शहामृग वर निबंध Essay on Ostrich in Marathi

Essay on Ostrich in Marathi शहामृग वर निबंध आज आपण या लेखामध्ये शहामृग या पक्ष्यावर निबंध (essay on ostrich) लिहिणार आहोत. जगातील सर्वात मोठा पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहामृग या पक्ष्याला शुतुरमुर्ग या नावाने देखील ओळखले जाते. शहामृग हा जरी पक्षी असला तरी त्याला आकाश्यामध्ये म्हणजेच त्याला उडता येत नाही. शहामृग या पक्ष्याला इंग्रजी मध्ये ostrich या नावाने ओळखले जाते. शहामृग किंवा शुतुरमुर्ग हा पक्षी जरी पक्षी कुळातील असला तरी त्याला उडता येत नाही हे त्याचे दुखः आहे पण या पक्ष्याला जगातील सर्वात मोठा पक्षी म्हणून मानले जाते.

शहामृग हा पक्षी स्त्रुथिओनिफ़ोर्मेस या कुळातील असून या पक्षाचे वैज्ञानिक किंवा शास्त्रीय नाव हे स्त्रुथिओ कॅमेलस असे आहे. शहामृग या पक्ष्याचे वर्णन करायचे म्हंटले तर ते आकाराने इतर पक्ष्यान पेक्षा मोठे असतात. या पक्षायची उंची साधारण २.४ मीटर ते २.८ मीटर इतकी असते, लांब मान, आखूड चोच, पाय लांब आणि खूप मजबूत असतात शहामृग त्यांच्या लांब पायामुळेच उंच दिसत्तात आणि त्यांच्या पायामध्ये एवडी शक्ती असते कि त्यांनी पायाने दीलेल्य एका फटक्याने प्राणी किवा मनुष्य जखमी होवू शकतात.

या पक्ष्याचा मेंदू खूप लहान असतो बहुतेक तो आकाराने अक्रोड एवढा असतो तसेच शहामृग या पक्ष्याला दात नसतात आणि या पक्ष्याचे पंख हे २ मीटर लांब असतात आणि जरी हे पक्षी आपल्या पंखांचा वापर करून उडत नसले तरी या पक्ष्यांना त्यांच्या पंखांचा वापर हा पाळण्यासाठी होतो आणि हे पक्षी तासाला ६० ते ६५ मिलो मीटरचे अंतर पार करू शकतात.

तसेच या पक्ष्यांना पायाला दोन बोट असतात आणि दोन नखे असतात आणि त्यातील एक नख खूप शक्तिशाली असते आणि या पक्ष्यांचे पाय एवढे बळकट असतात कि ते मनुष्य किवा शिकारी प्राण्याचा जीव घेवू शकतात. या पक्ष्यांचे डोळे तपकिरी रंगाचे असतात.

तसेच नर शहामृग हे काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे असतात आणि मादा शहामृग तपकिरी रंगाची असते, त्यामुळे मादा शहामृग आणि नर शहामृग यांच्यातील फरक ओळखणे खूप सोपे असते. शहामृग या पक्ष्याचे वजन ६० ते १४० वर्ष इतके असते आणि हा पक्षी जंगलामध्ये ४० वर्ष जगू शकतो आणि ह पक्षी अभयारण्यामध्ये ४५ वर्ष जादू शकतो.

essay on ostrich in marathi
essay on ostrich in marathi

शहामृग वर निबंध – Essay on Ostrich in Marathi

10 Lines on Ostrich in Marathi

शहामृग हा पक्षी सध्या भारतामध्ये सर्व ठिकाणी आढळत असला तरी हा पक्षी मोठ्या प्रमाणात दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळतो आणि बहुतेक या पक्ष्याची उत्पत्ती हि दक्षिण आफ्रिकेमध्येचा झाली असावी. दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात शहामृग हे पक्षी आढळण्याचे कारण तेथील वातावरण हे शहामृग या पक्ष्यांना अनुकूल ठरत असावे.

शहामृग या पक्ष्यांच्या निवास्थान विषयी सांगायचे म्हटले तर हे पक्षी वाळवंट, सवाना किवा अर्ध शुष्क मैदान त्याचबरोबर वूडलॅंड या प्रकारची ठिकाणे आपले निवास्थान म्हणून निवडतात. शहामृग या पक्ष्याला रोज अन्न खावे लागते आणि शहामृग हा पक्षी सर्वभक्षी म्हणजेच हा पक्षी मांसाहारी तसेच शाकाहारी असे सर्व प्रकारचे अन्न खातो.

हे पक्षी गवत, फळे, वनस्पतीची पाने, धान्य, वनस्पतींची मुळे आणि सरडे, आणि यासारखे अनेक छोटे छोटे प्राणी खातो. त्याचबरोबर या पक्ष्याला सिंह, बिबट्या आफ्रिकन चित्ता आणि शिकारी कुत्री या प्राण्यांच्या पासून धोका असतो म्हणजे या पक्ष्याच शिकार हे प्राणी करू शकतात. शहामृग हे पक्षी कळपात राहतात ज्यामध्ये १० ते ५० पक्षी असतात आणि या कळपाला ‘फ्लोक’ असे म्हणतात.

शहामृग यांच्या कळपामध्ये एक नर शहामृग आणि सर्व मादा शहामृग असतात आणि यांच्यातील फरक हा आपण त्यांच्या रंगावरून ठरवू शकतो. विणीच्या हंगामध्ये नर शहामृग मादा शहामृगला आकर्षित करण्यासाठी आपला पिसारा फुलवतात आणि मादा शहामृगला आकर्षित करतात.

या पक्ष्यांची अंडी खूप मोठी असतात आणि त्या अंड्यांचे वजन कमीत कमी २ किलो इतके असते आणि हि अंडी १५ सेंटी मीटर लांब असू शकतात आणि हि अंडी मादा शहामृग घरट्यामध्ये घालते आणि हि अंडी जरी मोठी असली तरी शहामृगच्या घरट्यामध्ये मावू शकतात कारण शहामृग घरटे ३ मीटर लांब असते आणि मादा शहामृग एका वेळी १ ते २ अंडी घालू शकते आणि अंडी उबवण्याचा कालावधी हा ४५ ते ४६ दिवस असतो.

शहामृग ह्या पक्ष्याची पिल्ले हि जन्मानंतर कोंबडी एवढी असतात आणि शहामृगची पिल्ले ३ ते ४ वर्षांनी पूर्णपणे वाढतात. शहामृग या पक्ष्याच्या एकूण ९ जाती आहेत पण त्यामधील ६ ते ७ जाती नामशेष झाल्या आहेत. रेड नेक्ड शहामृग, अरेबिअन शहामृग, सोमाली शहामृग, सावुथ आफ्रिका शहामृग, मसाई शहामृग या प्रकारचे अनेक शहामृगाचे प्रकार आहेत आणि त्यामधील काही अजूनही आहेत, काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत तर काही पूर्णपणे नामशेष झालेले आहेत.

आपल्याला प्रश्न पडत असेल कि वेगवेगळ्या प्रकारचे शहामृग कोठे राहत असतील तसेच कसे दिसत असतील तर रेड नेक्ड शहामृग हे उत्तर आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात आणि शहामृग पक्ष्यांमध्ये या जातीचा पक्षी खूप उंच असतो या पक्ष्याची उंची ७ फुट असते. या पक्ष्याची मान साधारण गुलाबी रंगाची असते.

तसेच सोमाली शहामृग पूर्व आफ्रीकामध्ये आढळतात त्याचबरोबर हे पक्षी इथिओपिया, सोमालिया आणि केनिया मधेही आढळतात. या जातीमध्ये नर शहामृग पेक्षा मादी शहामृग आकाराने मोठे असते या पक्षाचे पंख पांढऱ्या रंगाचे असतात आणि मादा शहामृग चे पंख पांढऱ्या रंगाचे असतात आणि त्यावर तपकिरी रंगाच्या छटा असतात. सावुथ आफ्रिका शहामृग ला ब्लॅक नेक्ड शहामृग या नावानेही ओळखले जाते. ह्या प्रकारचे पक्षी आफ्रिका, नामिबिया, झिंबाब्वे, अंगोला आणि झांबिया या भागामध्ये आढळतात.

नर शहामृग काळ्या रंगाचा असतो आणि मादी शहामृग तपकिरी रंगाचे असते आणि अश्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे शहामृग हे दिसायला वेगवेगळे असतात तसेच त्यांची शारीरिक वैशिष्ठ्ये देखील वेगवेगळी असतात. अशी शहामृग किंवा शुतुरमुर्ग पक्ष्याची अनेक शारिरिक वैशिष्ठ्ये असतात जी आपण वर पहिली तसेच शहामृग कोठे राहतात आणि काय खातात या सर्व गोष्टींच्यावर आपण माहिती घेतली.

आम्ही दिलेल्या essay on ostrich in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शहामृग वर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ostrich essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि 10 lines on Ostrich in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये types of yoga information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!