शैक्षणिक कर्ज माहिती Education Loan Information in Marathi

education loan information in marathi शैक्षणिक कर्ज माहिती, बँक या ठिकाणाविषयी कोणाला माहित नाही असे नाही कारण या ठिकाणी अनेक लोक आपल्या पैश्याची गुंतवणूक करतात किंवा मग जर गरज असेल तर बँकेतून कर्ज देखील घेतात आणि हे कर्ज वैयक्तिक कर्ज, सोने तारण कर्ज, गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज आणि व्यवसाय कर्ज आणि आज आपण या लेखामध्ये यामधील शैक्षणिक कर्ज या विषयी माहिती घेणार आहोत. शैक्षणिक कर्ज हे विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दिली जाणारी एक रोख रक्कम असते आणि हि भारतातील शिक्षणासाठी किंवा भारताबाहेरील शिक्षणासाठी विद्यार्थ्याना दिली जाते.

शैक्षणिक कर्ज हे त्या संबधित विद्यार्थ्याला कमी व्याजदारामध्ये दिले जाते आणि हे कर्ज १५ वर्षामध्ये तो विद्यार्थी कधीही फेडू शकतो परंतु त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी लागल्यानंतर कर्जाची रक्कम हि हप्त्यांच्या स्वरुपात भरण्यास सुरुवात करू शकतो.

education loan information in marathi
education loan information in marathi

शैक्षणिक कर्ज माहिती – Education Loan Information in Marathi

शैक्षणिक कर्जे म्हणजे काय – education loan information in marathi language

शैक्षणिक कर्ज हे विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दिली जाणारी एक रोख रक्कम असते आणि हि भारतातील शिक्षणासाठी किंवा भारताबाहेरील शिक्षणासाठी विद्यार्थ्याना दिली जाते.

शैक्षणिक कर्जाचे फायदे – benefits

जर एखाद्या विद्यार्थ्याने शैक्षणिक कर्ज घेतले तर त्याला काही फायदे मिळू शकतात आणि ते फायदे कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

 • जर एखाद्या विद्यार्थ्याने त्याचे उच्च शिक्षण घेण्यासाठी एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले तर तो ते कर्ज त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि नोकरी लागल्यानंतर फेडू शकतो आणि हे कर्ज तो संबधित विद्यार्थी १५ वर्ष कालावधी मध्ये फेडू शकतो.
 • शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कर्ज स्थगित कालावधी हा ६ महिने ते १ वर्षापर्यंत आहे.
 • या कर्जामध्ये शिक्षणासह इतर खर्च देखील समाविष्ट असतात जसे कि लॅपटॉप खर्च आणि प्रवास खर्च.
 • जर एखादा विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशामध्ये जात असेल तर त्याला परदेशी मुद्रा उपलब्ध करून दिल्या जातात.
 • अंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्यासाठी १ कोटी रुपये वित्तपुरवठा आणि देशांतर्गत विद्यार्थ्यांच्यासाठी ५० लाख रुपये वित्तपुरवठा केला जातो.

शैक्षणिक कर्ज व्याजदर – interest rate

काही बँका ह्या वेगवेगळ्या कर्ज दराने गरजू विद्यार्थ्यांना कर्ज देतात आणि खाली आपण अनेक वेगवेगळ्या बँकांचे कर्जदर पाहणार आहोत.

शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बँकेची माहिती

बँकेचे नावव्याजदर
स्टेट बँक ऑफ इंडिया (state bank of india)८.५५ टक्के च्या पुढे
एचडीएफसी बँक (HDFC bank)महाविद्यालय किंवा विद्यापीठानुसार प्राधान्य दर
कॅनरा बँक (canara bank) ९.२५ टक्के च्या पुढे
युनियन बँक ऑफ इंडिया (union bank of India)११.३० टक्के च्या पुढे
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया८.५५ टक्के च्या पुढे
आयसीआयसीआय बँक (ICICI bank)९.९५ टक्के च्या पुढे
अॅक्सीस बँक (axis bank)१३.७० टक्के
कर्नाटक बँक (karnataka bank)१०.४४ टक्के च्या पुढे

शैक्षणिक कर्ज घेण्यासाठीचे पात्रता निकष – eiligibility

जर एखाद्या विद्यार्थ्याला त्याचे उच्च शिक्षण घेण्यासाठी कर्ज घ्यायचे असल्यास त्या व्यक्तीला काही पात्रता निकष पार पडावे लागतात आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

 • जर एकाद्या विद्यार्थ्याला कोणत्याही बँकेचे शैक्षणिक कर्ज घ्यायचे असल्यास त्याने त्याचे १० वीचे किंवा १२ वीचे शिक्षण पूर्ण केलेलं पाहिजे आणि त्या संबधित विद्यार्थ्याची १० वी पर्यंतची किंवा १२ वी पर्यंतची शैक्षणिक पार्श्वभूम हि चांगली असली पाहिजे.
 • शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याचे वय हे १८ ते ३५ वर्ष असावे लागते.
 • जर एखाद्या विद्यार्थ्याला परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जायचे असल्यास त्या विद्यार्थ्याकडे परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक कर्जाचे प्रकार – types

शैक्षणिक कर्ज घेणारे विद्यार्थी वेगवेगळ्या कर्ज प्रकारासाठी अर्ज करू शकतात आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहूया.

परदेशी शिक्षण कर्ज

परदेशी शिक्षण कर्जे हे अश्या विद्यार्थ्यांना दिले जाते ज्यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जाण्याची इच्छा असते. पात्रता निकष पूर्ण केले तरच परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी विमान भाडे, निवास आणि शिक्षण शुल्क या कर्जामध्ये समाविष्ट आहे.

घरगुती शिक्षण कर्ज

जर एखाद्या विद्यार्थ्याची भारतामध्ये उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर अश्या विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक कर्ज मिळते आणि या शैक्षणिक कर्जाच्या प्रकाराला घरगुती शिक्षण कर्ज म्हणतात आणि हे कर्ज स्थानावर आधारित कर्ज आहे.

पदवीपूर्व शिक्षण कर्ज

पदवीपूर्व शिक्षण कर्ज हे अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण कर्ज आहे आणि हे कर्ज विद्यार्थ्यांना प्रधान केले जाते जेणेकरून ते त्यांचे पदवीपूर्व शिक्षण पूर्ण करतील. विविध स्पेशलायझेशन अंतर्गत पदवीपूर्व पदवी सामान्यता ३ ते ४ वर्षाचा दीर्घ अभ्यासक्रम असेल.

करिअर विकास कर्ज

कॉर्पोरेट नोकऱ्यांच्यामध्ये काही वर्षे काम करणारे अनेक व्यावसायिक त्यांच्या करिअरला अनेक व्यावसायिक ठ्माबावातता आणि त्यांच्या रोजगाराच्या संधी सुधारण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण घेण पसंत करतात. अशा व्यक्ती नामांकित व्यवसाय आणि तांत्रिक शाळांच्यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांची कौशल्ये सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतात.

रोख्यावर कर्ज

तुम्ही स्थावर मालमत्ता जसे कि कृषी, निवासी जमीन, सदनिका, जमीन, घर आणि इतर मुदत ठेव प्रमाणपत्र, आवर्ती ठेवी, रोखे, डिबेंचर्स आणि इक्विटी शेअर्स गहाण ठेवू शकता आणि यातून शिक्षणासाठी आवश्यक तो वित्तपुरवठा घेऊ शकता.

शैक्षणिक कर्जाअंतर्गत समाविष्ट खर्चाची यादी

 • परीक्षा/ लायब्ररी आणि प्रयोगशाळा शुल्क आणि शैक्षणिक संस्थांना देय शुल्क.
 • सावधगिरी ठेव, इमारत निधी, संस्थेची बिले, पावत्याद्वारे समर्थित परत करण्यायोग्य ठेव.
 • अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असल्यास वाजवी दरात संगणक खरेदी करण्याचा शुल्क हा कर्जाच्या २० टक्के पर्यंत असतो आणि त्या पेक्षा अधिक नसतो.
 • पुस्तके, इतर उपकरणे आणि गणवेश या सारख्या खरेदीसाठी कर्जामधील २० टक्के रक्कम आपण यासाठी देखील वापरू शकतो.
 • परेदेशातील अभ्यासक्रम करण्यासाठी प्रवास खर्च, शिक्षण शुल्क आणि निवासी खर्च म्हणून तो संबधित विद्यार्थी कर्जाची रक्कम वापरू शकतो.

आम्ही दिलेल्या education loan information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शैक्षणिक कर्ज माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या education loan information in marathi language या education loan details in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about education loan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!