माझा आवडता प्राणी निबंध My Favourite Animal Essay in Marathi

My Favourite Animal Essay in Marathi – Maza Avadta Prani Nibandh in Marathi माझा आवडता प्राणी निबंध मराठी माझ्या वडिलांना पाळीव प्राणी खूप आवडायचे. त्यामुळे आमच्या घरात कुत्रा, मांजर, गाई, म्हशी असे प्राणी असायचेच. माझ्या वडिलांनी टॉमी नावाचा कुत्रा पाळला होता. पण तो एक दिवस आजारी पडला आणि मरण पावला. त्यावेळी मी खूप लहान होते आणी त्यानंतर मी अजूनपर्यंत आमच्या घरी एकही कुत्रा नव्हता. एक दिवस मी आणि माझे बाबा बाजारामध्ये भाजी आणायला गेलो होतो. भाजी खरेदी करून परत येत असताना वाटेमध्ये एक कुत्रा ट्रकला धडक लागल्यामुळे रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला होता.

त्याच्या डोक्याला मार लागला होता त्यामुळे डोक्यातून रक्त बाहेर येऊन रस्ता लाल भडक झाला होता आणि त्याचे एक पिल्लू त्याच्या बाजूला उभा राहून भुंकत होते. त्याला पाहून असे वाटत होते की तो त्याच्या आईच्या आईच्या मदतीसाठी सर्वांच्याकडे विनवण्या करतो आहे. माझ्या बाबांनी हे सर्व पाहिले आणि ते लगेच त्याच्या मदतीसाठी धावले त्यांनी त्या जखमी कुत्र्याला लगेच डॉक्टरकडे घेऊन गेले पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

डोक्यातून खूप रक्त वाहून गेल्यामुळे त्याला डॉक्टर वाचवू शकले नाही. बाबांनी त्या कुत्र्याच्या पिल्ल्याकडे एक टक पाहिले आणि विचार केला की एवढ्या लहानश्या पिल्लाला जर आपण असेच सोडून दिले तर तो एक दिवस असेच वाहनांच्या गर्दीमध्ये हरवून जाईल म्हणून बाबा त्याला आपल्या घरी घेऊन आले. त्या दिवसापासून तो आमच्या कुटुंबाचा एक भागच बनला आहे.

my favourite animal essay in marathi
my favourite animal essay in marathi

माझा आवडता प्राणी निबंध मराठी – My Favourite Animal Essay in Marathi

माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी – Essay On Dog in Marathi

त्या दिवसापासून मी आणि ते पिल्लू दोघे एकत्र खेळायचो. बाबांनी त्याचे नाव टॉमी ठेवले. त्याच्या बरोबर खेळत असताना तो कधी माझा मित्र बनला समजलेच नाही. माणूस, पक्षी जसे या निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहेत तसेच प्राणी या निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या आजूबाजूला कुत्रा, मांजर, म्हशी, गाई, शेळी, घोडा असे अनेक प्राणी बघायला मिळतात आणि प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे.

तसेच माझी आहे ज्या दिवशी बाबा टॉमीला घरात घेऊन त्या दिवसापासून टॉमी हा माझा आवडता प्राणी आहे. माझी आणि टॉमीची आता खूप चांगली मैत्री झाली आहे. माझ्याबरोबर घरातल्या प्रत्येकाबरोबर त्याची मैत्री झाली आहे. तो आमच्या घरात सर्वांचाच लाडका आहे.

टॉमी दिसायला खूप सुंदर आहे. पांढऱ्या रंगाचे त्याचे अंग, काळेभोर पाणीदार डोळे, मऊ, लुसलुशीत, रुबाबदार शेपटी. तो शेपटी हलवत आयटीत चालतो की जसा एखादा मोठा साहेबच. त्याला एकदा पाहिले तर त्याच्याकडे पाहतच राहावे. त्याचे जेवण आमच्यासारखेच म्हणजे चपाती, भात, भाकरी आणि कधीकधी मांसाहारी पदार्थ. त्याला चपाती खूप आवडते. घरामध्ये त्याची बसण्याची जागा ठरलेली आहे.

तो अशा ठिकाणी बसतो की घरातील तीनही दरवाजामधून येणारा प्रत्येक व्यक्ती त्याच्या नजरेतून चुकत नाही. तो प्रामाणिकपणे, इमानदारीने आपले काम पार पाडतो. घराची राखण करतो. माझ्याबरोबर खेळतो. संध्याकाळच्या वेळी कुठे बाहेर फिरायला गेले तर माझ्या पाठोपाठ येतो. त्याच्याबरोबर खेळायला मला खूप आवडते.

त्याच्या बरोबर खेळत असताना मनात असलेला ताण-तणाव सर्व काही विसरून जातो. घरातील प्रत्येकाला त्याच्या इमानदारीवर एवढा विश्वास आहे की घरातील सर्वजण एखाद्या वेळी बाहेर फिरायला गेले तर घराची संपूर्ण जबाबदारी टॉमीवर असते. तो आमच्या घरासाठी पहारेकरी म्हणून काम करतो.

घरात अशा पद्धतीने वावरत असतो हे घर आमचे नाही त्याचेच आहे आणि त्याच्याच मूळे आम्ही सर्वजण चोरांची, गुन्हेगारांची भीती मनात न बाळगता बिनधास्तपणे राहतो.ज्या वेळेला मी शाळेत जातो त्या वेळी तो माझ्या पाठोपाठ येतो जसे लहान असताना बाबा मला शाळेत पोचवायला यायचे तसा तो आत्ता मला शाळेत पोचवायला येतो.

टॉमीचा आवाज खूप मोठा आहे. त्याचा आवाज ऐकूनच घरात कोणी येण्याचा विचारही करत नाही. जर एखादी व्यक्ती घरात आली तर ती व्यक्ती ओळखीची आहे की अनोळखी आहे हे टॉमी चटकन ओळखतो. जर व्यक्ती अनोळखी असेल तर टॉमी भुंकून भुंकून पूर्ण घर डोक्यावर घेतो.

हे तो फक्त वासानेच ओळखतो. मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही पण आम्ही जे बोलतो ते त्यांना लगेच समजते तसेच टॉमीलाही समजते. खेळत असताना दूरवर फेकलेला चेंडू आणायला सांगितले तर तो धावत जातो आणि चेंडू घेऊन येतो. आणि आता आम्हालाही त्याच्या भुंकण्याच्या आवाजावरून समजते की त्याला काय हवं आहे, काय नको आहे किंवा तो काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

जर त्यांना काही हव असेल आणि त्यांच्या भुंकण्याच्या आवाजाकडे आम्ही दुर्लक्ष करत असेल तर तो पायाजवळ ठेवून शेपटी हलवतो, आमच्या भोवती गोल गोल फेऱ्या मारतो, हळू आवाजात भुंकतो, नाहीतर मग अंगावर चढण्याचा प्रयत्न करतो. आंघोळीच्या बाबतीत मात्र तो फार आळशी आहे.

अंघोळीचे नाव ऐकताच तो दूर पळून जातो. सुरुवातीला खुप नाटक करतो पण एकदा अंघोळ घालायला सुरुवात केली कि आनंदाने उड्या मारत अंघोळ करतो. दुसऱ्या कोणत्याही प्राण्यापेक्षा कुत्रा आणि माणसाचे नाते हे दृढ आणि विश्वासाचे असते हे खरेच आहे.

कुत्र्याच्या अनेक प्रजाती आहेत. कुत्र्याचा उपयोग आपण अनेक कारणासाठी करतो. कुत्रा हा फार ईमानदार प्राणी आहे. एक वेळ माणूस आपली इमानदारी विसरून जाईल पण कुत्रा नाही. घराची राखण करण्यासाठी माणूस कुत्र्याला आपल्या घरामध्ये बाळगतो. तसेच थेरेपी डॉगसाठी सुद्धा कुत्र्याचा वापर केला जातो. आजच्या काळात चोऱ्या, गुन्हेगारी खूप प्रमाणात वाढली आहे म्हणून पोलीस सुद्धा गुन्हेगारांना, चोरांना पकडण्यासाठी कुत्र्याचा उपयोग करतात.

कुत्रे वासाचे विश्लेषण माणसापेक्षा चाळीस पटीने जास्त चांगल्या प्रमाणात करतात म्हणून गुन्हेगार, बॉम्ब शोधण्यात कुत्रा पोलिसांसाठी फार फायदेशीर आहे. कुत्रा हा फक्त घराची राखण करत नाही तर माणसाला एक मानसिक आधार देतो विरंगुळा देतो. कुत्रा हा फार पूर्वीपासून माणसाच्या सानिध्यात आहे.

मला एक बहीण एक भाऊ अशी भावंडे आहेत आणि त्यांच्यासारखाच टॉमी ही त्या भावंडांपैकी एक आहे. पण एके दिवशी रात्रीच्या वेळी भरपूर पाऊस पडत होता आणि आम्ही टोमीसाठी राहायला बांधलेल्या छोट्याशा घरामध्ये गळती पडली आणि टॉमी रात्रभर त्या पावसामध्ये भिजत राहिला पावसात भिजल्यामुळे त्याला दुसऱ्या दिवशी खूप ताप आला.

बाबा त्याला लगेच डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी त्याला निमोनिया झाला असल्याचे सांगितले. स्वतःचे काम इमानदारीने पूर्ण करणारा टॉमी निमोनियाला मात्र हरवू शकला नाही आणि तो आम्हाला सर्वांना सोडून गेला. तो गेल्यापासून असे वाटते की घरातील एक प्राणी नाही तर घरातील एखादा माणूसच कमी झाला आहे.

आम्ही दिलेल्या my favourite animal essay in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “माझा आवडता प्राणी निबंध मराठी” majha avadta prani विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maza avadta prani nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि my favorite animal essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण maza avadta prani essay in marathi या लेखाचा वापर my favourite animal dog essay in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!