Essay On Sane Guruji in Marathi साने गुरुजी निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये साने गुरु यांच्यावर निबंध लिहिणार आहोत. आज आपण साने गुरुजी यांच्या जीवन चारित्र्या विषयी, ते कोण होते आणि त्यांनी काय केले या बद्दल सर्व माहिती घेणार आहोत. साने गुरुजी हे नाव कोणाला माहित नाही असे नाही कारण हे नाव सर्वांना माहित आहे कारण ते एक लोकप्रिय साहित्यिक होते आणि त्यांच्या अनेक कविता आणि पुस्तके खूप प्रसिद्ध होती. चला तर आता आपण साने गुरुजी यांच्याविषयी जाणून घेवूयात.
एक लोकप्रिय साहित्यिक म्हणून ज्यांची ओळख होती असे साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ मध्ये महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावामध्ये झाला होता. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पाडुरंग सदाशिव साने असे होते पण त्यांच्या अनेक चांगल्या आणि लोकप्रिय कवितांच्यामुळे, पुस्तकांच्यामुळे आणि लेखांच्यामुळे त्यांचे नाव साने गुरुजी असे पडले आणि आता त्यांना साने गुरुजी या नावानेच ओळखले जाते.
साने गुरुजी निबंध मराठी – Essay On Sane Guruji in Marathi
Sane Guruji Essay in Marathi
साने गुरुजी यांच्या वडिलांचे नाव सदाशिव साने आणि आईचे नाव यशोदाबाई साने असे होते. साने गुरुजी यांच्यावर त्यांच्या आईचा खूप प्रभाव होता आणि त्यांच्या आईने त्यांच्यावर चांगले संस्कार घडवले होते. साने गुरुजी यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमळनेर या ठिकाणी असणाऱ्या प्रताप या हायस्कूल मध्ये ते एक शिक्षक म्हणून काम करू लागले आणि मग त्यांनतर त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आणि वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार कसा निर्माण करायचा तसेच या जगामध्ये सावाभिमानाने कसे जगायचे या बद्दल माहिती दिली किंवा मुलांना धडे दिले.
साने गुरुजी हे एक लोकप्रिय साहित्यिक तर होतेच परंतु यांना एक संवेदन शील स्वातंत्र्यसैनिक देखील होते आणि त्यांना देशाविषयी खूप अभिमान होता आणि ते एक महान देशभाकत देखील होते आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील अनेक चळवळींच्यामध्ये भाग घेतला होता. साने गुरुजी यांनी इ. स. १९२८ मध्ये ‘विद्यार्थी’ मासिक चालू केले. साने गुरुजी यांना सामाज्यामध्ये असणाऱ्या अस्पृश्यता रुढींच्या बद्दल खूप चीड यायची आणि त्यांना वाटायचे कि ह्या सर्व परंपरा मोडीस काढल्या पाहिजे.
साने गुरुजी हे अस्पृश्यता रूढी ( उदा : अस्पृश लोकांनी कोणत्याही मंदिरात जाऊ नये अशी पूर्वी प्रथा होती ) आणि समाजातील कर्मकांड या गोष्टींच्या विरोधात होते आणि त्यांना हे सर्व मोडून काढायचे होते म्हणून त्यांनी १९४६ मध्ये त्यांनी पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश आले. त्यांनी पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केले होते आणि या प्रयत्नांना यश मिळाले त्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळाला.
तसेच त्यांनी एक संवेदनशील स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम देखील केले त्यांनी इ. स. १९३० त्यांनी करत असलेली नोकरी सोडून त्यांनी सविनय कायदेभंग या चळवळीमध्ये भाग घेतला. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांना दुष्काळ प्रसंगामध्ये करमुक्ती मिळावी म्हणून काँग्रेस या साप्ताहिकामध्ये लेख लिहून प्रयात केले. त्याच बरोबर त्यांनी इ. स १९४२ मध्ये भूमिगत चळवळ आणि जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे झालेले कॉंग्रेसचे अधिवेशन यशस्वी रित्या पूर्ण करण्यास त्यांना यश मिळाले.
१५ ऑगस्ट १९४७ मध्ये आपल्या देशाला ब्रिटीशांच्यापासून स्वातंत्र्य मिळाले मग साने गुरुजींनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर त्यांनी समाजवादी पक्ष्यामध्ये प्रवेश मिळवला आणि मग त्यांनी इंटरऑपरेटिव्ह चळवळ चालू केली त्यामध्ये त्यांनी आपल्या देशातील लोकांना एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न केला म्हणजेच आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळी भाषा बोलणारे, तसेच त्यांच्या परंपरे नुसार वस्त्र घालणारी असे लोक होते.
आणि साने गुरुजी यांनी इंटरऑपरेटिव्ह चालवली मधून भारतातील वेगवेगळ्या जातीच्या, वेगवेगळ्या धर्माच्या आणि वेगवेगळ्या भाष्या बोलणाऱ्या अनेक लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि जरी आपली जात, धर्म वेगवेगळी असली तरी मानव हा एकच आहे आणि मानवता हाच खरा धर्म आहे असे त्यांनी सांगितले. साने गुरुजी हे जरी स्वातंत्र्य सैनिक असले तरी ते एक चांगले साहित्यिक आणि लेखक देखील होते आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनाची आवड देखील होती . ज्यावेळी त्यांनी कविता लिहिण्यास आरंभ केला त्यावेळी त्यांनी अनेक कविता लिहिल्या आणि त्यांची पहिली कविता म्हणजे
बलसागर भारत होवो | विश्वात शोभूनी राहो ||
राष्ट्रार्थ प्राण हे उरले | मी सिध्द माराया हो ||
ते सतत कोणत्या ना कोणत्या साप्ताहिकातून लेख लिहायचे आणि त्यांचे त्यांनी सुरु केलेले पहिले साप्ताहिक म्हणजे ‘विद्यार्थी’ साप्ताहिक होते त्यानंतर त्यांना ‘साधना’ हे साप्ताहिक सुरु केले मग त्यांनतर त्यांच्या अनेक कविता, लेख, पुस्तके, कादंबरी यासारखे आणि साहित्य पाहायला मिळाले. त्यांनी अनेक पुस्तके लहिली असतील म्हणजेच त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली आहेत आणि त्यामधील त्यांचे लोकप्रिय पुस्तक म्हणजे श्यामची आई हे आहे आणि हे पुस्तक ( कादंबरी ) आजही तितकेच लोकप्रिय आहे.
त्यांच्या साहित्यामध्ये समाज सुधारणा, मानवतावाद आणि देशभक्ती या विषयी साहित्य आहे म्हणजेच त्यांनी कविता, लेख, पुस्तके हि ह्याच विषयांच्यावर लिहिलेली आहेत. साने गुरुजी यांना संस्कृत, मराठी, तमिळ, बंगाली आणि इतर काही भाषा येत होत्या. त्यांनी सलग १५ महिने कारावास भोगला होता आणि त्यांनी त्यांचे बऱ्यापैकी लेखन हे तुरुंगामध्ये असतानाच केले आहे. तसेच त्यांनी आणखीन एक कविता लिहिलेली होती आणि ती देखील खूप लोकप्रिय आहे आणि ती म्हणजे
खरा तो एकची धर्म | जगाला प्रेम अर्पावे ||
जगी जे हीन अतिपतित | जगी जे दिन पददलित ||
अश्या प्रकारे साने गुरुजींनी भारताच्या इतिहासामध्ये अनेक मोलाची कामगिरी केली. त्यांनी अनेक स्वातंत्र्य चळवळींच्या मध्ये भाग घेतला तसेच भारताच्या साहित्यामध्ये मोलाची भर पाडली. साने गुरुजी हे भारताला लाभलेले संवेदनशील स्वातंत्र्यसैनिक आणि एक चांगले साहित्यिक होते. साने गुरुजी ( पांडुरंग सदाशिव साने ) हे ११ जून १९५० मध्ये मरण पावले. महाराष्ट्र राज्यातील रायगड या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या माणगाव या गावाजवळ वडघर हे गाव आहे आणि त्या ठिकाणी साने गुरुजींच्या स्मरणार्थ स्मारक उभारले आहे तसेच पुण्यामध्ये देखील साने गुरुजी यांच्या स्मरणार्थ स्मारक उभे केले आहे.
आम्ही दिलेल्या essay on sane guruji in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर साने गुरुजी निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Sane Guruji Essay in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि short essay on sane guruji in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट