मी फुलपाखरू झाले तर निबंध मराठी Mi Phulpakhru Zale Tar Marathi Nibandh

मी फुलपाखरू झाले तर निबंध मराठी Mi Phulpakhru Zale Tar Marathi Nibandh – Essay On Butterfly in Marathi मला तर वाटतं की या संपूर्ण जगात असा कोणताही व्यक्ती नसेल, ज्याला फुलपाखरू आवडत नसेल. कारण, वेगवेगळ्या रंगांचे, निरनिराळ्या ठिपक्यांचे अन् विविध आकारांच्या रेषांचे पट्टे स्वतःच्या अंगावर पांघरूण, चहूबाजूंनी भिरभिरणारे फुलपाखरू खरंतर सगळ्यांनाच प्रिय असते. मला लहानपणी वाटायचं की फुलपाखरू हा पक्षीचं आहे, पण शाळेत गेल्यावर शिक्षकांच्या शिकवणीतून समजलं की फुलपाखरू हा पक्षी नसून एक कीटक आहे! हे ऐकुन तुम्हालाही थोडंसं आश्चर्य वाटलं असेलनां!

पण, खरंच मित्रांनो फुलपाखरू हा एक कीटक आहे जो दिवसा  जास्त क्रियाशील असतो. जास्तीत जास्त ठिकाणी हा कीटक विविध चमकदार रंगांचा आढळतो.

शिवाय, त्याच्या अंगावर वेगवेगळ्या आकारांचे पट्टे व अगदी  गोलाकार आकाराचे ठिपके, जणू एखाद्या कापडावर नक्षीकाम केल्यासारखे उमटलेले असतात. यांखेरीज, फुलपाखरे त्यांचे जेवण अनेक झाडांच्या पानांपासून मिळवतात आणि केवळ त्यावर ते स्वतःचे संपुर्ण आयुष्य जगत असतात.

Mi Phulpakhru Zale Tar Marathi Nibandh
Mi Phulpakhru Zale Tar Marathi Nibandh

मी फुलपाखरू झाले तर निबंध मराठी – Mi Phulpakhru Zale Tar Marathi Nibandh

फुलपाखरू निबंध मराठी – Essay On Butterfly in Marathi

आपल्या निसर्गचक्राप्रमाणे, फुलपाखरांचे देखील एक छोटेसे जीवनचक्र असते. त्यांच्या या जीवनचक्रामध्ये अंडी, अळ्या, सुरवंट आणि प्रौढ फुलपाखरू असे चार चरण आपल्याला पहावयास मिळतात. सुरुवातीला, फुलपाखरे व्यस्त फुलपाखरू बनण्यासाठी अंड्यातून मॅटमॉर्फोसिसच्या प्रक्रियेत जात असतात.

खरंतर मित्रांनो, जेंव्हा मादी  फुलपाखरू झाडांच्या फांदीवर किंवा पानांवर अंडी घालते, तेंव्हा त्यांच्यात वाढत असणारी सुरवंट अजुन वाढते आणि तेंव्हाच ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते. शिवाय, फुलपाखरांच्या वेगवेगळ्या प्रजातींनुसार, त्यांची अंडी सुद्धा वेगवेगळ्या रंगांची आणि आकारांची आपल्याला पाहण्यास मिळतात.

त्याचबरोबर, विभिन्न प्रजातींच्या फुलपाखरांची अंडी उबविण्याची वेळ देखील त्यांच्या वैयक्तिक प्रजातीनुसार बदलू शकते. शिवाय, फुलपाखरू हा कीटक दर आठवड्यात अंडी घालतो आणि या अंड्यांना उन्हाळ्याचा हंगाम हा सगळ्यात जास्त आनंददायक असतो अर्थात या हंगामात फुलपाखरांची अंडी लवकर फुटत असतात.

अशा प्रकारे, शेवटच्या टप्प्यात वेळ मिळाल्यावर सुरवंट आपल्या अंड्यातून बाहेर पडतात. याशिवाय मित्रहो, फुलपाखरांच्या जीवनचक्राचा सखोल अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की सुरवंटात चांगला डोस असतो. त्यामुळे, सुरवंट अंड्यातून बाहेर येताच, पाने खाण्यास सुरवात करतात.

शिवाय, या टप्प्यात असताना सुरवंट आपली त्वचा जवळजवळ चार ते पाच वेळा शेड करतात आणि त्यानुसार ते मोठ्या आकारामध्ये वाढत जातात. यांखेरीज मित्रांनो, आपण हेदेखील लक्षात ठेवले पाहिजेत की प्रौढ सुरवंटाचा आकार हा अंडी-सुरवंट संपूर्ण वाढल्यानंतर त्याचा जेवढा आकार असतो, त्याच्या आकारापेक्षा शंभर पट जास्त असू शकतो.

तसेच, सुरवंट हे प्युपामध्ये बदलतात आणि यांतील एक प्युपा म्हणजे एक प्रकारची चिलखत असते, ज्याच्या आतील भागांत सुरवंट हा शारीरिकरीत्या अधिक विकसित होत असतो आणि त्यासोबतचं व्यस्त फुलपाखरामध्ये रूपांतरित देखील होत असतो.

मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशा प्रकारच्या प्युपाची सुरवंटाला काय गरज असते? तर मित्रहो, अशा प्रकारची ढाल सुरवंटाला इतर कीटकांपासून स्वतःचे संरक्षण करायला मदत करत असते. शिवाय, फुलपाखराच्या जीवनचक्रातील हा टप्पा अनेक दिवसांपासून आपल्याला पहावयास  मिळतो.

यांखेरीज, फुलपाखरांच्या निरनिराळ्या प्रजातींमध्ये तर कालांतराने प्यूपाच्या बाह्य पृष्ठभागास एक अधिक मजबूत ढाल मिळतं असते आणि ही ढाल प्युपाला वन्य प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यास  मदत करते. खरंतर, प्यूपामध्ये सुरवंटातील पेशी, हात तसेच, अवयव बदलत असतात आणि त्याचे रूपांतर एका प्रौढ फुलपाखरामध्ये होत असते.

शिवाय, प्रौढ फुलपाखराचे शरीर प्युपामध्येच पूर्णपणे तयार होते आणि हळूहळू फुलपाखरू त्याच्यातून बाहेर यायला लागते. सुरुवातीला, फुलपाखरू हा कीटक त्याच्या  शरीराच्या इतर उर्वरित भागांपेक्षा अधिक नाजूक अश्या आकाराचा पहावयास मिळतो. यानंतरच्या टप्प्यात फुलपाखरू हेमोलिम्फ नावाचा एक पदार्थ काढतो. खरंतर, या पदार्थाने फुलपाखरांचे पंख मोठे आणि मजबूत होतात.

अखेर, फुलपाखराच्या प्रत्येक अंगाचा पूर्ण विकास झाल्यानंतर, फुलपाखरू हवेत उड्डाण करते. एकदा का फुलपाखरू उडण्यासाठी सक्षम झाले की ते  त्याचा नर किंवा मादी सहकारी शोधण्यासाठी भटकंती करते. अशा प्रकारे, फुलपाखरू हा अतिशय आकर्षक असा कीटक आहे. इतर किटकांपेक्षा भिन्न असलेला, सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेणारा हा कीटक खरंच किती सुंदर आहेना!

खरंतर, आपल्या सर्वांना आपल्या घराभोवती किंवा बागेमध्ये निरनिराळी फुलपाखरे भिरभिरताना किंवा गिरट्या घालताना अनेक वेळा सहजतेने पहायला मिळतात. जास्तीत जास्त फुलपाखरे ही बागेंमध्येच पहायला मिळतात. बहुतेक फुलपाखरे झाडांच्या पानांऐवजी त्यांचे खाद्य फुलांमध्ये असलेल्या रसांमधून देखील मिळवतात.

मित्रांनो, या कीटकांच्या पायांमध्ये चव टिकवून ठेवण्याची क्षमता असते. अनेक शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला आहे की आपल्या पर्यावरणात फुलपाखरांच्या जवळजवळ पंधरा हजार ते वीस हजार प्रजाती आढळल्या जातात.

यांतील, मोनार्क नावाचे फुलपाखरू हे खासकरून लांब फेरफटका मारण्यासाठी आणि स्थलांतरासाठी ओळखले जाते. शिवाय, हे फुलपाखरू दरवर्षी साधारणतः चार हजार किलोमीटर अंतराचा प्रवास करत असते. मित्रहो, फुलपाखरांना एकूण चार पाय असतात.

शिवाय, फुलपाखरे त्यांचे संपूर्ण जीवनचक्र अथवा त्यांच्या जीवनाचा प्रवास पूर्ण करण्यासाठी कित्येक आठवडे ते जास्तीत जास्त एका वर्षापर्यंतचा कालावधी घेऊ शकतात. खरंतर, फुलपाखरांच्या आयुष्याची आयुर्मर्यादा ही पूर्णपणे त्यांच्या प्रजातींवर अवलंबून असते.

मी फुलपाखरू झालो तर निबंधMi Phulpakharu Zalo Tar Nibandh Marathi

याशिवाय, प्रौढ फुलपाखरू हे त्याच्या पहिल्या उड्डाणावेळी सुरुवातीला जास्त वेळ घेते. हळूहळू त्याच्या पायात रक्ताभिसरण वाढत गेले की ते नंतरच्या प्रयत्नात सहजपणे उडू लागते. कारण, त्याचे शरीर खूप कोमल आणि लवचिक असते. शिवाय, त्याच्या शरीरापेक्षा त्याच्या पंखांचा आकार हा खूप मोठा असतो.

त्यामुळे, हवेमध्ये उडताना त्याला त्याच्या पंखांची खूप सहाय्यता होते. शिवाय, फुलपाखरे जे अन्न खातात, त्या अन्नाचा उपयोग ते पूर्णपणे आपल्या शरीरात ऊर्जा तयार करण्यासाठी करत असतात. याखेरीज, फुलपाखराला त्याच्या चार पायांप्रमाणे चार पंख देखील असतात. नवलाची बाब म्हणजे काही फुलपाखरांचे कान त्यांच्या पंखांवर असतात, शिवाय त्यांच्या पंखांमुळे त्यांना घारींपासून संरक्षण देखील मिळते.

खासकरून, फुलपाखरे त्या फुलांना अधिक आकर्षित करतात ज्या फुलांचे रंग लाल, पिवळे, गुलाबी अथवा जांभळे असे पहावयास मिळतात. बहुतेक सुरवंट ही शाकाहारी असतात आणि ती केवळ झाडे खात असतात.

साधारणतः फुलपाखरांचा आकार हा अर्धा इंच ते १२ इंच इतका असू शकतो. जास्तीत जास्त फुलपाखरे ही मुख्यत: तीन रंगांमध्ये जास्त आढळून येतात, ते रंग पुढीलप्रमाणे; लाल, हिरवा आणि पिवळा इत्यादी. शिवाय, उंच उड्डाण करणाऱ्या फुलपाखरांची गती ही ताशी १२ मैलांपासून ते ताशी २५ मैलांपर्यंत पहावयास मिळते.

जर फुलपाखराच्या शरीराचे तापमान हे ६ अंशांपेक्षा देखील कमी असेल, तर ते फुलपाखरु इतर फुलपाखरांइतके उडण्यास सक्षम राहत नाही. मित्रहो, अंटार्क्टिका हे पृथ्वीवरील एकमेव असे ठिकाण आहे, जिथे आपल्याला फुलपाखरांची कोणतीच प्रजात पहावयास मिळत नाही. मित्रहो, आपल्याला माहीत आहे की आपल्या शरीराचे सापळे हे आपल्या शरीराच्या आतील भागात असतात, परंतू फुलपाखरांचे सापळे मात्र त्यांच्या शरीराच्या बाहेर असतात.

आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आढळणाऱ्या अनेक प्रजातींच्या फुलपाखरांना वाघ्या, बिबळ्या कडवा, नीलपरी, ढाण्या कडवा, एरंड्या, काळू, पानपंखी, शुभ्रपंखी, सोनपंखी, छोटा चांदवा, नीलवंत, भिरभिरी, नखरेल मयुरी, चिनी, भटके तांडेल, सरदार, चित्ता, काळा राजा, तपकिऱ्या, निलपऱ्या भीमपंखी, कवड्या, हळदी, लिंबाळी, लालटोक्या, केशर टोक्या, गौरांग, भटक्या, स्वैरिणी, बहुरूपी, शेंदूर टोक्या आणि अक्कडबाज अशी विभिन्न नावे दिलेली आहेत.

खरंच मित्रांनो, आपण महाराष्ट्रीयन खुपचं भाग्यवान आहोत. कारण, आपल्या महाराष्ट्रात निसर्गानं निर्माण केलेलं बहुमोल सौंदर्य सहजपणे पाहता येतं, अनुभवता येतं! परंतू, यासोबत निसर्गाच्या या विलक्षणीय सौंदर्याची जपणूक करण्याची देखील आपली जबाबदारी आहे. त्यामुळे, आपण सर्वांनी या जबाबदारीचं भान ठेवून निसर्गाच्या वरदानाचा आस्वाद घेतला पाहिजेत.

                    तेजल तानाजी पाटील

                       बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या essay on butterfly in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मी फुलपाखरू झाले तर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mi phulpakhru zale tar marathi nibandh या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on butterfly in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mi fulpakharu zalo tar Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!