स्वामी विवेकानंद माहिती Swami Vivekananda Information in Marathi

Swami Vivekananda Information in Marathi स्वामी विवेकानंद माहिती मराठी मध्ये म्हटले की डोळ्यासमोर येतो तो भारत-भ्रमण, तो त्याग, धर्मावर असलेली भावना, बंधू-भगिनींची शिकवण. Swami Vivekananda in Marathi स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ दत्त. स्वामी विवेकानंद यांचा जन्म व कलकत्त्यातील सिपलापल्लि येथे 12 जानेवारी 1863 ला सोमवारी सकाळी झाला. आपले देखणे भारदस्त व्यक्तिमत्त्व व अलौकिक बुद्धिमत्ता, अमोद वकृत्व, कुशल संघटन इत्यादी गुणांमुळे जगात महानायक म्हणून भूमिका स्वीकारली. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कलकत्ता उच्च न्यायालयात वकील होते.

swami vivekananda information in marathi
swami vivekananda information in marathi / swami vivekananda in marathi

स्वामी विवेकानंद माहिती – Swami Vivekananda Information in Marathi

नाव (Name)नरेंद्रनाथ दत्त
जन्म (Birthday)12 जानेवारी 1863
जन्मस्थान (Birthplace)कलकत्त्यातील सिपलापल्लि
वडील (Father Name)विश्वनाथ दत्त
आई (Mother Name)भुवनेश्वरी देवी
मृत्यू (Death)04 जूलै 1902
लोकांनी दिलेली पदवीस्वामी विवेकानंद

ते स्वतः सामाजिक आणि धार्मिक संदर्भात पुरोगामी विचारांचे आणि उदार दयाळू स्वभावाचे होते.

त्यांची माता भुवनेश्वरी देवी ही सुध्दा अत्यंत धार्मिक मनोवृत्तीची होती. नरेंद्रनाथांच्या विचारसरणीला वळण आणि संस्कार देण्यात या पालकांचा सहभाग होता. नरेंद्रनाथांच्या मातोश्री भुवनेश्वरी देवी या उदात्त वृत्तीच्या गृहिणी होत्या. स्वामी विवेकानंद म्हणतात माझ्या बौद्धिक विकाससाठी मी माझ्या आईचा ऋणी आहे.

बालपण

एकदा शाळेत असताना नरेंद्रनाथ त्यांचा काहीही दोष नसताना शिक्षा झाली होती. भूगोलाच्या शिक्षकांनी त्यांना एक प्रश्न विचारला होता. नरेंद्र यांनी त्याचे उत्तर बरोबर दिले होते, परंतु शिक्षकाला ते उत्तर चुकीचे वाटले होते.म्हणून शिक्षकांनी नरेंद्रला शिक्षा केली. नरेंद्र बालक असूनही खंबीर होते. ते शिक्षकांना म्हणाले, सर माझी काही चूक नाही. माझी खात्री आहे की माझं उत्तर बरोबर आहे. या बोलण्याने शिक्षक संतापले आणि नरेंद्र यांना छडीचा मार खावा लागला. नरेंद्र घरी आले त्यांचे डोळे पाण्याने डबडबले होते. त्यांनी आईला घडलेले सगळे काही सांगितले.

आईने जवळ घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि म्हणाली,बाळ तुझं बरोबर असताना तू का परवा करतोस? हे बघ काही झालं तरी खऱ्याची कास कधी सोडायची नाही. स्वामीजींच्या प्रत्येक कृतीत जो सत्यासाठी आग्रह दिसून येतो, त्याचे मूळ त्याच्या आईच्या आणि अध्यात्मिक गुरुच्या सत्यप्रती असलेल्या निष्ठेत सामावलेले आहे. पुढे जगाला देखील त्यांनी सांगितले ते म्हणाले होते” सत्यासाठी सर्वस्वाचा त्याग करता येत असतो पण सर्वस्व साठी सत्याला त्यागता येत नसतं”.

शिक्षण         

नरेंद्रनाथाला शास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत कमालीची रुची होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता इत्यादी धार्मिक साहित्य वाचण्यास आणि चिंतनात त्यांना विषेश गोडी होती. शिवाय शास्त्रीय संगीताची देखील त्यांना उत्तम जाण होती. बालपणापासूनच या विविध छंदा बरोबरच व्यायाम आणि क्रिडा खेळ या उपक्रमांमध्ये ते सक्रिय सहभाग घेत होते.

संस्कृत ही त्यांची आवडती भाषा होती. याशिवाय बंगाली, फ्रेंच, इंग्रजी, उर्दू-हिंदी इत्यादी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.गोव्यातील सेमिनारी हे धर्म विज्ञानाचा केंद्र होतं. तेथील लॅटिन भाषेतील अत्यंत दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखिते तीन दिवसात अहोरात्र जागून वाचून काढले होते.कोणतीही गोष्ट विवेक बुद्धीने आणि व्यवहारवादी दृष्टीकोनाने स्वीकारीत असत.

स्वामी विवेकानंद अतिशय हुशार व एकपाठी होते. आठवी ते दहावी तीन वर्षाचा अभ्यास त्यांनी काही महिन्यात करून प्रथम वर्गात उत्तीर्ण होते. नरेंद्रनाथांनी इसवीसन 1871 साली आपल्या घरच्या शिक्षणानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. पुढे 1879 मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजमधून परीक्षा उत्तीर्ण झाले.

या संस्थेत काही कार्य राहिल्यानंतर त्यांनी जनरल असेंबली इन्स्टिट्यूटमधून प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि युरोपीय इतिहास यांचे अध्ययन केले. 1891 साली ते फाइन ऑटोची आणि 1884 मध्ये बी ए ची परीक्षा उत्तीर्ण झाले. या काळामध्ये नरेंद्रनाथांनी डेव्हिड ह्यूमन, गोजी लेब, जॉर्ज हेगल, ऑगस्ट कोमू, जॉनस्टुअर्ड आणि चार्लस डार्विन इत्यादी विचार विचारांचा अभ्यास केला.

स्वामीजी धर्म प्रचार आणि प्रसारासाठी मेरड मध्ये गेले होते. स्वामीजींना पुस्तके वाचण्याचे खूप वेड होते.त्यांचा सगळा वेळ वाचनात जात असे. मेरठ मध्ये असताना स्वामी विवेकानंदांच्या सांगण्याप्रमाणे स्वामी अखंडानंद रोज तिथल्या वाचनालयात जात असत आणि सर जॉन ल्यूबॉक्स वर्क्सचा एक खंड रोज आनत आणि स्वामीजींचा वाचून झाला की दुसऱ्या दिवशी परत करीत.

स्वामीजी खंड वाचत नसावेत असा संशय वाचनालयाच्या ग्रंथपालाला झाला. इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी ते रोज पुस्तक नेत असावेत असे ग्रंथपालाला वाटले.स्वामी अखंडानंद ग्रंथ परत करण्यासाठी आले असता ग्रंथपालाने ही शंका त्यांच्याजवळ व्यक्त केली. स्वामी अखंडानंदानी ग्रंथपाल यांची शंका स्वामीजींना सांगितली.

मग स्वामीजी जातीने वाचनालयात गेले आणि ग्रंथपालाला नम्रपणे म्हणाले, सर मी पुस्तक जागरुकतेने वाचीत असतो.माझ्या वाचनासंबंधी आपणास जर शंका असेल तर आपण हवी ती गोष्ट त्या पुस्तकांमधून मला विचारू शकता. त्यानंतर ग्रंथपालाने स्वामीजींना अनेक प्रश्न विचारले आणि स्वामीजींनी प्रत्येक प्रश्नाला योग्य आणि नेमके उत्तर दिले.

ग्रंथपालाने स्वामीजींना प्रत्येक उताऱ्यावरील प्रश्न विचारले. त्याचे स्वामीजींनी अचूक उत्तरे दिली. तसेच तो उतार कोणत्या पानावर आहे, किती नंबर पानावर आहे हे सुद्धा अगदी अचूक पणे सांगितले. त्यामुळे ग्रंथपाल खजील झाले. त्यांना आपली चूक समजली आणि त्यांनी स्वामीजींचे पाय धरून माफी मागितली. ग्रंथपाल स्वामीजींना म्हणाले, तुमच्या या स्मरणशक्ती चे रहस्य काय? त्यावर  क्षणाचाही विलंब न करता स्वामीजी म्हणाले, या स्मरणशक्तीचे रहस्य आहे, ‘मनाची एकाग्रता’ आणि ‘इंद्रियावर नियंत्रण’.

11 सप्टेंबर 1993 शिकागोच आर्ट इन्स्टिट्यूट त्यात जगातील सर्व धर्माचे मोठमोठे पंडित आपल्या व्याख्यानेचे टिप्पण काढलेले कागद हातात घेऊन आले होते. त्यात एक तीस वर्षाचा बैरागी त्याच्या हातात काहीच नव्हतं तो उठून व्यासपीठावर आला. सदृढ शरीर, तेजस्वी नजर,  मनोहर रूप अशा पुरुषाकडे श्रोते बघतच राहिले.

स्वामीजींनी सुरुवात केली, “सिस्टर अंड ब्रदरस ऑफ अमेरिका” हे ऐकून सर्व श्रोते उठून उभे राहिले.पाच मिनिटे टाळ्यांचा कडकडात चालू राहिला. त्यानंतर त्या धर्मपरिषदेत लोकांच्या आग्रहाखातर स्वामीजींची आठवडाभर व्याख्याने झाली. अनेक जणांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. अमेरिकेतील वृत्तपत्रात त्यांच्यावर प्रशसेची पुष्पवृष्टी होत होती.

अमेरिकेतील शिकागो शहरात आयोजित केलेल्या सर्वधर्म परिषदेमध्ये 11 सप्टेंबर 1893 साली स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.त्यांनी सतत चार वर्षे अमेरिका व युरोप मध्ये भारतीय संस्कृती व वेदांताचा प्रचार प्रसार करून अखिल जगतात भारत मातेला गौरवाचे स्थान प्राप्त करून दिले. 1897 साली भारतात परतल्यानंतर भारताची भौतिक व अध्यात्मिक क्षेत्रातील दयनीय अवस्था पाहून त्यांचे प्रेमळ हृदय कळवळले.

मातृभूमीच्या तसेच संपूर्ण जगतातील मानवजातीच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी 1898 मध्ये आपले परमपूज्य गुरुदेव भगवान श्री रामकृष्ण परमहंस यांच्या नावाने “रामकृष्ण मठ”“रामकृष्ण मिशन” या सन्यासी संघाची कोलकत्ता शहराजवळील बेलूर गावात स्थापना केली. “आत्मनो मोक्षार्थ जगदीताय च” म्हणजेच स्वतःच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी आणि जगाच्या कल्याणासाठी हे ध्येयवाक्य त्यांनी संघापुढे ठेवले.

या ध्येयानुसार आज जगभर रामकृष्ण मठ आणि मिशनच्या 180 शाखा सामाजिक शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्रात रामकृष्ण संघाच्या चार अधिकृत शाखा नागपुर, मुंबई, औरंगाबाद व पुणे येथे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. मानवाची सेवा हीच त्याच्या मधील ईश्वराची पूजा होय हीच एक प्रेरणा रामकृष्ण संघाच्या सर्व शाखांमधून चालणाऱ्या लोकोपयोगी कार्यामागे आहे.

अमेरिकेत दौरे सुरू असतानाच त्यांनी आपल्या गुरुची समाधी बंगालमध्ये बांधायचं ठरवलं. त्यासाठी व्याख्याने देऊन पैसे जमा करायचं ठरवलं.पायाचं दुखणं, रक्तदाब, मधुमेह, निद्रानाश आणि जीवघेणी थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी चार महिन्यात 66 भाषणे आयोजित केली.

स्वामी विवेकानंद विचार

स्वामी विवेकानंद हे महापुरुष होते, ऋषि होते की साक्षात भगवान शंकर होते हे सांगणे जरी कठीण असले तरी ते मानव जातीचे खरे मित्र होते. भारताचे सच्चे सुपुत्र होते. हे मात्र सांगता येईल. भारतावर हृदयापासून प्रेम करणारा, मानवाचे दुःख बघून व्यतीत होणारा, मानवजातीच्या उद्धारासाठी प्राणार्पण करणारा आणि भारताच्या अध्यात्मिक संपदेचा जगाला परिचय करून देऊन भारतमातेचा गौरव वाढविणारा एक मात्र वीर म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद हे चिरतरुण होते. त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीला अतिशय प्रेरणादायी आहेत.

स्वामीजींचा तरुण पिढीवर फार विश्वास होता. तरुणांनी त्यांचे विचार आत्मसात करून स्वतःची व देशाची प्रगती करावी असे स्वामीजींना वाटायचे.स्वामी विवेकानंदांचे असे मानने होते की, तरुणपणाची शक्ती ही संपूर्ण जगाची समान संपत्ती आहे. तरुणांचे हे आपल्या भूतकाळाचे वर्तमानाचे आणि भविष्याचे चेहरे आहेत.

तरुणांमधील शक्ती आदर्शवाद, उत्साह आणि धैर्याने समाजातील कोणताही भाग जुळवू शकत नाही. असा स्वामी विवेकानंद यांचा विचार होता. हेच कारण होते की भारत स्वामी विवेकानंदांच्या निधनानंतर भारत सरकारने त्यांची जन्मतारीख “राष्ट्रीय युवा दिन” म्हणून घोषित केला.

आम्ही दिलेल्या swami vivekananda information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या swami vivekananda mahiti marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि swami vivekananda in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये swami vivekananda jayanti information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!