गणपतीपुळे मंदिर माहिती Ganpatipule Temple Information in Marathi

Ganpatipule Temple Information in Marathi गणपतीपुळे मंदिर कोणत्याही कार्याची सुरवात करताना गणरायाची प्रार्थना करण्याची आपली संस्कृती आहे असं म्हणतात जर आपण एखादं काम गणपतीची पूजा, प्रार्थना करून केली तर त्या कामामध्ये कधीच अडथळा येत नाही म्हणूनच गणपतीच दुसरे नाव आहे विघ्नहर्ता कुठलेही विघ्न पार पडताना कधीच अडथळा येत नाही. म्हणूनच आजच्या ब्लॉग मध्ये आपण गणपतीपुळे या मंदिराची माहिती घेणार आहोत.जसे प्रत्येक धार्मिक स्थळामागे काही तरी महत्व असतं. त्यांचा काहीतरी इतिहास किंवा महिमा असतो तशीच या स्थळाची सुद्धा एक वेगळीच कहाणी आहे ती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

ganpatipule temple information in marathi
ganpatipule temple information in marathi

गणपतीपुळे मंदिर माहिती – Ganpatipule Temple Information in Marathi

गणपतीपुळे मंदिरमाहिती
मंदिराचे नावस्वयंभू गणपती मंदिर
उत्सव, यात्राभाद्रपदी उत्सव
मंदिर कोठे आहेगणपतीपुळे हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात
मंदिर कोणी बांधले
दर्शन वेळसकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत
पाहाण्यासारखी ठिकाणेमालेश्वर हे प्रसिद्ध शिवमंदिर, मालगुंड ही मराठी कवितेची राजधानी, गणपतीपुळे समुद्रकिनारा

मंदिराचा इतिहास :

जसे प्रत्येक धार्मिक स्थळामागे काही तरी महत्व असतं. त्यांचा काहीतरी इतिहास किंवा महिमा असतो तशीच या स्थळाची सुद्धा एक वेगळीच कहाणी आहे. लोकप्रिय स्वयंभू गणपती मंदिर म्हणजेच गणपतीपुळे. रत्नागिरी जिल्ह्यात‌ स्थित असलेल हे मंदिर सुमारे पाचशे वर्ष जुन आहे. असं म्हटल जात की ह्या मंदिरात गणपतीची स्थापना करण्यात आली नव्हती तर स्वतः भगवान गणपती येथे प्रकट झाले होते. मंदिरामधील गणपतीची मूर्ती पांढऱ्या रंगाची असून ही मूर्ती अनेक भक्तांना आकर्षित करते. श्रीगणेश ही आद्य देवता आहे.

भारतातील हिंदू संस्कृती ही प्राचीन संस्कृती मधली एक आहे. पुराण सिद्धांत मधून असे सांगितले जाते की हिंदु संस्कृतीच्या विश्वाच्या तळाशी ओमकार स्वरूप कारणीभूत आहे. श्रीगणेश हे ओमकाराचे स्वरूप आहे संपूर्ण आशियात आणि प्रमुख करून दक्षिण आणि आग्नेय आशियात ओमकार स्वरूपात हि देवता मानली जाते. आणि या देवतेची अनेक प्राचीन मंदिरे देखील आहेत. गणपतीपुळे हे त्या स्थानापैकी एक आहे. गणपतीपुळे या स्थानाच समान वैशिष्ट्य म्हणजे पश्चिमेला लाभलेला अरबी समुद्र.

पिराच्या पाठीवर असलेली हिरवीगार निसर्गाची शाल आणि त्यात गणपतीपुळे सारखे उत्तम स्थापत्यकलेचा मंदिर. महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावर असलेल्या गणपतीपुळे या ठिकाणाचा उल्लेख पुराणात पश्‍चिम द्वारदेवता असा केला गेला आहे. पाचशे वर्षांपूर्वी गणपतीपुळे हा भाग आधी दुर्लक्षित केला गेला असून येथे घनदाट झाडी, छोटीशी टेकडी, आणि लांबलचक समुद्रकिनारा हा भाग भांडारपुळे म्हणून ओळखला जात होता. बाजूच्या गावातील रहवासी इथे आपली गुरे ढोरे सरायला सोडत.

या गावाची वहिवाट आधी बाळभटजी भिडे यांच्या हाता खाली होती. हे गणपती देवाचे खूप मोठे भक्त होते, त्यांची गणपती देवावर खूप जास्त श्रद्धा होती. कुठल्याही कार्याची सुरुवात ते गणराया स्मरण करूनच करायचे. एकदा असच एक गावातला गुराखी त्यांच्याजवळ आला आणि त्यानं भटजींना एक आश्चर्यजनक अशी गोष्ट सांगितली‌. तो म्हणाला की माझी गाय अनेक दिवस  डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका केवड्याच्या शिळेवर रोज दुधाची धार सोडते.

हे ऐकून भटजी त्या गुराख्याला आणि गावातल्या काही लोकांना घेऊन त्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणाची साफसफाई करताना भटजींना  स्वयंभूची मूर्ती सापडली. भटजींनी त्वरितच जागेची साफसफाई करून झावळ्यांचा आधार घेऊन छोटसं मंदिर स्थापन केल त्या मूर्तीची पूजा देखील केली. तर अशा प्रकारे गणपतीपुळे मंदिराची स्थापना झाली.

मंदिराची वैशिष्ट्ये:

सुमारे पाचशे वर्षांपूर्वी बाळभटजी भिडे यांना ओमकार स्वरूप स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत झाला होता.  मग त्यांनी त्याच ठिकाणी नारळाची झाप वापरून मंदिराची स्थापना करून मूर्तीची पूजा देखील केली. पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सरदार अण्णाजी दत्तो यांनी या मंदिराला सुंदर घुमट बांधून दिला. पेशवेकाळात पेशव्यांचे सरदार गोविंदपंत बुंदेले यांनी या मंदिराचा सभामंडप बांधला. त्यानंतर पुढे माधवराव वासुदेवराव बर्वे हे कोल्हापूर संस्थानाचे कारभारी यांनी देवळाला सोन्याचा मुलामा असलेला घुमटाकार कळस चढवला. रमाबाई यांच्या हस्ते दगडी धर्मशाळा देखील बांधण्यात आली.

श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी नंदादीपाची व्यवस्था केली. आज जे मंदिर आपल्या डोळ्यांसमोर उभ आहे त्याचे बांधकाम १९९८  ते २००३ पर्यंत चालू होतं. हे मंदिर प्राचीन भारतीय स्थापत्य कलेचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून बांधण्यात आले आहे.

मंदिराची वास्तुकला:

रेड आग्रा या खास दगडाचा वापर करून या मंदिराचं बांधकाम करण्यात आल आहे. उंच घुमटाकृती गर्भगार आणि सभामंडपाच्या छतावरील नक्षीकाम यांच्यावर सूर्यकिरण पडल्यावर यांच दृश्य डोळ्यांचं पारणं फिटवणार असतं. मंदिराच्या दक्षिण बाजूस पाच त्रिपुरा आहेत. त्रिपुर पोर्णिमेला त्यावरचे दिवे प्रकाशमान होतात तेव्हा मंदिराची रोषणाई मनमोहित करणारी असते. जानेवारी व नोव्हेंबर महिन्यात सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणे थेट जाऊन स्वयंभू मूर्तीवर पडतात.

मंदिर अगदी समुद्र किनाऱ्याला लागून असल्यामुळे पावसाळ्यात समुद्राला उधाण आल्यावर समुद्राच्या लाटा मंदिराचे चरणस्पर्श करतात. मंदिर डोंगराच्या पायथ्याला लागत असल्यामुळे मंदिराला प्रदक्षिणा घालन म्हणजे संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालन होय. मंदिर प्रदक्षिणेच्या मार्गा वरून होणार समुद्र दर्शन हे अतीशय रमणीय आहे. मंदिराचा प्रदक्षिणामार्ग जांभ्यादगडांनी बांधून घेतला आहे. मंदिराला लाभलेल्या समुद्रामुळे सनसेट हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

गणपतीपुळे पाहाण्यासारखी ठिकाणे :

गणपतीपुळे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी अनेक नागरिक, भक्त या मंदिराला भेट देतात. पर्यटकांना आकर्षित करणारा हे मंदिर अतिशय सुंदर आहे. तसेच मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील विविध प्रकारचे पर्यटन स्थळे आहेत. गणपतीपुळे पासून एक किलोमीटर लांबी वर मालगुंड नावाचं छोटंसं गाव आहे. हे गाव मराठी प्रसिद्ध कवी केशवसुत यांचे जन्मस्थळ आहे कविता आणि काव्य त्यांच्या कणाकणात भेरले होते. त्यांनी आजपर्यंत लिहिलेल्या सगळ्या कविता अजरामर झाल्या आहेत. त्यातल्याच काही कविता म्हणजे “तुतारी”, ” नवा शिपाई” या कविता खूप प्रसिद्ध आहेत. त्याच गावात त्यांचे स्मारक देखील आहे केशवसुत स्मारक.

या स्मारकाचे उद्घाटन मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या हस्ते झाले होते. असे म्हटले जाते की हे स्मारक म्हणजे मराठी कवितेचे तीर्थक्षेत्र आहे जिथे स्मारक स्थित आहे म्हणजेच मालगुंड ही मराठी कवितेची राजधानी मानली जाते. शांत वातावरण, नारळाची मोठमोठी झाडे, समुद्राच्या उंच उंच लहरा बघायच्या असतील तर तुम्ही शास्त्री नदीच्या उत्तरेला असलेल्या वलनेश्वर गावी जाऊ शकतात. हे गाव शिवभक्तांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे महाशिवरात्रीला येथे भक्तांचा कल्लोळ असतो. रत्नागिरी हे बाल गंगाधर टिळक यांचे जन्मस्थान असून गणपतीपुळे पासून हे पंचवीस किलोमीटर दूर आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे वर्णन पुराणकथांमध्ये देखील आहे ही तीच जागा आहे जिथे पांडवांनी वनवास काढला होता. रत्नागिरीमध्ये रत्नदुर्ग किल्ला आणि बाळगंगाधर टिळक यांचे स्मारक देखील आहे. त्याच्या शिवाय वीर सावरकरांनी निर्माण केलेल पतितपावन मंदिर देखील आहे. गणपतीपुळे पासून ३५ किलोमीटर  दूर असलेला जयगड किल्ला संगमेश्वर नदीजवळ स्थित आहे‌. हा किल्ला सतराव्या शतकात  बांधला गेला आहे. असं म्हणतात या किल्ल्यावरून विहंगम समुद्र आणि पूर्ण कोकणचं  चित्रदर्शन होतं.

जर तुम्ही शांत आणि प्राकृतिक सौंदर्याने परिपूर्ण अशा जागेच्या शोधात असाल तर महाराष्ट्रातील अत्याधुनिक गुरु स्वामीस्वरूपानंद यांचा आश्रम पावस या ठिकाणाला जरूर भेट द्या. मालेश्वर हे प्रसिद्ध शिवमंदिर आहे मंदिराच्या बाजूला उंच कडा अन वरुन खाली कोसळणारे शुभ्र धबधबा देखील आहे. हे ठिकाण गणपतीपुळे पासून साठ किलोमीटर लांब आहे. देरवण हे गणपतीपुळे पासून ८५ किलोमीटर लांब असून ही जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रदर्शनासाठी प्रसिद्ध आहे. परशुराम मंदिर हे गणपतीपुळे पासून ११२ किलोमीटर लांब आहे.

गणपतीपुळे समुद्रकिनारा : 

कोकणामध्ये मंदीर म्हंटलं की समुद्रकिनारा हा असतोच. कोकण हे खरं समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. असंच कोकणातील रत्नागिरी  मधील गणपतीपुळे मंदिर हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. मंदिराला निळाशार लांबलचक असा समुद्रकिनारा लाभला आहे. हा किनारा मंदिराची शोभा वाढवत आहे पर्यटकांचे मुख्य आकर्षण जरी गणपतीपुळे असलं तरी मनाला मोहित करणारा हा समुद्र किनारा आहे. दरवर्षी अनेक पर्यटन खास करून या समुद्रकिनाऱ्याला भेट देण्यासाठी येतात.

गणपतीपुळे दर्शन (वेळ, दिवस इ.) :

दरवर्षी गणपती पुळे येथे पर्यटकांची लाखोने गर्दी जमते. दर्शन व हॉलिडेज साठी परफेक्ट स्थळ म्हणजे गणपतीपुळे मंदिर. गणपतीचे दर्शन घेण्याची वेळ सकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत असते. दुपारी १२ वा संध्याकाळी ७ आरतीची ठराविक वेळ आहे, याच वेळेस आरती होते. दुपारची आरती झाल्यावर दुपारी साडेबारा ते दोन या वेळेत खिचडीचा प्रसाद देखील दिला जातो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पालखी दर्शन संध्याकाळी चार वाजता असते. भक्त जनांसाठी प्रत्यक्ष पूजा सकाळी चार ते अकरा वाजेपर्यंत चालू असतं. मंदिराला लागूनच समुद्र असल्यामुळे मंदिर व समुद्र या दोघांचा आनंद एकसाथ घेता येतो.

गणपतीपुळे पिक्चर :

“नवरा माझा नवसाचा” आणि “फुल थ्री धमाल” या दोन मराठी चित्रपटांचे चित्रीकरण गणपतीपुळे येथे झालं आहे. मंदिराच्या आजुबाजुचा परिसर समुद्रकिनारा, रमणीय वातावरण हे सगळ आकर्षित असल्यामुळे हे स्थळ चित्रीकरणासाठी देखील प्रसिद्ध आहे.

मंदिराचे मनोरंजक तथ्य:

स्वयंभू देवता ह्या सृष्टीचा एक भाग असतात. या देवतानां साकार रुपात आणावे लागत नाही किंवा त्यांची स्थापना करावी लागत नाही. तर त्या स्वतःहूनच घडतात म्हणजेच सृष्टीच्या जन्माच्या वेळी त्यांचाही जन्म होतो. गणपतीपुळे हे त्याच स्थानांपैकी एक आहे .

उत्सव, यात्रा:

गणपती पुळे येथे अनेक प्रकारचे सण उत्सव साजरे होतात. त्यातलेच काही सण म्हणजे भाद्रपदी उत्सव. या उत्सवात भाद्रपद शुद्ध १ ते भाद्रपद शुद्ध ५. दररोज रात्री आरत्या व कीर्तनाचा कार्यक्रम असतो. आणि वामन द्वादशीचे दिवशी प्रसाद महाप्रसाद असतो. माघ महिन्यात देखील माघ उत्सव साजरा केला जातो. माघ शुद्ध १ ते माग शुद्ध ५ दररोज रात्री आरत्या , मंत्रपुष्प आणि कीर्तनाचा कार्यक्रम असतो तर माघ शुद्ध ६ रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचा नियोजन केलं जातं तर माघ शुद्ध ७ दुपारी महाप्रसाद व रात्री पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रमाच नियोजन केलं जातं.

विजयादशमी इथे मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. सकाळी श्री खोत भिडे यांच्या समाधीचे पूजन करून भक्तजनांना २१०० बुंदीच्या लाडू चा प्रसाद दिला जातो. सुर, सनई प्रत्येक वाद्याची पूजा केली जाते. संध्याकाळी मंदिरातून पालखी निघते ही पालखी प्रदक्षिणेच्या मार्गावर क्षमीच्या वृक्षाखाली थांबते व या वृक्षाची पाने सोनं म्हणून लुटली जातात. आणि मग हे पानं गणपती मंदिरात येऊन गणपतीला अर्पण केली जातात‌.

अशा प्रकारे पालखी सोहळा संपूर्ण होतो. दीपोत्सव हा सण अश्विन शुद्ध पंधरा ते कार्तिक शुद्ध अशुद्ध पंधरा मध्ये येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमा व त्रिपुरी पौर्णिमा मध्ये साजरा केला जातो. या दिवसांत दररोज संध्याकाळी आरतीच्या वेळी पूर्ण मंदिराला दिव्यांची सजावट देवून दीपोत्सव साजरा केला जातो. गुढीपाडवा व अक्षय तृतीया हे सण देखील इथे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. इथे श्रींची पालखी मिरवणूक सोहळा हे भक्तजनांच मुख्य आकर्षण आहे. ही पालखी वर्षातून सतरा वेळा काढली जाते प्रत्येक संकष्टीला एका वर्षातून १२ वेळा तसेच गुढीपाडवा, दसरा, दीपावलीच्या पहिल्या दिवशी गणेश चतुर्थी व माघ चतुर्थी या पाच दिवशी हा पालखी मिरवणूक सोहळा असतो.

गणपतीपुळे फोटो:

ganpatipule temple information in marathi
ganpatipule temple information in marathi

मंदिर कोठे आहे? कसे जायचे?:

गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात स्थित आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी आपण तिन्ही मार्गांचा उपयोग करू शकतो. हवाई मार्गे जाण्यासाठी रत्नागिरी विमानतळ हे सर्वात जवळच आहे. रेल्वेद्वारे प्रवास करायचा असेल तर रत्नागिरी स्थानक हे गणपतीपुळे पासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई, पुणे, नागपूर या स्थानकांवरून गणपतीपुळेला जाण्यासाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहेत. पुढे बस किंवा टॅक्सी चा वापर करून आपण गणपतीपुळे पर्यंत पोचू शकतो. गणपतीपुळेला भेट देण्यासाठी बस सेवा देखील उपलब्ध आहेत मुंबई व पुण्यावरून गणपतीपुळेला जाण्यासाठी अनेक बस सेवा उपलब्ध आहेत.

गणपतीपुळे होटेल्स:

जर आपल्याला आपल्या हॉटेल्स ची जाहिरात करायची असेल तर आपण खाली कॉमेंट्स करून कळवू शकता

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा गणपतीपुळे मंदिर ganpatipule temple information in marathi language हे मंदिर कुठे आहे? ह्याचे वैशिष्ट्य, त्याचे सौंदर्य, याचा इतिहास,  मंदिरातील रहस्य, मंदिरात घडणारे उत्सव, जत्रा याची थोडक्यात माहिती  दिली आहे. ganpatipule temple information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about ganpatipule temple in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही गणपतीपुळे मंदिर विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या ganpatipule temple in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!