Dum Aloo Recipe in Marathi दम आलू रेसिपी भारतामध्ये अनेक प्रकारच्या मसालेदार आणि चविष्ट भाज्या बनवल्या जातात जसे कि काजू मसाला, पनीर मसाला, मिक्स वेळ, आलू मटार, आलू मसाला तसेच बटाट्यापासून बनवली जाणारी एक डिश म्हणजे दम आलू. दम आलू हि डिश हि एक मसालेदार, तिखट आणि स्वादिष्ट डिश आहे जी छोटे छोटे गोल बटाटे उकडले जातात आणि ते बटाटे सोलून ते मसालेदार ग्रेवी मध्ये घातले जातात. जर आपल्या घरी अचानक जेवण्यासाठी पाहुणे येणार असतील तर आपण लगेच बनणारी स्वादिष्ट रेसिपी बनवण्याचा विचार करतो.
त्यावेळी आपण दम आलू हि रेसिपी बनवू शकतो कारण हि रेसिपी आपल्या घरामध्ये असणाऱ्या साहित्यापासून अगदी सहजपणे उपलब्ध असू शकते आणि रेसिपी बनवण्यासाठी देखील सोपी आहे आणि कमी वेळेमध्ये बनते आणि बटाटा हा प्रकार कोणत्याही पध्दतीने बनवला.
तरी लोक तो आवडीने खातात त्यामुळे गडबडीच्या वेळी बनवण्यासाठी दम आलू हि रेसिपी एकदम उत्तम रेसिपी आहे. चला तर मग आज आपण या लेखामध्ये रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.
दम आलू रेसिपी – Dum Aloo Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० मिनिटे |
पाककला | भारतीय ( कश्मीरी किंवा पंजाबी ) |
बनवण्याची पध्दत | सोपी |
दम आलू म्हणजे काय ?
दम आलू बनवताना तीळ, खोबरे, आले, लसून, कोथिंबीर, काही खडे मसाले यांची पेस्ट बनवून त्याला मोहरी, कांदा, तिखट, हळद आणि मीठ याची फोडणी देवून त्यामध्ये उकडलेले बटाटे टाकले जातात आणि या पदार्थालाचा दम आलू म्हणतात.
- नक्की वाचा: आलू पराठा रेसिपी
- बटाटे : दम आलू बनवण्यासाठी छोटे छोटे बटाटे हा एक मुख्य घटक आहे. छोटे छोटे बटाटे उकडून त्याची साल काढली जाते आणि ते ग्रेवी मध्ये घातले जातात.
- इतर मुख्य साहित्य : तीळ, खोबरे आणि कोथिंबीर हे इतर डिश बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य आहे आणि या साहित्यामुळे ग्रेविला चांगली टेस्ट येते.
- काश्मिरी लाल मिरची पावडर : जरा आपण काश्मिरी लाल मिरची पावडर दम आलू मध्ये वापरली तर डिश चांगली तिखट टेस्ट येईल तसेच भाजीला चांगला रंग देखील येईल.
दम आलू रेसिपी – how to make dum aloo recipe in marathi
दम आलू हि रेसिपी भारतामध्ये अनेक ठिकाणी आवडीने बनवली जाते तरी हि रेसिपी वारंवार काश्मीर किंवा पंजाब मध्ये बनवल्या जाणाऱ्या डीश पैकी एक आहे. दम आलू बनवताना तीळ, खोबरे, आले, लसून, कोथिंबीर, काही खडे मसाले यांची पेस्ट बनवून त्याला फोडणी देवून त्यामध्ये उकडलेले बटाटे टाकले जातात.
दम आलू हि रेसिपी दिसायला देखील छान दिसते आणि या रेसिपीचा स्वाद देखील खूप छान असतो तसेच हि एक झटपट आणि घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनणारी एकदम सोपी रेसिपी आहे. चला तर मग दम आलू कसे बनवले जातात आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० मिनिटे |
पाककला | भारतीय ( कश्मीरी किंवा पंजाबी ) |
बनवण्याची पध्दत | सोपी |
दम आलू बनवण्यासाठी बटाटे अन काही मसाले हे मुख्य घटक लागतात. दम आलू बनवण्यासाठी जे जे साहित्य लागते ते बहुतेकदा आपल्या घरामध्ये उपलब्ध असते. चला तर मग दम आलू बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- ५ ते ६ छोटे छोटे बटाटे ( छोटे बटाटे नसल्यास तुम्ही मोठ्या बटाट्यांचे अर्धे भाग करून वापरू शकता ).
- १ वाटी सुखे खोबरे ( खिसलेले ).
- १/२ वाटी तीळ.
- १ छोटा चमचा जिरे.
- १ छोटी वाटी टोमॅटो प्युरे.
- २ चमचे आले लसून पेस्ट.
- १ मध्यम आकाराचा कांदा ( बारीक चिरलेला ).
- १ बदाम फुल.
- १ छोटा तुकडा दालचिन.
- १ वेलदोडा.
- २ चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- १ चमचा गरम मसाला.
- १ चिमूटभर हिंग.
- दीड मोठा चमचा तेल ( फोडणीसाठी ).
- १ वाटी दुध किंवा पाणी.
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- कोथिंबीर ( आवश्यकतेनुसार ).
- वरील साहित्य वापरून दम आलू रेसिपी कशी बनवायची ते आता आपण पाहूयात.
- दम आलू बनवताना सर्वप्रथम छोट्या आकाराचे बटाटे घ्या आणि ते चांगले स्वच्छ पाण्यामध्ये धुवा आणि कुकर मध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये ते बटाटे टाकून त्यावर झाकण लावून ते मोठ्या आचेवर चांगले उकडून घ्या आणि गॅस बंद करा.
- आता एक कढई घेवून ती मध्यम आचेवर गरम करा आणि त्यामध्ये सर्वप्रथम सुख खोबरं भाजून घ्या आणि ते बाजूला ठेवा. मग त्यामध्ये तीळ, जिरे, बदाम फुल, दालचिन, वेलदोडा घाला आणि या मसाल्याचा खामग वास येई पर्यंत ते चांगले भाजून घ्या आणि भाजल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढा आणि त्याची बारीक पावडर करून घ्या. ती पावडर एक वाटीमध्ये बाजूला काढून घ्या.
- त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले खोबरे, आले लसून पेस्ट आणि कोथिंबीर घालून हे वाटून घ्या आणि मग त्यामध्ये वाटलेला मसाला घाला आणि त्यामध्ये थोडे पाणी घालून ते परत एकदा मिक्सरला फिरवून घेवून ते मिश्रण एकजीव करून घ्या.
- आता उकडलेले बटाटे पाण्यामधून काढून सोलून बाजूला ठेवा आणि गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करा आणि त्यामध्ये तेल घाला नी तेल गरम झाले कि तेलामध्ये मोहरी टाका आणि मोहरी तडतडली कि त्यामध्ये लगेच कांदा घाला आणि तो लालसर होईपर्यंत भाजून घ्या मग या फोडणीमध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, हिंग घाला आणि ते थोडेसे मिक्स करा आणि त्यामध्ये टोमॅटो प्युरे घाला आणि ते चांगले मिक्स करून प्युरी ३ ते ४ मिनिटे भाजा,
- आता या मिश्रणामध्ये आपण बनवून ठेवलेला मसाला घाला आणि तो देखील चांगला मिक्स करून भाजा. आणि मग त्यामध्ये दुध घाला आणि त्यामध्ये मसाला चांगल मिक्स करून घ्या.
- आता या ग्रेविमध्ये उकडून सोललेले बटाटे घाला आणि त्याला झाकण लावून एक उकळी काढा आणि गॅस बंद करा आणि त्यावर चिरलेली कोथिंबीर टाका.
- तिखट आणि मसालेदार दम आलू रेसिपी सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.
दम आलू कश्या सोबत खातात – serving suggestion
- दम आलू हि रेसिपी आपण चपाती, रोटी, नान किंवा प्लेन भातासोबत खावू शकतो.
आम्ही दिलेल्या dum aloo recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर दम आलू रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dum aloo recipe in marathi madhura या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि dum aloo recipe in marathi by archana माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये authentic kashmiri dum aloo recipe Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट