गेटवे ऑफ इंडिया इतिहास Gateway of India History in Marathi

gateway of India history in Marathi गेटवे ऑफ इंडिया इतिहास, आज आपण या लेखामध्ये भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गेटवे ऑफ इंडिया या प्राचीन स्मारका विषयी माहिती घेणार आहोत आणि त्याचा इतिहास देखील जाणून घेणार आहोत. गेटवे ऑफ इंडिया या प्राचीन स्मारकाला भारताचे प्रवेशद्वार म्हंटले जाते कारण ज्यावेळ व्हॉईसरॉय अर्ल ऑफ रीडिंग मुंबई शहराचे नवीन गव्हर्नर झाले होते त्यावेळी ते बंदरावरून याच गेटमधून आले होते आणि ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळाले होते त्यावेळी ब्रिटीशांचे शेवटच्या सैनिकांचे जहाज हे या गेट जवळ असणाऱ्या बंदरावरून गेले होते त्यामुळे ब्रिटीश सैनीक भारतातून बाहेर याच गेटमधून गेले होते आणि म्हणून या स्मारकाला भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते.

मुंबई या शहरामध्ये अनेक ऐतिहासिक समारके आणि बांधकामे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामधील एक म्हणजे गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया या बांधकामाची सुरुवात ब्रिटीश सरकारच्या काळामध्ये झाली आणि हा गेट बहुतेक ज्यावेळी राणी मेरी आणि जॉर्ज (पाचवा) हे भारताला भेट देणार होते त्यावेळी बांधला होता आणि म्हणून या स्मारकाला राणी मेरी आणि जॉर्ज (पाचवा) यांच्या भेटीचे स्मारक म्हणून ओळखले जाते. गेटवे ऑफ इंडिया हे दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी मार्गाच्या शेवटी अपोलो बंदर भागात वॉटरफ्रंटवर आणि अरबी समुद्राजवळ स्थित आहे. चला तर आता आपण गेटवे ऑफ इंडिया विषयी आणखीन माहिती घेवूया.

gateway of india history in marathi
gateway of india history in marathi

गेटवे ऑफ इंडिया इतिहास – Gateway of India History in Marathi

बांधकामाची सुरुवात ३१ मार्च १९११
बांधकाम केंव्हा पूर्ण झाले १९२४
स्मारकाचे उद्घाटन ४ डिसेंबर १९२४
बांधकामाचा खर्च १९१३ मध्ये २.१ दशलक्ष रुपये
ठिकाण भारतामधील महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहरामध्ये आहे.
स्थापत्य शैली मुस्लीम प्रभावांसह इंडो सारासेनिक
का बांधले किंग जॉर्ज वॅड क्वीन मेरीच्या १९११ च्या मुंबच्या शाही भेटीच्या स्मरणार्थ बांधला.
भेटीची वेळ आठवड्याचे सर्व दिवस
प्रवेश शुल्क कोणताही प्रवेश शुल्क नाही

गेटवे ऑफ इंडिया ची बांधकाम माहिती – information about gateway of india in marathi

या स्मारकाचे बांधकाम हे इंडो सारासेनिक शैलीतील असून या स्मारकाची पायाभरणी ३१ मार्च १९११ रोजी करण्यात आली. गेटवे ऑफ इंडिया या स्मारकाची उंची जमिनीपासून २६ मीटर इतकी आहे आणि या स्मारकाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी त्यावेळी एकूण २१ लाख रुपये खर्च झाले होते. भव्य वास्तूच्या संरचनेत स्मारकाचे बांधकाम हे इंडो सारासेनिक शैलीतील आणि मुस्लिम स्थापत्यशैलीचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. स्मारकाचा मध्यवर्ती घुमट सुमारे ४८ फूट व्यासाचा असून त्याची एकूण उंची ८३ फूट इतकी आहे. ४ बुर्ज गेटवे ऑफ इंडियाच्या संपूर्ण संरचनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

स्मारकाचे नाव गेटवे ऑफ इंडिया (gateway of India)
ठिकाण मुंबई
बांधकाम शैली इंडो सारासेनिक शैली
स्थापना ३१ मार्च १९११
उंची याची उंची जमिनीपासून २६ मीटर इतकी आहे

गेटवे ऑफ इंडिया या स्मारकाचा इतिहास – history of gateway of india in marathi

गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामामागील मुख्य उद्देश किंग जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या बॉम्बे (मुंबई) भेटीचे स्मरण करणे हा होता. गेटवे ऑफ इंडिया हे स्मारक बहुतेक ज्यावेळी राणी मेरी आणि जॉर्ज (पाचवा) हे भारताला भेट देणार होते त्यावेळी बांधला होता आणि म्हणून या स्मारकाला राणी मेरी आणि जॉर्ज ( पाचवा ) यांच्या भेटीचे स्मारक म्हणून ओळखले जाते.

या स्मारकाच्या बांधकामाची (पायाभरणी) सुरुवात इ.स १९११ मध्ये झाली आणि इ.स १९१४ मध्ये भारत सरकारने या डिझाईनला मान्यता दिली आणि मग इ.स १९२० मध्ये या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले आणि इ.स १९२४ मध्ये या ऐतिहासिक स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले आणि या गेटचे उद्घाटन व्हॉईसरॉय अर्ल ऑफ रीडिंग ( जे मुंबई या शहराचे गव्हर्नर होते ) यांच्या हस्ते करण्यात आले होते.

व्हॉईसरॉय अर्ल ऑफ रीडिंग मुंबई शहराचे नवीन गव्हर्नर झाले होते त्यावेळी ते बंदरावरून याच गेटमधून आले होते तसेच भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर ब्रिटीशांचे सैनिक याच गेट मधून बाहेर गेले होते. या ऐतिहासिक स्मारकाला एक चांगला इतिहास लाभल्यामुळे हे मुंबई मधील एक आकर्षक पर्यटन क्षेत्र बनले आहे आणि सध्या या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी खूप गर्दी असल्यामुळे सध्या त्या ठिकाणी अनेक स्टॉल्स आणि असंख्य पर्यटकांना सेवा देणाऱ्या छायाचित्रकारांच्यासाठी ते एक महत्वाचे उत्पन्नाचे स्त्रोत्र बनले आहे.

गेटवे ऑफ इंडिया या स्मारकाला भेट द्यावी ?

लोक दिवसाच्या कोणत्याही वेळी स्मारकाला भेट देवू शकतात. गेटवे ऑफ इंडिया या स्मारकाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ हि नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत भेट दिली तर तो चांगला काळ ठरेल कारण मान्सून नंतरचे वातावरण हे अतिशय चांगले आणि आल्हाददायक असते.

गेटवे ऑफ इंडिया हे ऐतिहासिक स्मारक पहायला कसे पोहचायचे ?

मुंबई हे शहर राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांनी चांगले जोडलेले आहे त्यामुळे आपण कोणत्याही शहरातून मुंबई या शहराला बसने किंवा स्वताच्या कारणे अगदी सुलभ रित्या भेट देवू शकतो कारण वैयक्तिक पर्यटकांसाठी बसने मुंबईला भेट देणे सर्वात किफायतशीर आहे.

जर तुम्हाला विमानाने यायचे असल्यास भारतातील कोणत्याही विमानतळावरून विमानाने मुंबई ला येवू शकता. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्याचे पूर्वीचे नाव हार आंतरराष्ट्रीय विमानतळ असे होते जे मुंबई महानगर क्षेत्राला सेवा देणारे प्राथमिक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तेथे आपण विमानाने येवू शकतो आणि तेथून टॅक्सी किंवा बसने गेटवे ऑफ इंडिया हे स्मारक पाहण्यासाठी जावू शकतो.

मुंबई हे रेल्वेने भारताच्या इतर भागांशी चांगले जोडलेले आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस हे मुंबईतील सर्वात लोकप्रिय स्थानक आहे आणि भारतातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवरून मुंबईला जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत. मुंबई राजधानी, कोकण कन्या एक्स्प्रेस, मुंबई दुरांतो या काही महत्त्वाच्या मुंबई गाड्या आहेत. त्यामुळे आपण मुंबई मध्ये रेल्वेने येवू शकतो.

आम्ही दिलेल्या gateway of india information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गेटवे ऑफ इंडिया इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gateway of india history in marathi या article मध्ये information about gateway of india in marathi update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

Ad Blocker Detected!

Please Disable Ad Blocker to use this site as free

Refresh

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!
%d bloggers like this: