डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन Dr Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi

Dr Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जीवन परिचय डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन मराठी माहिती आपण दर वर्षी पाच सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतो. या दिवशी आपण जे शिक्षक आपल्याला आपल्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन देतात त्या गुरूंचे पूजन करतो. व त्यांनी आपल्याला दिलेल्या शिक्षणासाठी व ज्ञानासाठी त्यांचा आदर करतो. यादिवशी भारतामध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना पुरस्कार दिला जातो. शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये देखील शिक्षक दिन खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

शिक्षकांना फुलगुच्छ देऊन किंवा फूल देऊन शिष्याकडून शिक्षकांना आदर दर्शवला जातो. शिक्षक दिन या दिवसाचं खरं श्रेय आज ज्यांना जातं किंवा ज्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपण हा दिवस साजरा करतो ते म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती यांच्या जीवनाचा परिचय आपण आजच्या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत. तसेच या लेखाचा वापर आपण डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन मराठी निबंध म्हणून देखील करू शकतो.

dr sarvepalli radhakrishnan information in marathi
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन फोटो – dr sarvepalli radhakrishnan information in marathi

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन मराठी माहिती – Dr Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi

नाव(Name)डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
जन्म (Birthday)५ सप्टेंबर १८८८
जन्मस्थान (Birthplace)दक्षिण भारतातील तिरुत्तनी
वडील (Father Name)सर्वपल्ली वीरस्वामी
पत्नी (Wife Name)सिवकामू
आईचे नाव (Mother Name)सीताम्मा
मुले (Children)सर्वपल्ली गोपाळ
मृत्यू (Death)१७ एप्रिल १९७५

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जीवन परिचय

जन्म

५ सप्टेंबर १८८८ रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता. डॉक्टर राधाकृष्णन हे भारताचे माजी राष्ट्रपती होते. यांचा वाढदिवस सर्वप्रथम शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दक्षिण भारतातील तिरुत्तनी येथे सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला. राधाकृष्णन हे एक प्रसिद्ध विद्वान, शिक्षक आणि नेता होते. गरीब ब्राह्मण घरात सर्वपल्ली राधाकृष्णन जन्माला आले.

राधाकृष्णन यांचे वडील एक ब्राम्हण होते. राधाकृष्णन एका गरीब घरातून होते. पण ते अतिशय हुशार होते. वडिलांप्रमाणेच त्यांनी ब्राह्मण बनावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण राधाकृष्णन एक उत्तम शिक्षक बनले. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःला समर्पित केलं. त्यांचा वाढदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. राधाकृष्णन हे आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते.

शिक्षण

सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारतीय तत्त्वज्ञ होते. सर्वपल्ली यांचे बालपण तिरूमणी मध्ये गेलं.‌ त्यामुळे सर्वपल्ली यांनी प्राथमिक शिक्षण तिरूमणी येथूनच घेतलं.

सर्वपल्ली राधाकृष्णन यांना शाळेत गेल्यावर शिक्षणाची आवड निर्माण झाली. सर्वपल्ली हुशार होते म्हणून त्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या बळावर अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या. गरीब असल्यामुळे या शिष्यवृत्त्या द्वारे त्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश देखील मिळाला. सर्वपल्ली यांनी त्यांचं पुढचं शिक्षण वूर्ही कॉलेज आणि मद्रास ख्रिश्चन कॉलेज या दोन कॉलेजमधून पूर्ण केलं.

राधाकृष्णन यांनी फिलोसोफी या विषयावर शिक्षण घेण्याचं ठरवलं. राधाकृष्णन यांनी फिलॉसॉफी या विषयावर मद्रास क्रिश्चन कॉलेजमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. पुढे जाऊन राधाकृष्णन यांनी नीतिशास्त्र या विषयांमध्ये एम. ए. ही पदवी मिळवली. गरिबीतून हालअपेष्टा सहन करत खूप प्रामाणिकपणे सर्वपल्ली यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून शिक्षण पूर्ण केलं.

वैयक्तिक आयुष्य

राधाकृष्णन हे गरीब होते परंतु शिक्षणाची आवड होती. राधाकृष्णन हे भारतीय तत्त्वज्ञान होते. १९०८ मध्ये त्यांनी तत्वज्ञान या विषयामध्ये पदवी प्राप्त केली. राधाकृष्णन यांचा विवाह त्यांच्याच एका नातेवाईकाच्या मुलीशी झाला. जेव्हा राधाकृष्णन यांचं लग्न झालं तेव्हा ते फक्त सोळा वर्षाचे होते. त्यांच्या पत्नीचे नाव सिवकामू असं होतं.

या दाम्पत्यांना एकूण सहा अपत्ये झाली. त्यांचा मुलगा सर्वपल्ली गोपाळ हे खूप मोठे इतिहासकार होऊन गेले. राधाकृष्णन यांचं वैवाहिक जीवन खूप सुखी गेलं. १९५६ या वर्षात त्यांच्या पत्नीचं निधन झालं. पण तरीही एक वडील म्हणून त्यांनी त्यांची जबाबदारी कधीच सोडली नाही. स्वतःच्या कामाच्या व्यापातून देखील त्यांनी त्यांच्या पोरांचा सांभाळ केला. राधाकृष्णन हे एक उत्तम तत्वज्ञ त्यासोबतच एक उत्तम वडील देखील होते.

राजकीय कारकीर्द

राधाकृष्णन हे एक शिक्षक होते. कृष्णन यांनी त्यांच्या भविष्याची सुरुवात प्राध्यापक म्हणून केली. मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये राधाकृष्णन फिलॉसॉफी हा विषय शिकवायचे. या कॉलेजमध्ये ते १९०८ ते १९१७ पर्यंत काम करत होते. मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये आधी सहाय्यक प्राध्यापक आणि मग प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

१९१८-१९२१ या काळापर्यंत त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून मध्ये प्राध्यापक म्हणून सेवा दिली. त्यांच्या कामामुळे मैसूर विद्यापीठातर्फे त्यांचा एक उत्तम प्राध्यापक म्हणून गौरव देखील करण्यात आला. पुढे कलकत्ता युनिव्हर्सिटी कडून त्यांना प्राध्यापक या पोस्टसाठी आमंत्रण देण्यात आलं. कलकत्ता युनिवर्सिटी मध्ये त्यांनी दहा वर्षे आपली सेवा दिली.

१९२१ – १९३१ या काळामध्ये ते कलकत्ता यूनिवर्सिटी मध्ये काम करत होते. पुढे बराच काळ ते एका युनिव्हर्सिटी मधून दुसऱ्या युनिव्हर्सिटी मध्ये प्राध्यापक म्हणून सेवा देत होते. प्राध्यापक म्हणून त्यांची प्रसिद्धी वाढत गेली. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मन लावून विद्यार्थ्यांना शिकवलं.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील ते आवडते होते. गरिबीतून कष्ट करून ते वर आले. माणूस कितीही गरीब असला तरी मनात जिद्द असेल तर कोणतेही कारण आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवू शकत नाही. राधाकृष्णन यांचे विचार उच्च होते. स्वप्न मोठी पहावीत म्हणजे एक दिवस ती नक्कीच खरी होतात.

माणसाचे भविष्य त्याच्या कर्तृत्वावर ठरतं. राधाकृष्णन हे एक ब्राह्मण होते त्यामुळे त्यांच्या वडिलांना वाटायचं ती त्यांनी देखील पंडित शास्त्राचा अभ्यास करावा आणि एक विद्वान ब्राह्मण होऊन दाखवाव परंतु राधाकृष्णन यांच चातुर्य बघून त्यांच्या वडिलांना देखील त्यांचा अभिमान वाटला.

राधाकृष्णन यांना शैक्षणिक क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संधी येत राहिल्या. १९३१ मध्ये राधाकृष्णन यांना आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू बनण्याची संधी मिळाली. याच दरम्यान डॉक्टर राधाकृष्णन यांना इंग्लंडकडून सर ही पदवी मिळाली. बनारस विद्यापीठाचे‌ कुलगुरू बनण्यासाठी पंडित मदन मोहन मालवीय यांनी त्यांना विनंती केली.

१९४८ मध्ये राधाकृष्णन बनारस विद्यापीठाचे कुलगुरू बनले. स्वतःची व समाजाची प्रगती होण्यासाठी शिक्षण घेणं आवश्यक आहे. परंतु शिक्षणासोबत जो शिक्षण देतो त्याचा आदर करणे देखील गरजेचे आहे. असं राधाकृष्णन यांना वाटायचं. शिक्षणाबद्दल त्यांना अतिशय प्रेम होतं.

समाजाची प्रगती ही शिक्षणामुळे होते असे त्यांचे विचार होते त्यामुळे देशांमध्ये सगळ्यांना सुशिक्षित करून प्रत्येकाला शिक्षणाबद्दल ज्ञान दिलं पाहिजे व शिक्षण या व्यवसायाची देखील सर्वांना जाणीव व्हावी म्हणून त्यांनी अतोनात प्रयत्न केले. शिक्षणाबद्दल सर्वांच चांगलं मत असावा असे त्यांना वाटत राहिलं. देशाच्या योग्य प्रगतीसाठी शिक्षण या क्षेत्रावर जास्तीत जास्त जोर टाकला पाहिजे.

एका शिष्याला ज्ञान देणारा गुरू हा सर्व क्षेत्रांमध्ये परिपूर्ण असावा हे त्यांचे ब्रीद वाक्य होतं. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान सर्वश्रेष्ठ ठरलं. म्हणूनच दरवर्षी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अव्वल कामगिरी बजावली राधाकृष्णन यांनी त्यांची गाडी राजकीय क्षेत्रामध्ये वळवली.

राधाकृष्ण यांचा राजकीय क्षेत्राशी कोणताही संबंध नव्हता. परंतु त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातल्या कामगिरीमुळे त्यांना राजकारणात येण्याची संधी मिळाली. एक शिक्षित माणूसच समाजाला पुढे नेऊ शकतो. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी स्वातंत्र्य पूर्वीचा काळ देखील पाहिला होता. म्हणूनच स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वातंत्र्य भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते.

१३ मे १९५२ – १२ मे १९६२ या काळात ते उपराष्ट्रपती पदावर होते. भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांची नेमणूक १३ मे १९६२ रोजी झाली. राधाकृष्णन हे राष्ट्रपतीपदावर १३ मे १९६७ रोजी पर्यंत होते. आधी एक शिक्षक म्हणून आणि नंतर एक राष्ट्रपती म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली.

मृत्यू

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वातंत्र्य भारताचे माजी उपराष्ट्रपती आणि दुसरे उपराष्ट्रपती होते. एप्रिल १७, इसवी सन १९७५ या दिवशी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच‌ निधन झालं. १९६७ मध्ये राधाकृष्णन यांनी निवृत्ती घेतली. १९५४ मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार म्हणजे भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या कामगिरी मुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अप्रतिम सेवा दिली.

आम्ही दिलेल्या dr sarvepalli radhakrishnan information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन मराठी माहिती dr sarvepalli radhakrishnan in marathi यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या doctor sarvepalli radhakrishnan speech in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sarvepalli radhakrishnan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dr sarvepalli radhakrishnan information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!