Essay on Navratri in Marathi नवरात्र उत्सव निबंध मराठी सण व उत्सव ही आपल्या भारताची ओळख आहे. भारतीय परंपरा, संस्कृती व सण उत्सव आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे. आपल्या भारतामध्ये प्रत्येक सण गुण्यागोविंदाने साजरा केला जातो. भारतामध्ये वर्षाचे बारा महिने सण साजरे केले जातात आणि सण कुठलाही धर्माचा असो साजरा करताना सर्व जातीय सर्वधर्मीय एकत्रित येवून अगदी आनंदाने व गुण्यागोविंदाने सण साजरा करतात. भारतामध्ये गणपती, दहीहंडी, गोकुळाष्टमी यासारखे अनेक सण अगदी मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात त्यातीलच एक म्हणजे नवरात्री.
नवरात्री हा हिंदू धर्मीयांचा सण आहे आणि मुख्यतः हा सण नऊ दिवस चालतो. या नऊ दिवसांमध्ये देवीची पूजा केली जाते आणि नाच गाणी केली जातात. भारतीय संस्कृतीनुसार नवरात्री या सणाला अतिशय महत्त्व आहे. नवरात्री या सणा दरम्यान दुर्गा देवीची नऊ दिवस पूजा केली जाते नवरात्री या शब्दाचा अर्थ अगदी सोपा आहे नऊ+ रात्र= नवरात्र. हा सण बऱ्याच भारतीयांचा आवडता सण आहे म्हणून संपूर्ण भारतामध्ये हा सण अतिशय धुमधडाक्यात साजरा केला जातो.
नवरात्र हा हिंदू धर्मीयांचा सण असून प्रत्येक भक्त हा सण अगदी भक्तिभावाने साजरा करतो. नवरात्री हा उत्सव प्राचीन काळापासून सुरू असलेला सण आहे व हा सण साजरा करण्याच एक सांस्कृतिक कारण म्हणजे, नेहमी सत्याचा विजय होतो हे दर्शवण्यासाठी हा सण साजरा केला जातो. प्राचीन कथांच्या अनुसार म्हैशासुर नावाचा एक राक्षस होता. महिषासुर हा राक्षस वाईट कामांसाठी ओळखला जातो. हा उर्मट उद्धट असा राक्षस होता.
एक दिवस महिषासुर राक्षसाने ब्रह्मदेवाची पूजा केली ब्रह्मदेवाची भक्ती केली बराच वेळ तप करून ब्रह्मदेव महिषासुर राक्षसावर प्रसन्न झाले. आणि महिषासुरा ने ब्रह्म देवाकडून वरदान मागून घेतलं की कोणताही दानव किंवा कोणताही देव त्याला मारू शकणार नाही. या वराचा चुकीचा फायदा घेऊन महिषासुर राक्षस देवांना त्रास देऊ लागला. लोकांना त्रास देऊ लागला इतकंच नव्हे तर महिषासुर राक्षसाने इंद्रपद देखील बळकावलं. कोणताही देव किंवा दानव महिषासुर राक्षसाला मारू शकत नव्हता म्हणून ही सर्व परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ लागली होती. आणि म्हणूनच देवांनी एकत्र येऊन दुर्गादेवीची निर्मिती केली.
दुर्गादेवीने सतत नऊ दिवस महिषासुर राक्षसाशी लढा दिला आणि त्याचा वध केला आणि दहाव्या दिवशी दुर्गा महिषासुर राक्षसावर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. दहाव्या दिवसाला विजयादशमी असेदेखील म्हटले जाते. शेवटी सत्याचाच विजय होतो हा संदेश या सणाच्या माध्यमातून पोहोचवला जातो. दुर्गा देवीला दहा हात आहेत. वर्षातून नवरात्री हा सण दोन वेळा साजरा केला जातो पहिल्यांदा नवरात्री ही चैत्र महिन्यामध्ये साजरी केली जाते तर दुसरी नवरात्री अश्विन महिन्यामध्ये येते. चैत्र म्हणजे मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये तर दुसरी नवरात्री ऑक्टोंबर मध्ये येते.
नऊ दिवस दुर्गा मातेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते भाविक नऊ दिवस उपवास ठेवतात. नऊ दिवस हा सण सातत्याने चालू असतो भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नवरात्री साजरी केली जाते. पहिला दिवस हा शैलपुत्री देवीचा असतो पहिल्या दिवशी पूजा केल्याने एक सकारात्मक प्रकारची ऊर्जा प्राप्त होते आणि म्हणूनच सर्व भाविक भक्त या ऊर्जेचा उपयोग आपल्या मनाच्या शांतीसाठी करतात.
नवरात्री चा दुसरा दिवस हा ब्रह्मचारी देवीची पूजा करण्यासाठी असतो दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारी या देवीच्या रूपाची पूजा केली जाते या जगामध्ये आपलं स्थान प्राप्त करणं आणि या जगात आपला ठसा उमटवणे हे याचं मुख्य उद्दिष्ट असतं. दुर्गा देवीच तिसर रूप म्हणजे चंद्रघंटा या रूपाची नवरात्रीच्या तिसर्या दिवशी पूजा केली जाते. देवीचं रूप हे चंद्रासारख चमकत असते आणि त्यामुळे देवीच्या या रूपाची पूजा केल्याने मनातील सर्व नकारात्मक विचार दूर होतात आणि माणसांमध्ये सकारात्मक विचार प्राप्त होतात.
या देवीची पूजा केल्याने मस्त, द्वेष यांसारखे विचारांशी आपल्याला लढण्याची ताकद देतात. कुशमंड या दुर्गा देवीच्या रूपाची चौथ्या दिवशी पूजा केली जाते. या देवीची पूजा केल्याने आपल्या मध्ये चांगले विचार शक्ती विकसित होते आणि त्यासोबतच या देवीच्या आशीर्वादामुळे आपल्या प्रगतीचा चांगला मार्ग निवडण्याची सद्बुद्धी मिळते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी संकादमता देवीची पूजा करतात. या देवीचे अन्य नाव म्हणजे कार्तिकी माता असे देखील आहे.
या देवीची पूजा यासाठी केली जाते की ही देवी आपल्या भक्तांना आंतरिक व्यावहारिक ज्ञान विकसित करण्याची शक्ती देते. कात्यायानी देवीची पूजा नवरात्री च्या सहाव्या दिवशी केली जाते ही पूजा केल्याने नकारात्मक विचार दूर होण्यास मदत होते सातवा दिवस हा दुर्गा देवीच्या कालरात्री रूपाची पूजा करण्यासाठी असतो. कालरात्री देवीचे रूप भक्तांच्या आयुष्यामध्ये प्रसिद्धी व आदर देते. नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गादेवीचं महागौरी या रूपाचं पूजन केलं जातं.
आणि नवरात्रीच्या नवव्या दिवशी दुर्गा देवीच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केली जाते. दुर्गा देवीच अन्य नाव म्हणजे महिषासुरमर्दिनी. दुर्गा देवीला महिषासुरमर्दिनी नाव देण्याचं कारण म्हणजे दुर्गा देवीने महिषासुर राक्षसाचा वध केला होता म्हणून मैशासुर राक्षसाचा वध करणारी देवी म्हणजेच महिषासुरमर्दिनी.
नवरात्री हा सण साजरा करण्याची प्रथा अगदी प्राचीन काळापासून सुरू आहे आपल्या घरांमध्ये भक्त कलश स्थापन करतात त्यासोबतच दर दिवशी दुर्गा पाठही वाचण्याची प्रथा आहे. या दिवशी फक्त फळांचे सेवन केलं जातं कारण भाविक या दिवशी देवीचा उपवास ठेवतात. आठवा दिवस हा दुर्गाष्टमी साजरी करण्यासाठी असतो आणि नवव्या दिवशी राम नवमी साजरी केली जाते. राम नवमी म्हणजे तोच दिवस जेव्हा श्रीरामाचा जन्म झाला होता.
भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये नवरात्री साजरी केली जाते परंतु गुजरात, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या सारख्या राज्यांमधील नवरात्री शरद ऋतूमध्ये साजरी केली जाते आणि या राज्यांमध्ये नवरात्री साजरी करण्याची एक वेगळी पद्धत देखील आहे. नऊ दिवस देवीच्या पुढे गरबा खेळण्याची पद्धत आहे प्रामुख्याने ही पद्धत गुजराती लोकांमध्ये पाहायला मिळते. गुजरात पासून सुरू झालेली पद्धत आता बऱ्याच राज्यांमध्ये पसरली आहे देवीसमोर गरबा नृत्य केलं जातं ज्याला आता दांडिया उत्सव असे देखील म्हणतात.
नवरात्रीच्या दिवशी अगदी नऊ दिवस भाविक आपल्या घरासमोर मातीच्या पणत्या जाळतात हे दृश्य अगदी भव्य दिव्य असतं. नवरात्रीच्या नऊ दिवशी देवीला वेगवेगळ्या रंगाची साडी नेसवली जाते तर नवरात्रीच्या दिवशी कन्या पूजन देखील केले जाते या पूजेमध्ये नऊ तरुण मुलींची पूजा केली जाते व त्यांना देवी मातेचे एक रूप समजलं जातं नऊ लहान मुलींना हलवा, पूरी, मिठाई, फळे इत्यादी खायला दिली जातात. नवरात्री हा सण पश्चिम बंगाल मध्ये दुर्गा महोत्सव म्हणून देखील साजरा केला जातो.
बंगाल मध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये नवरात्री साजरी केली जाते आणि तेही अतिशय वेगळ्या पद्धतीने दुर्गा देवीच्या प्रत्येक मूर्तीची पूजा केली जाते सगळीकडे वेगवेगळे मंडप दिव्यांचे थाट मांडलेले असतात. संपूर्ण वातावरण अगदी भक्तिमय झालेलं असतं बंगालमधील उत्साह ओसंडून वाहत असतो. बंगालमध्ये हा सण सहा दिवस साजरा केला जातो. नवरात्रीच्या दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो नवरात्री साजरं करण्याच्या अनेक पौराणिक कथा आहेत त्यातीलच एक कथा म्हणजे जेव्हा सीता माता रावणाच्या कैदी मध्ये अडकली होती तेव्हा श्रीरामाने रावणाच्या कैदेतून सीता मातेला बाहेर काढण्यासाठी दुर्गा देवीची पूजा केली होती.
आणि त्यासाठी श्रीरामाने नऊ दिवस १०८ कलमांची पूजा केली. आणि म्हणूनच दुर्गा देवी श्रीराम यांच्यावर खुश झाली आणि त्यांना विजय मिळवून दिला आणि म्हणूनच श्रीरामाने अहंकारी रावणाला ठार मारून टाकले आणि आणि म्हणूनच दहाव्या दिवशी रावणाच्या हत्येनंतर हा सण दसरा म्हणून साजरा करण्यात आला. अशाप्रकारे वर्षातून चार वेळा साजरी केली जाणारी ही नवरात्री शरद ऋतूमध्ये धुमधडाक्यात साजरी केली जाते.
नवरात्रीचे एकूण ४ प्रकार असतात आणि ते चार प्रकार म्हणजे शरद नवरात्री, चैत्र नवरात्री, मघा नवरात्री, आषाढ नवरात्री या चार प्रकारांपैकी शरद नवरात्री सर्वात सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय तसेच महत्त्वपूर्ण देखील आहे. नवरात्रीमध्ये भाविकांना खूप आनंद मिळतो शिवाय नऊ दिवस देवीची पूजा करायला मिळते आणि म्हणूनच सर्व घरांमध्ये वातावरण अगदी भक्तिमय झालेलं असतं शिवाय नकारात्मक विचारांना तर जागाच नसते सर्वत्र सकारात्मक विचार आणि प्रसन्नता पसरलेली असते आणि सगळ्या सणांमध्ये नऊ दिवस साजरा केला जाणारा हा एकमेव सण आहे त्यामुळे नवरात्री हा सण सर्वांनाच आवडतो.
आम्ही दिलेल्या essay on navratri in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर नवरात्र उत्सव निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या short essay on navratri in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on my favourite festival navratri in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये essay on navratri festival in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट