Dal Makhani Recipe in Marathi दाल मखनी रेसिपी मराठी डाळ मखनी हि एक भारतीय रेसिपी आहे. जी उत्तर भारत आणि पंजाब मध्ये मोठ्या प्रमाणात बनवली जाते तसेच भारताच्या इतर भागामध्ये देखील आवडीने बनवली जाते आणि हि रेसिपी आपण रोटी, पराठा किंवा नान सोबत खाल्ली जाते. त्याचबरोबर हॉटेल मध्ये देखील डाळ मखनी हा पदार्थ तितक्याच आवडीने ऑर्डर करून खाल्ला जातो. डाळ मखनी हि आपण घरामध्ये बनवू शकतो आणि हि घरामध्ये बनवताना आपण सर्वप्रथम उडीद आणि राजमा पाण्यामध्ये भिजत घालून ते थोडा वेळ भिजले कि कुकरमध्ये चांगले मऊ शिजवून घेतले जातात.
आणि मग आता मध्यम आचेवर पॅन ठेवून त्यामध्ये बटर घालून त्याला फोडणी देवून त्यामध्ये टोमॅटो प्युरी घालून ते सर्व मिश्रण एकत्र करून ते ५ मिनिटे शिजवले जाते आणि मग त्यामध्ये शिजवलेले उडीद, राजमा आणि थोडेसे दुध घालून तो मिक्स केला जातो आणि काही वेळासाठी शिजवला जातो.
डाळ मखनी हि रेसिपी स्वादिष्ट आणि पौष्टिक असल्यामुळे हि रेसिपी लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांच्यासाठी उत्तम आहे. डाळ मखनी हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच २५ ते ३० मिनिटामध्ये बनू शकते. चला तर मग आज आपण या लेखामध्ये डाळ मखनी रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.
दाल मखनी रेसिपी मराठी – Dal Makhani Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
पाककला | उत्तर भारतीय |
डाळ मखनी बनवताना सर्वप्रथम उडीद आणि राजमा पाण्यामध्ये भिजत घालून ते थोडा वेळ भिजले कि कुकरमध्ये चांगले मऊ शिजवून घेतले जातात आणि मग आता मध्यम आचेवर पॅन ठेवून त्यामध्ये बटर घालून त्याला फोडणी देवून त्यामध्ये टोमॅटो प्युरी घालून ते सर्व मिश्रण एकत्र करून ते ५ मिनिटे शिजवले जाते आणि मग त्यामध्ये शिजवलेले उडीद, राजमा आणि थोडेसे दुध घालून तो मिक्स केला जातो आणि काही वेळासाठी शिजवला जातो.
- नक्की वाचा: डाळ ढोकळी रेसिपी मराठी
- उडीद आणि राजमा : डाळ मखनी बनवण्यासाठी उडीद आणि राजमा हे महत्वाचे घटक आहेत. डाळ मखनी बनवण्यासाठी सर्वप्रथम उडीद आणि राजमा कुकर मध्ये शिजवले जातात आणि मग त्याला फोडणी दिली जाते.
- बटर : डाळ मखनी बनवण्यासाठी बटर देखील एक महत्वाचे साहित्य आहे कारण बटर घातल्यामुळे मखनीला एक वेगळीच चव येते.
- टोमॅटो प्युरी : डाळ मखनी मध्ये टोमॅटो प्युरी वापरली जाते ज्यामुळे रेसिपीला एक आंबट गोड चव येते तसेच टोमॅटो प्युरीमुळे मखनी खूप छान लागते.
डाळ मखनी रेसिपी – how to make dal makhani recipe in marathi
डाळ मखनी हि एक तिखट भाजीची रेसिपी आहे जी आपण काही चमचमीत खाण्याची इच्छा झाल्यानंतर बनवू शकतो आणि हि रेसिपी आपण रोटी, पराठा, नान सोबत खावू शकतो. डाळ मखनी हि उडीद आणि राजमा पासून बनवली जाते आणि हि रेसिपी रेस्टॉरंट सारखी घरामध्ये देखील बनवता येते कारण हि रेसिपी खूप सोपी आहे आणि २५ ते ३० मिनिटामध्ये बनते. चला तर मग पाहूयात डाळ मखनी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
पाककला | उत्तर भारतीय |
डाळ मखनी बनवण्यासाठी लागणारे बहुतेक साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असत नाही ते आपल्याला बाजारातून आणावे लागते. चला तर मग आता आपण डाळ मखनी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहणार आहोत.
- अर्धी वाटी उडीद ( साल न काढलेले ).
- अर्धी वाटीला निम्मे राजमा.
- ३ मध्यम आकाराचे टोमॅटो.
- ३ ते ४ चमचे बटर.
- २ चमचे आले लसून पेस्ट.
- १ मध्यम आकाराचा कांदा ( बारीक चिरलेला ).
- १/२ चमचा जिरे.
- १/२ चमचा हळद.
- २ चमचे लाल मिरची पावडर.
- दीड चमचा गरम मसाला.
- १ चमचा धणे पावडर.
- अर्धी वाटी दुध.
- १/२ चमचा कसुरी मेथी.
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- मीठ ( चवीनुसार ).
- बारीक चिरलेली कोथिंबीर.
डाळ मखनी हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनते. चला तर मग आता आपण वर दिलेले साहित्य वापरून डाळ मखनी कशी बनवायची ते पाहूयात.
- डाळ मखनी बनवताना सर्वप्रथम उडीद आणि राजमा स्वच्छ निवडून ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या आणि ते वेगवेगळे पाण्यामध्ये ५ ते ६ तास भजू द्या.
- ते चांगले भिजले कि राजमा आणि उडीद मधील पाणी काढून टाका आणि ते कुकर मध्ये घाला आणि मग त्यामध्ये राजमा आणि उडीद चांगले शिजतील इतपत पाणी घाला आणि कुकरचे झाकण लावून कुकर गॅसवर मोठ्या आचेवर ठेवून ते ४ ते ५ शिट्या देवून शिजवून घ्या. हे शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि कुकर गार होऊ द्या.
- आता दुसरीकडे टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या आणि मग त्याचे अर्धे भाग करून त्यामधील बी काढा आणि मग ते एका भांड्यामध्ये घाला आणि त्यामध्ये पाणी घाला आणि हे भांडे गॅसवर मध्यम आचेवर ठेवून या टोमॅटोंना २ चांगल्या उकळ्या आणा आणि मग गॅस बंद करा आणि त्यामधील टोमॅटो बाजूला काढून ते गार होऊ द्या गार झाली कि त्यावरील साल काढून टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पेस्ट करा आणि ती बाजूला ठेवा.
- आता कुकर गार झाला असेल तर कुकर उघडून पहा उडीद आणि राजमा चांगला शिजला आहे काय आणि त्याला थोडे रवीने गुसळून एकजीव करून घ्या.
- मग गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये बटर घाला. बटर चांगले वितळले कि त्यामध्ये जिरे टाका आणि जिरे फुलले कि त्यामध्ये आले लसून पेस्ट घालून ती काही सेकंदासाठी तेलामध्ये परता आता त्यामध्ये लगेच कांदा घाला आणि त्याला लालसर रंग येईपर्यंत भाजा आता त्यामध्ये हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि धने पावडर घाला आणि मग हे मिक्स करा.
- मग यामध्ये लगेच आपण बनवून ठेवलेली टोमॅटो पेस्ट घालायची आणि ती मिक्स करून ५ मिनिटे शिजवायची.
- आता यामध्ये शिजवलेला उडीद आणि राजमा घालायचा मग यामध्ये चवीनुसार मीठ, कसुरी मेथी घालायची हे मिश्रण चांगले एकजीव करायचे आणि त्याला झाकण लावून ५ मिनिटे शिजवायचे. ( टीप : शिजवताना डाळ खाली लागू नये याची काळजी घ्यायची ).
- ५ मिनिटांनी त्यावरील झाकण काढून त्यामध्ये अर्धी वाती दुध घालायचे आणि ते मिक्स करून हि रेसिपी परत ५ ते ६ मिनिटे शिजवावी आणि मग गॅस बंद करावा.
- सर्व्ह करते वेळी त्यावर थोडेसे बटर आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
डाळ मखनी कशी सर्व्ह केली जाते – serving suggestion
- डाळ मखनी रेसिपी आपण पराठा, रोटी, नान, चपाती किंवा जीरा राईस सोबत खावू शकतो.
आम्ही दिलेल्या dal makhani recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर दाल मखनी रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या punjabi dal makhani recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि recipe of dal makhani in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये masoor dal makhani recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट