स्वादिष्ट चिकन रेसिपी मराठी Chicken Recipes in Marathi

Chicken Recipes in Marathi – Chicken Recipe Marathi चिकन रेसिपीज मराठी चिकन म्हंटल कि अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते कारण काही लोकांचे चिकन हे खूप प्रिय असते. आपण नेहमी काहीतरी वेगळं आणि स्वादिष्ट रेसिपीची इच्छा करत असतो आणि वेगवेगळ्या चिकन रेसिपी मुळे आपली स्वादिष्ट आणि काही वेगळ खाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते कारण चिकन वापरून आपल्याला कित्येक प्रकारच्या रेसिपी बनवता येतात. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चिकन रेसिपी बनवल्या जातात त्यामधील काही संपूर्ण भारतामध्ये लोकप्रिय असलेल्या चिकण रेसिपीज आज या लेखामध्ये पाहणार आहोत.

आज आपण या लेखामध्ये खाली दिलेल्या चिकन रेसिपी कश्या बनवायच्या ते पाहणार आहोत.

chicken recipes in marathi
chicken recipes in marathi
अनुक्रमणिका hide
1 स्वादिष्ट चिकन रेसिपी मराठी – Chicken Recipes in Marathi

स्वादिष्ट चिकन रेसिपी मराठी – Chicken Recipes in Marathi

बटर चिकन रेसिपी
चिकन बिर्याणी रेसिपी.
चिकन टिक्का मसाला.
चिकन कुर्मा मसाला.
चिकन ६५ रेसिपी.

बटर चिकन रेसिपी कशी बनवायची – how to make butter chicken recipe in marathi

आता आपण भारतामध्ये तसेच जगामधील काही देशांमध्ये प्रसिध्द असलेली स्वादिष्ट आणि तोंडाला पाणी आणणारी बटर चिकन रेसिपी पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
मॅरीनेटसाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ३० मिनिटे
एकूण लागणारा वेळ६० ते ६५ मिनिटे
पाककलाभारतीय ( दिल्ली )

बटर चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make butter chicken 

चिकण मॅरीनेट करण्यासाठी लागणारे साहित्य 
  • १ वाटी दही.
  • १ चमचा लाल तिखट / लाल मिरची पावडर .
  • २ चमचे आले लसूण पेस्ट.
  • १ चमचा गरम मसाला पावडर.
  • १ चमचा तेल.
  • १/२ चमचा धने पावडर.
  • ४०० ग्रॅम चिकण
  • मीठ (चवीसाठी).
बटर चिकणसाठी लागणारे इतर साहित्य 
  • १ चमचा तेल.
  • ३ बटर क्यूब्स.
  • २ चमचे आले लसूण पेस्ट.
  • २ दालचिनी, ४ ते ५ हिरव्या वेलची, ५ लवंगा, १ काळी वेलची.
  • २५ ग्रॅम काजू.
  • ४ टोमॅटो ( बारीक चिरलेले ).
  • १ वाटी कांदा ( चिरलेला ) .
  • मीठ (चवीसाठी).
  • ४ चमचे लाल तिखट.
  • ३ चमचे फ्रेश क्रीम.
  • कोथिंबीर (गार्निशसाठी)

बटर चिकन बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make butter chicken recipe 

  • सर्व[प्रथम एक बाऊल घ्या आणि त्यामध्ये चिकन, दही, मीठ, लाल मिरची पावडर, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला पावडर, धने पावडर आणि थोडे तेल घालून चांगले मिक्स करा आणि हे मिश्रण १५ मिनिटे मॅरीनेट करा.
  • मग ते मॅरीनेट केलेले चिकण ओव्हनमध्ये २० ते २५ मिनिटासाठी भाजून घ्या.
  • आता एक कढई घ्या आणि त्या कढईत बटर गरम करून त्यामध्ये थोडे तेल घालून त्यामध्ये लवंगा, दालचिनी, हिरवी वेलची, काळी वेलची घालून हा सगळा गरम मसाला थोडावेळ भाजून घ्या.
  • ह्या मसाल्यांचा चांगला वास सुटल्यानंतर त्यामध्ये आले लसूण पेस्ट, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, काजू, मीठ चांगले मिसळा आणि १० मिनिटे शिजवा त्यानंतर सर्व मिश्रण ब्लेंडरमध्ये काढून बारीक प्युरी बनवा.
  • दुसर्‍या पॅनमध्ये थोडे बटर गरम करा आणि त्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची, बनवलेली प्युरी घाला आणि १० मिनिटे शिजू द्या त्यानंतर मीठ, थोडी साखर, भाजलेले चिकन घालून ४ ते ५ मिनिटे शिजवा. चिकन चांगले शिजले कि गॅस बंद करा.
  • तुमची बटर चिकण रेसिपी तयार झाली, त्यावर फ्रेश क्रीम आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

चिकन बिर्याणी कशी बनवायची – how to make chicken biryani recipe in marathi

चिकन बिर्याणी ही रेसिपी एक भारतीय डिश आहे जी मुघलांनी भारताला दिलेली एक स्वादिष्ट डिश आहे. आता आपण चिकन बिर्याणी कशी बनवतात आणि ती बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते पाहणारा आहोत.

तयारीसाठी लागणारा वेळ२० मिनिटे
मॅरीनेटसाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ३० मिनिटे
एकूण लागणारा वेळ१ तास ५ मिनिटे
वाढणी१० ते ११ व्यक्ती
पाककलाभारतीय

चिकन बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make chicken biryani 

जर तुम्हाला रेस्टॉरंट सारखी चिकन बिर्याणी घरी बनवायची असेल तर बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घरामध्ये असणे आवश्यक आहे.

चिकन मॅरीनेट करण्यासाठी लागणारे साहित्य
  • ४ चमचे दही.
  • अर्धा चमचा हळद पावडर.
  • अर्धा चमचा लाल मिरची पावडर.
  • १ चमचा गरम मसाला पावडर.
  • १ चमचा धने पावडर
  • १ चमचा आले लसूण पेस्ट.
  • मीठ (चवीनुसार ).
  • २५० ग्रॅम चिकण.
मुख्य चिकन बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
  • १ किलो बासमती ( लांब तांदूळ )
  • ३ चमचे धने पावडर.
  • २ चमचे आले लसूण पेस्ट.
  • १ मोठी वाटी कांदा ( उभा चिरलेला ).
  • २ चमचे टोमॅटो प्युरी.
  • १ चमचा गरम मसाला पावडर.
  • २ चमचे लाल मिरची पावडर.
  • १ चमचा हळद पावडर.
  • २ चमचे तेल.
  • २ चमचे तूप.
  • मीठ (चवीनुसार घालावे).
बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे खडे मसाले
  • ५ वेलदोडे .
  • १ मसाला वेलदोडा.
  • २ बदाम फुल.
  • ६ लवंगा.
  • ५ ते ६ मिरी.
  • २ तमालपत्र.
  • १ दालचिन तुकडा.

चिकन बिर्याणी बनवण्याची कृती – process to make chicken biryani 

कृती १ – चिकन मॅरीनेट करण्यासाठी करावी लागणारी कृती 
  • चिकन मॅरीनेट करण्यासाठी एका बाऊल मध्ये चिकन, दही, धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर, आले लसूण पेस्ट, गरम मसाला आणि मीठ ( चवीनुसार ) घालून सर्व मिश्रण चांगले एकत्र करा.
  • मग ते मॅरीनेट केलेले चिकन १५ ते २० मिनिटे झाकून बाजूला ठेवा.
कृती २  – तांदूळ शिजवण्यासाठी केली जाणारी कृती 
  • सर्व प्रथम लांब बासमती तांदूळ घ्या आणि तो स्वच्छ धुऊन ते तांदूळ १५ ते २० मिनिटे भिजू द्या.
  • नंतर एक भांडे घेऊन त्यात पाणी घालून त्या पाण्यामध्ये वेलदोडे, मसाला वेलदोडा, लवंग, मिरी, तमाल पत्री, दालचिनी, बदाम फुल आणि दालचिन घाला आणि पाणी उकळू द्या.
  • पाणी उकळले कि त्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालून ते ७० ते ८० टक्के शिजवून घ्या.
कृती ३ – भाताला दम देण्याची कृती
  • शिजलेल्या भाताला दम देण्यासाठी एक जाड तळाचे भांडे घ्या आणि तूप आणि तेल एकत्र टाका. तूप आणि तेल तापले की त्यात आले लसूण पेस्ट आणि चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परता.
  • मग त्यामध्ये धनेपूड, गरम मसाला पावडर, लाल मिरची पावडर, हळद आणि तमालपत्र, वेलची, जिरे असे काही संपूर्ण मसाले घालून सर्व मिश्रण एकत्र करा.
  • मग त्यामध्ये मॅरीनेट केलेले चिकन घाला आणि त्यामध्ये थोडे पाणी घालून ते ६ ते ७ मिनिटे शिजवा.
  • नंतर चिकन पसरवा आणि चिकनवर शिजवलेला भात पसरवा आणि शेवटी बिर्याणीला कोथिंबीर, पुदिन्याची पाने, केशर चवीचे दूध आणि लिंबाचा अर्क आणि तळलेला कांदा घालून सजवा आणि त्यावर झाकण ठेवा आणि मग एक जाड तवा घ्या आणि तो गॅसवर ठेवा.
  • तव्यावर बिर्याणीचे भांडे ठेवा आणि बिर्याणीसाठी दम द्या.
  • बिर्याणी १० मिनिटे उच्च आचेवर आणि बिर्याणी २० मिनिटे मंद आचेवर शिजवा.
  • मग गॅस बंद करा आणि बिर्याणी खाण्यासाठी तयार झाली.
  • बिर्याणी पापड किंवा कांदा रायत्यासोबत सर्व्ह करा.

चिकण टिक्का मसाला कसा बनवायचा – how to make chicken tikka masala recipe in marathi

आता आपण पाहूयात तिखट आणि मसालेदार चिकण टिक्का मसाला कसा बनवायचा. चला तर मग पाहूयात चिकन टिक्का बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

तयारीसाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ३० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ मिनिटे
वाढणी४ व्यक्ती
पाककलाभारतीय

चिकन टिक्का मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make chicken tikka masala 

चिकन मॅरीनेट करण्यासाठी लागणारे साहित्य 
  • ५०० ग्रॅम चिकन ( छोटे तुकडे ).
  • अर्धी वाटी दही.
  • १ चमचा आले-लसूण पेस्ट.
  • १/२ चमचा हळद पावडर.
  • १/२ चमचा लाल मिरची पावडर.
  • १ चमचा गरम मसाला.
  • मीठ (आवश्यकतेनुसार).
  • २ चमचे तेल.
ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारे साहित्य 
  • ३ मोठे चमचे तेल.
  • २ वाटी टोमॅटो प्युरी.
  • १ छोटी वाटी कांदा ( चिरलेला ).
  • २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट.
  • १ मोठा चमचा बटर.
  • १ मोठा चमचा ताजी मलई.
  • १ मोठा चमचा लाल मिरची पावडर.
  • मीठ ( आवश्यकतेनुसार ).
  • १ चमचा साखर.
  • कोथिंबीर ( चिरलेली ).
खडे मसाले 
  • अर्धा चमचा जिरे.
  • १ दालचिनीची काडी.
  • १ बदाम फुल.
  • २ लवंगा.
  • २ वेलदोडे आणि १ मसाला वेलदोडा.

चिकन टिक्का मसाला बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make chicken tikka masala 

  • सर्वप्रथम एक मोठा बाऊल घेऊन त्यामध्ये सर्व मॅरीनेटसाठी लागणारे साहित्य घाला आणि ते चांगले मिक्स करून चिकन १५ ते २० मिनिटे झाकून बाजूला ठेवा.
  • आता एक कढई घेऊन ती मध्यम आचेवर गरम करून मग सर्व खडे मसाले एकत्र घेऊन एका कढईत २-३ मिनिटे परतून घ्या आणि मग ग्राइंडरमध्ये सर्व मसाल्यांची बारीक पावडर बनवा आणि ती थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.
  • आता त्या कढईमध्ये तेल घाला, तेल गरम झाले कि त्यामध्ये मॅरीनेट केलेले चिकन घाला आणि चिकन लालसर किंवा तपकिरी रंग येईपर्यंत परतून घ्या मग एका भांड्यात चिकन काढून बाजूला ठेवा.
  • आता परत कढई मध्यम आचेवर ठेवा आणि त्यामध्ये तेल आणि बटर घाला.
  • तेल गरम झाले कि त्यामध्ये कांदा आणि आले-लसूण पेस्ट घालून, कांदा चांगला पारदर्शी होईपर्यंत भाजून घ्या.
  • मग त्यामध्ये मसाले पावडर हळद, लाल तिखट घाला आणि हलवा नंतर टोमॅटो प्युरी आणि क्रीम घाला हे सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्या आणि हे मिश्रण मंद आचेवर ५ मिनिटे चांगले शिजवून घ्या.
  • नंतर ग्रेव्हीमध्ये चिकन, मीठ ( चवीनुसार ), साखर आणि पाणी ( आवश्यकतेनुसार ) घालून चांगले मिक्स करा आणि पुन्हा ग्रेव्ही झाकून १० मिनिटे शिजवा.
  • ग्रेव्ही शिजली की गॅस बंद करा आणि त्यावर कोथिंबीर घालून चिकण टिक्का मसाला तुम्ही सर्व्ह करू शकता.

चिकण कुर्मा कसा बनवायचा – how to make chicken korma recipe in marathi

आता आपण पाहूयात भारतातील एक लोकप्रिय चिकण रेसिपी ती म्हणजे चिकण कुर्मा रेसिपी. चला तर मग पाहूयात चिकन कुर्मा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

चिकण कुर्मा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make chicken korma 

  • २५० ग्रॅम चिकन.
  • २ मोठे चमचे तेल.
  • १ मोठा कांदा ( चिरलेला ).
  • १ लहान टोमॅटो ( चिरलेला ).
  • १ छोटी वाटी किसलेले खोबरे.
  • १ मोठा चमचा काजू.
  • १ वाटी दही.
  • अर्धा चमचा हळद पावडर.
  • २ चमचे लाल मिरची पावडर.
  • अर्धा चमचा धणे पावडर.
  • १ चमचा आले-लसूण पेस्ट.

खडे मसाले 

  • २ ते ३ वेलदोडे.
  • .१ दालचिनी.
  • २ चमचे तीळ.
  • २ ते ३ तमालपत्री पाने.

चिकण कुर्मा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make chicken korma recipe 

  • प्रथम तवा गरम करून त्यात सर्व मसाले घालून ५ ते ६ मिनिटे परतावे.
  • त्यानंतर ग्राइंडरमध्ये मसाले काढून मसाल्याची बारीक पावडर बनवा आणि मसाला पावडर बाजूला ठेवा.
  • कढई पुन्हा गरम करा आणि थोडे तेल घाला नंतर कांदा, टोमॅटो, किसलेले खोबरे घालून ३ ते ४ मिनिटे परतून घ्या त्यानंतर काजू घाला आणि मिनिटे परतून घ्या.
  • नंतर गॅस बंद करून कांद्याचे मिश्रण ग्राइंडरमध्ये काढून त्याची बारीक पेस्ट बनवा.
  • ही घ्या आणि त्यात हळद, धने पावडर आणि लाल तिखट घालून चांगले मिसळा आणि बाजूला ठेवा.
  • त्यानंतर कढई गरम करा आणि त्यामध्ये तेल घाला (मंद आचेवर तेल गरम करा) तेल तापले की त्यात आले लसूण पेस्ट घालून परतावे आणि लगेचच चिकन घाला आणि ५ ते ६ मिनिटे शिजवा (सतत ढवळत राहा).
  • नंतर मसाल्यांची पूड आणि कांदा काजूचे मिश्रण घालून एक मिनिट मिक्स करा.
  • आता दही मिश्रण आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिसळा आणि थोडे पाणी घाला आणि झाकण ठेवून चिकन मऊ आणि रसाळ होईपर्यंत शिजवा.
  • गॅस बंद करा आणि चिरलेली कोथिंबीर घाला आणि चांगले मिसळा आणि रोटी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.

चिकन ६५ कसे बनवतात – how to make chicken 65 recipe in marathi

चिकन ६५ बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make chicken ६५ 

मॅरीनेटसाठी आवश्यक साहित्य 
  • १ अंडे.
  • १ चमचा कॉर्नफ्लोअर.
  • ३ चमचा दही .
  • 3 चमचा धने पावडर.
  • ½ चमचा लाल मिरची पावडर.
  • १/२ चमचा हळद पावडर.
  • २ चमचे आले-लसूण पेस्ट.
  • मीठ ( आवश्यकतेनुसार ).
सॉस आणि इतर साहित्य 
  • ४ चमचे टोमॅटो सॉस.
  • १ चमचा रेड चिली सॉस.
  • ½ चमचा फूड कलर ( पर्यायी ).
  • १ चमचा चिरलेला लसून.
  • २ ते ३ चिरलेल्या हिरव्या मिरच्या.
  • ६ ते ७ कढीपत्ता.
  • तेल ( तळण्यासाठी ).

चिकन ६५ बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make chicken 65 recipe 

  • चिकन मॅरीनेट करण्यासाठी एक मोठा बाऊल घ्या आणि त्यामध्ये चिकन तुकडे, धनेपूड, हळद, आले लसूण पेस्ट, अंड्यामधील पांढरे द्रव, कॉर्नफ्लोअर आणि दही घाला.
  • त्याचबरोबर या मिश्रणामध्ये मीठ ( चवीनुसार ) घाला.
  • सर्व साहित्य चांगले मिसळून घ्या.
  • आणि हे मिश्रण फ्रिज मध्ये ३ ते ४ तासांच्या साठी ठेवा.
  • चिकन ३ ते ४ तास मॅरीनेट केल्यानंतर ते रेफ्रिजरेटरमधून काढा.
  • नंतर ते तळण्यासाठी कढई गॅसवर मध्यम आचेवर तेल गरम करून तेल गरम झाल्यावर त्यात एक एक करून चिकन टाका ( टीप : तेलामध्ये जितके चिकन तुकडे मावतील तितके तुकडे टाकून तळून घ्या )
  • सर्व चिकन एका बॅचमध्ये घालू नका ( २ ते ३ बॅचमध्ये तळून घ्या). चिकन चांगले लालसर रंगावर तळून घ्या.
  • आता तळलेले चिकन टिश्यू पेपरवर काढून बाजूला ठेवा. तळलेल चिकन टिश्यू पेपरवर काढण्याचे कारण जादाचे तेल टिश्यू पेपरमध्ये शोषून घेतले जाते.
  • आता तवा गरम करून त्यामध्ये २ चमचे तेल घाला.
  • तेल गरम झाल्यावर त्यामध्ये चिरलेला लसूण घाला आणि परतून घ्या त्यानंतर त्यात हिरवी मिरची आणि कढीपत्ता घाला आणि एक मिनिट परतून घ्या.
  • मग त्यामध्ये लाल मिरची सॉस, हिरवी मिरची सॉस आणि लाल फूड कलर घाला आणि ते मिश्रण चांगले एकत्र करून घ्या आणि नंतर त्यामध्ये तळलेले चिकन घाला. चिकन चांगले मिक्स करून घ्या आणि ५ मिनिटे मंद आचेवर शिजवा ( चिकन सतत हलवत रहा ).
  • तुमचे चिकन ६५ सर्व्ह करण्यासाठी तयार झाले.

आम्ही दिलेल्या chicken recipes in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर योगासन चित्र सहित माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या chicken 65 recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chicken korma recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chicken tikka masala recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!