DYSP Post Information in Marathi डीवायएसपी म्हणजे काय ? पोलीस उपअधीक्षक मित्रांनो! तुम्ही सर्वांनी डीवायएसपी या पदाबद्दल नक्कीच ऐकले असेल, डीवायएसपी हे पोलीस खात्यातील उच्च व सर्वोत्तम पद म्हणून ओळखले जाते. शिवाय, डीवायएसपी हे एक सरकारी पद आहे. परंतु, आपल्याला माहिती आहे का? डीवायएसपीला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात. जरी माहिती नसेल तरी हताश होण्याची काहीही गरज नाही. डीवायएसपीला मराठीमध्ये “पोलीस उपअधीक्षक” असे म्हणतात तर इंग्रजी मध्ये
डीवायएसपी म्हणजे “डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस”. असा होतो. पोलीस खात्यामध्ये असे अनेक पदे असतात. पण त्या अंतर्गत मानले जाणारे पद म्हणजेच ‘पोलीस उपअधीक्षक’ हे पद होय.

डीवायएसपी म्हणजे काय – DYSP Post Information in Marathi
डीवायएसपी म्हणजे काय – DYSP full form in Marathi
डीवायएसपी म्हणजे “डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस“. असा होतो. पोलीस खात्यामध्ये असे अनेक पदे असतात. पण त्या अंतर्गत मानले जाणारे पद म्हणजेच ‘पोलीस उपअधीक्षक‘ हे पद होय.
पोलीस
पोलीस हा शब्द ग्रीक शब्दापासून निघालेला असून तो मुलकी राज्यव्यवस्था या अर्थाने प्रथम फ्रेंच भाषेमध्ये रूढ झाला. पश्चिमात्य राष्ट्रांत प्राचीन काळापासून नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी त्यास सोपविलेली असल्यामुळे पोलीस या शब्दाला आधुनिक अर्थ प्राप्त झाला.
गुन्ह्यांना आळा घालणे तसेच लोकांच्या जीवितवित्तांचे रक्षण करणे आणि घडलेले गुन्हे हुडकून काढून आरोपीला पुराव्यानिशी न्यायालयासमोर हजर करणे, त्याचबरोबर समाजात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणे.
ऐतिहासिक आढावा
कोणत्याही पोलीसयंत्रणेचे स्वरूप हे तत्कालीन राजकीय तत्त्वज्ञान व आर्थिक परिस्थिती यांवर अवलंबून असते. तर कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे काम कोणाकडे असावे याबाबत मतभेद निर्माण झाले. राजाकडे किंवा केंद्र शासनाकडे असावे की ते जमीनदार, उमराव, नगरपालिका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादीनी ते पार पाडावे, या मतभेदातून दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पोलीसयंत्रणा उभारल्या जात.
पाश्चात्त्य देशांतील लोकांना कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी राजाने पोलीसयंत्रणा उभारणे ही कल्पनाच तेथील लोकांना सहन होत नसे. असा प्रयत्न एकदा फ्रान्समधील सातवा चार्ल्स (१४०१–६१) याने प्रयोग करून पाहिला होता; पण तो पूर्णपणे अपयश ठरला. नंतर १८२९ साली इंग्लंडमध्येही पोलीसदलांची उभारणी करण्याचा कायदा पार्लमेंटने केला. पण त्याला आणि उभारलेल्या पोलीसयंत्रणेला जनतेच्या विरोधाला तोंड द्यावे लागले, १८३३ साली त्यांच्यात संघर्ष सुरू झाला.
प्राचीन भारतातील पोलीसयंत्रणा
याउलट जनतेच्या जीवितवित्तांचे संरक्षण करण्याचे जबाबदारी ही राजाचेच आहे, हा सिद्धांत भारतात फार प्राचीन काळापासून चालत आलेला होता. यासंबंधीचे स्पष्ट उल्लेख बृहदारण्यकोपनिषद, ऋग्वेद या प्राचीन संस्कृत ग्रंथांतही आढळतात. तसेच रामायणातदेखील सर्व प्रजेची रक्षा करण्याची जबाबदारी ही राजाचीच आहे, असे निर्देश आहे. जर गुन्हें घडल्यास नगररक्षकांनाच जबाबदार धरण्यात येई. कालांतराने गुप्तकाळात पोलीस खात्यात अनेक सुधारणा झाल्या.
पोलिसाला अनेक नावाने संबोधले जात. शिवाय पोलिसाला ‘चाट’ देखील म्हणत. पोलीस खाते हे राजस्व विभागाचे प्रमुख अधिकारी समाहर्ता (महसूल मंत्री) याच्याकडे सोपविले जात असा उल्लेख कौटिलीय या अर्थशास्त्रात आढळतो. तसेच, जीवितवित्तांच्या संरक्षणाचीही जबाबदारी मुख्यतः ही राजाची असे.
भारताव्यतिरिक्त अन्य दुसऱ्या देशात कोठेही न आढळणारी ही व्यवस्था, ब्रिटिश राज्य भारतात येईपर्यंत अव्याहतपणे चालू होती. शिवाय तुर्की सुलतानांनी व मोगल बादशहांनीही ती मोडली नाही. कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी ही राजाचे मानले गेल्यामुळे खून, दरोडा, दंगल, चोरी इत्यादी गुन्हे घडल्यास राजाविरुद्ध किंवा शासनाविरुद्ध असतात, हा सिद्धांत भारतात सर्वमान्य होता.
स्वातंत्र्योत्तर काळातील पोलीसयंत्रणा
गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जच्या काळात भारतात पोलीस खात्याची स्थापना झाली. कालांतराने भारतीय पोलीसयंत्रणेत खूपच बदल आणि सुधारणा झाल्या. सर्व अधिकाऱ्यांचे गणवेश समान ठेवले. गुन्ह्यांच्या आणि इतरही बाबतीत एकसूत्रीपणा आला. पदानुसार त्यांना स्थान देण्यात आले, याखेरीज गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांच्या तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी कलकत्ता व मौंट अबू येथे संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. याअगोदर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमणुका हे स्वतंत्रपणे होत असे.
पण आता कालांतराने अखिल भारतीय पोलीस सेवेसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेऊन यशस्वी झालेले सर्व अधिकारीच प्रत्येक राज्यांत वाटून देण्यात येतात.भिन्न प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासात विज्ञानचे मदत मिळविण्याच्या दृष्टीने प्रयोगशाळाही स्थापन झालेल्या आहेत. महिला पोलीस ही तरतूद किंवा पद नव्हते वास्तविक महिलांना शिक्षण घेणे हा गुन्हा समजला जात.
१९११-१९१५ या काळात स्त्री-पोलीस ही स्वातंत्र्योत्तर काळातील एक अत्यंत महत्त्वाची तरतूद झाली. सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी स्त्री-पोलीस नेमणूक झालेली आहे तसेच रेल्वे खात्यात सुद्धा आता स्त्री पोलीस नेमलेले आहे.
काही विशेष तरतूद सुद्धा आहेत जसे की, बाँम्बे चिल्ड्रेन अॅक्ट यांसारख्या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी स्त्री-पोलिसांचा खूप मोठा उपयोग होतो तसेच समाजकल्याणाच्या हेतुने यांची मदत होते. शिवाय कायदा व सुव्यवस्थेचे अनेक प्रश्न लोककल्याणकारी राज्यांत स्त्रियांच्या बाबतीत निर्माण होत असतात;त्याकामी तेथेदेखील स्त्री-पोलिसांचा साह्य होण्यास मदत होते.
DYSP Syllabus in Marathi
पोलीस खात्याची रचना
- पोलिस महासंचालक (DGP)
- अतिरिक्त महासंचालक (१७)
- विशेष पोलिस महानिरीक्षक (Special IGP) हे महसूल आयुक्ताच्या दर्जाचे पद
- पोलिस उपमहानिरीक्षक (DIG)
- जिल्हा स्तरावर पोलिस अधीक्षक (SP/DCP
- अतिरिक्त पोलिस अधीक्षक (Add. SP),
- पोलिस उपअधीक्षक (DySP/ACP) हे पद येते जे राज्यसेवेतून प्राप्त होते.
- वरिष्ठ पोलिस निरीक्षक (Sr.PI)
- पोलिस निरीक्षक (PI)
- पोलिस उपनिरीक्षक (PSI)
- सहाय्यक पोलिस निरीक्षक (API)
- सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (APSI)
- पोलिस हवालदार (Police Head Constable)
- पोलिस नाईक (PN)
- पोलिस शिपाई (PC)
विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस खात्याबद्दल कुतूहल आणि आकर्षण असते. अशी ही एक गणवेशधारी सेवा आहे, आणि तेही एक आकर्षण. राज्यसरकारचा कर्मचारी हा पोलीस असून त्यास कायदा व सुव्यवस्था राखण्याची त्याचबरोबर मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी सोपविलेली आहे.
पोलिसांना आवश्यक प्रसंगीच्या ठिकाणी बळाचा वापर करण्याचेही अधिकार आहेत. पोलीसामुळे आपण सर्व सुरक्षित आहोत. मात्र पोलिसांचे जीवन हे खूपच असुरक्षित आहे. पोलीस हे कर्तव्य निष्ठ असतात.
मुंबई पोलिस अधिनियम १९५१ नुसार, महाराष्ट्र या राज्यासाठी पोलीस दलाचे स्थापना करण्यात आले. प्रशासकीय सोयीनुसार ग्रामीण व शहरी भागात पोलीस दलाची विभागणी करण्यात आली.
ग्रामीण भागाकरिता परिक्षेत्रे निर्माण करण्यात आले. तर शहरी भागासाठी आयुक्तालये निर्माण करण्यात आले. अपवाद मुंबई सोडून राज्यातील अन्य सर्व राज्यात आयुक्तालये ही पोलिस महासंचालकाच्या अधिपत्याखाली आहेत.
‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ असे ब्रीद घेऊन महाराष्ट्र पोलिस सेवा (म. पो. से.) हे कार्य करते. पोलीस उपअधीक्षक या पदासाठी एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) मार्फत परीक्षा घेतली जाते, अनेक विद्यार्थी हे डीवायएसपी होण्याचे स्वप्न घेऊन स्पर्धापरीक्षांमध्ये येतात. परंतु प्रत्येकालाच यश प्राप्त होते असे नाही, जे कठीण परिश्रम, संयम, चिकाटी आणि अभ्यासात सात्यात ठेवतात ते नक्कीच या पदापर्यंत पोहोचतात.
राज्य सेवेमार्फत निवड झालेल्या वर्ग-अ च्या अधिकाऱ्यांना पायाभूत अभ्याक्रमासाठी साठी ‘यशदा’ म्हणजे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे पाठविले जातात. याला ‘एकत्रित परीक्षाविधिन प्रशिक्षण कार्यक्रम’ असे देखील म्हटले जाते. त्यांचे उद्दीष्ट हे राज्यस्तरीय दृष्टिकोन, मूल्यव्यवस्था व नैतिक प्रमाणके निर्माण करणे हा आहे.
विविध सेवांमधील प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण हे एकाच ठिकाणी झाल्याने त्यांच्यामध्ये सहयोगाची भावना निर्माण व्हावी हाही एक उद्दीष्ट असतो. प्रत्यक्ष क्षेत्रात शिस्तबद्ध, लोककेंद्री व लोककेंद्री असे सनदी अधिकारी निर्माण व्हावेत याची काळजी घेतली जाते. प्रशिक्षण घेणाऱ्या अधिका-यांचे महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकारी म्हणून नावलौकिक उंचावणे.
शासनाच्या विविध विभागांचे संघटन व कार्यपध्दतीची माहिती प्रशिक्षणादरम्यान अधिका-यांना देणे. तसेच शासनाच्या विविध संवर्गातील अधिका-यांमध्ये एकोपा तयार करणे, एकसारखी नैतिक मुल्य निर्माण करणे, दूरदृष्टी विस्तारित करणे. यालाच कंबाईन प्रोबेशनरी प्रोग्राम असे म्हणतात. हा कार्यक्रम साधारणपणे दोन वर्षांचा असतो.
त्यामध्ये फाऊंडेशन टप्पा असतो. तांत्रिक शिक्षण सुद्धा दिले जाते, गाव व आदिवाशी भागांना भेट दिले जातात त्याचबरोबर न्यायपालिका, कायदेमंडळ, शस्त्रप्रशिक्षण, सैनिकी छावणी या सर्वांना भेट देऊन तेथील कार्याचा प्रत्यक्ष परिचय करून घेतला जातो. केंद्रीय सेवेतील अधिकाऱ्यांचे ज्याप्रमाणे प्रशिक्षणादरम्यान भारत दर्शन घडवले जाते.
त्याच धर्तीवर राज्य सेवा अधिकाऱ्यांना सुद्धा महाराष्ट्र दर्शन घडवले जाते. इतकेच नव्हे तर दिल्लीलाही नेऊन तिथल्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष परिचय करून दिला जातो.
पोलीस उपअधीक्षक या पदी निवड झालेल्या अधिकाऱ्यांना पुढच्या ट्रेनिंग साठी महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे पाठविले जाते. त्यांना फिजिकल ट्रेनिंग बरोबरच संगणक कौशल्य, आणि प्रयोगशाळेचे प्रशिक्षण दिले जाते. ही प्रशिक्षण पंधरा महिन्यांसाठी असते.
उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला जेव्हा शहरी भागामध्ये असलेल्या पोलीस आयुक्तालय (पोलीस स्टेशन कार्यालय) मध्ये नियुक्ती मिळते तेव्हा त्यांना डीवायएसपी म्हणजेच पोलीस उपअधीक्षक असे म्हणतात. पोलीस उपअधीक्षकला उमेदवारीच्या कालावधीमध्ये एक * स्टार मिळत असतो आणि तो कालावधी संपल्यानंतर त्यांना तीन * स्टार दिले जातात.
कामाचे स्वरूप
त्यांच्या क्षेत्रातील अवैध डीस्टिलेसनवर नियंत्रण ठेवणे व तसेच त्यांची विक्री , वाहतूक थांबवणे अश्या कामावर छापे मारणे.जर कुठे गंभीर गुन्हा घडल्यास त्यांची चौकशी करणे, त्याचबरोबर गुन्हा होऊ नये म्हणून कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणे. उच्च अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन करणे व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे.
तसेच पोलीस उपअधीक्षकाना अधीक्षकांनी नेमून दिलेली सर्व कामे व कर्तव्ये हे पार पाडावी लागतात. त्यांच्या हाताखालील अधिकारी यांना मार्गदर्शन व पर्यवेक्षण करणे. शिवाय पोलिस ठाण्यांना भेटी देणे, गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची भेट घेणे व चौकशी करणे आणि रात्र फेरी काढणे, गुन्हे घडू नयेत म्हणून देखरेख करावी लागते.
रात्री अचानक फेरीची व्यवस्था त्यांना करावी लागते, या फेऱ्यांमध्ये त्याच्या हाताखालील सर्व अधिकारी हे सतर्क असतात की नाही याची खात्री करावी लागते. तसेच विशेष आणि स्थानिक कायद्यांची अंमलबजावणी करावी लागते.
बढती
बढती किंवा प्रमोशन हे पोलीस उपअधीक्षकच्या कामगिरीवर अवलंबून असते. साधारणपणे दहा वर्षाच्या कालावधीत डीवायएसपी यांचा ए.एस.पी. (ॲडिशनल सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस) किंवा एस.पी (डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस) म्हणून प्रमोशन( बढती) होते.
आम्ही दिलेल्या dysp post information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर डीवायएसपी म्हणजे काय ? माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dysp information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about dysp in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dysp syllabus in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट