गॅलिलिओ गॅलिली माहिती Galileo Galilei Information in Marathi

Scientist Galileo Galilei Information in Marathi गॅलिलीओ गॅलिली हे इटली या देशातील एक महान तत्त्वज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते. त्यांना त्यांच्या वडिलांनी मुक्त विचार करण्याची महत्वपूर्ण शिकवण दिली, त्यामुळे ते एक महान वैज्ञानिक बनू शकले. आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी खगोल विज्ञान क्षेत्राला एक नवीन दिशा दिली. गॅलेलियो गॅलिली यांनी युरोप देशांत वैज्ञानिक क्रांती करीत खूप महत्त्वपूर्ण योगदान दिले. म्हणून त्यांना ‘आधुनिक खगोल विज्ञानाचे जनक’ आणि ‘आधुनिक भौतिक शास्त्राचे जनक ‘ म्हटले जाते. galileo biography in marathi या लेखात आपण त्यांची थोडक्यात माहिती घेणार आहोत.

galileo galilei information in marathi
galileo galilei information in marathi

गॅलिलिओ गॅलिली मराठी माहिती – Galileo Galilei Information in Marathi

गॅलिलीओ गॅलिलीमाहिती
जन्म15 फेब्रुवारी 1564
जन्म ठिकाणपिसा, इटली
मृत्यू8 जानेवारी 1642
फील्ड्सगणित
सन्मानत्यांच्या हाताचे बोट हे इटलीच्या एका संग्रहालयात जपून ठेवले आहे.

जन्म  आणि बालपण :  

गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1564 साली पिसा, इटली येथे झाला.  त्याच्या सात भावंडांपैकी तो सगळ्यात मोठा होता. त्याचे वडील संगीतकार होते तसेच त्यांचा लोकर व कापड विकण्याचा उद्योग होता. गॅलिलिओ त्यांच्या वडिलांच्या प्रभावाखाली संगीत रचनानाही करू लागला होता. गॅलिलीओ यांनी ग्रीक, लॅटिन,तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास केला. त्यांना चित्रकला, संगीत आणि काव्य यांचीही आवड होती

शिक्षण :   

गॅलिलिओने पहिली चार वर्षे शिक्षण भिक्षूंच्या मठात घेतले. त्यानंतर ते फ्लोरेन्स या शहरात गेले. गॅलिलिओने डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती म्हणून  पिसाच्या विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी धडपड सुरू केली.  इच्छा नसूनही गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण चालू झाले. वैद्यकीय शिक्षणात  त्यांना यश आले नाही त्यांची खरी ओढ गणिताकडे होती.  तेथेच त्यांनी ॲरिस्टॉटल यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला.

अध्यापन :   

गॅलिलिओला  मित्राच्या मदतीने पिसा विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापकाची नोकरी मिळाली. त्याचे विद्यापीठातले पहिले लेक्चर प्रचंड गाजले. इथल्या वातावरणात  गॅलिलिओ खूपच खुलला.

गॅलिलिओचे शोध :   

यांनी तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला  होता तरीसुद्धा त्यांची वृत्ती धार्मिक भावना सोबत जोडली गेली होती. असे असले तरी ते आपल्या प्रयोगाच्या प्रत्यक्षिकरण करताना जुन्या मान्यताच्या विरुद्ध जाऊन त्यांची पूर्णपणे व्याख्या करीत.

पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण  :  

इटली येथील  किनाऱ्यावर बसून ते समुद्राच्या लाटांचे निरीक्षण करीत असत. समुद्राच्या लाटांची उंची कशी वाढते किंवा कसे घटते तसेच समुद्राला कशाप्रकारे भरती ओहोटी येते या सर्व गोष्टींचे ते बारकाईने निरीक्षण करत.  समुद्राला येत असलेल्या भरती आणि ओहोटीच्या निरीक्षणाच्या माध्यमातून त्यांनी पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण याचा सिद्धांत मांडला.  

त्यांच्या सिद्धांतानुसार समुद्राला येत असलेली भरती आणि होती ही पृथ्वीच्या परिवलन आणि परिभ्रमण यामुळेच होते  परंतु केपलर यांनी गॅलिलिओ गॅलिली यांचा समुद्राच्या बाबतीत असलेला सिद्धांत मोडीत काढून समुद्राला भरती आणि ओहोटी ही चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे येत असल्याचे प्रतिपादन केले.

लंबकाचे घड्याळ :  

एका प्रवचना दरम्यान  गॅलिलिओने उंच झोके घेणारे एक झुंबर पाहिले आणि त्याला एकदम ब्रेनवेव आली.   त्याने लगेच प्रयोग सुरू केले. झोका लहान असो वा मोठा किंवा लंबकाचे वजन कमी असो वा जास्त त्याच्या एका आंदोलनाला सारखाच वेळ लागतो हा निष्कर्ष त्याने काढला. दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनाला लागणारा वेळ बदलतो हेही त्याला कळले.

सगळ्या प्रयोगासाठी त्याने त्याकाळी घड्याळ नसल्याने वेळ मोजण्यासाठी हाताची धडधड करणारी नाडीचे वापरली होती.  याच लंबकाचा वापर गॅलिलिओने’ नियम ‘मांडण्यासाठी केला. 1639 साली त्यांनी गती संबंधी एक महत्त्वाचा शोध लावल्यावर लंबकाचा घड्याळात उपयोग होऊ लागला. 

1593 साली त्याने साधा हवेचा  तापमापक तयार केला. त्यात सुधारणा करून त्यांनी अल्कोहोलचा तापमापक बनवला. त्यांनी चुंबकावर प्रयोग करून चुंबकासंबंधी काही शोधही लावले. त्यांनी पदार्थाच्या बदलासंबंधी चे प्रयोग केले होते. काही प्रमाणात त्यांनी पदार्थाची मूळची स्थिर किंवा गतिमान अवस्था न बदलण्याच्या प्रवृत्तीचे नियम शोधून काढले होते, तर समतोलाचे नियम त्यांच्या संशोधनावर आधारलेले आहेत.

1856 साली त्यांनी वस्तूचे द्रवातील वजन करण्याचा तराजू शोधून काढला व त्यावर लेख लिहिला. तसेच त्या तराजूने घनपदार्थांचे विशिष्ट गुरुत्व काढण्यास कसा उपयोग होतो हेही दाखवून दिले. पिसा विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्यांनी पुढील दोन-तीन वर्षांमध्ये नवनवीन प्रयोग करून त्यांनी पदार्थांच्या गती संबंधीचे नियम प्रस्थापित केले.

फेकलेल्या वस्तू च्या प्रक्षेपणाचा मार्ग ॲरिस्टॉटल यांच्या मताप्रमाणे भूपृष्ठाला समांतर नसून तो त्याला पॅराबोलीक असतो  असे  त्यांनी सांगितले  आणि प्रक्षेपक गतीचे गणिताने स्पष्टीकरण देऊन खात्रीही करून दिली. हलक्या वस्तू च्या मानाने जड वस्तू लवकर खाली पडेल असे अरिस्टॉटल यांचे म्हणणे होते परंतु गॅलिलिओ यांनी असे सांगितले की भिन्न वजनाच्या वस्तूंचा पडण्याचा वेग सारखाच असतो.  

या मताच्या स्पष्टीकरणासाठी त्यांनी भिन्नभिन्न वजनाच्या वस्तू एकाच वेळी वरून खाली टाकल्या असता त्या जमिनीवर एकाच वेळी पोहोचल्या.  त्यांनी 1604  साली  ज्योतिषशास्त्राचे खरे अध्ययन सुरू केले. त्यांनी दुर्बिन बनवण्यास सुरुवात केली आणि विकलीही. प्रथम वस्तूची प्रतिमा मोठी करण्याची क्षमता तीन होती.  

बत्तीस पर्यंत वाढवण्यात ते यशस्वी झाले. ज्योतिषशास्त्र साठी त्यांनी सर्वप्रथम दूरदर्शकचा उपयोग केला. 1610 साली  ते फ्लोरेंस विद्यापीठाचे आजीव प्राध्यापक झाले. गुरुचे चार मोठे व तेजस्वी उपग्रह शोधून काढले.दूरदर्शकातून त्यांना  तारकासमूह डोळ्यांनी दिसतात त्यापेक्षा जास्त आहेत असे आढळले आकाशगंगेत असंख्य तारे दिसले.

दूरदर्शकातून त्यांनी शुक्र बुध आणि मंगळ यांच्या कला पाहिल्या आणि शनी लंबगोल दिसल्याचे सांगितले. गॅलेलियो गॅलिली हे सूर्यावरील डागांचे निरीक्षण करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. त्यांनी या डागांचे निरीक्षण करून सूर्याला स्वतःभोवती एक फेरी मारण्यास सत्तावीस दिवस लागतात असे सांगितले.

त्यांनी धूमकेतूंच्या  भ्रमनाविषयी शोध लावला. विश्वातील सर्व पदार्थांमध्ये एक प्रकारचे आकर्षण असते हे गॅलिलिओ यांना कळले होते. हेच पुढे न्यूटन यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमांना आधारभूत ठरले. पृथ्वीचे स्थान  विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्यांनी गणिताने सिद्ध केले. त्यांनी असा शोध लावला की चंद्राचा पृष्ठभाग हा गुळगुळीत नसून पर्वत आणि विवरामुळे खडबडीत आहे.

पूर्वीच्या काळी वादविवादाच्या माध्यमातून आपला प्रयोग सिद्ध करून दाखवण्याची प्रथा अस्तित्वात होती परंतु गॅलिलिओ यांनी आपले संशोधन प्रयोगाच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवले.  ग्रीक तत्वज्ञानी अरिस्टोटल यांनी मांडलेल्या अनेक गोष्टी गॅलिलीओ गॅलिली आपल्या दुर्बिणीच्या साह्याने पाहत असत.

त्यामुळे गॅलिलिओ गॅलिली यांच्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाला. लोकांच्या मनात त्यांच्या प्रती ते आपल्यावर काहीतरी जादूटोणा करीत असल्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे ॲरिस्टॉटल यांच्या समर्थकांमध्ये गोंधळ उडाला. गॅलिलिओ यांनी आपल्या सिद्धांतांवर आधारित पुस्तक लिहिल्यामुळे पोप यांनी त्यांचे पुस्तक प्रकाशित होऊ दिले नाही व त्या पुस्तकावर बंदी घातली.

तसेच गॅलिलिओ यांना चौकशी समिती समोर उभे केले. त्यांना एखाद्या कैद्याप्रमाणे वागणूक देऊन त्यांना कैद करण्यात आले. त्यांनी कैदेत असताना ‘ टू न्यू सायन्सेस ‘ या पुस्तकाचे लिखाण केले आणि गुप्तपणे ते पुस्तक हॉलंड या शहरात पाठवून प्रकाशित केले. कैदेत असताना त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना त्यांच्या घरीच कैदेत ठेवण्यात आले. गॅलिलीओ गॅलिली यांना त्यांच्या मृत्यूच्या पाच वर्ष आधी अंधत्व आले होते.

मृत्यू :  

गॅलिलिओ गॅलिली यांचा मृत्यू 8 जानेवारी 1642 साली  इटली येथे झाला.

सन्मान :  

गॅलिलिओ गॅलिली हा आधुनिक शास्त्रज्ञ म्हणता येईल.  त्याच्या  हाताचे बोट हे इटलीच्या एका संग्रहालयात जपून ठेवले आहे.

वरील सर्व मजकूर पाहून आपणास अंदाज लागला असेल कि गॅलिलिओ गॅलिली कोण होते galileo galilei information in marathi language त्यांनी कशाचा शोध लावला व त्यांचा इतिहास काय आहे. scientist galileo galilei information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच galileo biography in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही गॅलिलिओ गॅलिली या शास्त्रज्ञाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या information about galileo galilei in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!