनी त्यांच्या साथीदारांसोबत म्हणजेच राजगुरु आणि सुखदेव यांच्या सोबत मिळून साॅडर्सची १७ डिसेंबर रोजी १९२८ मध्ये हत्या केली.
इतकच नव्हे तर जेव्हा इंग्रज आपल्या देशातील गरीब शेतकऱ्यांवर त्यांचे जुलूम अत्याचार करत होते त्यावेळी भगत सिंह यांनी इंग्रज असेंबलीत बॉम्बस्फोट घडवून आणला या घटनेमध्ये त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी साथ दिली होती. या घटनेनंतर भगतसिंह स्वतः इंग्रजांच्या स्वाधीन झाले परंतु इंग्रजांच्या कैदेत असून देखील भगत सिंह यांची क्रांतिकारक चळवळ थांबली नाही.
त्यांनी तुरुंगात राहून देखील अनेक आंदोलनं पार पडली परंतु काही दिवसांनी त्यांचे साथीदार देखील इंग्रजांनी द्वारे कैद केले गेले आणि या तिघांवर देखील साॅंडर्सच्या हत्येचा आरोप लावण्यात आला. तुरूंगात कैद असून देखील भगतसिंह यांचा प्रभाव लोकांवर इतका वेगळा पडला होता की तुरुंगातले कैदी यांना जेव्हा भगत सिंह यांना फाशी होणार अशी बातमी कळाली तेव्हा त्यांनी भगत सिंह यांचे सामान चौकीदारांना कैद्यांमध्ये वाटायला सांगितले.
जेणेकरून ते त्यांच्या पुढील पिढ्यांना सांगु शकतील की आम्ही भगतसिंह यांच्या सोबत तुरुंगात कैद होतो. भगतसिंह आणि त्यांचे मित्र राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्याच्या खऱ्या दिवशी पेक्षा बारा तास आधीच फाशी देण्यात आली आणि २३ मार्च १९३१ रोजी भगत सिंह आणि त्यांचे साथीदार राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली? अशाप्रकारे भगतसिंग हे देशासाठी शहीद झाले भगतसिंग यांच्या मते क्रांती तेव्हाच घडून येते जेव्हा क्रांतिकारक देशासाठी बलिदान देतो.
जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेबद्दल आपल्या सगळ्यांनाच अगदी लहानपणापासून इतिहासाच्या माध्यमातून माहिती आहे. परंतु ही घटना ज्यांनी स्वतःच्या डोळ्याने पाहिली ते म्हणजे भगत सिंह यांच्या आयुष्यातील ही घटना खूप महत्त्वपूर्ण होती कारण ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन करण्यासाठी खूप सारे नागरिक जालियनवाला बाग येथे जमले होते.
संतप्त झालेल्या हजारो नागरिकांवर गोळीबार करण्यात आला हा गोळीबार इंग्रज सरकार जनरल याने आपल्या सैनिकांकडून करून घेतला या गोळीबारा मध्ये जवळपास हजारो लोक मारले गेले त्यामध्ये लहान मुलं आणि स्त्रिया यांचा देखील समावेश होता. या प्रकरणामुळे भगतसिंह यांच्या मनामध्ये ब्रिटिशांविरुद्ध अजून राग वाढत गेला हि घटना १३ एप्रिल १९१९ मध्ये घडली.
ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी भगतसिंह खूपच लहान होते त्यांनी त्याच वेळी इंग्रज सरकारचा पराभव करण्याचा निर्णय घेतला त्या वेळी भगतसिंह यांच्या मनामध्ये देशासाठी असलेलं प्रेम जाग झालं आणि स्वातंत्र्य लढा सुरू झाला त्यांच्या नसानसामध्ये स्वातंत्र्य घुमू लागलं. फक्त बारा वर्षाचे असणारे भगत सिंह यांना इतक्या लहान वयामध्ये खूप अवघड परिस्थितीशी सामना करावा लागला होता.
आम्ही दिलेल्या bhagat singh information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर भगतसिंग यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about bhagat singh in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि bhagat singh biography in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bhagat singh information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
Very important information
Thanks for give us this information thank you so much
Love & respect
Ketan bhosale
धन्यवाद