उपजिल्हाधिकारी माहिती Deputy Collector Information in Marathi

Deputy Collector Information in Marathi उपजिल्हाधिकारी माहिती उपजिल्हाधिकारी हे राज्य सेवेतील सर्वोच्च आणि प्रतिष्ठेतेचे पद आहे. वर्ग एक मध्ये उपजिल्हाधिकारी या पदाचा समावेश होतो. या पदापर्यंत दोन पध्दतीने पोहचता येते. ते म्हणजे एक राज्यसेवा मार्फत परीक्षा देऊन आणि दुसरे म्हणजे बढतीने. उपजिल्हाधिकारी पदाचे एक वैशिष्ट हे की, १५ ते २० वर्षे सेवा केल्यावर काही महत्तपुर्ण निकष पूर्ण केले तर भारतीय प्रशासकीय सेवेत (आय ए एस) सेवा करण्याची संधी मिळते. उपजिल्हाधिकारीना सहसा डीसी म्हणूनच संबोधले जाते.

उपजिल्हाधिकाऱ्यांची निवड ही त्या त्या राज्यांच्या लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षामार्फत घेतली जाते. महाराष्ट्रात एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे अधिकाऱ्यांची निवड होते. एमपीएससी हे राज्य सरकारच्या आवश्यकतेनुसार अधिकाऱ्यांची शिफारस केली जाते. तसेच उपजिल्हाधिकारी हे पद राज्यसेवेतील सर्वोच्च पद असून आजही या पदाबद्दल सर्व परिक्षार्थींना प्रचंड आकर्षण आहे.

deputy collector information in marathi
deputy collector information in marathi

उपजिल्हाधिकारी माहिती – Deputy Collector Information in Marathi

मार्गातील अडथळे

आयएएसचे पद मिळणे हे जरी आकर्षक असले तरी हे पद किती वर्षांत मिळेल हे निश्चित नसते. यूपीएससी कडून उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती ही जशी विशिष्ट कालक्रमाने होत जाते तसे एमपीएससी कडून उत्तीर्ण झालेल्या अधिकारीचे होत नाही. राज्यामध्ये जेव्हढी आयएएस ची पदे उपलब्ध असतील, त्यांचे दोन वाटे केले जातात.

पहिला वाटा हा राज्यसेवा परीक्षा देऊन आलेले इच्छुक यांना दिला जातो तर दुसरा वाटा जे यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना जे थेट राज्य केडर मिळवून दाखल होतात त्यांना दिला जातो. पहिला वाटा जो असतो त्याला गट अ व गट ब या दोन्ही सेवांना देण्याची संधी प्राप्त होते.

साधारणपणे दोन तृतीयांश पदे ‘गट अ’ व उरलेली एक तृतीयांश पदे ‘गट ब’ मधून भरली जातात. यूपीएससी मधून उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना जर आयएएसमध्ये बढती द्यायची असेल तर त्यांची शिफारस ही राज्य सरकार करते. त्यांची शिफारस करण्यापूर्वी अधिकाऱ्यांचा सेवेचा पूर्वेइतिहास बघितला जातो.

ज्यांची कामगिरी समाधानकारक आहे त्यांची एक वेगळी यादी तयार केली जाते. त्यानंतर या यादीतील अधिकाऱ्यांची लेखी परीक्षा घेतली जाते व शेवटी मुलाखत घेतली जाते. त्यानंतर शिफारसीची अंतिम यादी बनवून ती यूपीएससी कडे सोपवण्यात येते. सगळ्यांना आयएएस हे पद मिळेलच असे नाही. म्हणूनच प्रत्येक उपजिल्हाधिकारी हा आयएएस या पदांच्या दर्जाचा असतो.

उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्यामधील फरक?

उपजिल्हाधिकारी हा एक संवर्ग म्हणजे केडर असून या संवर्गातील अधिकारी यांना कार्य आणि जबाबदाऱ्यांवर त्यांची एखाद्या पदावर नेमणूक केली जाते. महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागात त्यांची नेमणूक होऊ शकते. उपजिल्हाधिकारीचा मूळ विभाग हा महसूल विभाग आहे.

उपजिल्हाधिकारीची नेमणूक जेव्हा मूळ विभागात म्हणजेच महसूल विभागात क्षेत्रीय स्तरावर केली जाते तेव्हा त्या जबाबदारी नुसार त्या पदांचे नाव बदलते पण संवर्ग मात्र एकच असतो.

उपजिल्हाधिकारीची नेमणूक जेव्हा उपविभाग म्हणजेच प्रांत (प्रशासकीय दृष्ट्या निर्माण केलेले क्षेत्र) चा प्रमुख म्हणून होतो तेव्हा त्या पदांचे नाव बदलून प्रांताधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी म्हणून केला जातो. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार उपजिल्हाधिकारीला कायदेशीर स्वरूप आणि अधिकार प्राप्त होतात.

याखेरीज द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 नुसार या कायद्याच्या अंतर्गत उपविभागीय दंडाधिकारी यांची तरतूद आहे. परंपरेने उपजिल्हाधिकारी या पदाला पश्चिम महाराष्ट्रात ‘प्रांताधिकारी’ असे म्हणतात तर इतर भागात उपविभागीय अधिकारी किंवा एसडीओ म्हणतात. उपविभाग किंवा प्रांत ही महसूल कायद्याअंतर्गत एकच संकल्पना आहे.

उपजिल्हाधिकारीचे नियुक्ती, कार्य आणि जबाबदाऱ्या

उपविभागीय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी हा काम करत असतो. उपजिल्हाधिकारी हे महसूल विभागीय अधिकारी (आरडीओ) म्हणूनही कार्य करतात. तसेच कार्य करतांना त्या उपविभागात शांतता व सुव्यवस्था राखणे, महसुली वसुलीचा आढावा घेणे तसेच निर्वाचन अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.

या सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. उपजिल्हाधिकारी हा त्या उपविभागाचा प्रशासक किंवा सेनापती असतो. उपजिल्हाधिकारीची एकूण पंधरा प्रमुख पदांवर नेमणूक केली जाऊ शकते. तसेच निवासी जिल्हाधिकारी म्हणूनही नेमला जाऊ शकतो.

उपजिल्हाधिकाऱ्यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणूनही अधिकार दिलेले असल्याने, या पदाला उपविभागीय दंडाधिकारी असेही संबोधित केले जाते आणि ते जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार काम करतात तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजातही मदत करतात. याशिवाय उपजिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती ही एमआयडीसी, म्हाडा, सिडको इत्यादी अशा विविध महामंडळावर होते.

उपजिल्हाधिकारीला कामे करताना सर्व खाती, जिल्हाधिकारी व तहसीलदार केंद्र तसेच राज्यांचे विभाग यांच्यात समन्वय साधण्याची खूप मोठी कसरत त्यांना करावी लागते. याशिवाय मोर्चाला सामोरे जाऊन तेथील परिस्थिती सांभाळणे, दंगल नियंत्रण, पूर दुष्काळ, साथीचे रोग इत्यादी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करणे, शिष्टमंडळांना भेटणे, जिल्हाधिकाऱ्याच्या अनुपस्थितीत जिल्हा प्रशासनात शांतता, सुसूत्रता व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारीही उपजिल्हाधिकारीवर असते.

निवडणूक व्यवस्थापन करणे, पुनर्वसन विषयक कामाचे संनियंत्रण करणे, विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी करणे, तसेच ठरलेली उद्दिष्टे पूर्ण करणे आणि त्यासंबंधीचे अहवाल तयार करणे, विविध प्रमाणपत्र किंवा दाखले देणे याचबरोबर महत्त्वाच्या व्यक्तीच्या दौऱ्यात राज शिष्टचार अधिकारी म्हणून काम पाहणे या जबाबदाऱ्या व सर्व कामकाज पार पाडाव्या लागतात. यातून असे दिसते की, उपजिल्हाधिकाऱ्याचे काम हे वैविध्यपूर्ण असते.

उप विभागीय अधिकारी म्हणूनही उपजिल्हाधिकारी काम पाहतो. (उप विभाग हा जिल्ह्यातील काही तहसिल मिळून बनलेला विभाग असतो) उप विभागीय अधिकारी पदावर असतांना उपजिल्हाधिकारीचे कामाचे स्वरूप

 • ​जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासन यातील दुवा म्हणून उपजिल्हाधिकारी काम पाहतो.
 • ​​शासकीय वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे, बिनशेती प्रकरणात चौकशी करून अहवाल देणे तसेच गोदामाची पाहणी करणे.
 • ​​जमीनविषयक दाव्यांवर तहसिलदाराच्या निर्णयांवर अपिलीय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारीनी निर्णय देणे.
 • ​​बॉम्बे पोलीस कायद्यानुसार तडीपारीचे आदेश देणे, वृक्षतोड अधिनियमानुसार वृक्षतोडीस परवानगी देणे किंवा नाकारणे हे उपजिल्हाधिकारीच्या हातात असते.
 • ​​मनरेगा कामांची पाहणी करणे, जलयुक्तशिवार उप विभाग समिती अध्यक्ष, जिल्हा भूजल प्राधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी हा काम पाहतो. किंवा
 • जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपजिल्हाधिकारीचे विविध पदांवरील कामाचे स्वरूप हे वेगवेगळे असतात.
 1. निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर असतांना जिल्हाधिकारीप्रती अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम करणे. जिल्हाधिकाऱ्यांना मदत करणे शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थित काम पाहणे.
 2. जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून जिल्ह्यातील सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीही उपजिल्हाधिकारीची असते.
 3. भूसंपादन व पुनर्वसन अधिकारी म्हणून काम करतांना जमीनीचे संपादन करणे तसेच मोबदला वितरण करणे आणि प्रकल्पाकरीता जमीन दिलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करणे
 4. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मतदार नोंदणी, मतदार याद्या व मतदार ओळखपत्र तयार करणे इत्यादी विषयक कामे पाहणे. याचबरोबर लोकसभा आणि विधानसभा यांची निवडणूक ही निवडणूकीच्या वेळेपत्रकानुसार पार पाडणे. अ
 5. शा विविध स्वरूपात उपजिल्हाधिकारीचे कार्य आणि जबाबदारी असते. या जबाबदाऱ्या सांभाळताना उपजिल्हाधिकारीचे प्रशासन कौशल्य आणि सावधानता यांचा खूप मोठा कस लागतो.

उपजिल्हाधिकारी या पदांवरील फायदे

मोठी प्रशासकीय यंत्रणा उपजिल्हाधिकारीच्या अधिपत्याखाली असल्याने मोठा दरारा असतो. तसेच लोकसेवेची मोठी संधी प्राप्त होते व त्यातून मोठी सामाजिक प्रतिष्ठाही प्राप्त करण्याची संधी मिळते. पदोन्नतीने अखिल भारतीय सेवेतील पदांवर जाण्याची संधी उपजिल्हाधिकारीला मिळत असते. शासकीय निवासस्थान, शासकीय वाहन, हाताखाली नोकरवर्ग इत्यादी हे सर्व उपजिल्हाधिकारीला प्राप्त होतात.

आम्ही दिलेल्या deputy collector information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर उपजिल्हाधिकारी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या deputy collector in maharashtra या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about deputy collector in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये deputy collector house in maharashtra Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!