Lion Essay in Marathi माझा आवडता प्राणी सिंह निबंध जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा सिंह हा प्राणी आपल्या सर्वांना माहितच आहे. हा प्राणी दिसायला रुबाबदार, देखना, बलाढ्य आणि हिंसक असतो म्हणजेच या प्राण्याला पाहताच भीती वाटावी अशी त्याची शरीर रचना असते. सिंह या प्राण्याने जंगलामध्ये एक डरकाळी फोडली सर्व जंगल भयाण होवून जाते म्हणजेच जंगलामधील सर्व प्राणी घाबरतात आणि म्हणूनच सिंहाला जंगलाचा म्हणजेच सर्व प्राण्यांचा राजा म्हणून ओळखले जाते तसेच सिंहाच्या डरकाळी मुले संपूर्ण जंगलाचे वातावरण बदलण्याचे कारण म्हणजे सिंहाच्या डरकाळीचा आवाज जंगलामध्ये ६ ते ७ मैलाच्या अंतरावर जातो.
सिंह हा प्राणी जंगलामध्ये असणाऱ्या नैसर्गिक गुहेमध्ये राहतात आणि ते सिंह आणि सिंहीण आणि त्यांची पिल्ली अश्या गटामध्ये राहतात. सिंह हा प्राणी दिसायला खूप देखना आणि बलाढ्य असतो म्हणजेच त्याचे शरीर हे दणकट आणि रुबाबदार असते तसेच त्याच्या चेहऱ्याच्या भोवतीने आणि मानेभोवतीने केस असतात त्याला आयाळ म्हणतात जे सिंहांच्यामध्ये असते आणि सिंहिणीला आयाळ नसते त्यामुळे नर सिंह आणि मादा सिंह ओळखणे खूप सोपे आहे.
माझा आवडता प्राणी सिंह निबंध – Lion Essay in Marathi
My Favourite Animal Lion Essay in Marathi
सिंह हा तपकिरी किंवा पिवासार रंगाचा असतो ज्याला चार पाया असतात आणि त्याच्या पायाला जी नखे असतात ती खूप तीक्ष्ण आणि धारदार असतात आणि ते पायांच्या नखांचा वापर करून त्यांचे शिकार फाडतात. तसेच त्यांचे पुढचे २ पंजे देखील खूप शक्तीशाली असतात आणि ते त्या दोन पुढच्या पंजाचा वापर शिकार पकडण्यासाठी वापरतात आणि म्हणूनच या प्राण्याला पंजाअॅटॅक शिकारी म्हणून देखील ओळखले जाते.
सिंहाला दोन मोठे डोळे असतात आणि त्यामुळे त्यांची नजर देखील खूप तीक्ष्ण असते त्यामुळे त्यांना रात्रीचे देखील दिसते आणि रात्री या प्राण्याचे डोळे चमकतात तसेच सिंहाच्या जबड्यामध्ये एकूण ३२ दात असतात आणि ते खूप धारदार असतात या दातांच्या मुले सिंहाला आपला आहार चांगल्या प्रकारे तोडता येतो आणि चावून खाता येतो. अशी या प्राण्याची एकदम आकर्षक शरीर रचना असते.
सिंह हा प्राणी आपण जरी जंगलामध्ये कधी पहिला नसला तरी हा प्राणी आपण मोठ्या अभयारण्यामध्ये किंवा मग सर्कशी मध्ये तरी पहिलाच आहे ज्याला सर्कशी मधील खेळांचे प्रशिक्षण दिले जाते आणि तो तसे खेळ लोकांच्या समोर करू दाखवतो. जर तुम्ही अभयारण्य किंवा सर्कशी मध्ये देखली प्रत्यक्षात सिंह पहिला नसेल तर टीव्हीमध्ये नॅशनल जीवोग्रफी किंवा डिस्कवरी अश्या प्राण्यांची माहिती देणाऱ्या टीव्ही चॅनल तरी सिंह हा सर्वांनी पहिलाच आहे.
त्यामुळे लोकांना समजण्यासाठी सिंहाचे जास्त वर्णन करावे लागत नाही. सिंह हा बहादूर आणि शूरवीर असतो आणि हे सिंहाचे गुण पाहून लोकांना देखील त्याच्यापासून बह्दुरातेची आणि शूरतेची प्रेरणा मिळते आणि म्हणूनच सिंहाला धैर्याचे प्रतिनिधित्व करणारा प्राणी समजले जाते त्याचबरोबर त्यांना धैर्य आणि रॉयल्टीचे एक प्रतीक मानले जातात.
Essay on Lion in Marathi
सिंह हा प्राणी मांसाहारी प्राणी आहे म्हणजेच हा प्राणी जंगलामध्ये असणाऱ्या प्राण्यांचा आणि जनावरांचा शिकार करून आपले पोट भरतात. हा प्राणी छोटे प्राणी, म्हशी, मृग, पक्षी, झेब्रा, वारथोग, हरीण, मासे यासारख्या अनेक प्राण्यांचा शिकार आपल्या शक्तीशाली पंजांनी करतो आणि त्याच्या तीक्ष्ण नखांनी तो शिकार फाडून खातो.
सिंह या प्राण्याला दिवसाला ८ ते ९ किलो इतके मांस गरजेचे असते म्हणजेच ८ ते ९ किलो हा त्याचा दिवसाचा आहार असतो तसेच ह्या प्राण्याने एकदा पाणी पिले कि त्याला ४ ते ५ दिवस पाणी नाही पिले तरी चालते. नर सिंहाला सिंह म्हणतात आणि मादी सिंहाला सिंहीण म्हणतात आणि त्याच्या केसांच्या आयाळ मुळे आपल्याला नर आणि मादी सिंहामधील फरक समजत येतो.
सिंहाला इंग्रजीमध्ये lion म्हणतात आणि सिंहिणीला lioness म्हणतात व सिंहिणीच्या पिल्लांना ‘छावा’ म्हणतात. सिहीनींचा प्रजनन कालावधी हा २ वर्षाचा असतो आणि दोन वर्षाने सिंहिणीला पिल्ले होतात आणि एका वेळी सिंहीण २ ते ३ पिल्लांना जन्म देवू शकते. सिंह १० ते १५ प्राणी असनाऱ्या कळपामध्ये राहतात ज्यामध्ये मादा, लहान नर आणि पिल्ले असतात.
ज्यावेळी पिल्ले मोठी होतात म्हणजेच ते आपला आपला शिकार करण्यास सक्षम बनतात त्यावेळी नर सिंह कळप सोडतात आणि आपला वेगळा कळप बनवण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये एक सिंह आणि जास्त सिंहीण आणि त्यांची पिल्ले असतात. सिंह हा प्राणी जंगलामध्ये १० ते १४ वर्षे जगतात आणि ते जर पकडले असतील तर ते २० वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकतात म्हणजेच जर सिंह अभयारण्यामध्ये किंवा सर्कशी मध्ये असतील तर ते २० वर्ष जगू शकतात कारण त्यांच्या शरीराला कोणतीही दुखापत होत नाही.
परंतु जंगलामध्ये सिंह १० ते १४ वर्ष जगण्याचे कारण हा जंगलामध्ये सिंहाला आपले पोट भरण्यासाठी शिकार करावे लागते तसेच आपल्या कळपाची किंवा ते जेथे राहतात त्या ठिकाणाचा बचाव करण्यासाठी त्यांना दुसऱ्या सिंहसोबत भांडण करावे लागते आणि भांडताना त्यांच्या शरीराला अबेक जखमा होतात आणि त्यामुळेच त्यांचे आयुष्य कमी होते. नर सिंहाच्या वयाचा चांगला अंदाज आपण त्याच्या मानेवरून घेवू शकतो जर त्याची मान जास्त काळी नसेल तर तो तरुण असतो आणि जर त्याची मान खूप काळी असेल तर त्या सिंहाचे खूप वय झालेले असते.
सिंह जर कळपामध्ये राहत असतील तर आपला शिकार आपण स्वता कधीच करत नाहीत तर ते आपल्या कळपाचा आणि आपल्या प्रदेशाचा बचाव दुसऱ्या नर सिंहापासून करतात तर शिकार हा कळपातील सिंहिणी करतात परंतु नर सिंह प्रथम खातात. परंतु या वरून असे दिसून येते कि सिंहाला पेक्षा अधिक शिकार हा सिंहिणीच करतात.
सिंह हा प्राणी जंगलामध्ये किंवा दलदलीच्या प्रदेशामध्ये राहणे पसंत करतात आणि सिंहांना दिवसातून एकूण २० तास तरी विश्रांती घ्यावी लागते आणि हे दिवसातील २० तास गुहेमध्ये विश्रांती घेतात आणि यावरून असे समजते कि सिंह हा प्राणी दिवसाचा जास्तीत जास्त वेळ विश्रांती मधेच घालवतो. सिंह या प्राण्याला वेगवान प्राण्यातील एक म्हणून ओळखले जाते कारण हा प्राणी तासाला ५० किलो मीटरचे अंतर पार करू शकतो तसेच या प्राण्याच्या डरकाळीला ‘गर्जना’ म्हणतात आणि हि गर्जना जंगलामध्ये ७ किलो मीटर दूर ऐकू येवू शकते.
सिंहांचे बघायला गेले तर पाच ते सहा प्रकार होते जसे कि आशियाटिक सिंह, बार्बरी सिंह, ट्रान्सव्हाल लायन, इथिओपियन सिंह, पांढरा सिंह, आफ्रिकन सिंह यासारखे अनेक प्रकार होते. सुमारे १०००० वर्षांपूर्वी युरेशिया तसेच अमेरिकेतही सिंह सापडले पण काळाबरोबर काही प्रजाती नामशेष झाल्या आता सिंहांचे दोनच प्रकार आढळतात ते म्हणजे आफ्रिकी सिंह आणि आशियाई सिंह.
आशियाई सिंह हे भारतामध्ये गुजरातमधील गिर वनक्षेत्रात टिकून आहेत आणि या सिंहाचे वजन १९० किलो इतके असते आणि सिंहीनिचे वजन १६५ किलो इतके असते तसेच ते १० फुट लांब असतात. आफ्रिकन सिंह हि एक मुख्य सिंहांची प्रजाती आहे आणि मुख्य प्रजातीच्या वेगवेगळ्या उपजाती आपल्याला आफ्रिकेमध्ये पाहायला मिळतात. आफ्रिकन सिंहाची वजन २२५ किलो इतके असते तर सिंहीनिचे वजन १६५ किलो इतके असते तसेच ते ११ फुट लांब असतात.
आम्ही दिलेल्या lion essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता प्राणी सिंह निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my favourite animal lion essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on my favourite animal lion in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये lion in marathi essay Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट