Essay On Butterfly in Marathi फुलपाखरू निबंध मराठी फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू! या वेलीवर, फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू!! या कवितेत वर्णन केल्यासारखं फुलपाखरू अतिशय सुंदर, नाजूक आणि छानसं छोटसं जीव आहे. फुलपाखरू हे साधारणता बागेत किंवा छान छान फुलांवर पाहायला मिळतं. फुलपाखरूच रूप अतिशय मनमोहक असतं. फुलपाखरू च्या शरीरावर असणारे विभिन्न रंग मनाला भुरळ पाडतात. फुलपाखरू ही एक कीड असून तिला असणाऱ्या दोन रंगीबिरंगी पंखांमुळे ती अधिक सुंदर दिसते. फुलपाखरू हा एकमेव असा जीव आहे.
जो फक्त भारतातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये पहायला मिळतो. फुलपाखरांच्या वेगवेगळ्या प्रजाती असतात. संपूर्ण विश्वामध्ये वेगवेगळे प्राणी पक्षी किडे पाहायला मिळतात परंतु या सर्वांमध्ये अतिशय सुंदर व मनाला स्पर्श करणारा कुठला जर जीव असेल तर तो म्हणजे फुलपाखरू. फुलपाखराला वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या प्रकारची पंख असतात जी त्यांना अधिक सुंदर बनवतात.
फुलपाखरूचा आकार त्याचा रंग त्याच्या पंखांवर असणाऱ्या वेगवेगळ्या आकृती हे संपूर्ण दृश्य मनाला वेड लावणार आहे. म्हणूनच फुलपाखरू हा सर्वांचाच आवडता जीव आहे. फुलपाखरू हे साधारणता दिवसामध्ये बघायला मिळतं फुलपाखरू त्यांच अन्न फुलांच्या मध्यभागी असणाऱ्या जागेतून मिळवतात. म्हणूनच मुख्यतः फुलपाखरू हे सुंदर फुलांच्या जवळ पाहायला मिळतात आणि कदाचित यावरूनच त्यांना फुलपाखरू असं नाव पडलं असेल.
फुलपाखरू निबंध मराठी – Essay On Butterfly in Marathi
Butterfly Essay in Marathi
फुलपाखरू म्हणजेच फुला जवळ आढळणारे पाखरू. फुलपाखरू हे रंगीबिरंगी व सर्वांचा आवडता कीटक आहे जो शेकडो वर्षांपासून अस्तित्वात आहे. फुलपाखराला चार पंख असतात ज्यांच्या तुन आपण आरपार बघू शकतो फुलपाखरांच्या पंखांवर अगदी छोट्या-छोट्या वेगवेगळ्या मनमोहक नक्षी असतात. याच्यामध्ये वेगवेगळे रंग भरलेले असतात फुलपाखरू एक कीटक असून त्यांना दोन ते चार सप्ताह पर्यंतच आयुष्यमान असतं.
फुलपाखरू ला इतर पक्षी व प्राण्यांसारखे कान नसतात परंतु फुलपाखरू व्हायब्रेशनला प्रतिसाद देतात. संपूर्ण विश्वामध्ये जवळपास २४ हजार फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. संशोधनाच्या आधारे असं सांगण्यात आलं आहे की antartica येथे फुलपाखरू पहायला मिळत नाहीत कारण तिथे अधिक थंडी असल्यामुळे छोटे छोटे जिवाणू व कीटक यांच तिथे राहण अधिक अशक्य आहे.
फुलपाखरू त्यांची अंडी झाडांच्या किंवा वेलींच्या पानांवर देतात. फुलपाखरू फुलांमध्ये असलेला गोड रस शोषुन उपजीविका चालवतात रस शोषण्यासाठी किंवा इतर पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी ते आपल्या बारीक पायांचा उपयोग करतात. फुलपाखरू १७ फिट प्रतितास हवेमध्ये उडतात त्यासाठी त्यांचा तापमान ८५ अंश सेल्सिअस इतके असते.
फुलपाखरूंच्या डोळ्यामध्ये सहा हजार लेन्स असतात त्यामधून ते अल्ट्रावायलेट किरणे देखील बघू शकतात. फुलपाखरू तांच्या आयुष्यमान मध्ये जवळपास २५० ते ३०० अंडी देतात. फुलपाखरूच साधारणता आयुष्यमान दोन हफ्ते असू शकतो किंवा बारा महिने. फुलपाखरू मध्ये असणारे वेगवेगळे रंग अतिशय आकर्षित असतात जे मनुष्याला त्याच्याकडे आकर्षित करतात.
फुलपाखरू ही विशेषतः लहान मुलांमध्ये अतिशय सुप्रसिद्ध आहे. फुलपाखरांच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. संपूर्ण विश्वामध्ये जवळपास १ लाख ६८ हजार प्रजाती आहेत. फुलपाखरू सर्वप्रथम अंडी मग अळी नंतर कोश मग किटक अशा चार वेगवेगळ्या टप्प्यांमधून त्यांची वाढ होते. संपूर्ण विश्वामध्ये मोनार्क या जातीची फुलपाखरू आढळतात. जी सर्वाधिक लांब प्रवासाबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत. मोनार्क जातीची फुलपाखरं साधारणपणे तीन हजार किलोमीटर पर्यंत स्थलांतर करतात.
साधारणता फुलपाखरू हे दिवसा संक्रमण करतात परंतु नॉर्दन परली आय ही फुलपाखराची प्रजाती रात्री संक्रमण करतात. फुलपाखरू हे तासाला १२ मैल वेगाने उडतात. भारतामध्ये देखील अनेक वेगवेगळे सुंदर फुलपाखरांच्या प्रजाती पाहायला मिळतात परंतु सदर्ण बर्ड विंग ही फुलपाखराची प्रजाती भारतामधील सर्वात मोठ्या आकाराची प्रजाती आहे. फुलपाखरांच्या शरीराचे तापमान ८६ डिग्री पेक्षा जर कमी असेल तर ते उडू शकत नाहीत.
मित्रांनो फुलपाखरं वेगवेगळ्या रंगाचे असतात आणि म्हणूनच आपण त्यांच्यावर सर्वात जास्त आकर्षक होतो परंतु हा रंग त्यांच्या पंखांवर येतो तरी कसा? तर फुलपाखरांची पंख पारदर्शक असतात आणि ते पंखांवर छोटे छोटे खवले असतात. ज्यातून त्यांना रंग प्राप्त होतो. फुलपाखरू हे दिसायला कितीही आकर्षक असले आणि आपल्याला त्यांना लगेच हातात घेण्याची इच्छा होते परंतु शेवटी ती एक कीटक आहे. ब-याच फुलपाखरांच्या अळ्यांच्या अंगावर एक विषारी केस असतात.
- नक्की वाचा: मी फुलपाखरू झाले तर निबंध
बरीचशी वयस्क फुलपाखरे आहेत जे विष्ठा टाकत नाहीत. मादी फुलपाखरू नरापेक्षा आकाराने मोठी असते व नरापेक्षा जास्त जगते. ईशान्य भारत फुलपाखरांच नंदनवन म्हणून ओळखलं जातं. गंधक प्रजातींच्या फुलपाखरांचं आयुष्यमान सर्वाधिक असतं ते साधारणतः नऊ ते दहा महिने जगू शकतात.
सर्वात छोटा फुलपाखरू हे सहा इंचाच असतं तर त्याच्याहून अधिक मोठ्या फुलपाखरू बारा इंचाच असतं परंतु न्यू गिन प्रजातीचे एक फुलपाखरू इतके मोठे असते की त्याच्या पंखांचा विस्तार हा जवळपास सत्ताविस सेमी इतका असतो. फुलपाखराला सर्वसाधारण चार पंख असतात परंतु जगातील सर्वात मोठ्या फुलपाखराला १२ पंख होते.
आपल्या महाराष्ट्रामध्ये फुलपाखरांच्या २२५ प्रजाती आढळून आल्या आहेत. त्यामध्ये शुभ्र पंखी काळू कडवा निळवंती भीर भीर सरदार नीलपरी छोटा चांदवा चित्त चिमणी बहुरूपी अशा अनेक प्रजातींचा समावेश आहे. महाराष्ट्र मध्ये आढळून येणारी फुलपाखराची मुख्य प्रजाती म्हणजे ब्ल्यू माॅर्मन हे फुलपाखरू दक्षिण भारतात देखील आढळते.
ह्या फुलपाखराचा रंग काळा असून त्यांच्या पंखांवर निळे ठिपके असतात आणि या फुलपाखराच्या पंखांचा विस्तार १५० मिमि इतका असतो. संत्री-मोसंबी ईडलिंबू यांसारख्या झाडांवर या फुलपाखरांची अंडी पाहायला मिळतात. डनायस क्रिसपीस म्हणजेच महाराष्ट्र मध्ये या प्रजातीला वाघऱ्या फुलपाखरू या नावाने ओळखले जाते.
मैदानी भागामध्ये आढळून येणार हे फुलपाखरू जवळपास तीनशे मीटर उंच टेकडीच्या झाडांवर अंडी देतात. या फुलपाखरांचा विस्तार ७० ते ८० mm इतका असतो या फुलपाखरांचे पंख भगव्या रंगाची असतात आणि त्यावर पांढरे ठिपके आढळून येतात. केसर ए हिंद ज्याचा शास्त्रीय नाव टिनोपाल्पस् इंपेरिआलिस आहे.
हे फुलपाखरू महाराष्ट्रात किंवा ईशान्य कडील सिक्कीम राज्यात कडील पूर्व दिशेला असणाऱ्या वनांमध्ये समुद्रसपाटीपासून २००० ते ३००० उंचावर असणाऱ्या टेकड्यांवर आढळून येतात व या फुलपाखरांच्या पंखांच्या मध्यभागी शेवटी बारीक बारीक शेपट्या असतात ज्यामुळे ही फुलपाखरं अतिशय आकर्षक दिसतात. फुलपाखराच्या शरीराची रचना सांगायची झाली तर फुलपाखरूचे शरीर हे तीन भागांमध्ये विभागले गेले आहे पहिला भाग म्हणजे फुलपाखराचं डोकं.
या भागात फुलपाखराचे डोळे व तोंड असतं दुसरा भाग म्हणजे वृक्ष आणि तिसरा भाग म्हणजे उदर फुलपाखराचे तोंड हे दिसायला सोंड सारखं दिसतं. फुलपाखराचे पाय हे टेस्ट रिसिपेटर असतात ज्यामुळे फुलपाखरू पदार्थांची चव ओळखू शकतो व त्यासोबतच कुठल्या झाडावर अंडी घालने योग्य राहील हे फुलपाखराला त्याच्या पायाच्या सहाय्याने समजत.
फ्रीअरिया टोचीलस या फुलपाखराची जात ज्याला मराठीमध्ये चिमणी या नावाने ओळखले जाते. फुलपाखरू भारतात पहायला मिळतं इतर फुलपाखरांच्या प्रजाती पेक्षा हे फुलपाखरू सर्वात लहान फुलपाखरू म्हणून प्रसिद्ध आहे. या फुलपाखरा मधील मादी तांबड्या रंगाची असते व नर निळा रंगाचा असतो. या फुलपाखराच्या पंखांचा विस्तार साधारणता १५ ते २२ mm इतका आहे.
याच प्रकारे भारतात व भारताबाहेर अर्थातच संपूर्ण विश्वात वेगवेगळ्या रंगाच्या प्रजातीचे आकर्षित असे फुलपाखरू आढळतात. फुलपाखरू च्या अशा अनेक प्रजाती आहेत आणि त्या प्रजातींची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. काळ्या रंगाचे फुलपाखरू ज्याची ब्लॅक बटरफ्लाय अशी विशेष ओळख आहे. या फुलपाखरू बद्दल सांगायचं झालं तर याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा फुलपाखरू आपल्याला कधीच पहायला मिळत नाही.
या फुलपाखराची एक अशी विशेष ओळख आहे ती म्हणजे हा फुलपाखरू ज्यावेळी आपला मृत्यू जवळ येतो त्यावेळी एकदा ना एकदा रस्ता कापतो प्राचीन काळापासून फक्त भारतातच नाही तर इतर देशांमध्ये देखील काळी मांजर जेव्हा आपला रस्ता ओलांडते तेव्हा त्याला अपशकुन अस मानला जात.
त्याच प्रमाणे जर आपला मृत्यू जवळ येणार असले तर हे फुलपाखरू म्हणजेच ब्लॅक बटरफ्लाय आपल्याला त्याच संकेत देत. फुलपाखराच मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रंगीबिरंगी व समजदार पंख सर्वांना आकर्षित करतात. फुलपाखराची स्पीकर ही प्रजाती इतक्या वेगाने उडू शकते की एखाद्या घोड्यालाही मागे टाकू शकते. परंतु वाढत्या प्रदूषणामुळे वैगरे फुलपाखरांच्या अनेक प्रजाती अदृष्य झालेल्या आहेत.
आम्ही दिलेल्या essay on butterfly in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर फुलपाखरू निबंध मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या butterfly information in marathi essay या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on butterfly in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये short essay on butterfly in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट