ख्रिसमस नाताळ मराठी निबंध Christmas Essay in Marathi

“ख्रिसमस उत्सव घेऊन आला आनंद घराघरांत

सगळेजण मागूया पापांची अन् चुकांची माफी मनात

येशू! सर्वांना सुखी ठेव,

अशी ठेवून कामना उरात

सहाय्य हाच खराची धर्म

असे गाणे गात रहावे सुरात!”

Christmas Essay in Marathi – Christmas Speech in Marathi ख्रिसमस नाताळ मराठी निबंध २५ डिसेंबर जवळ आला की सर्वांना ख्रिसमस उत्सवाची लगेच चाहूल लागते आणि सगळ्यांचे मन या सणाच्या विस्मरणाने अगदी फुलून जाते. मित्रहो, आपण जर ख्रिस्ती धर्माच्या इतिहासामध्ये थोडंसं  डोकावून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की, “ख्रिसमस किंवा नाताळ” हा सण सुरुवातीच्या ख्रिस्त सभेमध्ये मुळीच अस्तित्वात नव्हता. शिवाय, पूर्वीच्या काळी येशूंचा जन्मउत्सव हा दिनांक ६ जानेवारी या पवित्र दिवशी साजरा केला जात होता. तसेच, पौर्वात्य ख्रिस्त सभेमध्ये साधारणतः तिसऱ्या शतकात आणि रोमन ख्रिस्त सभेमध्ये इसवी सन ३००च्या जवळपास नाताळ सण हा खूप उत्साहाने साजरा करण्यात आला होता.

परंतू, तत्कालीन काळात रोम शहरात मात्र ही तारीख २५ डिसेंबर अशी ठरवली गेली. पण मित्रहो, रोम शहरात जरी २५ डिसेंबर ही तारीख जाहीर केली गेली असली, तरीदेखील इतर ठिकाणी मात्र नाताळ हा सण अन्य दुसऱ्या अथवा वेगळ्या कोणत्या तरी दिवशी साजरा केला जात होता.

christmas essay in marathi
christmas essay in marathi

ख्रिसमस नाताळ मराठी निबंध – Christmas Essay in Marathi

Essay on Christmas in Marathi

याखेरीज, रोममधील जास्तीत जास्त रोमन लोक हे सूर्य देवाची उपासना करीत होते. खरंतर, याचे मुख्य कारण म्हणजे २२ डिसेंबर या दिवसानंतर सूर्याचे दक्षिणायन संपून त्याचे उत्तरायण सुरू होते आणि दिवसाचा कालावधी हा हळूहळू मोठा होऊ लागतो. त्यामुळे, रोमन लोकांच्या धार्मिक श्रद्धेनुसार हा दिवस विशेषतः सूर्य देवाचा नवीन जन्म दिवस मानला जातो.

शिवाय, आपल्या सूर्य देवाचा हा नवजन्म असल्याने रोमन लोक एकत्रितरित्या मोठ्या आनंदाने हा शुभ दिवस साजरा करत होते. मित्रहो, कौतुकाची बाब म्हणजे कॉन्स्टन्टाईन या एका रोमन सम्राटाने याच काळात ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. त्यामुळे, त्याने ख्रिस्ती धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी सूर्य देवाची उपासना न करता, सूर्याचा निर्माता आणि नीतिमत्तेचा सूर्य असलेल्या प्रभू येशू यांची उपासना करणे सुरू केले. अशा प्रकारे, अखेर २५ डिसेंबर हा पवित्र दिवस रोमन कॅथोलिक ख्रिस्त सभेमध्ये येशूंचा जन्मदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

विशेषतः सूर्य देवाच्या जन्मदिनाला रोमन भाषेमध्ये “नातालीज सोलिस इनइक्विटी” म्हणजेच “अजिंक्य सूर्यदेवाचा वाढदिवस” असे म्हटले जात होते. खरंतर, त्यावरूनच या शुभ उत्सवाला नाताळ असे नाव देण्यात आले. शिवाय, तत्कालीन काळातील संत क्रिजोस्तम म्हणतं की, “आपल्या प्रभूवाचून अन्य दुसरा अजिंक्य देव कोण आहे?

कारण, आपला प्रभूचं तर स्वतः न्यायाचा सूर्य आहे.” मित्रहो, नाताळच्या दिवशी आपण पाहतो की अनेक ठिकाणी लहानशी झोपडी, बाळ येशू ख्रिस्त आणि गायीचा गोठा खूप सुंदरतेने सजवला जातो. खरंतर, यामागचे मुख्य कारण म्हणजे कॅथोलिक ख्रिस्तसभेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्माची स्मृती म्हणून ‘गोशाळा अथवा गायीचा गोठा’ तयार करण्याचा पहिल्यापासून प्रघात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवाय, तसं पहायला गेलं तर आपल्या लक्षात येईल की प्रामुख्याने असा रीतिरिवाज संत फ्रान्सिस असिसिकर यांनी इसवी सन १२२३ साली सुरू केला होता आणि या परंपरेनुसार ग्रेसिओ नावाच्या एका लहान खेड्याजवळ असलेल्या छोट्याश्या गुहेमध्ये त्यांनी सजीव गाय, उंट, मेंढरेगाढवे इत्यादी प्राणी आणून खूप सुंदर देखावा निर्माण केला होता.

या देखाव्यातून त्यांनी तेथील लोकांना प्रभू येशूंच्या लोकांप्रती असलेल्या अपार दयेची, करुणेची आणि ख्रिस्ती धर्माची शिकवण दिली. त्यामुळे, ही प्रथा त्या खेड्यातील लोकांनी पूर्वापार पद्धतीने चालू ठेवली. शिवाय, याबद्दल काही जणांचे असे म्हणणे आहे की तत्कालीन काळी संत फ्रान्सिस याने पवित्र मिस्सा अर्पण केली होती आणि त्याचवेळी उपस्थित लोकांना भावस्पर्शी प्रवचनदेखील दिले होते.

मित्रहो, आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी देत असलेल्या प्रवचनाच्या शेवटी त्यांच्या हातात खरोखरच एक सुंदर जिवंत बालक अवतरल्याचे उपस्थित लोकांनी पाहिलं. अशा प्रकारे, त्याकाळी घडलेल्या या चमत्कारिक घटनेमुळे गोशाळा उभारण्याच्या प्रथेला खूप मोठ्या प्रमाणात बळकटी मिळाली.

इसवी सनाच्या अकराव्या आणि बाराव्या शतकात पहिल्यांदाच “ख्रिसमस कॅराॅल अथवा नाताळ गीतांची” प्रथा जर्मनीमध्ये सुरू झाली. तसेच, इसवी सनाच्या दहाव्या शतकात ख्रिसमस ट्री उभे करण्याची परंपरा सुरू झाली.

असे मानले जाते की ख्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या ईडन नावाच्या बागेतील एका झाडाचे आणि क्रूसाच्या झाडाचे एक अनोखे असे प्रतीक आहे. खरंतर, ख्रिसमस ट्री या संकल्पनेचा अधिक सविस्तर उल्लेख हा इसवी सन १६०५ मध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. त्याकाळी, चार्ल मेगन या राजाचा राज्याभिषेक दिनांक २५ डिसेंबर इसवी सन ८०० यादिवशी साजरा करण्यात आला होता.

खरंतर, या विशिष्ट दिवसामुळे देखील नाताळ सणाला साजरे करण्याचे महत्त्व विशेष असे वाढलेले दिसून येते. त्याचबरोबर, मध्ययुगाच्या कालखंडात या दिवसाला सुट्टीचे सुद्धा महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसून येते.

शिवाय, याच काळामध्ये नाताळ सण हा एक सार्वजनिक उत्सव देखील बनला. मित्रहो,  त्याकाळी भेटवस्तू देण्याची प्रथा केवळ मालक आणि सेवक यांच्यापुरतीचं मर्यादित होती. पण, नंतरच्या काळात भेटवस्तू देण्याची प्रथा सगळ्यांसाठी बनली.  त्यामुळे, सगळेजण आपापल्या परीने एकमेकांना भेटवस्तू देऊ लागले.

यांखेरीज, नाताळ सणातील सूचिपर्णी वृक्ष हा विशेषतः एका पगान संस्कृतीच्या वृक्षपूजेचा एक विशेष असा भाग मानला जातो. खरंतर, या वृक्षाचा संबंध हिवाळा/वसंत ऋतूतील संक्रमणाशी आहे. शिवाय, आपणा सर्वांना माहीत हवे की ख्रिसमस ट्री असे संबोधन इसवी सन १८३५ मध्ये पहिल्यांदा झाले होते.

आजच्या एकविसाव्या युगातील ख्रिसमस वृक्षाची सजावट हा भाग खासकरून जर्मनी या देशात उगम पावल्याचे समजले जाते. नाताळ सणादिवशी सुचीपर्णी वृक्ष हे दिव्यांच्या माळा आणि अन्य आकर्षक सजावट साहित्यांनी खूप सुंदर पद्धतीने सुशोभित केले जाते.

शिवाय, लहान मुलांचे छोटे-छोटे मोजे, छोट्या प्रतीकात्मक काठ्या, लहान आकाराच्या घंटा, आकर्षित भेटवस्तू इत्यादी. गोष्टी लावून हा वृक्ष चांगल्या प्रकारे सजविला जातो. अनेक ठिकाणी विशेषतः ख्रिस्त धर्मीय लोकांच्या प्रार्थनास्थळी प्रभू येशूंच्या जन्माचा विलोभनीय पद्धतीचा देखावा तयार केला जातो.

आपणा सर्वांना माहीत आहे की, सांताक्लॉज म्हणजेच संत निकोलस हे ख्रिसमस सणाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. खरंतर, सांताक्लॉज ही केवळ एक काल्पनिक व्यक्तिरेखा असून त्याला मराठी भाषेमध्ये नाताळबाबा असेदेखील म्हणतात. यांखेरीज, पाश्चिमात्य ख्रिश्चन संस्कृतीत असे मानले जाते की चांगली वागणूक अथवा सभ्य वर्तवणुक असलेल्या लहान मुलांना नाताळ सणाच्या आदल्या दिवशी सांताक्लॉज भेटवस्तू देऊन जातात.

विशेषतः सगळीकडेच या काल्पनिक सांताक्लाॅजचे चित्रण हे साधारणतः वृद्ध, पांढऱ्या दाढीची, बुटकी, लाल अंगरखा घातलेली, चष्मा लावलेली व्यक्ती असे केले जाते. शिवाय, लहान मुलांना भेटवस्तू देण्यासाठी या सांताक्लाॅजसोबत नानाविध भेटवस्तूंनी भरलेली एक मोठी पिशवीही असते. त्याचबरोबर, विशेष म्हणजे अमेरिका आणि कॅनडा या प्रगत  देशांत देखील ही व्यक्तिरेखा इसवी सनाच्या १९व्या शतकापासून लोकप्रिय आहे.

नाताळ दिवशी आपल्या देशातील प्रत्येक चर्चमध्ये सकाळची प्रार्थना होते. शिवाय, यादिवशी चर्चमध्ये लोकांची नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सगळे ख्रिश्चन लोक सहसा पुरुष, स्त्री, लहान मुले इत्यादी. नवीन कपडे परिधान करून खूप उत्साहात चर्चमध्ये येतात आणि येशूंकडे त्यांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करतात.

मित्रहो, आपल्या देशात ख्रिश्चन लोकांची संख्या ही अल्पसंख्याक असून त्यांची लोकसंख्या अवघी २.३% म्हणजेच १.२४ कोटी एवढीच आहे. तरीदेखील नाताळ सणादिवशी आपल्या देशात सर्वांना सार्वजनिक सुट्टी दिली जाते. यांखेरीज, नाताळच्या दिवशी अनेक भाविक उपवास करतात.

तथापि, अनेकजण नाताळ सणाच्या निमित्ताने वाईन, फळांनी बनवलेला विशेष नाताळ केक, भाजलेली टर्की, पुडिंग, चाॅकलेटचे नानाविध प्रकार, बिस्किटांचे प्रकार, उकडलेल्या बटाट्याचे पापड, अंड्यांच्या डिशेस अथवा विविध मांसाहारी पदार्थ इत्यादी. पदार्थांचे अगदी आवर्जून सेवन करतात.

                      तेजल तानाजी पाटील

                         बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या christmas essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ख्रिसमस नाताळ मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on christmas in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on christmas in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये christmas essay in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!