15 ऑगस्ट मराठी भाषण 2023 15 August Speech in Marathi

15 August Speech in Marathi – Independence Day Speech in Marathi 2022 स्वातंत्र्य दिन भाषण 15 August Bhashan in Marathi १५ ऑगस्ट १९४७ म्हटलं की सर्व भारतीयांच्या डोळ्यासमोर भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस उभा राहतो. १५ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. ७४ वर्षांपूर्वी म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश ब्रिटीश राजवटीतून मुक्त झाला. म्हणूनच १५ ऑगस्टला संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारक, शूरवीर यासारख्या महान व्यक्तींनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इंग्रजांशी लढा दिला. या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांना स्वतःचे जीव देखील गमवावे लागले.

नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, खुदीराम बोस, शिरीषकुमार, मंगल पांडे, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपतराय, पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा हजारो क्रांतिकारकांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या बहुमोल योगदानामुळे आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला.

तिरंगी झेंडा फडफडे,

जय जय कार बोला!

१५ ऑगस्ट आज,

आमुचा भारत देश स्वतंत्र झाला!

15 August Speech in Marathi
15 August Speech in Marathi

15 ऑगस्ट मराठी भाषण 2022 – 15 August Speech in Marathi 

स्वातंत्र्य दिन भाषण – Independence Day Speech in Marathi

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी लाल किल्ला, दिल्ली येथे हजारो जनसंखेच्या उपस्थितीत भारताचा तिरंगी झेंडा फडकवला. त्यादिवसापासून दरवर्षी लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट या दिवशी आपल्या भारत देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते. आपल्या भारत देशाची राजधानी ‘दिल्ली’ येथे अनेक कार्यक्रम पार पडतात.

भारताच्या सैन्य दलांकडून परेड करण्यात येतात. अशा पवित्र दिवशी देशभर सर्व शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते. तसेच, सर्व शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण आणि ध्वजवंदन समारंभ पार पडतो. जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत लिहिले आहे.

भारताच्या स्वातंत्र्य दिवशी हे राष्ट्रगीत गाऊन ध्वजाला मानवंदना आणि सलामी दिली जाते. भारतातील अनेक ठिकाणी प्रभातफेरी काढून, या प्रभातफेरीमध्ये देशासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांच्या नावाचा जयघोष करण्यात येतो.

संपूर्ण भारत देश भारताच्या स्वातंत्र्याचा हा दिवस मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सणासारखा साजरा करतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते. आपल्या भारताच्या इतिहासात इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते.

१९ व्या शतकापासूनच सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. २० व्या शतकात महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने चले जाओ आंदोलन सुरू केले.

दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना असे लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर देखील वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली.

अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला.

त्यानंतर, स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताची राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा मोलाचा वाटा होता. प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले ‘जन गण मन’ हे भारताचे राष्ट्रगीत तर, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ह्यांनी लिहिलेले ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणून यादिवशी ठरवले गेले.

१५ ऑगस्ट १९४७ पासून संपूर्ण भारत देशात बहुतांश रेडिओ केंद्रावर तसेच दूरदर्शनवर देशभक्तिपर गाणी, कार्यक्रम, आणि चित्रपट लागतात.

खरंतर, आपल्याला प्रश्न पडायला हवा की आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस हा १५ ऑगस्ट या दिवशीच का साजरा केला जातो? आपला स्वातंत्र्य दिवस १४ ऑगस्ट किंवा १६ ऑगस्ट या दिवशी का साजरा केला जात नाही? तर मित्रांनो, यामागे अनेक कारणे आहेत. महात्मा गांधीजींनी भारत स्वतंत्र व्हावा यासाठी कितीतरी आंदोलने केली होती.

१५ ऑगस्ट १९४७ दिवशी ज्यावेळी भारत देश स्वतंत्र झाला तेंव्हा गांधीजी भारताच्या स्वातंत्र्याच्या उत्सवात सहभागी होत नव्हते. त्यावेळी, बंगालमध्ये दंगली होत होत्या. हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये कडाक्याचे वाद चालू होते. हे सांप्रदायिक वाद थांबावेत यासाठी दिल्लीपासून कितीतरी हजारो किलोमीटर दूर महात्मा गांधीजी बंगालमध्ये उपोषण करायला बसले होते.

जेंव्हा इकडे दिल्लीमध्ये निश्चित झालं की १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला, तेंव्हा पंडित जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी गांधीजींना एक पत्र लिहल. पत्रामध्ये त्यांनी लिहिले होते की १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र होणार आहे.

आपण भारत देशाचे राष्ट्रपिता आहात आणि म्हणूनचं राष्ट्रपिता या नात्याने आपल्या स्वातंत्र्यादिवशी आपण उपस्थित राहून सर्वांना आशिर्वाद आणि शुभेच्छा द्याव्यात, अशी गांधींजींना विनंती करण्यात आली. गांधीजींनी नेहरूंना पत्रामध्ये उत्तर देताना ठाम नकार कळविला.

पंडित जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पत्राच्या दिलेल्या उत्तरात ते म्हणाले होते की, येथे कोलकत्यात हिंदू आणि मुस्लिम एकमेकांचा जीव घेत आहेत आणि मी अशा गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कसा स्वातंत्र्य उत्सव साजरा करू!

येथील दंगे जोपर्यंत शांत होत नाहीत तोपर्यंत मला दिल्लीत येणे जमणार नाही. हे दंगे थांबवण्यासाठी माझा जीवही गेला तरी चालेल पण, मी हे दंगे थांबवणारच. शेवटी, गांधींजींशिवाय स्वातंत्र्य दिवस नाईलाजाने साजरा करण्यात आला. १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरु यांनी ‘ट्विस्ट वुईथ डेस्टिनी’ हे ऐतिहासिक भाषण आजच्या राष्ट्रपती भवन येथे दिलं खरंतर, तेंव्हा पंडित जवाहरलाल नेहरु भारताचे पंतप्रधान नव्हते.

त्यांनी मध्यरात्री दिलेलं भाषण महात्मा गांधीजींनी सोडून समस्त भारतवासियांनी ऐकलं होत. पुढच्या दिवशी अर्थात १५ ऑगस्ट १९४७ रोजी लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारतीय कार्यालयीन कामे उरकली. दुपारी पंडित नेहरू यांनी त्यांना आपापल्या मंत्री मंडळांची यादी सुपूर्त केली, यानंतर इंडिया गेट जवळ ‘प्रिन्सेज गार्डन’ येथे एक सभा बोलवली.

आपल्याला माहिती आहे की दरवर्षी स्वातंत्र्या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ला येथे आपल्या तिरंगी झेंड्याचे ध्वजारोहण करतात. मात्र, १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावर तिरंगी झेंड्याचे ध्वजारोहण पंडित जवाहरलाल नेहरु जे की त्यावेळी पंतप्रधान नव्हते त्यांच्या हस्ते करण्यात आले होते.

लोकसभा सचिवालयातील एका शोध पत्रानुसार १६ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला गेला होता. भारताचे तत्कालीन लॉर्ड माऊंटबॅटन यांचे सचिव कॅम्बेल जॉन्सन यांच्या सांगण्यानुसार मित्रदेशांसमोर जपान देशाने समर्पण केलं होत. या गोष्टीला १५ ऑगस्ट १९४७ रोजी दोन वर्ष पूर्ण होणार होती.

त्यामुळे, याचदिवशी भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत आणि पाकिस्तान देशांची सीमारेषा निर्धारित केली नव्हती. त्यामुळे या सीमारेषेचा निर्णय १७ ऑगस्ट १९४७ रोजी घेण्यात आला. भारत देश स्वतंत्र तर झाला होता मात्र भारताला स्वतःच अस राष्ट्रगीत जवळजवळ अडीज वर्ष नव्हतं.

रविंद्रनाथ टागोर यांनी जन गण मन फार पूर्वीच लिहंल होत तरीदेखील, त्याला भारताच राष्ट्रगीत बनायला अडीज वर्ष लागली. १९५० मध्ये ‘जन गण मन’ हे गीत राष्ट्रगीत म्हणून घोषित करण्यात आले.

१५ ऑगस्ट हा केवळ भारताचाच नव्हे तर, आणखीन तीन देशांचा स्वातंत्र्य दिवस आहे. दक्षिण कोरियाच्या तावडीतून जपान हा देश सुद्धा १५ ऑगस्ट १९४५ रोजी स्वतंत्र झाला होता. १५ ऑगस्ट १९७१ रोजी ब्रिटनच्या सत्ताधारीतून बेहरीन स्वतंत्र झाला तर, १५ ऑगस्ट १९६० रोजी फ्रांस देशाच्या कचाट्यातून कांगो स्वतंत्र झाला.

नक्की वाचा: गणेश चतुर्थी ची माहिती मराठीत 

अशा या शुभ दिवशी आपला भारत देश ही स्वतंत्र झाला आणि इंग्रजांचा झेंडा खाली उतरून आपला तिरंगी झेंडा सगळीकडे लहरू लागला. जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि स्वतःचे आयुष्य वेचणाऱ्या आपल्या थोर स्वातंत्र्य सैनिकांना आपण सर्वांनी यादिवशी आदरांजली वाहिली पाहिजेत.

सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी नंतर टप्याटप्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. अशा स्वतंत्र भारताचा नंतर सुंदर असा तिरंगा झेंडा तयार करण्यात आला.

आपल्या तिरंगी झेंड्यामध्ये तीन रंगांचे पट्टे तयार करण्यात आले, यामध्ये सगळ्यात वरचा पट्टा केशरी रंगाचा, मधला पट्टा पांढऱ्या रंगाचा आणि सगळ्यात खालचा पट्टा हिरव्या रंगाचा तयार करण्यात आला.

उत्सव तीन रंगांचा,

आभाळी आज सजला.

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,

ज्यांनी भारत देश घडविला! “

महात्मा गांधीजींच्या अहिंसावादी धोरणातून आणि विचारसरणीतून ‘सविनय कायदेभंग’ करण्यात आला, ‘छोडो भारत’ आंदोलन करण्यात आले. खरंतर, अनेक आंदोलने, चळवळी, उठाव आणि सत्याग्रह यांच्या माध्यमातून आपल्या भारतीयांनी इंग्रजांविरुध्द संघर्ष केला. त्यांनी अगणित वेदना सहन केल्या म्हणून आज आपण निवांत आणि सुरक्षित आयुष्य जगत आहोत.

त्यांनी जर त्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हालअपेष्टा सोसल्या नसत्या, इंग्रजांविरुध्द संघर्ष केला नसता तर आजही आपण ब्रिटिशांच्याच गुलामगिरीत असतो. महात्मा गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा या तत्वांनी संपूर्ण भारतीय समाजाला कुणालाही हिंसा न पोहचवता, कुणाशीही खोटं न बोलता, शांततेत देखील आपल्या शत्रुविरुद्ध संघर्ष करून तो यशस्वीपणे पार पाडू शकतो.

असा अमूल्य संदेश महात्मा गांधीजींनी आपणा सर्वांना दिला आहे. भारतीय स्वातंत्र्याचा हा लढा दीर्घकालीन आणि खूप संघर्षाचा होता. शेवटी, आपल्या कित्येक भारतीयांनी दिलेल्या बलिदानामुळे आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि आज आपण स्वतंत्र देशात रहायला लागलो.

स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो,

सूर्य तळपतो तेजाचा.

स्वातंत्र्याचा पराक्रम गाजतो,

सर्वत्र होऊन गाजावाजा. “

–  तेजल तानाजी पाटील

बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या 15 august speech in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “15 ऑगस्ट मराठी भाषण “ 15 august bhashan in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या 15 august speech in marathi for child या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि 15 august speech in marathi 2022 माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण 15 august in marathi language या लेखाचा वापर independence day speech in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

6 thoughts on “15 ऑगस्ट मराठी भाषण 2023 15 August Speech in Marathi”

    • प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!
      पुढच्या वेळी आम्ही या गोष्टीचा विचार करू
      अशाच नवीन माहिती करिता भेट देत रहा ..

      उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!