डॉक्टर बापूजी साळुंखे यांची माहिती Dr Bapuji Salunkhe Biography in Marathi

Dr Bapuji Salunkhe Biography in Marathi – Dr Bapuji Salunkhe Information in Marathi डॉक्टर बापूजी साळुंखे यांची माहिती गोविंदराव ज्ञानोजीराव साळुंखे ऊर्फ बापूजी साळुंखे. हे महाराष्ट्रातील शिक्षणमहर्षी होते. बापूजी साळुंखे यांनी अनेक लोकांचे जीवन घडवले आहे. बापूजी साळुंखे एक थोर दूरदर्शी शिक्षणतज्ञ होते ज्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. ही शिक्षण संस्था महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जवळपास दोन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या लेखामध्ये बापूजी साळुंखे यांचा जीवन परिचय जाणून घेणार आहोत.

dr bapuji salunkhe biography in marathi
dr bapuji salunkhe biography in marathi

डॉक्टर बापूजी साळुंखे यांची माहिती – Dr Bapuji Salunkhe Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)बापूजी साळुंखे
जन्म (Birthday)९ जून १९१९
जन्म गाव (Birth Place)सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील रामपुरी या गावांमध्ये
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)महाराष्ट्रातील शिक्षणमहर्षी
मृत्यू (Identity)८ ऑगस्ट १९८७

Dr Bapuji Salunkhe Information in Marathi

जन्म व वैयक्तिक आयुष्य

संपूर्ण महाराष्ट्रात बापूजी साळुंखे या नावाने परिचित असून त्यांचे मूळ नाव गोविंदराव ज्ञानोजीराव साळुंखे आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील रामपुरी या गावांमध्ये बापूजी साळुंखे यांचा जन्म ९ जून १९१९ रोजी झाला. अगदी कोवळ्या वयामध्ये बापूजींच मातृसुख हरवलं आणि बापूजी जवळपास बारा वर्षाचे असताना त्यांचे वडील मरण पावले. बालपणातच बापूजींच्या आयुष्यातून मातृसुख आणि पितृ सुख कायमच हरवलं. बापूजी साळुंखे यांच शिक्षण प्रतिकूल परिस्थितीत झालं.

रामपूर येथून बापूजी साळुंखे यांच्या प्राथमिक शिक्षणास सुरुवात झाली. पुढे मॅट्रिकच शिक्षण त्यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथून पूर्ण केल. आणि उच्च शिक्षणासाठी कोल्हापूर येथे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग मध्ये दाखला नोंदवला. १९४५ मध्ये बापूजींनी बी.ए ची पदवी संपादन केली. १९४९ मध्ये बापूजींनी बी.टी ही पदवी संपादन केली. बापूजींना संस्कृत आणि मराठी भाषेमध्ये रस होता सोबतच गणित हा देखील त्यांचा आवडता विषय होता. बापूजी साळुंखे यांचा विवाह बेळगाव येथील नानासाहेब पाटील यांची कन्या सुशीला यांच्यासह २५ डिसेंबर १९४० रोजी पार पडला. या दाम्पत्यांना आज तीन मुलगे व एक मुलगी आहे.

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे

शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांचे जीवन आणि कार्य महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील सुवर्णकाळ ओळखला जातो. बापूजी साळुंखे यांच्या जीवनावर महात्मा गांधी यांचा प्रचंड प्रभाव होता आणि म्हणूनच नातेवाईक व मित्रपरिवार त्यांना बापूजी म्हणू लागले आणि पुढे संपूर्ण महाराष्ट्रात यांची बापूजी अशी ओळख निर्माण झाली. बापूजी यांचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीमध्ये पार पडलं काही मित्रांच्या सहकार्याने त्यांनी शिक्षण घेतलं होतं तिच्यासोबत बापूजींनी श्रीराम समाज सेवा मंडळाची स्थापना केली.

या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी १५ प्राथमिक शाळा व गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले. अप्पासाहेब पवार यांनी विद्यार्थीदशेत असलेल्या बापूजी साळुंखे यांच्यावर म्हैसूर राज्यातील संस्थान अंतर्गत सोंडूर संस्थांच्या इतिहास संशोधनाची जबाबदारी सोपवली होती. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक कारकीर्दीची सुरुवात १९४० मध्ये सुरू झाली तेव्हा त्यांची सोंडूर संस्थानात राजगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यासोबतच त्यांनी सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून सेवा दिली.

बापूजी साळुंखे यांच महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील चलेजाव या चळवळीत देखील सहभाग होता. सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीतही त्यांनी भाग घेतला होता. पुढे सातारा जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात सन १९७० च्या मध्ये बापूजींनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मरणार्थ एक लाख रुपये निधी गोळा करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

सोबतच बापूजींनी कर्मवीर भाऊराव पाटील पायगौंडा यांच्या रयत शिक्षण संस्थेत अध्यापक आणि मुख्याध्यापक म्हणून सेवा दिली होती. जवळपास बापूजींनी रयत शिक्षण संस्थेत १९४५ ते १९५५ असं संपूर्ण दशक सेवा दिली होती. सातारा जिल्ह्याच्या क्रांती वर बापूजी साळुंखे यांनी स्वातंत्र्यसैनिकांची एक छोटीशी कथा देखील दिली आहे. १९ ऑक्टोंबर १९५४ रोजी कराड येथे मुरलीधर मंदिरात आपल्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत नवी शिक्षण संस्थेची पायाभरणी झाली.

नोव्हेंबर १९४५ मध्ये संस्थेचे पहिले अध्यक्ष स्वामी रामानंद भारती यांच्या सांगण्यावरून प्रस्तावित शैक्षणिक संस्थेला श्री स्वामी विवेकानंद यांचे नाव देण्यात आले. श्री स्वामी विवेकानंद संस्थेची ३१ डिसेंबर १९४५ रोजी रितसर नोंदणी करण्यात आली आणि ५ जून १९५५ रोजी या संस्थेचं बांधकाम सुरू झालं. पुढे बापूजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात पसरवली कोल्हापूर, तासगाव, चाफळ, तरळे आणि उंडाळे येथे माध्यमिक शाळांची स्थापना केली. कराड येथे महिलांसाठी प्रशिक्षण महाविद्यालय सुरू केली.

कोल्हापूर आणि चाफळ येथे वसतिगृहे सुरु करण्यात आली. ही तर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची फक्त सुरूवात होती ही संस्था लवकरच महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये विस्तारित गेली. या संस्थेमध्ये सर्वाधिक ३१६० शिक्षक व १२२१ कार्यालयीन कर्मचारी आहेत. या संस्थेच्या मालकीच्या १७६ इमारती आहेत. सोबतच मुख्य कार्यालयाच्या बांधकामा सोबत ७० नवीन इमारती बांधल्या गेल्या आहेत. या संस्थेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पतसंस्था देखील स्थापन केली आहे.

शिक्षणाचा प्रसार, ज्ञान, विज्ञान आणि अंकुर वाढविण्याच्या दृष्टिकोनातून ही संस्था उभारण्यात आली आहे. बापूजींच्या मते ज्ञान म्हणजे सत्य, चारित्र्य, अखंडता, शोषक प्रवृत्ती नष्ट करणे, सेवा आणि समर्पण होय. चांगुलपणा हा ईश्वराचा गुणधर्म मानला जातो आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये चांगले चारित्र्य घडविणे यावर भर दिलं गेलं पाहिजे अशी बापुजींची खात्री होती आणि म्हणूनच संस्थेची प्रार्थना हरे राम हरे कृष्ण ही बापुजी ने स्वतः रचलेली आहे. बापूजी साळुंखे यांच्या आयुष्यातील ही सर्वात महत्त्वाची संस्था होती. बापूजींनी आपले संपूर्ण आयुष्य श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कार्यासाठी समर्पित केलं होतं.

बापूजींनी आपली वारस हक्कातील मालमत्ता या संस्थेच्या विकासासाठी दान केली. वेळोवेळी बापूजी साळुंखे यांनी या संस्थेला मोठ्या प्रमाणात निधी देखील पुरवला आहे. सन १९७३ रोजी बापूजी साळुंखे यांना रुपये एक लाख ३७ हजार अशी गुरुदक्षिणा मिळाली होती. ही गुरुदक्षिणा त्यांनी संस्थेच्या खर्चासाठी दिली.

बापूजी साळुंखे यांनी त्यांच्या या शिक्षण संस्थेमधून महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमध्ये आणि कर्नाटकातील एका जिल्ह्यामध्ये अशा एकूण १९ जिल्ह्यांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये, दुर्गम भागांमध्ये, आदिवासी आणि मागासलेल्या मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवल्या. त्यांनी केलेला ज्ञानप्रसार यामुळे त्यांना शिक्षणमहर्षी ही पदवी देण्यात आली आहे. या शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्राच्या माध्यमातून १७० माध्यमिक विद्यालय, सहाशे कनिष्ठ महाविद्यालय, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आठ प्रशिक्षण महाविद्यालय, ३ बि. एड कॉलेज, १ विधी महाविद्यालय, एक निवासी आश्रम शाळा आणि १९ वसतिगृहे अशी सुमारे तीनशे तीन शाखा आहेत.

या शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय कोल्हापूर येथे आहे. आणि यापैकी बहुतांश प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण, मागास, डोंगराळ दुष्काळग्रस्त आणि दुर्गम भागात वसलेली आहेत. या संस्थेच्या विविध केंद्रांमध्ये जवळपास दोन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसारक हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.

पुरस्कार

डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्य शिक्षणाचा प्रसार करण्यात समर्पित केलं. समाजातील दीनदलित आणि गरीब समाजासाठी केलेल्या महान सेवेबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना “दलित मित्र” ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर तर्फे त्यांना डि.लीट ही पदवी प्रदान करण्यात आली. बापूजी साळुंखे यांनी भारतातील व महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रगण्य कार्य केलं आहे. आणि त्यासाठी लोकांनी त्यांना शिक्षणमहर्षी ही पदवी दिली.

स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृतीचे आदर्श आहेत. ते सत्य, चारित्र्य, गौरव, त्याग, भक्ती, उदारता, अपेक्षा आणि कठोर परिश्रम यांचे प्रतिनिधी आहेत. आणि ही शिक्षण संस्था महान संत श्री स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वज्ञानाचा आणि शिकवणीचा आदर करत काम करते. त्यामुळे शिक्षण संस्था त्यांच्या नावावर उभारली गेली आहे.

मृत्यू

बापूजी साळुंखे यांचे ८ ऑगस्ट १९८७ रोजी कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले.

आम्ही दिलेल्या dr bapuji salunkhe biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डॉक्टर बापूजी साळुंखे यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dr bapuji salunkhe information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of dr bapuji salunkhe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!