माझे आवडते फूल गुलाब निबंध – Essay On Rose in Marathi
माझे आवडते फूल निबंध – Essay On my Favourite Flower Rose in Marathi
तसं पहायला गेलं तर आपल्या लक्षात येईल की गुलाब ही वनस्पती एक बहुसांस्कृतिक स्वरूपाची वनस्पती आहे. शिवाय, ही वनस्पती जास्तीत जास्त ठिकाणी झुडूपांच्या आकारात वाढते. गुलाबाच्या वनस्पतीवर येणाऱ्या फुलांना गुलाब असे म्हटले जाते आणि प्रामुख्याने ही फुले सुवासिक असतात.
याखेरीज, गुलाबाच्या फुलाला इंग्रजीमध्ये Rose असे म्हटले जाते, तर दुसरीकडे गुलाबाच्या वनस्पतीला Rosa या नावाने ओळखले जाते. मित्रांनो, ही वनस्पती रोसासी या कुटुंबातील आहे. यांखेरीज, या वनस्पतीच्या प्रजातीची सर्व फुले अगदी कापसासारखी मऊ-मऊ आणि बर्फासारखी थंड राहतात. शिवाय, या वनस्पतीच्या शंभराहून अधिक प्रजाती आहेत.
परंतू, त्यापैकी आशियाई प्रजाती सर्वाधिक जास्त प्रमाणात आढळून येते. विशेष म्हणजे गुलाबाचे झुडूपं मूळतः युरोप आणि उत्तर अमेरिकेचे असल्याचे अनेक पुरावे सादर झाले आहेत. अनेक ठिकाणी गुलाबाची फुले खासकरून लाल रंगाची आढळून येतात.
परंतू असे असले तरी, गुलाबाचे फुल केवळ लाल रंगामध्ये एवढे आढळून येत नाही तर गुलाबी, केशरी, नारंगी, पिवळे आणि काळ्या रंगात देखील ते आढळते. ज्यावेळी गुलाबाचे फूल फुलते, त्यावेळी त्यातील तळाचा भाग हा निरनिराळ्या आकाराच्या पाकळ्यांनी व्यापलेला असतो. खरंतर, या पाकळ्या अतिशय कोमल आणि मुलायम असतात.
- नक्की वाचा: गुलाब फुलाची संपूर्ण माहिती
त्यामुळे, या कारणास्तव देखील गुलाबाचे फुल खूपच सुंदर आणि आकर्षक दिसते. याखेरीज, या वनस्पतीमध्ये बऱ्याच प्रकारची विविध काटेरी झुडूपं आहेत. तसेच, या झुडूपाच्या आकारामुळे गुलाबाची वनस्पती वर्षभर हिरवी राहते. याशिवाय, या वनस्पतीची उंची साधारणतः पाच ते सहा मीटर इतकी वाढते. या वनस्पतीच्या फांद्यांवर थोड्या-थोड्या अंतरावरती पुष्कळ काटे असतात.
परंतू, ही वनस्पती काटेरी असली तरी ती किंचित कमकुवत देखील आहे. एकंदरीत, जरी एखाद्या व्यक्तीने गुलाबाचा काटा हा स्वतःच्या हाताने काढायचा प्रयत्न केला, तरी त्या व्यक्तीला हा काटा सहजपणे काढता येईल.
मित्रहो, गुलाबाच्या झाडाची पाने ही गडद अशा हिरव्या रंगाची असून, ही पाने फांदीच्या दोन्ही कडांनी निघतात. शिवाय, ही पाने एकसारखी गोलाकार असून, त्याची काही पाने मात्र अंडाकृती आकाराची असतात. या दोन्ही आकारांच्या पानांना त्यांच्या कडांच्या बाजूंनी हलक्या स्वरूपाचे अगदी दातांसारखे दिसणारे पट्टे असतात.
शिवाय, या पानांचा वरचा भाग खूप गुळगुळीत असतो आणि तो किंचित प्रमाणात खालच्या बाजूस खणला असतो. मित्रहो, गुलाबाच्या फुलाला बाजारात जास्त मागणी असल्याने, याची लागवड जगातील बहुतेक सर्व प्रदेशांमध्ये केली जाते. तसेच, या वनस्पतीच्या बहुमोल सौंदर्यामुळे, भारतातील भरपूर लोक आपल्या घरामध्ये ही वनस्पती शोभेची वनस्पती म्हणून लावतात. यांखेरीज, जेंव्हा दोन प्रेमळ लोक पहिल्यांदा एकमेकांना भेटतात, तेंव्हा ते एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन त्यांच्यातले प्रेम व्यक्त करतात.
शिवाय, आपल्या भारत देशात सगळीकडे दिनांक ७ फेब्रुवारी रोजी गुलाब दिन हा ‘गुलाब दिवस‘ म्हणून साजरा केला जातो. खरंतर, यादिवशी प्रत्येक व्यक्ती एकमेकांना गुलाबाचे फुल अगदी आवडीने देतो. त्याचबरोबर, विविध प्रकारची सौंदर्य उत्पादने तयार करण्यासाठी अनेक कंपन्या गुलाबाचे फूल मोठ्या प्रमाणात वापरतात.
शिवाय, गुलाब फुलाच्या मनोवेधक सुगंधामुळे या फुलास आपल्या देशामध्ये ‘फुलांचा राजा’ असे मानाचे पद बहाल करण्यात आले आहे. आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे नेहमी आपल्या कोटच्या खिशात एक नवीन गुलाब परिधान करायचे. मित्रहो, गुलाबाच्या फुलाचा गुलकंद देखील बनवला जातो, जो खायला खूप चविष्ट आणि चवदार असतो. सौंदर्याने नटलेले गुलाबाचे फुल पूजा पठणामध्ये आणि लग्न समारंभात सजावट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
शिवाय, हे फूल इतके लोकप्रिय आहे की जर कोणी एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्याबद्दल स्तुती करीत असेल तर त्या संबंधित व्यक्तीस गुलाबाचे नाव देखील दिले जाते. यांखेरीज मित्रहो, अनेक नामांकित कवींनी लिहिलेल्या या फुलासंबंधीच्या विविध कविता आपणा सर्वांना सगळीकडे पहावयास मिळतात.
- नक्की वाचा: माझा आवडता प्राणी निबंध
प्रत्येक व्यक्तीला माहित आहे की गुलाब खूप किती सुंदर आहे! परंतु, बहुतेक लोकांना हे माहित नाही की गुलाबाचे किती रंग आहेत? गुलाबाचे किती प्रकार आहेत? याशिवाय, अनेकांना गुलाबाच्या सर्व रंगांचा अर्थदेखील माहीत नाही. चला तर मित्रांनो, आपण या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती जाणून घेऊयात.
खरंतर, जेंव्हा आपल्या मनात गुलाबाचे फूल तयार होते, तेंव्हा आपल्या डोळ्यांसमोर गुलाबाच्या फुलाचा एकच रंग उभा राहतो आणि तो म्हणजे लाल. पण, या रंगाशिवाय गुलाबाचे फुल हे अनेक रंगांमध्ये आढळते. त्यामुळे, गुलाबाच्या उर्वरीत सर्व रंगांबद्दलची माहिती आपण खालील भागांत पाहुयात.
लाल गुलाब
आपण वरील भागात पाहिले की जेंव्हा लोक आपले प्रेम व्यक्त करतात, तेंव्हा ते आपल्या प्रिय व्यक्तीला लाल गुलाब देतात. त्यामुळे, लाल रंगाचे गुलाब हे सगळ्यांसाठी नेहमीच प्रेमाचे प्रतीक बनून राहिले आहे. शिवाय, बहुतेक व्यक्ती ‘व्हॅलेंटाईन डे’ यादिवशी हे फुल आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला देतात.
निळा गुलाब
मित्रहो, निळा रंग हा शांततेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे, आपण जर एखाद्या व्यक्तीला शांततेचा संदेश देऊ इच्छित असाल, तर आपण त्या संबंधित व्यक्तीला निळा गुलाब देऊ शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या रागवलेल्या मित्राला अथवा नाराज असलेल्या मैत्रिणीला निळे गुलाब देऊन, तुमच्यातले मैत्रीचे नातेही मजबूत करू शकता.
पिवळा गुलाब
ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीला आपला खरा मित्र मानतो, त्यावेळी त्या मित्राला आपण पिवळे गुलाब देतो. जर तुमचा एखादा खरा मित्र असेल, तर तुम्हीदेखील तुमच्या मित्राला अथवा मैत्रिणीला पिवळे गुलाब देऊ शकता. यांखेरीज, जेंव्हा आपण एखाद्या आजारी व्यक्तीच्या तब्येतीबद्दल चौकशी करायला जातो, तेंव्हा आपण त्या व्यक्तीसाठी पिवळा गुलाब देखील घेऊन जाऊ शकतो.
हिरवा गुलाब
खरंतर, हिरवा गुलाब हा आनंदाचे प्रतीक मानला जातो. तसेच, हिरवा रंग हा सुखाचे प्रतीक देखील आहे. आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्या प्रगतीसाठी आणि आनंदासाठी शुभेच्छा द्यायला गेलेला असाल, तर त्या व्यक्तीला आपण हिरव्या रंगाचा गुलाब अथवा या रंगाच्या फुलांचा पुष्पगूच्छ भेट म्हणून देऊ शकतो.
केशरी (संत्रा) गुलाब
मित्रहो, केशरी गुलाब हा उत्साहाचे प्रतीक मानला जातो. जेंव्हा आपण उत्साहाने भरलेले असतो, तेंव्हा अशावेळी आपण आपल्यासोबत केशरी गुलाब ठेवू शकतो.
गुलाबी गुलाब
खरंतर, गुलाबी गुलाब हे अनेक ठिकाणी कौतुकाचे चिन्ह मानले जाते. जर आपल्यासाठी एखाद्या व्यक्तीने कोणतेही चांगले काम केलेले असेल, तर त्याबदल्यात आपण त्या व्यक्तीला गुलाबी गुलाब देऊ शकतो.
मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गुलाबाच्या वनस्पतीची लागवड कशा प्रकारे केली जाते? तर मित्रांनो, आजकाल सगळीकडे गुलाबाच्या वनस्पतीची लागवड करण्यासाठी सगळ्यांत प्रचलित असलेल्या ‘बियाणांची लागवड’ या पद्धतीचा अवलंब केला जातो. यांमध्ये, गुलाबाच्या बियाणांद्वारे गुलाबाची रोपे लावण्यासाठी जास्त प्रमाणात बियाणे घेतली जातात.
कारण, गुलाबाची वनस्पती केवळ ४० ते ५० टक्के इतक्याच बियाण्यांमध्ये वाढते आणि उरलेल्या अर्ध्या बिया या खराब होऊन जातात. आता गुलाबाच्या लागवडीसाठी योग्य वेळ कोणती? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर मित्रांनो, ही वेळ पूर्णपणे गुलाबाच्या विविधतेवर अवलंबून असते. कारण, वेगवेगळ्या प्रजातीनुसार विविध हंगामांमध्ये हे पीक घेतले जाते.
यापैकी बहुतेक बियाणे ही थंड हवामानामध्ये वापरली जातात. म्हणजेच, या बियाण्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये उपयोगात आणले जाते. शिवाय, पावसाळ्यात या पिकाच्या उत्पन्नाचे खूप चांगले निकाल मिळतात. परंतू, या बियाण्यांपासून रोपे तयार व्हायला सुमारे दोन ते तीन महिने इतका कालावधी लागतो.
तेजल तानाजी पाटील
बागीलगे, चंदगड.
आम्ही दिलेल्या essay on rose in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर माझे आवडते फूल गुलाब निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on rose flower in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on my favorite flower rose in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये children essay on rose in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट