computer parts information in marathi संगणकाचे भाग व माहिती, कॉम्प्युटर हा सध्या आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे आणि आपण आपली महत्वाची कामे सहज आणि लवकर कॉम्प्युटरच्या मदतीने करू शकतो. सध्याच्या च्या मॉडर्ण म्हणजेच आधुनिक जगामध्ये संगणकाचा वापर हा अनेक क्षेत्रामध्ये केला जात आहे आणि संगणकाचा वापर शाळा, महाविद्यालय, हॉटेल, दुकान, घरी वापरला जातो आणि आता लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना संगणक कसा वापरायचा ते माहित आहे आणि सध्या संगणकाला अनन्य साधारण महत्व लाभले आहे.
परंतु लहानांच्या पासून मोठ्यांच्यापर्यंत संगणक कसा वापरायचा हे माहित असले तरी संगणकांच्या वेगवेगळ्या भागांच्या विषयी अनेकांना माहित नाही कि संगणक काय काम करतो, संगणकाचे कोणकोणते भाग आहेत तसेच संगणकाचा प्रत्येक भाग काय काम करतो या बद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत.
संगणकाचे भाग व माहिती – Computer Parts Information in Marathi
संगणक विषयी माहिती – parts of computer in marathi
संगणकाचे वेगवेगळे भाग काय आहेत ते पाहण्याच्या अगोदर आपण संगणक म्हणजे काय आणि त्या बद्दल माहिती जाणून घेवूया. कॉम्प्युटर मराठी मध्ये संगणक असे म्हणतात आणि संगणकाचा शोध इ.स १८२२ मध्ये चार्ल्स बॅबेज यांनी लावला आणि त्यांना संगणकाचे जनक म्हणून ओळखले जाते.
संगणक हे आपले काम खूप वेगामध्ये करू शकते तसेच एका वेळी अनेक कामे आपल्याला संगणकावर करता येतात, त्याचबरोबर आपण संगणकामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती साठवून ठेवू शकतो तसेच आपण संगणकामध्ये महत्वाच्या नोंदी देखील खूप मोठ्या काळासाठी जतन करून ठेवू शकतो अश्या प्रकारे आपण संगणकाचा वेगवेगळ्या कारणासाठी उपयोग करू शकतो.
संगणक म्हणजे काय ?
संगणक हे आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याचा पूर्वी उपयोग फक्त मोजण्याचे यंत्र म्हणून केले जायचे पण आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये याचा वेगवेगळ्या कामासाठी वापर केला जात आहे. संगणकामुळे कामाचा वेग वाढला तसेच कामामध्ये अचूकता मिळू लागली त्यामुळे लोक त्यावर अवलंबून राहू लागले.
संगणकाचे भाग – computer parts name in marathi
संगणकाचे मुख्य दोन भागामध्ये विभाजन केले आहे ते म्हणजे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर असे आहेत आणि सॉफ्टवेअर म्हणजे ज्या भागांना आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही आणि सॉफ्टवेयर हा एक प्रोग्रॅम असून हे संगणकाला कसे काम करायचे याबद्दल सूचना देते. तर हार्डवेअर म्हणजे असे संगणकाचे भाग जे आपण डोळ्याने पाहू शकतो तसेच स्पर्श देखील करू शकतो. चला तर आता आपण खाली संगणकाचे वेगवेगळे भाग कोणकोणते आहेत ते पाहूया.
संगणकाचे अंतर्गत आणि बाह्य भाग
संगणकाला चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी त्याचे अंतर्गत आणि बाह्य भाग आवश्यक असतात आणि खाली आपण संगणकाचे अंतर्गत आणि बाह्य कोणकोणते आहेत आणि ते कसे कार्य करतात ते पाहणार आहोत.
बाह्य भाग
संगणकाच्या या भागांना परीधीय घटक म्हणून देखील ओळखले जाते आणि हे संगणकाशी इनपुट आणि आऊटपुट प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी संगणकाला बाह्य रित्या जोडलेले असतात. उदा : सीपियू, मॉनीटर, कि बोर्ड, माऊस, प्रिंटर, आणि युपीयस इत्यादी.
- माऊस ( Mouse ) : माऊस हे संगणकाला जोडलेला एक भाग आहे आणि हे एक पकडले जाणारे पॉइंटिंग उपकरण आहे. माऊस हा भाग आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर कर्सर फिरवण्यास अनुमती देते त्याबरोबर आपण माऊसच्या आधारे स्क्रीनवरील पर्याय निवडू शकतो. माऊस हे उपकरण वायर्ड किंवा वायरलेस असू शकते.
- मॉनीटर ( monitor ) : मॉनीटर हे टी व्ही स्क्रीनसारखे दिसते आणि जे संगणकाच्या इतर उपकरणांच्या मार्फत व्युत्पन्न केलेली माहिती, दस्ताऐवज किंवा प्रतिमा प्रदर्शित करते.
- किबोर्ड ( keyboard ) : कीबोर्ड एक प्राथमिक इनपुट डिव्हाइस असल्यामुळे वापरकर्त्यांना संगणक किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये मजकूर इनपुट करण्यास अनुमती देते. कीबोर्डची रचना टाइपराइटर कीबोर्डवरून आली आहे आणि कीबोर्डवर अशा प्रकारे क्रमांक आणि अक्षरे व्यवस्थित आहेत ज्यामुळे आपल्याला जे करायचे आहे.
- पटकन टाइप करण्यास मदत करते. इलेक्ट्रिक टाइपराइटर प्रमाणेच कीबोर्ड अक्षरे, संख्या आणि चिन्हे तयार करण्यासाठी आणि अतिरिक्त कार्ये करण्यासाठी वापरल्या जाणार्या बटणावर बनलेला असतो त्याचबरोबर यामध्ये विंडोज आणि ऑल्ट की सारख्या विशेष की देखील कार्य करतात.
- सीपीयु ( CPU ) : सीपीयुला संगणकाचा मेंदू म्हटले जाते जो विविध प्रोग्रॅम्सच्या डिजिटल सूचनांच्यावर प्रक्रिया करतो आणि त्याची अंमलबजावणी करतो.
- कॅमेरा ( Camera ) : कॅमेरा हा व्हिज्युअल प्रतिमा काढण्यास मदत करतो आणि मग संगणकावर किंवा संगणकाद्वारे नेटवर्क डिव्हाईसवर प्रवाहित करतो.
- मेमरी कार्ड ( memory card ) : मेमरी कार्ड हा पोर्टेबल बाह्य स्टोरेज मिडीयाचा एक प्रकार आहे आणि याचा वापर मिडिया किंवा डेटा फाइल्स संचयित करण्यासाठी वापरला जातो.
- टचपॅड ( touchpad ) : टचपॅड हे बाह्य किंवा लॅपटॉपमध्ये अंगभूत डिस्प्ले स्क्रीनवर पॉइंटर नियंत्रित करण्यासाठी वापरला जातो आणि हे बाह्य माऊचा पर्याय आहे.
अंतर्गत भाग
- मदरबोर्ड ( mother board ) : मदरबोर्ड हा एक मुद्रित सर्किट बोर्ड आहे जो सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट ( CPU ) आणि इतर आवश्यक अंतर्गत हार्डवेअर धारण करतो आणि मध्यवर्ती हब म्हणून कार्य करतो आणि आणि ज्याद्वारे इतर सर्व हार्डवेअर काम करतात.
- हार्ड ड्राईव्ह ( hard drive ) : हार्ड डिस्क ड्राईव्ह हि भौतिक स्टोरेज उदाहरणे आहेत जी कायमस्वरूपी आणि तात्पुरती दोन्ही डेटा वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये संग्रहित करतात ज्यामध्ये ओएस, डिव्हाइस फाईल्स, प्रोग्राम्स आणि फोटो.
- रॅम ( RAM ) : रॅम हि एक तात्पुरती मेमरी स्टोरेज आहे जी माहिती प्रोग्राम्समध्ये त्वरित प्रवेशयोग्य बनवते. रॅमहि अस्थिर मेमरी आहे त्यामुळे संगणक बंद केल्यानंतर संग्रहित माहिती साफ केली जाते.
- ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट : ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट हे चीप आधारित उपकरण हे ग्राफिकल डेटावर प्रक्रिया करते आणि मुख्य सीपीयू ( CPU ) साठी विस्तार म्हणून कार्य करते.
- नेटवर्क इंटरफेस कार्ड : हे एक सर्किट बोर्ड आहे किंवा चीप आहे जे संगणकाला नेटवर्कशी कनेक्ट करण्यास सक्षम करते.
आम्ही दिलेल्या computer parts information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर संगणकाचे भाग व माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या computer parts name in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि parts of computer in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information of computer parts in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट