चिकन सुक्का रेसिपी Chicken Sukka Recipe in Marathi

Chicken Sukka Recipe in Marathi चिकन सुक्का रेसिपी मराठी चिकन म्हंटल कि अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते कारण काही लोकांना चिकन पासून बनणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज खूप आवडतात जसे कि चिकन टिक्का मसाला, चिकन बिर्याणी, चिकन मसाला, बटर चिकन आणि यामधील एक लोकप्रिय डिश म्हणजे चिकन सुक्का. आज आपण या लेखामध्ये चिकन सुक्का कसा बनवायचं ते पाहणार आहोत. चिकन सुक्का हि रेसिपी नॉनव्हेजीटेरीयन लोकांच्या आवडत्या यादीतील एक आहे आणि हि रेसिपी भारतामध्ये बहुतेक भागामध्ये खूप प्रेमाने बनवली जाते आणि आवडीने खाल्ली जाते.

तसेच काही लोक हि रेसिपी खाण्यासाठी हॉटेल मध्ये जातात परंतु घरामध्ये आपल्या चिकन सुक्का हि रेसिपी अगदी सोप्या पध्दतीने आणि एकदम टेस्टी रेसिपी बनवता येते आपल्याला चिकन सुक्का खाण्यासाठी हॉटेल मध्ये जावे लागत नाही. चिकन सुक्का हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि कमी वेळेमध्ये म्हणजे ३५ ते ४० मिनिटामध्ये बनते. चला तर आता आपण चिकन सुक्का कसा बनवायचा ते पाहूयात.

chicken sukka recipe in marathi
chicken sukka recipe in marathi

चिकन सुक्का रेसिपी – Chicken Sukka Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारे वेळ१० ते १५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ२५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ ते ४० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

चिकन सुक्का कसा बनवायचा ?

चिकन सुक्का बनवताना सर्वप्रथम कांद्याची फोडणी दिली जाते आणि मग त्यामध्ये चिकन घालून थोडा वेळ भाजले जाते आणि मग त्यामध्ये कांदा, आले लसून, तीळ जिरे, खोबरे कोथिंबीर याची एकत्र पेस्ट बनवली जाते आणि ती चिकनमध्ये घालून मिक्स केले जाते मग त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ घालून त्यामध्ये पाणी घालून शिजवले जाते आणि त्याला शिजवून घट्ट बनवले जाते म्हणजे सुक्के केले जाते.

चिकन सुक्का बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

  • चिकन : चिकन हे चिकन सुक्का बनवण्यासाठी लागणारे महत्वाचे साहित्य आहे जे आपण तेलामध्ये भाजतो आणि मग त्यामध्ये काही मसाल्यांची पेस्ट घालून ते शिजवले जाते आणि सुक्के बनवले जाते.
  • खोबरे : चिकन सुक्क्याची आपण जी ग्रेव्ही बनवतो त्यामध्ये खोबरे वापरल्यामुळे ग्रेव्हीला टेस्ट छान येते तसेच ग्रेव्ही दाट बनते.
  • काही मसाले : आपण ज्यावेळी ग्रेव्ही बनवतो त्यावेळी आपण त्यामध्ये काही मसाले घालतो त्यामुळे ग्रेव्हीला मसालेदार चव येते.

चिकन सुक्का रेसिपी – sukha chicken recipe in marathi

चिकन सुक्का हि एक भारतीय पारंपारिक रेसिपी आहे जी लोक खूप पूर्वीच्या काळापासून खातात आणि आजही हि रेसिपी लोक तितक्याच आवडीने बनवतात आणि खातात. चिकन सुक्का हि नॉनव्हेजीटेरीयन लोकांच्या आवडत्या यादीतील डिश आहे आणि हि डिश घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि हि आपण खूप कमी वेळेमध्ये बनवू शकतो. चला तर मग आता आपण चिकन सुक्का कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारे वेळ१० ते १५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ२५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ ते ४० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

चिकन सुक्का रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make chicken sukka recipe

चिकन सुक्का बनवण्यासाठी चिकन, खोबरे, तीळ आणि काही मसाले हे काही महत्वाचे साहित्य लागते. चिकन सुक्का बनवण्यासाठी लागणारे काही साहित्य घरामध्ये उपलब्ध असते तर काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते ते आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करू शकतो. चला तर आता आपण चिकन सुक्का बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • अर्धा किलो चिकन ( छोटे छोटे तुकडे ).
  • १ वाटी सुखे खोबरे ( खिसलेले ).
  • १ कांदा ( उभा चिरलेला ).
  • १ कांदा ( बारीक चिरलेला ).
  • २ चमचे आले लसून पेस्ट.
  • ४ चमचे तीळ.
  • १/२ चमचा जिरे.
  • १ बदाम फुल.
  • १/२ चमचा वेलची पावडर.
  • २ तुकडे दालचिन.
  • २ चमचे लाल मिरची पावडर.
  • १/२ चमचा हळद.
  • १ चमचा गरम मसाला.
  • कोथिंबीर.

चिकन सुक्का बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make chicken sukka recipe 

चिकन सुक्का मसाला हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि हि आपण खूप कमी वेळेमध्ये बनते. चला तर मग वर दिलेले साहित्य वापरून चिकन सुक्का मसाला रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

  • चिकन सुक्का बनवताना सर्वप्रथम आपल्याला जी ग्रेव्ही साठी पेस्ट बनवावी लागते ती बनवून घ्यावी लागते.
  • पेस्ट बनवण्यासाठी गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि मग त्यामध्ये प्रथम सुखे खिसलेले खोबरे भाजून घ्या आणि आणि ते थोडे कुरकुरीत आणि गरम झाले कि बाजूला काढा.
  • आता कढई मध्ये तीळ, जिरे, बदाम फुल, दालचिन घाला आणि ते देखील भाजून घ्या.
  • कढई मध्ये थोडेसे ( अर्धा चमचा ) तेल घाला आणि त्यामध्ये कांदा घाला आणि कांदा देखील लालसर रंग येईपर्यंत भाजा. आता गॅस बंद करा.
  • सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले खोबरे घाला आणि ते चांगले मिक्सर वर बारीक करून घ्या.
  • तसेच तीळ – जिरे आणि इतर मसाले देखील बारीक करून घ्या आणि मग त्यामध्ये बारीक केलेलं खोबरे, भाजलेला कांदा आणि कोथिंबीर घाला आणि ते मिक्सरला फिरवून घ्या.
  • या मिश्रणामध्ये थोडेसे पाणी घाला आणि ते चांगले मिक्सरवर मिक्स करून घ्या आणि हे मिश्रण थोडा वेळ बाजूला ठेवा.
  • आता परत गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये फोडणीसाठी तेल घाला.
  • तेल गरम झाले कि त्यामध्ये कांदा घाला आणि कांदा लालसर रंग येईपर्यंत भाजा आणि थोड्या वेळाने त्यामध्ये आले लसून पेस्ट घाला आणि थोड्या वेळासाठी आले लसून पेस्ट तेलामध्ये परता.
  • त्यामध्ये आता चिकन घाला आणि ते तेलामध्ये ६ ते ७ मिनिटे सतत हलवत राहून भाजा.
  • आता चिकन मध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर, हळद घाला आणि मिकास करा आणि मग त्यामध्ये लगेच आपण बनवून ठेवलेली पेस्ट घालून चिकन मध्ये मिक्स करा आणि थोड्या वेळासाठी पेस्ट भाजा.
  • आता त्यामध्ये मिश्रण सरसरीत होईल इतके पाणी घाला तसेच चवीनुसार मीठ घाला आणि ते झाकण लावून चिकन मऊ होईपर्यंत आणि त्यामधील सर्व पाणी आतून चिकन कोरडे किंवा सुखे होईपर्यंत शिजवा.
  • चिकन शिजले कि गॅस बंद करा.
  • चिकन सुक्का सर्व्ह करण्यासाठी तयार झाले.

चिकन सुक्का कश्यासोबत खावू शकतो – serving suggestion

  • चिकन सुक्का आपण चपाती, भाकरी, रोटी, नान, पुलके किंवा जीरा राईस किंवा मग पांढऱ्या भातासोबत खावू शकतो.

आम्ही दिलेल्या chicken sukka recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर चिकन सुक्का रेसिपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या malvani chicken sukka recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि gavran chicken sukka recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये malvani chicken sukka Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!