डॉ वसंत गोवारीकर यांची माहिती Dr Vasant Gowarikar Information in Marathi

Dr Vasant Gowarikar Information in Marathi डॉ वसंत गोवारीकर यांची माहिती विज्ञानाचे सखोल ज्ञान असलेले, कोल्हापूरपासून ब्रिटन पर्यंतचा प्रवास करणारे, भारतात विज्ञानाचा पाया रचणारे अष्टपैलु शास्त्रज्ञ  म्हणजेच “डॉ. वसंत गोवारीकर”. देशभरात विज्ञानप्रसार करणाऱ्या संस्था आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणाऱ्या माणसाना प्रोत्साहन देण्याचा उद्देश असलेले शास्त्रज्ञ  डॉ. वसंत गोवारीकर. 

dr vasant gowarikar information in marathi
dr vasant gowarikar information in marathi

डॉक्टर वसंत गोवारिकर यांचा जीवन परिचय – Dr Vasant Gowarikar Information in Marathi

नावडॉ. वसंत रणछोड गोवारीकर
जन्म२५ मार्च १९३३, पुणे
मृत्यू३ जानेवारी २०१५, पुणे
कार्यशास्त्रज्ञ
पुरस्कारपद्मभूषण, पद्मश्री, फाय फाउंडेशन पारितोषिक.
पत्नीसुधा
अपत्येआश्विनी, कल्याणी, इरावती

डॉ. गोवारीकर यांचा जन्म पुण्यात २५ मार्च १९३३ ला झाला. त्यांच्या वडिल रणछोड गोवारीकर हे सरकारी नोकरी करत होते. वसंतरावाना एकूण नऊ बहिण भाऊ. त्यांचे वडील फोटोग्राफी करायचे. वसंतराव लहानपणापासूनच हुशार होते. १९६४ साली गोवारिकरांचे लग्न सुधाताई चाफेकर यांच्याशी झाले.   

शैक्षणिक जीवन

गोवारिकरांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरच्या हरिहर विद्यालय आणि सिटी हायस्कूल मधून पूर्ण झाले. त्यानंतर कोल्हापूरमधील शासकीय राजाराम कॉलेजमधून बी.एस्सी. आणि त्यानंतर सैद्धान्तिक भौतिकीमधून (thearotical physics) १९५६ साली त्यांचे एम.एस्सी चे शिक्षण पूर्ण झाले. ते कॉलेजमध्ये असताना सुप्रसिद्ध साहित्यिक ना.सी. फडके. हे त्यांना शिकवायला होते. एम.एस्सी. पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गोगटे कोलेज आणि फर्गसन कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली.

वसंतरावांनी वयाच्या ११ व्या वर्षी यांत्रिक पद्धतीने चरख्यातील धागा आपोआप गुंडाळला जाण्याची पद्धत शोधली होती. त्यांच्या या कल्पनेचे कौतुकास्पद पत्र महात्मा गांधींचे सचिव महादेवभाई देसाई यांनी वसंतरावांना पाठवले होते. वसंतरावांना साहित्याची आवड लहानपणापासूनच आहे. त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षी रहस्यकथा लिहिण्याचा छंद त्यांना लागला. ‘त्या चांदण्या राती’, ‘मृत्युच्या सीमेपासून’, ‘आच’ अशा त्यांच्या अनेक कथा मासिकामध्ये छापल्या गेल्या.

वयाच्या १२- १३ व्या वर्षी आपल्याला मोटार बनवता आली पाहिजे असे जेव्हा वसंतरावांना वाटू लागले तेव्हा मोटारगाड्या कशा बनवाव्यात यासाठी त्यांनी अमेरिकेच्या हेन्री फोर्डला पत्र पाठवले. त्यांना त्या पत्राचे उत्तर आले आणि त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली.

१९५९ साली वसंतराव लंडनला गेले. लंडन मधील बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी रसायन अभियांत्रिकीतून परत एम.एस्सी. चे शिक्षण पूर्ण केले. तेथील पोस्ट ग्रज्युएट इन केमिकल इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रमही पूर्ण केला. आणि त्यांनी मास्टर्स आणि डॉक्टरेट पदव्या प्राप्त केल्या. वयाच्या २८ व्या वर्षी प्रोफेसर फ्रिट्झ गार्नर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पी.एच.डी. प्राप्त झाली.

करियर आणि कार्यकाळ

वसंत गोवारीकरांनी इंग्लंडमध्ये उपग्रहांच्या मोटारी बनवणाऱ्या कारखान्यात काम केले. आणि नंतर स्वतः अग्निबाणांच्या मोटारी बनविण्याचे काम केले. त्यांनी प्रामुख्याने भारतात अग्निबाण मोटारी करिता लागणाऱ्या घन इंधन बनविण्याचे काम केले.

वसंतराव गोवारीकरांनी बनवलेले एचटीपीबी या घन इंधनाच्या बाबतीत भारत हा जगातला अत्याधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञान वापरणारा असा देश आहे.  

डॉ. वसंतरावांनी १९६२ मध्ये ब्रिटनच्या ‘अॅटॉमिक एनर्जी रिसर्च एस्टॅब्लिशमेंट’ मध्ये सिनियर सायंटिफिक ऑफिसर म्हणून दोन ते अडीच वर्षे कार्यभार सांभाळला.

त्यानंतर रॉकेट साठी मोटर्स बनवणाऱ्या समरफिल्ड रिसर्च स्टेशन म्हणजेच ‘एजन्सी एस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटीश मिनिस्ट्री ऑफ एव्हिएशन एसिआय’ येथे वसंतरावांची सिनियर टेक्निकल ऑफिसर पदी नेमणूक झाली.

१९६५ साली ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च’ या संस्थेमध्ये डॉ. वसंत गोवारीकर यांनी उपग्रह तंत्रज्ञानावर काम करायला सुरुवात केली.

त्यानंतर त्यांची भेट एक महान शास्त्रज्ञ, अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष, अवकाश संशोधन खात्याचे अध्यक्ष, भारत सरकारचे प्रधान सचिव ‘डॉ विक्रम साराभाई’ यांच्याशी झाली. पुढे १९६७ साली वसंतराव गोवारीकर थुंबा येथील ‘भारतीय अवकाश संशोधन खाते’ (Indian Space Research Organization) म्हणजेच इस्रो येथे प्रॉपेलंट इंजिनियर पदावर रुजू झाले. भारतीय अवकाश तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये डॉ विक्रम साराभाई यांच्या सोबत गोवारीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.  

२१ फेब्रुवारी १९६९ रोजी वसंतराव आणि त्यांच्या गटाने तयार केलेल्या अंतरीक्ष दर्जाच्या इंधनावर एका छोट्या अग्निबाणाने आकाशात झेप घेतली. थुंबा वेलीने विकसित केलेला हा पहिला भारतीय अग्निबाण आणि त्यासाठी वापरण्यात आलेले घन इंधनही. त्यामुळे संपूर्ण देशभर त्याचे कौतुक झाले.

सलग बारा वर्षे वसंतरावांनी इस्रो मध्ये काम केले आणि नोव्हेंबर, १९७९ साली वसंतराव गोवारीकर इस्रो चे केंद्रप्रमुख झाले.

१८ जुलै १९८० ला वसंतराव संचालक असताना त्यांच्या नेतृत्वाखाली एस.एल.व्ही-३ या अग्निबाणाचे चे प्रक्षेपण यशस्वी झाले आणि त्यावरून ‘रोहिणी’ हा उपग्रह अवकाशात पोहोचला.

वसंतराव १९९१ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या सचिव पदावरून निवृत्त झाले. पुढे त्यांना पंतप्रधानांचे विज्ञान सल्लागार म्हणून २ वर्षासाठी नियुक्ती झाली.  

१९९३ मध्ये पुण्यात असताना देशांत शेतकऱ्यांनी खतांचा वापर कसा आणि किती करावा यावर ‘री – लूक अॅट फर्टीलायझर’ नावाचा अहवाल तयार केला.

१९९८ मध्ये गोवारीकरांनी खतांचा जागतिक ज्ञानकोश बनवायला सुरुवात केली आणि तो ‘फर्टीलायझर एन्सायक्लोपिडिया’ २००५ साली पूर्ण झाला. या ज्ञानकोशात रासायनिक खते, सेंद्रिय खते, जैविक खते अशी सगळी खते आली.

डॉ. गोवारीकर यांच्याबद्द्ल उल्लेखनीय

 • २८ फेब्रुवारी – ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’. १९८७ मध्ये गोवारीकरांनी देशांत विज्ञानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी २८ फेब्रुवारी हा विज्ञानदिन म्हणून सुरु केला.
 • १९९२ – डॉ. गोवारीकर इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या वडोदरा अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते.
 • १९८८ ला हवामान खात्यात असताना वसंतरावांनी पाऊस किती पडेल याचा अंदाज वर्तवला होता. तेव्हा हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणाऱ्या ‘गोवारीकर मॉडेल’ ची निर्मिती त्यांनी केली.
 • १९८६- भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव झाले.
 • १९९४ ते २००० या कालावधीत गोवारीकर मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
 • १९९५ – १९९८ या कालावधीत गोवारीकर यांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू पदाचा कार्यभार सांभाळला.

समाजात विज्ञानाचा प्रसार

विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी अनेक कार्यक्रम सुरु केले, अनेक समित्यांची निर्मिती केली. ‘टायफॅक समितीची’ स्थापना केली. म्हणजेच ‘टेक्नॉलॉजी इन्फर्मेशन फोरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिल’.

देशभरात विज्ञानाचा प्रसार करणाऱ्या संस्था आणि वैज्ञानिक दृष्टीकोन असणारी माणसे दुर्लक्षित राहू नयेत, त्यांचा केंद्र सरकारतर्फे सन्मान केला पाहिजे असे वसंतरावाना वाटले. तेव्हा त्यांनी मुलांसाठी विज्ञानप्रसार करणारे, इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे विज्ञान प्रसार करणारे, लेखन- भाषणे याद्वारे विज्ञानप्रसार करणारे आणि संस्थेद्वारे विज्ञानप्रसार करणारे अशा चार वर्गाद्वारे पुरस्कार द्यायला सुरुवात झाली.

१९८७ पासून प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. २००५ पासून आणखी एका वर्गाची पुरस्कार योजनेत भर पडली. विज्ञान माणसात रुजू करण्यासाठी डॉ. वसंतराव गोवारीकरांनी इंग्रजी आणि हिंदी असेएक द्वैभाषिक नियतकालीन सुरु केले.

पंतप्रधानाचे विज्ञान सल्लागार असताना त्यांच्या नेतृत्वाखाली हवामानाचा अंदाज, तंत्रज्ञान उद्योजक बनवण्याच्या योजना, परदेशस्थ भारतीय संशोधकांना परत आणणे, सरकारचे विज्ञान धोरण ठरविणे व त्याचा प्रसार करणे हि कामे प्रामुख्याने झाली.

पुरस्कार

 • १९८४ – पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
 • २००८ – पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित.
 • फाय फाउंडेशन पुरस्कारनेही गोवारीकरांना सन्मानित करण्यात आले.

पुस्तके

 • जानेवारी, १९८७ साली त्यांनी लिहिलेले ‘पॉलिमर सायन्स’ पुस्तक प्रसिद्ध झाले. हे पुस्तक आजही तितकेच प्रसिद्ध आहे. या पुस्तकाची तमिळ आणि रशियन आवृत्तीही आहेत.
 • लोकसंख्येवर भाष्य करणारे ‘आय प्रेडिक्ट’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
 • ‘द फर्टीलायझर एन्सायक्लोपिडिया’.

मृत्यू

dr vasant gowarikar death information in marathi गोवारिकर या विज्ञानयात्री चे निधन २ जानेवारी २०१५ रोजी दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे येथे डेंग्यू संसर्गामुळे झाले.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये dr vasant gowarikar information in marathi काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर information on dr vasant gowarikar in marathi म्हणजेच “डॉ वसंत गोवारीकर यांची माहिती” vasant gowarikar information in marathi यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या डॉक्टर वसंत गोवारिकर या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि dr vasant gowarikar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!